तरुण, तरुणींनो जागे व्हा

एक कंपनी, करोडोंचा मुनाफा हे यश तुम्हाला दिसते आणि त्यापाठी काय दडलेले आहे हे नाही दिसत. समजा एका शहरात किंवा औद्योगिक वसाहतीत ५,००,००० आकड्यात पाच लाख कामगार आहेत, त्यापैकी ९०० नऊशे हे कायमस्वरूपी आहेत. उरलेले ४,९९,१०० हे कंत्राटी कामगार आहेत. त्यामध्ये कंत्राटदारांची संख्या हि हजारांच्या घरात.
हेच कंत्राटदार २५,००० पंचवीस हजारांच्या पगाराच्या पावत्यांवर सही घेणार आणि देणार जे काही सरकारने कमीत कमी जे ठरवून दिले आहे तेवढेच ते हातात देतात. ७,००० सात हजार समजू. हाच पगार आताच्या कामगारांना भेटतो आणि बाकी कंत्राटदारांच्या खिश्यात जवळपास १८,००० अठरा हजार रुपये. आणि कंपनीच्या खिश्यात करोडो रुपयांचा मुनाफा.
एक भारताच्या जमिनीवर बनणारे मोठे बांधकाम, त्याचे कंत्राट निघते. जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा जास्त काम हे खाजगी कंपनीला देण्यात येते. आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी सरकारची भागेदारी असते. म्हणजे कामांची संख्या खाजगी मध्ये जास्त आणि त्यामध्येही कंत्राटदार.
कधीकाळी कामगारांना पगार आणि आदर खूप होता, पण काळानुसार कामगार ज्यांच्यामुळे संपूर्ण कंपनी चालायची आणि उत्पादने बनवायचे आता त्यांची गणना हि श्रमिक मध्ये व्हायला लागली आणि व्यवस्थापन विक्री विभाग जिथे श्रमापेक्षा मेंदूचा वापर जास्त होतो अश्यांना पगार जास्त मिळायला लागला.
आता तर हि तफावत प्रचंड आहे. ज्या कामगारांमुळे कंपनी चालायची आता त्यांना कंत्राटी पद्धतीवर ठेवण्यात येते व पगार तर अतिशय तुटपुंजा देतात, अनेक वर्षे तर त्यांना कायमस्वरूपी पण केले जात नाही.
ह्यावर अधिक माहिती तुम्हाला डाव्या चळवळीतील लोकांकडून भेटेल. आणि मुंबई सारख्या ठिकाणीही असे घोटाळे चालू असतात.
आपल्या भारतात नोकऱ्यांची कमी नाही. थोडा अभ्यास केला तर तुम्हाला अजून पक्की माहिती भेटेल. इंटरनेट वर सर्वच खरे पोस्ट करत नाही. त्यामुळे आपआपला मेंदू वापरलेला बरा.
एकदा का तुम्ही विचार करायचे सोडून दिले तर दुसरा तुमच्या अगोदर मेंदूचा ताबा घेतो आणि मग शरीराचा. कायद्यानुसार ८ तास कामाचे आहे पण अनेक कामगार हे त्यापलीकडे काम करत जातात, किंवा त्यांना करावेच लागते.
शोषण फक्त अशिक्षित आणि कमी शिक्षित कामगारांचे नाही होत तर उच्च शिक्षित अधिकाऱ्यांचे पण होते.
आपण प्रत्येकाला मानसिक गुलामीतून मुक्त करू शकत नाही, ज्याने मनापासून ठरवले तोच मानसिक गुलामीतून मुक्त होऊ शकतो. आणि आताच्या कंपन्या ह्या कामगारांचे मानसिक आणि शारीरिक उर्जा हि संपूर्ण पणे शोषून घेतात जेणेकरून तो फक्त घरी गेल्यावर झोपू शकतो.
विचार करा. पटले तर मानसिक गुलामीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करा. एकच आयुष्य भेटले आहे ते मुक्त पणे जगा. ह्या संपूर्ण जगात तुमच्या सारखा दुसरा कोणी नाही इतके विशेष महत्वाचे आहात.
वरील लेखामध्ये कसा पैश्यांचा प्रवाह हा ठराविक ठिकाणी जातो हे नमूद करून दिले आहे. लोक कसे श्रीमंत होतात हेही तुम्हाला समजले असेल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


मुक्तपणे उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक करा ना की जखडून गेल्यासारखे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


आकाश हि मर्यादा नाही आहे,
तुमचा दृष्टीकोन हि मर्यादा आहे.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७फरक फक्त सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोनाचा असतो,
नाहीतर पायऱ्या त्याच असतात
ज्या एखाद्याला वर घेवून जातात
आणि एखाद्याला खाली घेवून येतात.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

तुम्ही तुमच्या उद्योग, व्यवसाय आणि आयुष्यातील इतर आर्थिक व्यवहारांशी ट्यून आहात कि नाही?


तुम्ही तुमच्या उद्योग, व्यवसाय आणि आयुष्यातील इतर आर्थिक व्यवहारांशी ट्यून आहात कि नाही?
तुमची कंपने उद्योग, व्यवसाय आणि आयुष्यातील इतर आर्थिक व्यवहारांसोबत जुळतात कि नाही?
तुमच्या गिऱ्हाईकांसोबत तुमची कंपने जुळतात कि नाही?
तुमचे खाजगी आणि अति खाजगी आयुष्यामधील असणार्या प्रत्येक स्त्री पुरुषाशी मग ते घरचे संबंध असो बाहेरचे ह्यांसोबत तुमची कंपने जुळतात कि सतत अडथळे निर्माण होतात?
जर कंपने जुळत असतील तर तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे आयुष्य किंवा स्वप्नातील आयुष्य हे वास्तवात जगत आहात आणि नसेल तर तुम्हाला सतत विरोधाचा सामना करावा लागत असेल.
धन्यवाद,
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
निर्वाणा आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७युरोप आणि अमेरिकेत लाखोंच्या संख्येने बेरोजगारांचे मोर्चे निघत असतात पण ह्याची दखल घेतली जात नाही. इथल्या भांडवलदारांनी आपले उद्योग, व्यवसाय हे विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये हलवले आहेत. कारण सोपे आहे जागतिकीकरणाच्या नावाखाली फक्त आणि फक्त आपला नफा वाढवण्यासाठी, चलनाच्या तफावतीमुळे प्रचंड नफा मिळवण्यासाठी आणि जिथे लोकसंख्या जास्त आहे, जिथली न्यायप्रणाली हि कमकुवत आहे तिथे ते आपला उद्योग, व्यवसाय हलवले गेले.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७इंग्लिश हि फक्त भाषा आहे, ज्ञान नाही.
ज्याला इंग्लिश भाषा उत्तम लिहिता, वाचता आणि बोलता येत असेल तर जरुरी नाही कि तो ज्ञानीच असला पाहिजे आणि जो मातृभाषेत बोलत असेल तो अडाणी, गावठी आणि अज्ञानी असेल.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

<! - ->


अनेक नावाजलेल्या जगप्रसिद्ध उत्पादन बनवणाऱ्या कंपन्यांवर जगभरात कामगारांचे शोषण, बाल कामगार ह्यावर केसेस चालू आहेत. हे सर्व विकसनशील आणि अविकसित देशातील जनता किंवा त्या देशातील नागरिक आहेत. जेव्हाही नामांकित कंपनीचे तुम्ही उत्पादन घ्याल तेव्हा हि गोष्ट लक्ष्यात ठेवाल. ह्या बातम्या कुठल्याही मोठ्या वृत्त वाहिनी आणि वृत्त पत्रामध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि दिसल्या तरी अगदी कमी वेळेसाठी आणि छोटी बातमी देण्यात येते कारण वृत्त वाहिन्या आणि वृत्त पत्र हे बड्या भांडवलदारांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या हातात आहेत. जे मोठ मोठ्या जगप्रसिद्ध विद्यापीठातून शिकलेले आहेत त्यांना फक्त कंपनीचा नफा कसा वाढेल ह्याचाच साठी ठेवले जाते.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७बंद, संप चे दुष्परिणाम
मालक, सत्ताधारीवर आणि सामान्य कामगारांवर.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
फोटो मालकीहक्क (http://cdn.c.photoshelter.com/…/John-Leech-Cartoons-Punch-1…)


जे तज्ञ असतात त्यांचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. कच्चे तेल आणि उर्जा ह्या क्षेत्रातील मोठ्या उद्योजकांनी आणि भांडवलदारानी पर्यावरणवादि तज्ञ, ज्यामध्ये उच्च शिक्षित संशोधक पण येतात ह्यांना विकत घेवून सतत टीव्ही वृत्तपत्र ह्यामध्ये त्यांचे लेख, वादविवाद हे त्यांच्या उत्पादनापासून पर्यावरणाला काही धोका नाही असे सांगत होते.
सामान्य लोक अश्या तज्ञांवर विश्वास ठेवणारच. कारण सामान्य लोक स्वतःच्या मेंदूने कधीच विचार करत नाही किंवा त्यांना तितका वेळच दिला नसतो. पण आता परिस्थिती अशी आली कि मालदीव सारखे व्हीनस सारखे शहर बुडू लागली आहेत ह्यावरून प्रदुषणाचा किती भयंकर प्रभाव झाला आहे हे समजून येत आहे.
समाजशास्त्राचे तज्ञ सुद्धा दोन्ही कामासाठी वापरत होते. त्यांना फक्त सामान्यांना भूल देत ठेवायचे होते आणि त्यामधून आपला उद्योग व्यवसाय हा वाढवायचा होता. हेच उद्योजक आपले उत्पादन एके ४७ तस्करीच्या मार्गाने अतेरीक्यांना विकायचे आणि हेच उद्योजक आपले उत्पादन कायदेशीर कराराद्वारे एखाद्या देशाच्या सैन्याला देखील विकायचे.
ह्याच तज्ञांचा वापर हा ढालीसारखा करतात. जर एखादी योजना किंवा करार करायचा असेल तेव्हा ह्यांना पुढे करून आपले काम करून घेतले जाते पण ह्या तज्ञांना वाटते कि आपले ऐकून त्यांनी हा निर्णय घेतला आहे पन वास्तवात असे नसते.
ते ह्यासाठी करतात कि जे आपण करतो ते फसले तर ह्याची सर्व जबाबदारी हि त्या तज्ञांवर येईल आणि मुख्य सूत्रधार हा आरामात बाजूला होईल. अश्या जगभरात आणि भारतातही अनेक घटना झालेल्या आहेत पण सामान्य माणसांना ते समजून येत नाही. त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे असते.
सामान्य मनुष्य हा फक्त भावनेवर चालतो. त्याला प्रत्येक वेळेस एक कोण न कोणतरी नेता लागत असतो कारण तो मानसिक दृष्ट्या अपंग असतो. तो फक्त जाती धर्माच्या गर्दीमध्ये स्वतःला सुरक्षित मानतो.
भांडवलदार, राजकारणी ह्यांना हे सामन्यांचे मानसशास्त्र उत्तम माहित असल्यामुळे ते सतत राज्य करत असतात. त्यांना माहित आहे कि त्यांची आताची पिढी आणि पुढील सात पिढ्या आरामत सामन्यांवर राज्य करतील.
म्हणून तुम्हाला जिथे तिथे दिसेल कि मोठ मोठे नेते जेवढे भांडत नाही त्यापेक्षा कितरी त्वेषाने कार्यकर्ते भांडत असतात. नेत्यांवर जे गुन्हे लागतात त्या प्रत्येक गुन्हाला राजकीय गुन्हे म्हंटले जाते ज्यामुळे त्यांच्या कारकीर्द वर काहीही फरक पडत नाही आणि कार्यकर्ते जे गरीब, मध्यवर्गीय घरातून येतात त्यांच्यावर इंडियन पिनल कोड द्वारे गुन्हे दाखल केला जातात.
तुम्हाला आयुष्य एकच भेटले आहे ते असे दुसर्यांसाठी वाया घालवायचे कि हुशार बनून आलेली परिस्थिती बदलवत आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे? निर्णय तुमचा.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७

तुम्हाला माहित आहे का?लहान मुल आणि तरून ह्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि डोळ्यांतील चमक हि कमी किंवा नाहीशी झाली आहे, कारण आहे तणाव, धकाधकीचे आयुष्य.

हा ताण आता १० वर्षांखालील मुलांमध्येही पोहचला आहे.

आजारांचे प्रमाणही वाढले आहे. आपल्यामधील असलेल्या नैसर्गिक आजार आणि जखम बरे करण्याची क्षमता हि औषधे आणि मलम ह्यांच्या अति वापरामुळे कमी कमी होत चालली आहे. (मोठे आजार किंवा जखमा वगळता.)

नैसर्गिक जागे होणे, झोपणे खाणे पिणे ह्यांच्या वेळा बदललेल्या आहेत. ह्याचा परिणाम हा संपूर्ण मानवजातीवर होत आहे व नवीन येणाऱ्या पिढीवरही.

आपल्या नैसर्गिक भावनिक आणि शारीरिक गरजाही निट पूर्ण होऊ शकत नाही.

तणावामुळे प्रजनन क्षमतेचे प्रमाण हे कमी कमी होत चालले आहे.

पुढील काही वर्षांमध्ये नवजात मुल हे फक्त शास्त्रीय पद्धतीनेच जन्माला येत जाईल.

मैदानी खेळ ज्यामुळे मानसिक आणि शारीरक संपर्क व्हायचा त्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.

भावनांची अदलाबदल होत नाही आहे.

वरून समाजाचा दबाव हा वेगळा.

हे आजचे वास्तव आहे. सगळीकडे अविश्वासाचे वातावरण आहे. पैश्याचे महत्व वाढले आहे.

ह्याला बदलती सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे. मनुष्य हा दिवसेन दिवस निसर्गापासून लांब चालला आहे. त्याला नैसर्गिक गरजांपेक्षा भौतिक गरजांमध्ये जास्त रस आहे.

आता नैसर्गिक गरजांचेसुद्धा बाजारीकरण झाले आहे. अनेक कंपन्या माणसाच्या खाजगी भावनांचे जाहिरातींमध्ये वापर करून घेत आहे.

मनुष्याची विचार करण्याची क्षमता हि कमी कमी करून नष्ट करण्यात येत आहे. त्याला एखाद्या नेत्याची गरज लागलीच पाहिजे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

ह्याला पर्याय एकच आत्मविकास. नैसर्गिक कायदा.

ध्यान व इतर आत्मविकासाच्या तंत्राद्वारे आपण आत्मविकास घडवून आणू शकतो. आत्मविकास घडवून आणण्यासाठी कमीत कमी ३ महिने द्यावे लागतात तेही तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली.

अनेकांना ३ किंवा ६ दिवसांच्या ५० किंवा १०० लोकांच्या गर्दीमध्ये आत्मविकास करण्यासाठी जातात. काही दिवस बरे वाटते मग परत येरे माझ्या मागल्या.

प्रत्येक मनुष्य हा भावनिक दृष्टीने वेगवेगळा असतो, त्याच्या शारीरिक आणि मानसिक नैसर्गिक गरजा वेगवेगळ्या असतात. त्याचे बालपण हे वेगळ्या परिस्थितीमध्ये गेलेले असते. त्याची आताची परिस्थिती पण वेगळी असते.

आणि इतक्या वर्षांचे जे नकारात्मक गुण ६ दिवसात जावू शकतात?शक्य नाही. पण योग्य समुपदेशनाद्वारे आपण आपल्या अंतर्मनाचे दरवाजे उघडू शकतो. अनेक खाजगी विषयांवर हात घालून खोलात शिरून मुळासकट समस्या हि दूर करू शकतो. त्यासाठी कमीत कमी ३ महिने व काही बैठकीनंतर शक्यतांचे प्रमाण हे चमत्कारिक रित्या वाढते.

आकर्षणाचा सिद्धांत तेव्हाच काम करतो जेव्हा तुम्ही निसर्गनियमांचे पालन करायला लागता. आणि एकदा का आकर्षणाच्या सिद्धांताने काम करायला सुरवात केली मग मागे वळणे शक्यच नाही. तुमचे आयुष्य हे कायमसाठी बदलून जाते.

मग वाट कसली बघत आहात करा तुमच्या अंतर्मनाला मुक्त. जग मनमोकळे पणाने तुमच्या स्वप्नांचे आयुष्य. तुम्हाला जे पाहिजे ते अमर्याद स्वरुपात मिळवा.

धन्यवाद
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


चार प्रकारची समाजात लोक असतात आहेत आणि राहणारच
१) वाम, अवैध आणि गुन्हेगारी मार्गाने पैसा कमावणारे
२) सरळ मार्गाने पैसा कमावणारे
३) चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही मार्गांनी पैसे कमावणारे
४) परिस्थितीनुसार चांगल्या आणि वाईट मार्गाने पैसा कमावणारे
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७तुम्ही जर चिंता, नैराश्य, भीती आणि कमी आत्मविश्वास ह्याने ग्रस्त असाल तर ह्या समस्येचे मूळ नक्की तुमच्यामध्ये आहे कि तुम्ही ज्या मुर्खांसोबत राहता त्यांच्यामध्ये आहे हे अगोदर तपासून घ्याल.
तुम्हाला मार्ग नक्की सापडेल.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत 
८०८०२१८७९७नुसते बी ने झाड नाही उगवत, त्यासाठी तुम्हाला ते पेरावे लागेल,
सुपीक जमीन, पाणी, उन आणि सूर्यप्रकाश ह्या नैसर्गिक मुफ्त
आणि वाढीसाठी गरजेच्या असलेल्या गोष्टी भेटल्या कि बी चे रोपटे,
रोपट्याचे झाड आणि झाडाचा वटवृक्ष होतो हे निसर्ग नियम अटळ आहे,
आणि जगाच्या पाठीवर सगळीकडे सारखे आहे.
तसेच उद्योग धंद्याचे आहे जर तुम्ही जर तुम्ही उद्योग धंद्याच्या वाढीसाठी
लागणाऱ्या पूरक गोष्टी पुरवत गेलात तर त्या उद्योग धंद्याचा वटवृक्ष व्हायला वेळ नाही लागणार.
उद्योगाचे बी म्हणजे तुमची कल्पना आणि वाढण्यासाठी गरजेच्या गोष्टी म्हणजे
इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, जबाबदारी, लीडरशिप क्षमता, प्रोस्ताहन परिवाराकडून,
नातेवाइकाकडून, मित्रमंडळीकडून व समाजाकडून ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते, खास
करून तुम्हाला घरच्यांकडून पूर्णपने समर्थन व प्रोस्थाहन भेटले पाहिजे. जर तुमचा परिवार
पूर्णपणे एक आहे, सगळे उदारमतवादी आहेत व प्रोस्ताहन देणारे आहेत तर तुम्ही आनंदी,
यशस्वी व समृद्ध जीवन जगू शकता. ह्यामध्ये काही अंतराळाचे विज्ञान नाही आहे. कोणीही समजू शकते.

- अश्विनीकुमार

निर्वाणा
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षकएसबीआय (SBI) ने ७,०१६ करोड रुपये (सात हजार सोळा करोड रुपये) बड्या उद्योगपतींचे आणि त्यांच्या कंपन्यांचे माफ केले आहे. अजून बाकी सरकारी, निमसरकारी आणि खाजगी बँकेच्या बड्या कर्जदाराबद्दल शहनिशा तुम्हीच करून घ्याल.
"मानसिक दृष्ट्या गुलाम हा दुसर्यांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवतो,
मानसिक दृष्ट्या स्वतंत्र मनुष्य हा स्वतः माहिती गोळा करतो."
खालील इमेज मध्ये तुम्ही त्यांची नावे बघू शकता.
आरटीआय म्हणजे माहितीचा अधिकार वापरून तुम्ही पक्की माहिती मिळवू शकता. कारण इंटरनेट वर खोटी माहितीही भेटू शकते.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७फक्त मूर्खच काळा पैसा किंवा इमानदारीचा पैसा साठवून ठेवतात.
बाकी ह्या नाहीतर त्या मार्गाने गुंतवून मोकळे होतात.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७

बेडूक आणि विंचू ह्यांची कथाबेडूक आणि विंचू हे खूप चांगले मित्र (ज्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता अशी व्यक्ती घरची किंवा बाहेरची.) असतात. विंचूला एकदा नदी पार करून पलीकडे आपल्या नातेवाईकांना भेटायला जायचे असते.
तो आपली समस्या बेडकासमोर मांडतो.
विंचू : मला नदी पार करून पलीकडे माझ्या नातेवाईकांना भेटायला जायचे आहे. पण समजत नाही कि मी नदी पार कशी करू.
बेडूक : तू बरोबर बोललास. मी पण तुला मदत केली असती पण तू मला डंख मारू शकतो म्हणून मी मदत नाही करू शकत.
विंचू : आपण इतके वर्षांचे मित्र आहोत. मी तुला डंख कसे मारणार? तू माझ्या मैत्रीवर विश्वास ठेवू शकतो.
बेडूक : ठीक आहे. चल बस पाठीवर. मी आताच तुला नदी पार करून देतो.
विंचू बेडकाच्या पाठीवर बसतो आणि बेडूक नदीत उतरून पोहायला लागतो. नदीच्या मध्यभागी गेल्यावर विंचू डंख मारतो. आणि बेडूक तडफडायला लागतो.
बेडूक : अरे मूर्ख तू हे काय केलेस, तू मलाच डंख मारलास. मैत्रीचा विश्वासघात केलास. माझ्यासोबत तू पण बुडून मरशील हे तुलाही माहित होते ना?
विंचू : मित्रा मला माफ कर. डंख मारणे हि काही माझी सवय नाही आहे कि जिला मी ताब्यात ठेवू शकतो. हा माझा स्वभाव आहे, ह्यामुळे नकळत माझ्याकडून कृती होवून जाते.
ते दोघेही बुडून मरून जातात.
बोध :
जर स्वभाव चांगला असेल जगभरातील व्यसन जरी असतील तरी ती व्यक्ती डंख मारत नाही. पण जर स्वभाव वाईट असेल आणि निर्व्यसनी असेल तर तो डंख मारत राहिल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्याकडे दोन पर्याय आहे. पहिला दुसर्यांच्या अनुभवातून शिका, ह्याला हुशार समजूतदार म्हणतात. दुसरा स्वतः अनुभव घ्या आणि शिका, ह्याला मुर्खपणा म्हणतात.
हा नियम जगभरात सगळीकडे सारखाच आहे. मनुष्य घरचा असो किंवा बाहेरचा स्वभाव चांगला असेल तर चांगलाच वागेल आणि वाईट असेल तर वाईटच वागेल. इथे तुमच्या भावनांना कींमत नाही.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७निष्काळजी लोकांचा पैसा डूबला,
सावध लोकांचा पैसा वाचला.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७अजूनपर्यंत काळा किंवा सफेद पैसा कमावणारा मूर्ख मनुष्य मला भेटला नाही. ते हुशारच असतात. पैसा त्यांच्याचकडे जातो जो त्याची कदर करतो. काळा पैसा सफेद करण्याचे अनेक मार्ग असतात, ते मार्ग ज्यांनी ज्यांनी वापरले असतील ते आता आरामत आहेत, पण जे गर्विष्ठ असतात त्यांचा पैसा हा एकतर कचऱ्यात किंवा जाळण्यात जातो.
असेच सफेद पैश्यांचेदेखील आहे. जो योग्य रित्या हाताळतो त्याच्याच हातात पैसा वाढत जातो, बकिंच्याचा पैसा वाळूसारखा हातातून निसटून जातो.
पैश्याला माहित नाही कि तो कुणाकडे जातो ते, जो मनापासून कुठलाही मार्ग वापरून किंवा ज्यावर त्याचा विश्वास आहे असा मार्ग वापरून कमावण्याचा प्रयत्न करेन त्याच्याकडे पैसा जाणारच.
असेच निसर्गाचे देखील आहे, गुरुत्वकर्षनाच नियम सगळ्यांनाच सारखा आहे. तो हे नाही बघत कि हा सज्जन मनुष्य आहे किंवा वाईट आहे, तो दोघांनाही एकसमान रित्याच खालीच खेचणार.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७आयुष्य जगताना संपर्कांत येणाऱ्या लोकाचे चेहरे इतक्या लवकर लक्ष्यात ठेवू नका. सकारात्मक अनुभव असतील तर ते चेहरे दिसल्यावर तुम्हाला तेच आठवेल आणि त्यानंतर विचारांची शृंखला सुरु होवून जाईल. हि शृंखला आपल्यासाठी चांगली आहे. दुसरी शृंखला हि चांगले वाईट अनुभव शिकल्याची असेल हि हि एक प्रकारे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. पण जर नकारात्मक असतील तर ते गुरूत्वाकर्षनासारखे सारखे काम करेल आणि ती नकारात्मकते शृंखला तुम्हला तळापर्यंत घेवून जाईल. मग ते घरचे असो किंवा बाहेरचे. आत्मविकासाला नातेसंबंध माहित नसतात. तो जगभरात एकसारखाच काम करत असतो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७पैश्यांच्या बाबतीत काही स्पष्टीकरन देण्याचा प्रयत्न करतो, जो तटस्थ आहे, जो मुक्त मनाचा आहे त्याला समजून येईल.
एके ४७ रायफल हि चांगला मनुष्य चांगल्या कामासाठी वापरेल आणि वाईट मनुष्य हि वाईट कामासाठी वापरेल.
संविधान ह्याचा वापर चांगला मनुष्य हा चांगल्या वापरासाठी करेल आणि वाईट मनुष्य हा वाईट वापरासाठी करेल.
असेच काही चित्र हे कायदा सुव्यवस्था, न्यायपालिका ह्याबाबतीतही आहे.
पैसा पण अशीच वस्तू आहे. ह्याचाही वापर हा चांगल्या आणि वाईटासाठी करू शकतो.
चार प्रकारची समाजात लोक असतात आहेत आणि राहणारच
१) वाम, अवैध आणि गुन्हेगारी मार्गाने पैसा कमावणारे
२) सरळ मार्गाने पैसा कमावणारे
३) चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही मार्गांनी पैसे कमावणारे
४) परिस्थितीनुसार चांगल्या आणि वाईट मार्गाने पैसा कमावणारे
हि सर्व लोक कालांतराने आप आपले मार्ग बदलत असतात. हा निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही जर जीव शास्त्राचा अभ्यास केला तर आढळून येईल. अँटिबायोटिक्स ह्या जास्त पावर च्या गोळ्या घेवून घेवून, अतिरेक करून ते विषाणू देखील आपल्या मध्ये बदल करत, आपली जनुके बदलत त्यांची पुढील पिढी हि अँटिबायोटिक्स ला प्रतिसाद देत नाही, त्यावेळेस अजून जास्त पावर ची औषधे निर्माण करावी लागतात. ह्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावर होतोच.
आता वरील चार प्रकारची मानसिकता काळानुसार जगण्याच्या नियमानुसार कायमस्वरूपी निर्माण झालेली आहे. कायमस्वरूपी म्हणजे आपण जो पर्यंत जिवंत आहोत तो पर्यंत. त्यापुढील भविष्य कोणीच सांगू शकत नाही आणि वर्तवू शकत नाही.
आणि हे फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. आंतरराष्ट्रीय उद्योजक, व्यवसायिक हे बंदुका अतेरीक्यांना विविध मार्गांनी विकतात आणि सैनिकांनाही विविध मार्गांनी विकतात.
जगाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर असे जाणवून येईल कि गरीब ते मध्यमवर्गीय हा प्रत्येक वेळेस ह्या न त्या कारणाने भरडला गेला आहे.
गरीब, मध्यमवर्गीय हा रेल्वे ने प्रवास करतो तिथेही गर्दी. श्रीमंत, सत्ताधारी हे आप आपल्या आलिशान गाड्या, विमाने आणि हेलिकॉप्टर ने प्रवास करतो, तिथे फक्त तो, त्याचे कुटुंब किंवा इतर साथीदार असतात.
गरीब, मध्यम वर्गीय हे सतत तुटवड्यामध्ये असतात तर श्रीमंत आणि सत्ताधारी ह्यांना प्रत्येक गोष्ट हि सर्व मार्गांनी आणि भर भरून भेटत असते.
गरीब मध्यम वर्गीय मेला तरी कुणाला काही फरक पडत नाही. श्रीमंत आणि सत्ताधारी मेला तर त्याची दखल संपूर्ण मिडिया घेते, आणि त्यांची नावे ह्या नाही तर त्या कारणाने सामाजिक उपक्रमाद्वारे सतत चर्चेत असतात.
गरीब आणि मध्यमवर्गीय तरून तरुणींना शून्यातून किंवा आहे तिथून सुरवात करावी लागते. श्रीमंत आणि सत्ताधार्यांना शेअर चा पैसा, उच्च पद हे वारसा हक्काने मिळते.
हा फक्त ढोबळ मानाने फरक सांगितला आहे. अजून खोलात शिरलं तर मानुसकिवरून आपला विश्वास कायमचा उडून जाईल.
सांगण्याचा उद्देश एवढाच कि आत्मविकासात मग्न रहा. परिस्थितीनुसार बदलत रहा. आपले आयुष्य हे काही कुठल्या प्रोस्ताहन दिलेल्या पुस्तकाप्रमाणे चालत नाही. परिस्थितीनुसार आपल्या ज्ञान आणि अनुभवाचा वापर करा.
दिवस आहे तशी रात्रही आहे. चांगले आहे तिथे वाईटहि आहे. मनुष्य म्हंटला कि चुकणारच. प्रयत्न करणे कधीही थांबवू नका. जास्तीत जास्त निसर्ग नियमांचे पालन करा, त्या गरजा पूर्ण करा.
इतिहास साक्षी आहे कि जग कोणीही बदलू शकले नाही. निसर्ग साक्षी आहे कि जो काळानुसार बदलत गेला तो आणि त्याच्या पिढ्या टिकल्या, बाकी सगळे काळाच्या ओघात संपले.
बाकी निर्णय आपला.
धन्यवाद,
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७अणुवर विश्वास ठेवू नका, त्याने सर्वकाही बनवले आहे.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत 
८०८०२१८७९७अनेक स्त्रियांनी पैसे हे साठवून ठेवले होते हे आता नोटा बंद करण्याच्या निर्णयाने बाहेर आले. बचत हा एक उत्तम पर्याय आहे पण कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीचा अतिरेक हा घातकच असतो.

पाणी साठून राहिले तर गढूळ होत जाते, पाणी वाहते राहिले तर साफ राहते.

पैसा जो आपण मेहनतीने कमावतो, आणि हो स्त्रिया ह्या गृहिणी जरी असल्या तरी त्या घरचे काम करतात ह्यानुसार ते त्यांच्याच मेहनतीचे पैसे आहेत. डोक्यातून काढून टाका कि तुम्ही घर गृहिणी आहात तर तुम्ही काहीच नाही करत ते.

तुम्ही जे घरचे काम करता त्या कामाचे बाहेर किती पगार आहे? नाही बोलले तरी सर्व पकडून कमीत कमी आपण २५,००० पंचवीस हजार पकडू. एका घर सांभाळण्याच्या कामामध्ये विविध प्रकारच्या पदांच्या काम तुम्ही घरी करता.

कमीत कमी हुद्द्याचे कामवाली पासून ते जास्तीत जास्त हुद्द्याचे व्यवस्थापन, अकाऊंट ते गुंतवणूकदार अश्या पदांवर येवून संपते. म्हणजे एक गृहिणी लघु, मध्यम उद्योग व्यवसाय आरामात सांभाळू शकते. त्यासाठी तिला एमबीए करायची गरज नाही, हा गुण तिच्यात आहे.

त्यांना पारंपारिक सांस्कृतिक बंधने अनेक असल्यामुळे त्या व्यक्त होऊ शकत नाही. ह्या बंधनानवर मी भाष्य करणार नाही कारण हा एक मानवी इतिहासामधील गुलामगिरीचा वादाचा आणि मोठा विषय आहे.

तरीही स्त्रिया ह्या नाहीतर त्या कारणाने स्वतःच आनंदी रहायचा प्रयत्न करत असतात, त्यामधील एक प्रकार आहे तो भिसी चा. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या मनाचे करायची परवानगी असते, ह्यामध्ये त्या पैश्यानबद्दल निर्णय हि घेवू शकतात.

पैसे हि अशी वस्तू आहे कि ती सतत वापरात आली पाहिजे. आपण पैसे कमावतो किंवा साठवतो त्याचा पहिला उपयोग हा मानसिक, शारीरिक गरजा आणि आरोग्य ह्यासाठी झाला पाहिजे. दुसरा उपयोग स्वतःसाठी, परिवारासाठी झाला पाहिजे.

ह्याचा महत्वाचा उपयोग हा तुमची मानसिक स्थिती मुक्त करण्यासाठी होतो. स्वतःमध्ये परिवारामध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुमचे व घरचे वातावरण हे वैचारिक आणि भावनिक दृष्ट्या स्थिर झालेले असते ह्यामुळे आपल्याला पैश्याचे व्यवहार, गुंतवणूक करण्यासाठी योग्य मानसिकता भेटलेली असते.

एकदा का तुमचे विचार स्थिर झाले कि तुम्हालाही समजते कि आपल्या आयुष्यामधील आर्थिक बाजू कशी सांभाळायची ते. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडूनही उत्तम प्रतिसाद भेटतो.

जिथे भावनिक दृष्ट्या स्थिरता असते तिथे आकर्षणाचा सिद्धांत काम करायला लागतो. कारण आपण योग्य वेळेस योग्य विचार करत असतो, योग्य वेळेस योग्य ठिकाणी असतो, योग्य वेळेस योग्य लोक भेटतात, योग्य वेळेस योग्य कृती होते. नकारात्मक परिस्थितीही आपल्या काम करते.

आर्थिक बाबींमध्ये, गुंतवणूक येते. ह्यामध्ये जो आर्थिक मार्ग जास्त परतावा देतो त्याला प्राधिकरण देणे गरजेचे आहे, त्यानंतर टप्प्या टप्प्याने येत बाकी मार्गांचा अवलंब करावा. अशी गुंतवणूक करावी कि आपल्याला जर गरज भासलीस तर ती लगेच आपण वापरास काढू शकू.

ह्यामध्ये आपली गरज जशी, ऐषआराम, लग्न, मुल, शिक्षण, उच्च शिक्षण, आरोग्य, निवृत्ती नंतरचे आयुष्य, म्हातारपण असे टप्पे ठरवून गुंतवणूक करण्यास सुरवात करावी. हि गुंतवणूक दर १५ दिवसांनी तपासत जावी.

ह्यामध्येही २ प्रकार येतात, पहिला गुंतवणुकीला सतत काम करायला लावणे आणि दुसरा गुंतवणूक आपोआप तुमच्यासाठी काम करत राहणे. पहिला प्रकार हा संपूर्णपणे तर्कावर आधारित आहे. ह्यामध्ये तुम्हाला सतत तज्ञ लोकांची मदत घ्यावी लागेल.

दुसरा प्रकार हा संपूर्णपणे आकर्षणाच्या सिद्धांतावर अवलंबून आहे. ह्यामध्ये ते जेही शिकत जातात ते कुठल्याही तज्ञापेक्षा जास्त ज्ञान असते. ते ज्ञान हे त्यांच्या मन, मेंदू आणि शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये बसलेले असते. म्हणून ते जेव्हा विचार आणि कृती करतात तेव्हा निकाल ह्या त्यांच्या बाजूने असतो.

ह्यांना कसे केले विचारले असता त्यांचे उत्तर "मला माहित नाही. जसे विचार येतात तसेच शरीर कृती करत जाते आणि निकाल माझ्या बाजूने येतो" असे सांगतात. आपण याला आवड म्हणू शकतो किंवा जन्मजात गुण.

आयुष्य जगणे हे सोपे असते पण मनुष्य अतिविचारांमुळे, योग्य वेळी न भेटलेल्या संगतीमुळे तो ते विस्कळीत करून टाकतो. तुम्ही शांत पणे जरी विचार केलात तर तुम्हाला मर्ग सापडू शकतो. जर स्वतःहून नसेल जमत तर तज्ञांची मदत घेतलेली बरी.

तज्ञांची मदत ह्यासाठी बरी पडते कारण तिथे आपल्या भावना जपल्या जातात. भले तो व्यवहार जरी असला तरी आपल्या भावनांचा वापर केला जात नाही व एका शिस्तीत आपल्याला समुपदेशन, मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते.

अनुभवानुसार जवळच्या व्यक्तीकडून जास्त नुकसान झाल्याचे निदर्शनात आले आहे.

धन्यवाद,
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


अज्ञानाची मर्यादा असते ती अनेक गरिब पासून ते श्रीमंत, अडाणी पासून ते उच्च शिक्षित, सामान्य कारकुनापासून ते उच्च पदाधिकाऱ्या पर्यंत हि अमर्याद केलेली दिसून आली आहे.
तुम्ही जेव्हा हजारो, लाखोंचे व्यवहार करता तेव्हा तज्ञ लोकांची मदत घेता का?
त्यांचे मार्गदर्शन घेता का?
ते आपल्या परिस्थितीनुसार तपासून बघता का? ह्या व्यवहाराचे पुढील ५ वर्षांपर्यंतचे अंदाजे भविष्य काय असेल ह्याचा अंदाज बांधून ठेवला आहे का?
जर नुकसान झाले तर किती नुकसान सहन करून बाहेर निघावे ह्याबद्दल तज्ञाकडून मार्गदर्शन घेता का?
तो व्यवहार वेळोवेळी जसे तुम्ही आरोग्याबाबत डॉक्टर कडून तपासून घेता तसे त्या क्षेत्रातील तज्ञांकडून तपासून घेत असता का?
पैश्यांच्या व्यवहारात भावनांवर खूप ताबा ठेवावा लागतो, ह्यासाठी तुम्ही सतत स्वतःचा आत्मविकास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करत असता का?
जर वरील प्रश्नांचे उत्तर हो असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्ही आर्थिक दृष्ट्या साक्षर आहात, तुम्ही तुमच्या पैश्यांचा उत्तम वापर करून तो आरामत वाढवूही शकता आणि जर नाही असेल तर तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. ह्याचा अनुभव तुम्हाला नुकसान होत असताना जे तुम्ही बघत पण असता पण काहीच करू शकत नाही आणि दुसरे झाल्यावर समजून नाही तर अनुभव किंवा ती परिस्थितीच तुमच्या वाट्याला येते.
आयुष्याच्या सिनेमात रिटेक करता येत नाही.
आजच संपर्क करा.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७जेव्हा तुम्ही मन आणि मेंदू ने आंधळे असता तेव्हा तुमचे डोळेही निरुपयोगी ठरतात.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत 
८०८०२१८७९७

मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार समाज निर्माण करण्यासाठी काय करायला हवे?

मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार समाज निर्माण करण्यासाठी काय करायला हवे?
भाग १
हा प्रश्न खरच खूप कठीण आहे कि तुमची मानसिकता ती बनवते?
प्रश्न एक पण उत्तर अगनित आहेत.
उदाहरणार्थ :
एक सामान्य कुटुंब घ्या आणि त्याच्या घरी काय काय आहे ते विचारा.
अशीच कमीत कमी १००० घरांचा सर्वे करा.
त्यामध्ये अंदाजे काय काय लागते ते मी तुम्हाला सांगतो, ह्यासाठी काही आर्थिक क्षेत्रामधील तज्ञाची गरज नाही आहे. फक्त मानसिकता किंवा दृष्टीकोन म्हणूया आपण ती लागते.
किराणा माल - अन्न धान्य, बेक उत्पादन (बिस्कीट इत्यादी) व इतर खाण्या पिण्याची उत्पादने.
घर कपडे साफ करण्यासाठी लागणारी उत्पादने.
भाजी पाला, फळ व इतर शिजवून खाण्याचे पदार्थ जे जास्तीत जास्त ताजेच लागतात.
औषध
वरील गरजा ह्या प्रत्येक घरा घरात असतात. आता तुम्हाला फक्त ह्या दररोजच्या गरजा कश्या पूर्ण करणार ह्याचा विचार करायचा आहे.
मी कुणालाही करोडो रुपये गुंतवून मोठी कंपनी टाकायला नाही सांगणार कारण ह्यामुळे लहान मोठे लोकल उद्योग व्यवसाय हे ठप्प होवून जातात आणि जे खाद्य पदार्थ ताजे भेटायला पाहिजे ते भेटत नाही.
हे उद्योग व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन चा वापर करू शकता.
पुढील भागात आपण ह्यामुळे निर्माण होणार्या विविध उद्योग, व्यवसाय ह्याबद्दल चर्चा करूया.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२८७९७एमेझोन ची सुरवात हि फक्त पुस्तके विकण्यापासून झाली होती, तो आज सर्वकाही विकत आहे.

फ्लिपकार्ट ने भारतात भविष्यात ह्याची गरज आहे हे ओळखले आणि हि एमेझोन ची कल्पना उचलली व त्यानीही पुस्तके विकण्यापासून सुरवात केली आणि आज ते सर्वकाही विकत आहेत.

जर कल्पना करता येत नसेल तर तुम्ही दुसर्यांच्या कल्पनेची नक्कलहि करू शकता.

अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी दुसर्यांच्या कल्पनेची नक्कल केली आणि आज ते त्यांच्या देशात यशस्वी आहेत.

जर कल्पना करता येत नसेल तर दुसर्याच्या कल्पनेची नक्कल करा, आणि हेही करता येत नसेल तर ज्यांच्याकडे कल्पना आहे ती पूर्ण करण्यास हातभार लावा.

₹ गुरु मंत्रा ₹

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७जो मनुष्य जेवढा जास्त घाबरट असतो तो तेवढाच मेंदूचा वापर करतो..जो मनुष्य जेवढा जास्त निर्भय असतो तेवढाच तो हृदयाचा वापर करतो..

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत 
८०८०२१८७९७

आईनस्टाइन आणि मराठी उद्योजक

आईनस्टाइन आणि मराठी उद्योजक
आईनस्टाइन आणि मराठी उद्योजक हे एकदा लांब पल्ल्याच्या विमानात एकमेकांच्या बाजूला बसले होते.
आईनस्टाइन :
चल एक खेळ खेळूया....मी तुला एक प्रश्न विचारेन, जर तुला उत्तर माहित नसेल तर तू मला ५ रुपये देशील आणि जर मला उत्तर आले नाही तर मी तुला ५०० रुपये देईल.
आईनस्टाइन पहिला प्रश्न विचारतो :
पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर किती आहे?
मराठी उद्योजक एकही शब्द न बोलता आपल्या खिश्यात हात टाकतो आणि ५ रुपये देतो.
आता मराठी उद्योजकाची पाळी असते.
तो आईनस्टाइन ला प्रश्न विचारतो :
असे काय आहे जे चढण चढताना ३ पायांवर चढते आणि उतरताना ४ पायांनी खाली उतरत येते?
आईनस्टाइन गुगल वर खूप शोधतो, त्याच्या तज्ञ हुशार मित्रांनाही विचारतो....
शेवटी तासाभराने तो मराठी उद्योजकाला ५०० रुपये देतो.
आईनस्टाइन विचार करून वैतागलेला असतो आणि विचारतो :
तूच उत्तर सांग.
मराठी उद्योजक आपल्या खिश्यात हात टाकतो आणि आईनस्टाइन ला ५ रुपये देतो.
आईनस्टाइन बेशुध्द पडतो..
बोध :
भले तुम्ही आईनस्टाइन असाल....
पण जेव्हा पैश्यांची गोष्ट येते तेव्हा मराठी उद्योजकाच्या नादी नसते लागायचे.
₹ गुरु मंत्रा ₹
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

ऑनलाईन शॉपिंग समज आणि गैरसमज

ऑनलाईन शॉपिंग समज आणि गैरसमज
भारत हा देश तंत्रज्ञानाने प्रगत पण विचारांनी हा मागासलेला आहे. नागरिक हे जास्तीत जास्त तयार उत्तराच्या शोधात असतात, आणि ते उत्तर देखील सत्य असत्याच्या कसोटीवर न बघता त्यांना काय पाहिजे त्याच दृष्टीकोनातून बघत असतात.
साधे उदाहरण घ्या, गाडी चारचाकी किंवा दुचाकी ह्याचा शोध हा परदेशी लागला, पण आपल्या इकडे त्या गाडीमध्ये लागणाऱ्या मुर्त्या, त्याबाहेरील स्टिकर्स, त्यावर लागणारा जात, धर्म आणि प्रांताचा गर्व असणारा संदेश, दुचाकीवरही सारखेच दिसून येते.
गाडीची किंमत हि लाखांच्या घरात, ह्यामधला करोडोंच्या घरातील नफा हा प्रदेशात जातो, त्यावरील रॉयल्टी देखील प्रदेशात जाते. आता उरला स्टिकर्स चा बाजार, तो तर फक्त लोकलच असतो, त्याचा फायदाही खूप कमी असतो.
ऑनलाईन शॉपिंग हि संकल्पनाही परदेशीच आहे. तिथेही काही हि संकल्पना राबवून काही फायदा नाही झाला, तिथेही लहान उद्योग, व्यवसाय संपवण्यात आले, आणि जी कंपनी टनांनी उत्पादन काढते तिच्या फायद्यासाठी आणि तिला जगभर बाजार उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे.
सामान्य दुकानदारांना, लोकांना जाहिरातीमध्ये दाखवून दिशाभूल करत जे करोडोंचे उलाढाल करत असतात त्यांना प्राधान्य दिले जाते. लोक भावनिक होवून सामान्य दुकानदारांकडून ५० वस्तू खरेदी करतात आणि त्या संपल्या कि ५००० पेक्षा जास्त तसेच उत्पादन मोठी कंपनी हि घेवून तयार असते.
ह्यामध्ये होणारा नफा हा सुश्म आणि लघु उद्योगांना हजारो किंवा लाखोंच्या घरात असतो तर मोठ्या उद्योग व्यवसायांना हा हजारो करोडोंच्या घरात असतो.
कितीही केले तरी आपल्याला दुकानांवर अवलंबून रहावेच लागते. टीव्ही मिडिया ह्यावर ७० टक्के एकाधिकारशाही हि एकाच व्यक्तीची असल्यामुळे ती आपल्याला लहान सहान घटना दाखवत बसत नाही.
त्यांचे पैसेही ह्या व्यवसायात गुंतलेले असतात त्यामुळे फक्त आणि फक्त ह्यासंदर्भातच बातम्या दाखवल्या जातात. आणि सामान्य लोकांनाही इथूनच सामान खरेदी करण्यासाठी प्रोस्ताहित केले जाते.
उत्पादने आहेत म्हणून ऑनलाईन बाजाराला किंमत आहे. कारण त्या काहीच बनवत नाही. तरीही ते बक्कळ पैसा घेवून जातात. एमेझोन काही मूर्ख नाही, अमेरिकन कंपनी आहे, ती बारा हजार करोड गुंतवन्यापूर्वी अनेक वर्ष अगोदर आपल्या भारतीय लोकांच्या जीवनशैली वर संशोधन करण्यासाठी संशोधकांची टीम पाठवून त्यांच्याकडून सगळी माहिती गोळा करून घेतली जाते.
ऑनलाईन शॉपिंग मध्ये दुकानदारांचे ग्राहकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध बनत नाही. ते संबंध फक्त हे नफ्यापुरते असतात. एखादवेळेस तुमचा लोकल दुकानदार हा तुम्हाला पैसे नसतील तर स्वतःच्या नावावर कर्ज काढून ती वस्तू घेवून देतील पण ऑनलाईन दुकानदार असे नाही करणार, आणि नाही तशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे.
हि समस्या काही आपल्याच देशाची नाही आहे, जगभरात हेच चालू आहे. प्रत्येक ठिकाणचे लोकल मार्केट जिथे गावा गावात, घरा घरात बनणाऱ्या वस्तू भेटायच्या खाण्या पिण्याचेही ताजे, रासायनिक खते न वापरता तयार केलेले पदार्थ भेटायचे तेही आता बंद केले आहे.
तेलाचे मार्केट हे आपल्या वस्तीत घरा घरात होते तेही बंद पाडण्यात आले आहे. आता आपल्याला फक्त मोठ्या कंपनीने बनवलेले तेलच घ्यायचे आहे. ग्राहकांची ह्यात चूक नाही आहे, त्यांनाही भाग पडले जात आहे.
कुठल्याही गावात त्या स्त्रीने चुलीवर थापलेल्या भाकरीची चव हि तुम्हाला पंचतारांकित हॉटेल मधल्या डेटोल ने हात धुतलेल्या हातातूनही नाही येणार.
एकदा का लोक भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतली कि लोकउपयोगी कायदे कमजोर करायचे आणि भांडवलशाही सत्ताधारी ह्यांना पोषक कायदे बनवायचे, आणि कायद्याचा वापरही असा करायचा कि सामान्य मनुष्य फसला पाहिजे पण श्रीमंत, सत्ताधारी ह्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये.
ह्याचा फायदा परदेशी कंपन्या घेतात. ते कमी डॉलर गुंतवून अब्जो रुपये घेवून जातात. आणि इथे राजकारणी, शासकीय अधिकारी आणि बडे उद्योजक हे मलाई खात बसतात.
इंटरनेट चा वापर कराल तसा होतो, तुम्ही जर उत्तमरीत्या आपले उत्पादन हे आपल्या परिसरात किंवा लोकल मार्केट मध्येही पोहचवले तरी तुम्ही नफा कमवू शकता. इथे तुम्हाला सरकार कडून काहीच मदत भेटणार नाही. जे काही आहे ते तुम्हालाच तुमच्या क्षमतेनुसार करायचे आहे.
सरकार जो उद्योगपती अब्जोची उलाढाल करतो त्या बोटांवर मोजता येईल इतक्या लोकांवर लक्ष्य देईल कि सामान्य जी करोडोंच्या घरात लोकसंख्या आहे त्यांच्याकडे लक्ष्य देईल?
आपण पण जिथून आपला फायदा होतो तिकडेच लक्ष्य देतो तर सरकारचेही काही चुकत नाही, शेवटी ते त्यांचे कामच झाले. वरून काही परदेशी कंपन्यांना त्यांची सरकार लाच द्यायला परवानगीदेखील देते तिथेही आपण काही करू शकत नाही.
टीव्ही बंद करा, बातम्या बघणे बंद करा, सतत करोडपती उद्योजक व्यवसायीकांचा बोलबाला करणाऱ्या मिडीयाला कायमचे आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाका. संपूर्ण लक्ष्य आपल्या आयुष्याकडे द्या. आपण कशी प्रगती करू त्यावर द्या. आपल्याला मानसिक शांतता ज्यामधून भेटेल ते करा.
परिस्थिती समजून घ्या व त्यावर मात करायला शिका, वादळात सरळ वाढलेले झाड उपटून जाते, आणि लवचिक झाड हि टिकून राहतात. जिथे सरळ वागत येईल तिथे तसेच वागा, आणि जिथे वाकड्यातच शिरले पाहिजे तिथे तसेच वागा.
तुमच्यासाठी जग बदलणार नाही, जगानुसार वेळोवेळी तुम्हाला बदलावे लागेल.
(काही बाबी आपण सार्वजनिक ठिकाण फेसबुक वर बोलू शतक नाही त्यामुळे अधिक माहिती मी इथे देवू शकत नाही. ती माहिती तुम्हाला त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांकडून भेटेल, तेही तुमचे नातेसंबंध घनिष्ट असतील तर.)
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७लहान मोठ्या शहरातील
५० % हून अधिक दुकाने आणि सूक्ष्म लघु उद्योग व्यवसाय हे मारवाडी समाजाच्या मालकीचे आहेत.
₹ गुरुमंत्रा ₹
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

मारवाडी उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीत यशस्वी असण्याचे ७ रहस्य
१) पैश्यांवर लक्ष्य ठेवून असणे
मारवाडी उद्योग व्यवसायिक कंपन्या आणि समूह यांनी आपला सर्व गुंतवणूक निधीचे व्यवस्थापन असे करतात कि जिथे दीर्घकालीन उत्पादनक्षम व फायदेशीर आहे तिथेच गुंतवणूक करतात आणि त्या उद्योग व्यवसायाची काटेकोर पणे आर्थिक निरीक्षण करतात.
२) प्रतिनिधी नियुक्त करूनसुद्धा स्वतः निरीक्षण करतात
यशस्वी उद्योग, व्यवसायाला प्रतिनिधी कसे नियुक्त करायचे हे शिकावे लागते. (आताचे उदाहरण रतन टाटा विरुद्ध सायरस मिस्त्री) अन्यथा आर्थिक गुंतवणुकीचा कालावधी हा मर्यादित होत जाईल.
त्यांना पण माहित असले पहिजे कि केव्हा हस्तक्षेप करायचा, त्यांना जाणीवही असते कि हस्तक्षेप करायचा निर्णय हा महागातही पडू शकतो. असमाधानकारक अधिकाऱ्याला बदलणे हे त्या अधिकार्याकडून काम करून घेत राहणे हे सोपे व फायदेशीर ठरू शकते. अकार्यक्षम अधिकारी आणि कुटुंबातील सदस्य ह्यांच्या भावनांना धक्का न पोहचवता त्यांना आरामशीर आणि चालवायला सोप्या अश्या पदावर बदली करतात.
३) योजना पण एक शैली आणि प्रणाली सोबत असलेली
काहीसे अस्पष्ट आहे, तरी आपल्याला सवयीचे स्वभावात, जन्मजात गुणात रुपांतर झालेले दिसून येते. तरीही, हे कदाचित अगोदर सांगितल्याप्रमाणे हे बदल अनुवांशिकतेनुसार संस्थापका कडून पुढील पिढीकडे आले आहेत.
४) नैतृत्व वाढीला प्रोस्ताहन, नैतृत्व हे परंपरागत व्यवस्थेला वाढ थांबवू देत नाही
यशस्वी उद्योजक, व्यवसायिकाचा मुख्य गुण हा आहे कि तो सतत प्रगतीच्या दिशेने जात असतो. अनेक कल्पना त्याच्याकडे असतात पण काहींची तो अंमलबजावणी करतो.
५) योग्य कॉर्पोरेट संस्कृती
कंपनी किंवा समुहाची कार्यशैली हि बाजारानुसार आणि बदलत्या वेळेनुसार फायद्याची असावी.बदल आणि तडजोड करत राहणे हे खूप कठीण आहे.
कंपनीच्या कॉर्पोरेट संस्कृती मध्ये इमानदारीला प्रोस्ताहन देणे हे खूप कठीण असते, खास करून सक्षम मॅनेजर्सना. दिलेले आर्थिक फायदे हे काही कालावधीपर्यंत त्यांना सोबत ठेवू शकतात, कधी कधी हे कामाचा दर्जा हि घसरवतात.
६) काळानुसार आलेल्या अल्पकालीन लोकप्रिय फायदेशीर पद्धतीनुसार हुरळून जाऊ नका
ह्या व्यवस्थापन लहरीचा कालावधी हा फक्त ६ महिन्यांपूरता असतो. प्राध्यापक, आणि व्यवस्थापन विद्यापीठांमध्ये उल्लेखनीय योजना आणि आकर्षक सिद्धांत ह्यांचा आणि यशाचा काही संबंध नसतो.
एक जबाबदार व्यवस्थापक आपल्या दृष्टीकोनाबद्दल सतत चाचणी घेत असतो आणि प्रयोगशील असतो. शाळेमधील वादविवाद स्पर्धेत भाग घेणाऱ्या लहान मुलालादेखील माहित असते कि प्रत्येक प्रश्नाच्या कमीत कमी दोन बाजू असतात आणि जैन तर्कानुसार अनेकांतवादा म्हणजे अनेक बाजू असतात. आलेल्या परिस्थितीनुसार काय बरोबर आहे ह्याचा निर्णय घेणे हि समस्या असते.
७) नवीन विकासाच्या संधी सोडू नका
काही उद्योग स्वतःचे वर्णन करताना सांगतात कि त्यांना सखोल ज्ञान आहे. हे सगळेच उद्योजक बोलतात. जगातील सगळ्यात जुने उद्योग जे आता यशाच्या उंच शिखरावर आहेत तेही संधी गमावल्यामुळे अनेक अपयशाला सामोरे गेले आहेत.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


श्वास हि निरंतन चालणारी प्रक्रिया आहे.
आपल्या सकारात्मक किंवा नकारात्मक भावनांनुसार श्वासाची प्रक्रिया बदलत असते,
भावना सकारात्मक असो किंवा नकारात्मक दोन्हींवर आपले नियंत्रण पाहिजे,
जेव्हा आपले आपल्या भावनांवर नियंत्रण सुटते तेव्हा आपले आपल्या भाग्यावरून नियत्रण सुटते,
जेव्हा पण भावनांचे वादळ उठतील तेव्हा आल्या श्वासावर नियंत्रण ठेवा,
काही मिनटे आरामत दीर्घ श्वास घ्या, श्वासावरील नियंत्रणाच्या विचार
आणि कृतीमुळे आपले आपल्या भावनांवर व कृतीवर नियंत्रण मिळते.
आपले भाग्य परत आपल्या हातात येते.
- अश्विनीकुमार
निर्वाणा
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक

साल्ट एन पेपर (मीठ आणि काळी मिरी)


लघु पट, भाषा हिंदी
एक चांगली आर्थिक परिस्थिती असलेली स्त्री जी आत्महत्या करायचा प्रयत्न करत असते ह्यामध्ये समोरच्या स्त्री, पुरुषाची मानसिक अवस्था, वेळीच तज्ञांची मदत न घेतल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती दर्शवते.
आई, वडील, कुटुंब आणि समाजाने आवर्जून बघितले पाहिजे, ज्यामुळे पुढील होणार्या आत्महत्या, मानसिक आजार जसे तणाव, चिंता आणि भीती ह्यावर तज्ञांच्या मदतीने मात करू शकतो.
शेतकरी ह्याची आजची हि परिस्थिती का उद्भवली त्यावर उत्तम भाष्य करणारी हि लघु कथा आहे. दोन वाक्य "सरकारी धोरण" आणि "१९९० साली स्वीकारलेले जागतिक अर्थव्यवस्थेचे धोरण" हे दोन्ही मुख्य समस्येच्या गाभ्यात हात टाकणारे विषय उत्तम रित्या मांडले आहे.
आर्थिक परिस्थितीनुसार आत्महत्येची करणे कशी बदलतात त्याचीही मांडणी सामान्यांना समजेल अशी केली आहे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७निसर्गाचे नियम सगळ्यांना, जगाच्या पाठीवर कोठेही सारखेच आहे.
पाणी हे १०० अंश तापमानावरच उकळणार
मग ते वाळवंटासारख्या उष्ण प्रदेशात असू दे,
शीत किंवा अतिशीत प्रदेशात असू दे,
आपल्या घरी असू दे किंवा हजारो किलोमीटर लांब परदेशात कुणाच्या घरी असू दे,
यशस्वी माणसाच्या घरी असू दे किंवा अयशस्वी माणसाच्या घरी असू दे,
माझ्या घरी असू द्या किंवा तुमच्या घरी.
हाच नियम माणसाच्या सर्वांगीण विकासाबद्दल पण लागू असतो,
जर तो नियम तुम्ही वापरला तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात यशस्वी व्हाल.
उद्योग भरभराटीला पण हाच नियम आहे,
आणि करोडो रुपयांचा प्रवाह तुमच्याकडे चालू रहायला पण हाच नियम आहे.
निसर्ग नियम वापरा आणि सुख समाधानी आयुष्य जगा.
- अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
 ८०८०२१८७९७

अमली पदार्थाच्या नशेच्या अधीन, बेघर ते करोडपती बनण्यापर्यंतचा प्रवास

अमली पदार्थाच्या नशेच्या अधीन, बेघर ते करोडपती बनण्यापर्यंतचा प्रवास

खलील रफाती
बालपणात लैंगिक शोषणाच्या अत्याचाराला बळी पडला होता.
१३ वर्षांपूर्वी बेघर आणि अमली पदार्थांच्या आहारी गेला होता.
नशेची सुरवात हि गांजापासून झाली, त्यानंतर वाढत वाढत ती एक्सटसी, केटामाइन आणि शेवटी हेरोईन ह्या अमली पदार्थांपर्यंत मजल गेली.
तो ह्या अमली पदार्थ विकण्याचा व्यवसायदेखील करत होता.
रफाती ह्या अमली पदार्थांच्या नशेच्या चक्रव्युहात अडकत गेला. २००१ साली जेव्हा त्याने जाणीवपूर्वक हेरोईन ची जास्त प्रमाणात मात्रा घेतली ज्यामुळे त्याचे प्राण जाणार होते, पण पैरामेडिक (नर्स) च्या प्रयत्नांमुळे त्याचा जीव वाचला.
त्याच्याच पुढील वर्षी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, त्यामधून तो थोडक्यात बचावला होता. त्यावेळेसही तो अमली पदार्थाचे व्यसन करत बसला होता.
२००३ मध्ये रफातीने अपयशांचा तळ गाठला होता. अजून खाली जाण्यासारखे काहीच नव्हते.
नंतर त्याने संपूर्ण वेळ हा आरोग्यासाठी दिला. त्याचे आयुष्य त्या क्षणी बदलले जेव्हा त्याच्या मित्राने ज्यूस आणि सुपरफूड बद्दल माहिती दिली.
ह्याचा परिणाम लक्षणीय आणि कमी कालावधीत आला होता.
२००७ साली मैलाबू मध्ये त्याने सुरु केलेल्या रीविरीया रिकव्हरी सेंटर रुग्ण आणि कर्मचार्यांसाठी ड्रिंक बनवायला सुरवात केली.
त्याने स्मूथी तयार केली त्यामध्ये खजूर आणि केळे हे पदार्थ होते. ह्या स्मूथीला त्याने वोल्व्हरीन हे नाव दिले कारण ह्यामुळे आरोग्य सुधारायला आणि ताकद वाढायला मदत होत होती.
रीवेरीया मधील रुग्णांमध्ये प्रसिध्द असलेली स्मूथी हि हळू हळू नैरोबी मध्ये लोकप्रिय व्हायला लागली. शहराबाहेरील लोकही रीविया रिकव्हरी मध्ये माझी स्मूथी प्यायला येवू लागले.
येणारी लोक हि काही अमली पदार्थ व्यसनांच्या अधिनही नव्हते तरीही ते माझी स्मूथी प्यायला येत होते.
आता रफाती ने ठरवले कि स्वतःचे ज्यूस सेंटर सुरु करायला हवे.
त्याने त्याचे ५०,००० डॉलर (३४,००,०००, चौतीस लाख) हे सोन्याच्या शिक्क्यांच्या रुपात ठेवले होते व उरलेली रक्कम हि एका व्यावसायिक जुगारी कडून उभी केली.
त्याने त्याचे दुकान साधेच ठेवले आणि उद्दिष्ट होते, प्रेम, बरे होणे आणि प्रोस्ताहन. हेच ३ शब्द त्याच्या टीशर्ट आणि जेकेट वर लिहून आहे. जे तुम्हाला तिथून विकतही घेता येतील.
दुकानाचे नाव सनलाइफ ओर्गेनिक ब्रांड ठेवले, त्यामध्ये ३२ प्रकारचे ज्यूस, प्रोटीन शेक, स्मूथी, प्लस अकाई बॉल्स, कॉफी, संड्यें आणि फ्रोझन योगहरट विकतो.
त्याच्या ज्यूस आणि इतर प्येयांमध्ये आरोग्यदाई आणि शरीराला पोषक असेच घटक तो वापरतो.
तो कर्मचारी म्हणून अश्या लोकांना घेतो ज्यांना खरच त्याची गरज आहे. केचे केलो सारखा त्याचा रुग्ण आणि गिर्हाईक जो अमली पदार्थांच्या अधीन होता तो सांगतो कि त्याने माझ्यावर खूप मेहनत घेतली आणि मला मेहनत घ्यायलाही लावली. तो जनी असलेल्या वडीलांसारखा आहे.
त्याचे ग्राहक हे प्रसिध्द व्यक्तिमत्व एलीझाबेत टेलर, गन्स एंड रोझेस गीटारिस्ट स्लाश आणि एकेडमी अवार्ड विनिंग कलाकार जेफ्फ ब्रिजेस हे आहेत.
भूतकाळ कितीही कठीण असू द्यात,
तुम्ही कधीही नवीन सुरवात करू शकता.
बुद्ध
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७