जर तुमचे उत्पादन किंवा सेवा उत्तम असेल तर तुम्हाला ग्राहक खेचण्यासाठी व त्यांना परत तुमची उत्पादन किंवा सेवा घेण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागत नाही. तुम्हाला सुरुवातीला ग्राहकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे तेव्हा तुम्ही जाहिरात आणि सेल्स चा वापर करू शकता. जसे तुम्हाला ग्राहकांची गरज असते तसेच ग्राहकांना देखील तुमची गरज आहे. जसे तुम्ही ग्राहक शोधता तसेच ग्राहक देखील उत्पादन आणि सेवा शोधतच असतो. कुठेही जाहिरात आणि सेल्स चा अतिरेक करून ग्राहकांना त्रास द्यायची गरज नाही.


अश्विनीकुमार 

सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण


तुमचे अंतर्मन इतके शक्तिशाली आहे कि जर तुमच्या अंतर्मनात विश्वास असेल कि एखादी गोष्ट होणारच तर ती कुठल्याही मार्गाने होवूनच जाते. आणि जर तुमच्या अंतर्मनात विश्वास नसेल तर अगदी सोपी गोष्ट सुद्धा होणारच नाही.


अश्विनीकुमार 

सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

जी व्यक्ती जितकी जास्त मानसिक दृष्ट्या सक्षम असते ती तितक्याच जास्त लोकांवर प्रभाव पाडते तर ह्या उलट जी व्यक्ती जितकी जास्त मानसिक दृष्ट्या दुर्बल असते तितक्याच जास्त लोकांचा प्रभाव तिच्यावर पडतो.


अश्विनीकुमार 

सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

 


नवीन वर्ष नवीन सुरुवात नाही तर नवीन दिवस नवीन सुरुवात, नवीन क्षण नवीन सुरुवात करा. नवीन सुरुवात करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्याची गरज नाही, तुम्ही एका दिवसात आणि एका क्षणात नवीन सुरुवात करू शकता. तुम्ही ठरवले तर तुमचे अंतर्मन हे एका क्षणात बदलू शकता.

अश्विनीकुमार 
सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

मला अपयशाची भीती नाही वाटत. हो आज मी अपयशी आहे. अपयशाच्या खोल दरीत अडकलो आहे. बाहेर निघायचा प्रयत्न केला पण परत अपयशाचा तळ गाठला. ना मला अपयशाची भीती वाटत आणि नाही अपयशाचा तळ गाठण्याची. कारण मला माहिती आहे कि मी आज जे अपयशाच्या दरीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत आहे त्यामुळे मी प्रचंड शक्तिशाली होत आहे. भले अपयशाच्या तळात अंधार आहे पण तिथेच मी माझ्या अंतर्मनाच्या डोळ्यांनी बघायला शिकलो. माझ्यातल्या अद्भुत क्षमता देखील मला दिसल्या व त्या मी जागृत केल्या. मला माहिती आहे कि मी जेव्हा अपयशाच्या दरीतून बाहेर पडेल तेव्हा मी जमिनीवर पाय ठेवणार नाही तर अवकाशात भरारी घेणार. हो माझे भविष्य उज्वल आहे. अश्विनीकुमार सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
 


 तुम्ही मोठ्यात मोठ्या संकटावर मात करू शकता.

तुम्ही स्वतःला पूर्णपणे विकसित करू शकता.

काहीही कायमस्वरूपी नाही आहे, तुमची आजची परिस्थिती सुद्धा.

तुम्ही अडकलेले नाही आहात.

तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत.

तुम्ही नवीन सकारात्मक मानसिकता घडवू शकता.

तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकता.

तुम्ही नवीन सकारात्मक सवयी घडवू शकता.

आज ह्या क्षणी निर्णय घेणे महत्वाचे आहे, त्यानंतर तुम्ही मागे वळून बघू नका.


अश्विनीकुमार

सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण


 अशी काही लोक आहेत, मित्र आहेत जे तुमचे यश स्वतःचे मानतात आणि जेव्हा तुम्ही प्रगतीच्या शिखरावर जाता तेव्हा त्यांना तुमचा अभिमान वाटतो. दुसरीकडे अशीही काही लोक आहेत मित्र आहेत जे तुमचे हितचिंतक असल्याचा, तुमचे मित्र असल्याचे ढोंग करतात, ह्यांना तुम्हाला मिळालेले यश सहन होत नाही व तुम्ही जेव्हा प्रगतीच्या शिखरावर असता तेव्हा ह्यांना तुमची प्रचंड इर्षा वाटते.


पहिल्या प्रकारच्या लोकांना सांभाळा, त्यांचे जतन करा.

दुसऱ्या प्रकारच्या लोकांपासून सावध रहा.



अश्विनीकुमार

सर्वांगीण आर्थिक विकास

सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण


 भाग्य म्हणजे योग्य वेळी योग्य जागी असणे होय.

अश्विनीकुमार
सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण


 काही लोक पैसे कमावून वयाच्या ४० व्या वर्षी निवृत्त होतात तर काहींची सुरुवात हि वयाच्या ४० व्या वर्षी होते.


अश्विनीकुमार

सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण


 कधी कधी सध्या मिळत असलेला पगार आणि पद हे एखाद्याचे स्वप्न मारण्याच्या विषासारखे वाटते.


अश्विनीकुमार

सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण


ध्येय गाठण्याचा प्रवास 

हा कधी कधी ध्येय गाठून 

जितके शिकतो त्यापेक्षा 

जास्त शिकवून जातो.


अश्विनीकुमार