"मी जर एखाद्या प्रगत देशात असते तर ज्यासाठी मला सर्वोच्च सन्मान मिळाला असता त्याच संशोधनासाठी विद्यापीठाने माझा मोठ्या प्रमाणात छळ करण्यास सुरवात केली. कोणतेही कारण न देता माझी बदली करण्यात आली, मला पदोन्नती नाकारण्यात आली, अनेक महिने माझा पगार थांबविण्यात आला व विविध प्रकारे माझा छळ करून विद्यापीठ मला आत्महत्येपर्यंत घेऊन गेले. माझा गुन्हा एकच होता की भारतीय संशोधन मला सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचे होते पण मोन्सँटोने वरपासून खालपर्यंत सर्वांना विकत घेतल्यामुळे विद्यापीठाने मला सुखाने जगू देण्यास नकार दिला. जिथे मी अनेक वर्षे मौलिक संशोधन केले ती प्रयोगशाळाही तोडून फेकण्यात आली.
या छळवादाला कंटाळून १ ऑक्टोबर,२०१५ रोजी मी पंतप्रधानांकडे दाद मागितली तेव्हा १० मे, २०१६ रोजी मला कळविण्यात आले – ‘CASE CLOSED’ (तुमची केस बंद करण्यात आली आहे.)’’
ज्यांना वाटते कि आपण स्वतंत्र झालो आणि लोकशाही आहे त्यांनी हा लेख आवर्जून वाचवा. भांडवलशाही, शासन, सत्ताधारी आणि उद्योजक हे कसे इमानदार आणि सामन्यांसाठी झटणार्यासोबत वागतात ते.
संशोधन आणि अभ्यास करा भांडवलशाहीवर.
खालील लेख संपूर्ण वाचा.

https://www.facebook.com/1518436798423924/photos/a.1532436677023936.1073741828.1518436798423924/1710267545907514/?type=3&theater

अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७ 
               
चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

फ्रीलान्सर समज आणि गैरसमज

फ्रीलान्सर हे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ असतात ज्यांना कुणाच्या हाताखाली जरी ती कंपनी त्यांना उच्च पद आणि करोडो रुपये पगार देत असेल तरी काम करत नाहीत. त्यांना स्वतःची कंपनी टाकून नुसते त्यापुरते एका मर्यादेत काम करणेदेखील मान्य नसते.
त्यांना दररोजचे वेळेची बंधन मान्य नसतात, पण जेव्हा ते काम मिळवतात तेव्हा २४ तासही ते आरामत त्यासाठी देतात कारण हे त्यांच्यासाठी काम नसून किंवा पैसे कमावण्याचे साधन नसून ती त्यांची आवड आहे.
मोठ मोठ्या कंपन्या ह्यांच्यावर करोडो रुपये खर्च करत असतात कारण ह्यांच्या इतके ज्ञान त्या कंपनीतील उच्च पदाधिकार्याला देखील नसते. मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या ह्यांना बोलावून काम करून घेतात. त्यासाठी ह्या कंपन्या त्यांना तासाने पैसे देतात.
फ्रीलान्सरची फी हि तासाला हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत असते. त्यांना त्यांच्या कामाविषयी इतकी आवड असते कि ते प्रचंड दबावात कमी कालावधी मध्येही काम पूर्ण करून देवू शकतात.
फ्रीलान्सरची प्रत्येक समस्येवर समाधान करण्याची क्षमता अफलातून असते. हि क्षमता तुम्हाला कोठेही भेटणार नाही. ह्यांची मदत अनेकवेळा राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत खातेही घेत असते. जिथे गोपनीयता आहे तिथेहि फ्रीलान्सरचा वापर करून घेतला जातो कारण ते त्यांच्या कामाशी एकनिष्ठ असतात.
९० टक्क्याहून अधिक फ्रीलान्सर ह्यांचे शिक्षण पूर्ण झालेले नसते. त्यांनी शाळा महाविद्यालयामधील शिक्षण अर्धवट सोडून संपूर्ण वेळ हा त्यांच्या आवडीसाठी दिलेला असतो. उरलेले निवृत्त असतात आणि त्यानंतर उरलेले हे पदवीधर असतात.
सहसा हे कुणाला भेटत नाही. अगोदर त्यांनी ज्यांचे काम केले असेल किंवा त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती असेल त्यांच्या सिफारशीने ओळखीने त्यांना भेटू शकतो.
फ्रीलान्सर चे काम हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत सुरु असते. त्यांच्याकडे जगभरातील तज्ञ लोकांची टीम असते.
जास्तीत जास्त फ्रीलान्सर हे त्यांच्या जन्मजात गुणांमुळे पुढे आलेले असतात, ते स्वतःहून आपोआप शिकत जातात. इतरांपेक्षा त्यांचा शिकण्याचा कालावधी खूप कमी असतो. त्यांच्या शिक्षणामध्ये व्यावहारिक ज्ञान जास्त प्रमाणात असते.
फ्रीलान्सर ची शाळा म्हणजे हे संपूर्ण जग आहे. ते कुठल्याही बंद भिंतीमध्ये असलेल्या शाळा कोलेज मधून आलेले नसतात. ह्यांना वयाचे बंधन नसते, तुम्हाला सगळ्यात कमी वयाचा आणि सगळ्यात जास्त वयाचा फ्रीलान्सर आढळून येईल.
फ्रीलान्सर हे सर्व क्षेत्रात आढळून येतात. माहिती तंत्रज्ञानामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतील. ह्यांच्या कामाचे ठिकाण हे घर, सीसीडी, हॉटेल किंवा ऑफिस मध्ये वेगळी जागा हे असते.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

गुंतवणूक केल्या केल्या ३ ते ६ महिन्यात गुंतवलेली रक्कम वसूल करून देणारा द्रोण आणि पेपर डिश व्यवसाय.
गुंतवणूक केल्या केल्या ३ ते ६ महिन्यात गुंतवलेली रक्कम वसूल करून देणारा द्रोण आणि पेपर डिश व्यवसाय.
त्यानंतर निव्वळ नफा.
संपूर्ण महाराष्ट्रातून भेटलेल्या प्रतिसादामुळे मी हि पोस्ट परत अपडेट करत आहे. मुंबई आणि जवळील जिल्ह्यातून अनेकांनी प्रत्यक्ष भेट दिली व मशीन विकत घेवून आपला व्यवसाय सुरूही केला, पण जे लांब राहत आहेत त्यांच्यासाठी व्हिडीओ अपलोड करत आहे.
ह्या व्हिडीओ मध्ये मशीन, कच्चा माल आणि तयार झालेल्या मालाची गोनी ह्यासाठी लागणाऱ्या जागेचाही तुम्हाला अंदाज येईल. ज्यांना घरातून सुरु करायचे आहे किंवा गाळा घेवून मोठ्या प्रमाणात सुरु करायचे आहे त्यांना जागेचा अंदाज घेता येईल.
खालील मासिक उत्पन्न हे पूर्ण वेळ काम करून भेटते.
भारत देश हा सणासुदीचा, मेळावे, जत्रा आणि सामुहिक कार्यक्रमांचा असल्यामुळे हा व्यवसाय सतत भरभराटीत असतो. तुम्ही एकट्याने देखील हा व्यवसाय करू शकता किंवा २ पेक्षा जास्त लोक मिळूनही हा व्यवसाय करू शकता.
महिला बचत गट व इतर संस्था ह्यांच्या साठीही अतिशय उपयुक्त व्यवसाय आहे.
उद्योजक विशाल शेडगे आणि विनोद काळे ह्यांना स्वतःचे काही तरी करायचे हा विचार शांत बसू देत नव्हता. मध्यम वर्गीय नोकरदार कौटुंबिक पार्श्वभूमी, ना घरातून ना समाजातून मदत. वरून कुटुंबाची जबाबदारी. जर नोकरी सोडली तर कुटुंबाचे पोट भरणार कसे? तरीही धाडस दाखवत नोकरी सोडली, उद्योग सुरु केला.
इथे पहिल्याच उद्योगात कोणीही मदत तर केली नाही पण सर्वांनी फसवले. मशीन घेताना फसगत झाली, कच्चा माल घेताना फसवले गेले, बाजारातील अनुभवी दुकानदार कमी भावात माल खरेदी करू लागले. ह्या परिस्थितीत अने जन हार मानतात पण ह्या दोघांनी हि वाईट परिस्थिती शिकण्याच्या उद्देशाने घेतली आणि हाच तो वाईट अनुभव पुढील द्रोण पेपर डिश च्या व्यवसायात कामी आला. हा अनुभव तुम्हाल कोठेही बिझनेस मेनेजमेंट च्या विद्यापीठात भेटणार नाही.
पेपर डिश आणि द्रोण व्यवसाय सुरु करण्याअगोदर मागील अनुभव चांगलाच कामी आला मशीन घेताना त्यांची फसगत झाली नाही आणि रास्त दरात मशीन खरेदी करण्यात आली. परत हा व्यवसाय नवीन होता त्यांच्यासाठी, फसगत होणे तर अपेक्षित आहे.
आता त्यांना लागणारा कच्चा माल पेपर ह्यामध्ये फसगतीला सामोरे जावे लागले. मागचा धाडसी आणि दांडगा अनुभव असल्यामुळे ते ह्याही परिस्थितीमधून लवकर उभे राहिले व त्यांचा हा व्यवसाय यशाच्या दिशेने घौडदौड करायला लागला.
एक मशीन आणि छोटासा गाळा ह्यापासून सुरु केलेल्या व्यवसायाचे त्यांनी मोठ्या व्यवसायात रुपांतर केले व आज ते स्वतःहि द्रोण पेपर डिश बनवतात व अनेक गरजूंना हा व्यवसाय करायचे शिकवून त्यांनाही त्यांच्या पायावर उभे केले.
आज त्यांचा व्यवसाय उत्तम जम बसवून आहे.
खालील व्हिडीओ मध्ये मशीन, लागणारा कच्चा माल, त्याचा दर्जा, उत्पादनाचा दर्जा ह्याचा तुम्हाला अंदाज येईल.
प्रबळ इच्छा शक्ती, धाडस आणि प्र्वाहाविरुद्ध पोहण्याची क्षमताच मनुष्याला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवते.
युट्युब वर व्हिडीओ खालील लिंक वर चेक करा.
१) हेंड प्रेस मशीन पेपर डिश डाय सोबत - ३५,००० हजार रुपये
द्रोण डाय सोबत - ३०,००० हजार रुपये
मासिक उत्पन्न १०,००० ते १५,००० रुपये
२) सेमी ऑटोमेटिक द्रोण मेकिंग मशीन सिंगल स्ट्रोक - ३०,००० हजार रुपये
मासिक उत्पन्न ९,००० ते १२,००० हजार रुपये
३) सेमी ऑटोमेटिक द्रोण मेकिंग मशीन डबल स्ट्रोक - ५०,००० हजार रुपये
मासिक उत्पन्न १५,००० ते १८,००० हजार रुपये
४) फुली ऑटोमेटिक द्रोणा मेकिंग मशीन सिंगल स्ट्रोक - ७५,००० हजार रुपये
मासिक उत्पन्न - १५,००० ते १८,००० हजार रुपये
५) फुली ऑटोमेटिक द्रोणा मेकिंग मशीन डबल स्ट्रोक - १,१०,०००
मासिक उत्पन्न - २०,००० ते २५,००० हजार रुपये
६) एम्बॉसिंग मशीन ० नंबर आणि १ नंबर डाय कटर सोबत - १,१५,०००
मासिक उत्पन्न - ३०,००० ते ३५,००० हजार रुपये
उत्तम प्रतीचा कच्चा माल उपलब्ध करून दिला जाईल
सर्कल कटिंग पेपर, ० ते ५ नंबर डीश पेपर
वितरक (डिस्ट्रीब्युटर) ह्यांनी द्रोण, ० ते ५ नंबर पेपर डिश ह्यासाठी संपर्क करावा.
विशाल शेडगे आणि विनोद काळे
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७आयुष्य हे ‘भाग्याने’ चालते!!
जर हुशारीने चालत असते तर अकबर च्या जागी बिरबल हा बादशाह झाला असता.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
 ८०८०२१८७९७दिवाळी
आणि
लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक सुभेच्छा
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
बालक पालकधाडस प्रत्येक वेळेस डरकाळी नाही फोडत.
कधी कधी धाडस हळू आवाजात दिवसाच्या शेवटी बोलते,
“मी उद्या परत प्रयत्न करेन”
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७अश्विनीकुमार
८०८०२१८७९७ 
               
चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


जीवनामध्ये समस्यांना एक दगड समजायचे आणि समाधानांना हातोडा, जर तुमच्याकडे एक समाधान असेल तर समस्यांचा दगड दोन तुकड्यात तुटेल, जे बाजूला सारायला अजून मेहनत लागेल. जर तुमच्या कडे अजून जास्त समाधान असेल त्यावेळेस तुमची ताकद आणि हातोड्याचे वजन वाढलेले असेल तेव्हा तुम्ही एक फटक्यात समस्यांच्या दगडाचे अनेक तुकडे करू शकाल, जे साफ करायला जास्त मेहनत नाही लागणार. आता फक्त विचार करा कि एक समस्याचे अगणित समाधान किंवा उत्तर असतील तेव्हा तो समस्यांचा दगड तुम्हाला अगदी छोटा वाटेल जो एका फटक्यात चुरा होवून तुम्ही फुक मारून आरामात उडवू शकता किंवा हवेचा एक झोका त्याला उडवून घेवून जाईल. सतत उत्तर किंवा समाधान शोधत राहा, एक वेळ अशी येईल कि तुमच्या कडे समस्या येणारच नाही.
- अश्विनीकुमार
निर्वाणा
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक

इन्फोसिस सोफ्टवेअर कोडर ते पाणीपुरी विकण्या पर्यंतचा प्रशांत कुलकर्णीचा प्रवास


प्रशांत कुलकर्णी हा जेव्हा इन्फोसिस मध्ये काम करत होते तेव्हा त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात पाणीपुरी खाल्ली आणि फूड पोईजन होवून आजारी पडला, ह्यामुळे त्याला अनेक महिने त्याचे आवडते आणि अनेक लोकांचे आवडते खाद्यपदार्थ पाणीपुरी ह्यापासून वंचित रहावे लागले.
ह्या घटनेने त्याचे आयुष्य बदलले, माहिती काढायला सुरवात केली, संशोधन केले तेव्हा त्यांना ह्या संपूर्ण भारतदेशातील पाणीपुरी खाद्यपदार्थाच्या व्यवसायामध्ये एकही ब्रँड आढळून नाही आला. इथेच त्यांनी भारतातील पहिले गपागप पाणीपुरी खाद्यपदार्थाचे ब्रँड सुरु केले.
प्रशांत कुलकर्णीला जाणीव होती कि नोकरी सोबत स्वतःचे विश्व उभे करणे काही सोपे नाही आहे. प्रशांतकडे करोडोची कल्पना होती. त्याचे व्यवसायिक साथीदार आरती शिरसाट आणि पल्लवी कुलकर्णी सोबत तो गपागप ब्रँड आणि इतर खाद्यपदार्थ जसे ८० प्रकारच्या भेळ, २७ प्रकारचे चाट, पोहे इत्यादींचे व्यवस्थापन करतो.
त्याने बिग बाझार शॉप सोबत करार केला आहे ज्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान मध्ये फ्रेन्चायझी सुरु झाली आहे. त्याच्या महत्वाकांक्षेबद्दल विचारले असता प्रशांत बोलला “आमचा स्वप्न बघणार्यांचा समूह आहे, आम्हाला चटरपटर ब्रँड हा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जायचा आहे. भारतीय बाजारपेठेत पाय पसरल्यानंतर आम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाय पसरायला आवडेल.” त्याला आतापासूनच लंडन, ऑस्ट्रेलिया मधून फोन आले आहेत.
जलद सेवा रेस्टॉरंट हा प्रकार भारतामध्ये जलद गतीने वाढत आहे. २०११ मध्ये ह्याची बाजारपेठ हि १३६ करोडची होती, ३५ टक्क्यांनी वाढत ती २०१५ मध्ये ४५० करोड पर्त्य्न जावून पोहचली. ह्याचे मुख्य कारण हे जोडप्यांची जीवन जगण्याची शैली बदलली आहे आणि सोबत खर्च करण्याची क्षमता वाढलेली आहे म्हणू ह्या व्यवसायामध्ये भरभराट दिसून येत आहे.
प्रशांतचा ऑटोमोबाईल ला ट्यूब बनवून द्यायचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. एम बी ए झाल्यावर प्रशांत जेव्हा चटर पटर हि संकल्पना सुरु करायचा विचार करत होता तेव्हा त्याच्या जवळील व्यक्तींना तो वेडा झाला आहे असे वाटत होते, ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करत यशस्वी पणे त्याचा व्यवसाय सुरु आहे.
शांतपणे सगळी परिस्थिती सांभाळत त्याने आतापर्यंत १५,००,००० (एक लाख पन्नास हजार) लाखांच्यावर पाणीपुरी विकल्या आहेत.
जर तुम्हाला पुढच्या वेळेस स्वच्छ आणि चांगल्या पदार्थांनी बनवलेली पाणीपुरी खायची असेल तेही आजारी न पडता तर चटर पटर ला नक्की भेट द्याल.
फ्रेंचायझी साठी खालील लिंक वर संपर्क करा
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७सकारात्मक विचार करणे म्हणजे आयुष्याच्या उंच पर्वतावर गिर्यारोहण करण्यासारखे आहे, पर्वताच्या पायथ्यापासून ते शिखर गाठेपर्यंत अतिशय खडतर जीवावर बेतणाऱ्या समस्यांचा असतो, जेव्हा तुम्ही हे सगळे आव्हान पार करून शिखरावर पोहचता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा अतिशय सुंदर दृश्य बघत असतात.
नकारात्मक विचार म्हणजे गुरुत्वाकर्षनासारखे असते, फक्त थोडा धक्का आणि बाकीचे काम हे नकारात्मक विचारांचे गुरुत्वाकर्षन करते व तुमच्या आयुष्याच्या शिखरावरून जमिनीवर घेवून येते. ह्यामध्ये एक तर तुम्ही शून्यावर येतात किंवा आयुष्य संपू शकते.
आता विचार तुमचा आहे,
सकारात्मक कि नकारात्मक
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७शरीराने अपंग असलेला उद्योगपती सुद्धा आपल्या
उद्योग आकाशा पलीकडच्या उंचीवर नेउन ठेवतो,
पण मनाने अपंग असलेला धडधाकट उद्योगपती हा आपला
आकाशा पलीकडचा उद्योग हा जमिनीवर आणून ठेवतो.
हि मनाची शक्ती आहे,
म्हणून आयुष्यात कधी मनाने अपंग बनू नका.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


उद्योगपतीच्या आयुष्यात व
त्याच्या जीवनाचा एक भाग असलेल्या उद्योगामध्ये
नैसर्गिक समस्या ह्या फक्त २ % असतात,
बाकी अनैसर्गिक ९८ % समस्या ह्या
त्या माणसाने किंवा स्त्रीने स्वतः निर्माण केलेल्या असतात.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७


प्रेम, युद्ध आणि
धंद्यात
सगळ काही माफ आहे.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!
आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!
बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!
यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!
मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?
तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!!
शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती?
तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या?
आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?
हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते!!
मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!
सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!
आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!
आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!
भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!
पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!
पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!
माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?
कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?
वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?
लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?
आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?
निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!
प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!
शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!
आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!
शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो!!
अश्विनीकुमार
बालक पालक आणि कुटुंब
८०८०२१८७९७

जे दर्जेदार आयुष्य अगोदर संपूर्ण जगात जगले जात होते त्याचा दर्जा घसरत चालला आहे किंवा अतिशय खालच्या पातळीवर आहे.

जे दर्जेदार आयुष्य अगोदर संपूर्ण जगात जगले जात होते त्याचा दर्जा घसरत चालला आहे किंवा अतिशय खालच्या पातळीवर आहे.
जे दर्जेदार आयुष्य अगोदर संपूर्ण जगात जगले जात होते त्याचा दर्जा घसरत चालला आहे किंवा अतिशय खालच्या पातळीवर आहे.
मनुष्य हा सकाळी कामाला बरोबर वेळेत जातो पण येण्याची वेळ निश्चित नाही.
पगार वाढतो त्यापेक्षा दुप्पट महागाई वाढत जाते.
कंपनी इतके काम करून घेते कि तो ४० व्या वर्षी निवृत्त जरी झाला तरी तो त्याचे आयुष्य सुख समाधानाने जगू शकत नाही इतकी मानसिक उर्जा त्याची किंवा तिची संपवली जाते.
लहान मोठे उद्योग तीतके सुपर मार्केट मुळे नाही संपले जितके ओनलाईन मार्केट मुळे संपले.
म्हातारे आई वडील हे घर काम करण्यासाठी वापरू लागले कारण खर्च परवडत नाही कामवाली किंवा घर सांभाळणारी बाई चा.
लहान मुल हि खेळाची मैदाने विसरून घरी मोबाईल आणि इंटरनेट अश्या काल्पनिक विश्वात रममाण होऊ लागलीत.
कौटुंबिक, मैत्री आणि शेजाऱ्यासोबत नाते कमी होऊ लागलेत.
कार्यालयातील नातेसंबधांना मजबुती येवू लागली आहे ती देखील कामापुरती.
घर, समाज आणि सार्वजनिक ठिकाणी माणसांची गर्दी असूनही एकटे असल्यासारखे वाटत आहे.
उत्पादनांचे तंत्रज्ञान हे प्रगत होत चालले आहे, सतत च्या नवीन बदलांमुळे आणि मर्यादित ग्राहकांमुळे आहे ते उत्पादन त्यांनी विकून त्यांचेच नव तंत्रज्ञानाने सज्ज उत्पादन घ्यायला ग्राहकांना भाग पाडले जात आहे.
उदाहरणार्थ जर तुम्ही एका कंपनीचे सीम वापरत असाल तरी ते तुम्हाला इतर अनेक सवलतींच्या जाहिरातींचा मारा करतील किंवा एखाद दुसरी स्कीम तुम्हाला न विचारता सुरु करून तुमच्याकडून पैसे काढून घेतील.
म्हणजे तुम्ही नुसते ग्राहक असून ते समाधानी नाही तर तुमच्या मेहनतीच्या कमाईचा एक एक पैसा पण काढायला कमी करणार नाही आणि त्यांची वृत्ती देखील अशी कि तुम्हाला खायला पैसे नसतील तरी चालेल पण आम्हाला पैसे द्या.
वस्तूंच्या किमंती इतक्या भरमसाठ वाढवून ठेवल्या आणि आपल्या कंपनीतल्या सेल्स डीपार्टमेंट ला टार्गेट देतात कि आम्हाला गिर्हाईक आणून द्या आणि नाही आणले तर नोकरी सोडा. आता घरांच्या किमती इतक्या वाढवून ठेवल्या आहेत कि हे कुणालाच शक्य होत नाही, मग पर्याय एकच दुसरी नोकरी शोधा.
आपली लहान मुल हि शेजार्यांच्या घरात वाढायची, आता प्रत्येक जन दरवाजा बंद करून आप आपल्या घरी राहतोय. इथे जाती धर्माचा प्रश्न नाही आहे हे स्वजाती सोबतही घडत आहे.
बातमी देणाऱ्या वाहिन्यांच्या आहारी इतके गेलो आहे कि ते जे बोलतील ते खरे असे मानत बसतो. दोन जणांच्या संवादाची जागा हि वाद विवादाने घेतली आहे. बातमीदार सरळ सरळ विद्वेषाची भाषा वापरत आहे ज्यामुळे घरा घरात वाद निर्माण होऊ लागले आहेत कारण नकारात्मकता अगोदर त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला संपवते.
हे आजचे वास्तव आहे. ह्जारातून एक सकारात्मक मी माणू शकतो पण लाखांतून एक सकारात्मक हि अतिशयोक्ती होते कारण कधीही ती नकारात्मकता तुमच्या आयुष्यात येवू शकते.
ह्याला पर्याय एकच आत्मविकास तेही वास्तव जगाला धरून. सतत आत्मविकास करणारा मनुष्य हा परिस्थिती आपल्या ताब्यात ठेवतो, जो कमजोर नकारात्मक मानसिकतेचा असतो त्याला किंवा तिला परिस्थिती स्वतःच्या ताब्यात ठेवते.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


घरातून कधीही नोकरीच्या
मुलाखतीला जाण्यासाठी पैसे नका मागू,
उद्योग स्थापन करण्यासाठी मागा.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

एकाने उत्तम प्रश्न विचारला "भावना म्हणजे काय?"


भावना म्हणजे आपले शरीर अवयव ज्या संपर्कासाठी भाषा वापरतात त्याला भावना असे म्हणतात. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी भूक, संकट आणि सेक्स हे उदाहरणार्थ घेवू. जेव्हा माणसाची उर्जा संपते तेव्हा सर्व आतील व बाहेरील अवयवांना उर्जेची गरज असते आणि ह्यासाठी भावनांचा एकमेकांशी संपर्कासाठी, संभाषणासाठी वापर केला जातो आणि उर्जेची गरज आपण जेवल्यानंतर भरून निघते. आणि हे आपल्याला तृप्त झाल्याची भावना निर्माण होते म्हणून समजते, न कि तुमचे प्रत्येक अवयव तुम्हाला सांगत बसते कि त्याच्या उर्जेची गरज पूर्ण झाली आहे आता खाणे थांबवा म्हणून.
आपले शरीर, अवयव सतत काम करत असतात, झोपेतसुद्धा. आपल्या शरीरात ७५ ट्रिलियन सेल आहेत, ते सतत एकमेकांशी संपर्क करत असतात. आता तुम्ही विचार करा जर ते आपण जे शब्द वापरतो त्याच्याने बोलायला लागले तर तुमचे काय होईल? सतत ती बड बड ऐकून तुम्हाला वेड लागण्याची पाळी येईल. ह्यासाठी निसर्गाने संपर्क करण्यासाठी भावनांची निर्मिती केली, जे ध्वनी पेक्षा जलद गतीने प्रवास करते.
उदाहरणार्थ तुमची अतिशय जवळची व्यक्ती जर हजारो किलोमीटर लांब जरी असेल आणि तुम्ही त्यांचाच विचार करत असाल तर त्यांचा फोन लगेच येईल ह्याला म्हणतात भावनिक संपर्क, टेलीपेथी. आणि आकर्षणाच्या सिद्धांताला फक्त भावनेची भाषा कळते, म्हणून काही जणांचे आयुष्य एका क्षणात बदलून जाते किंवा ते भाग्यवान असतात.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७100 दिवस नोकरी करत
शेळी होवून जगण्यापेक्षा
१ दिवस धाडस दाखवत
उद्योगासाठी प्रयत्न करून
वाघासारखे जगून मेलेले बरे. 
निवड तुमची आहे.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


कधी कधी मुलांना पालकांच्या
प्रोस्ताहनाची
गरज असते.
- अश्विनीकुमार
बालक पालक
८०८०२१८७९७श्रीमंत आणि गरीब लोकांचे तत्वज्ञान
"श्रीमंत लोक रुपये गुंतवतात आणि उरलेले खर्च करतात.
गरीब लोक रुपये खर्च करतात आणि उरलेले गुंतवतात."
- रोबर्ट कियोसाकी
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७

पदवीधर चायवाला
लखनऊ मध्ये राम मनोहर लोहिया हॉस्पिटल च्या बाहेर एक चाय वाला आहे आणि त्याच्या दुकानाचे नाव असे आहे कि सर्वांचे लक्ष्य वेधून घेते. हे चाय चे दुकान आहे गोविंद आणि त्याच्या ३ भावांचे, ह्यांचे सरासरी वय हे २० ते २५ च्या दरम्यान आहे. दुकानाचे नाव आहे ग्रज्युएट चाय वाला.
पदवी घेतल्यानंतर भावांमध्ये सगळ्यात मोठ्या गोविंद ने एका कॉल सेंटर मध्ये नोकरी करायला सुरवात केली, पण मनासारखा पगार आणि समाधान न झाल्यामुळे त्याने ती नोकरी सोडून दिली. अनेक वर्षांपूर्वी वडील सतीश चंद्रा ह्यांची नोकरी गेली होती व ते कोर्ट कचेर्यांमध्ये अडकले होते.
“पदवीची जास्त काही मदत नाही होत. चांगल्या पदाच्या कामासाठी तुम्हाला इंग्लिश येणे गरजेचे आहे ह्यासाठी आमची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी नव्हती” असे गोविंद सांगत होता.
ह्या चाय च्या दुकानामधून आम्ही माल, व्यवस्थापन आणि कामकाजाचा खर्च वजा करून आम्ही दिवसाला ३५० ते ४०० रुपये निव्वळ नफा कमावतो, हि कमाई कॉल सेंटर च्या नोकरीपेक्षा जास्त होती. गोविंद सांगतो कि “कॉल सेंटर मध्ये मला फक्त ५००० पगार भेटत होता, कामाचा ताणही खूप होता आणि पगार हा वेळेवर भेटत नव्हता.”
जेव्हा त्याची भावंड गोपाल वय २३ आणि माधव वय २१ हे एएसबीडी मेमोरियल कोलेज हरदोई मधून ह्याच वर्षी पास झेल तेव्हा त्यांना नोकरीचा आणि आर्थिक परिस्थिती चा सारखाच अनुभव आला. “मी त्यांना चाय च्या दुकानाची कल्पना सांगितली, सुरवातीला ते नाखूष होते, मी कसे तरी त्यांना राजी केले, आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही वाईट कल्पना नाही आहे.” गोविंद म्हणाला.
ग्रज्युएट दुकानाचे नाव हे दर्शवते कि हि पदवीधर भावंडे आणि त्यांची कल्पना सुष्म-लघु व्यवसायामध्ये काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करत आहेत, आणि पुढील एका मोठ्या व्यवसायाची पायाभरणी करत आहे, ह्यासोबत त्यांनी चांगली नोकरी न भेटण्याची निराशा अशी दूर केली.
हि तरून नवशिक्षित पदवीधर भावंड मिळून दुकान चालवतात. जेव्हा आमच्याकडे पुरेसा पैसा येईल तेव्हा आम्ही अजून शहरभर चाय च्या दुकानांची शृंखला सुरु करू, सकारत्मक गोविंद सांगत होता.
अनेक वर्षांपूर्वी गुजरात मध्ये एका अति सामान्य घरातील तरून रेल्वे वर चाय विकत होता त्यावेळेस तोही अशीच सकारात्मक मोठी स्वप्न बघत होता. नरेंद्र मोदि हे आपल्या भारताचे आज पंतप्रधान आहेत, त्याअगोदर त्यांनी ३ वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री पद भूषवले. काळच सांगेन कि हा ग्रज्युएट चाय वाला यशाचे किती शिखर गाठेल ते.
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७रस्त्यावरील लहान मोठे उद्योग,
व्यवसाय ताब्यात घ्या.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७भविष्य नेहमी बदलत असते.
- अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत 
 ८०८०२१८७९७मराठी समाजाला उद्योजक, व्यावसायिक किंवा गुंतवणूकदार बनवण्यासाठी एखाद दुसरा करोडो अब्जो ची उलाढाल करणारा उद्योगपती निर्माण होवून किंवा करून काहीही फायदा होणार नाही. मराठी समाज घडवण्यासाठी हजारोंचे उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक करणारे लाखो निर्माण केले तरच संपूर्ण मराठी समाज हा बदलू शकतो आणि ह्यामधूनच करोडो, अब्जोंचे व्यवहार करणारे शेकडो उद्योजक, व्यावसायिक निर्माण होऊ शकतात. आणि जेवढे महाराष्ट्रा बाहेर, भारताबाहेर स्थलांतर वाढेल तेवढाच मराठी समाजाचा पाया मजबूत होत जाईल.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७फक्त आत्मविश्वास
आणि रुपयांनी भरलेले पाकीट खिशात असेल तेव्हाचा आत्मविश्वास
ह्या मध्ये जमीन आसमान चा फरक आहे.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७अश्विनीकुमार
८०८०२१८७९७ 
               
चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


तुमचा अपयशा नंतरचा यशासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न
हा तुमच्या पुढच्या पिढीला आत्मविश्वास देवून जातो.
- अश्विनीकुमार
बालक पालक
 ८०८०२१८७९७लोकांनी आणि परिस्थितीने निराश होऊ नका,
तुमच्या प्रतीक्रीयेशिवाय दोन्ही शक्तिहीन आहेत.
- अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत 
८०८०२१८७९७


नोकरी करणारा मालकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतो व त्या बदल्यात पगार घेतो,
मालक स्वतःचे स्वप्न पूर्ण करायला लोकांना कामावर ठेवून घेतो व त्या बदल्यात पगार देतो.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७


भूतकाळ - वर्तमान - भविष्य
- अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत 
 ८०८०२१८७९७

विदेशी प्रॉडक्टला संपवा त्याच्यापेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून

विदेशी प्रॉडक्टला संपवा त्याच्यापेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून
तुम्हाला पी सी बी माहित आहे का? नाही नाही, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाही. मी म्हणतो ते प्रिंटेड सर्किट बोर्ड. तर पीसीबी हा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचा जीव कि प्राण असतो. म्हणजे डोअर बेल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, मायक्रोव्हेव या प्रत्येक घरगुती उपकरणात पीसीबी वापरतात. बरं तुमची बाईक असेल, कार असेल किंवा तुमचं विमान असेल तर या प्रत्येक वाहनात पीसीबी चं अनन्यसाधारण महत्व आहे. कोणत्याही मशिन्स, मेडिकल इक्विपमेंट यात पीसीबी असतातच. हे पीसीबी सिंगल लेयर आणि मल्टि लेयर अशा दोन प्रकारात येतात. मल्टी लेयर पीसीबी मुळे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची साईज लहान होत चालली आहे.
भारतात जितके इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं बनतात त्याला जे पीसीबी लागतात, त्याच्या फक्त २४% भारतात बनतात. आणि ७४% पीसीबी हे चीन मधून इम्पोर्ट होतात. आणि खरी गंमत पुढे आहे मित्रांनो. हे जे पीसीबी भारतात बनतात त्याचं शंभर टक्के रॉ मटेरियल हे चीन मधून इम्पोर्ट होतं. आणि नुसतं भारताला च नाही तर जगाला चीन हे रॉ मटेरियल सप्लाय करतं. अख्ख्या भारताचं पीसीबी चं प्रोडक्शन जितकं आहे तितकं चीन मध्ये एक कंपनी करते आणि अशा किमान १५ कंपन्या आहेत.
अजून एक छोटा हिशोब सांगतो. ह्या पीसीबी इंडस्ट्री मध्ये स्पिन्डल लागतात. माझ्या अंदाजाने भारतात ५००० स्पिन्डल वापरले जात आहेत. चीन मध्ये एका छताखाली २००० स्पिन्डल असलेल्या किमान १० कंपन्या मला माहित आहेत.
कळतं का चीन कुठपर्यंत तुमच्या घरात घुसलं आहे ते. राष्ट्रभक्तीच्या वल्गना करताना जरा थोडा अभ्यास करा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा. नाहीतर आपलं उचललं बोट, अन दाबला की बोर्ड. केलं फॉरवर्ड. आणि हे तर मी तुम्हाला पीसीबी चं सांगितलं. अजून दोन उद्योगाबद्दल अशीच माहिती देऊ शकतो. अहो आपल्या इथे २०० किमी प्रति तास ही रेल्वे करण्याचा विचार आज आहे ना तिथे चीन मध्ये ३५० किमी प्रतितास इतक्या वेगाने रेल्वे पळत आहेत.
त्यामुळे मनगटात दम असेल ना तर हे पीसीबी सारखे प्रॉडक्टस भारतात चीन पेक्षा कमी भावात बनवून दाखवा. अन हे शक्य आहे. आज भारताचा लेबर चीन पेक्षा अर्ध्या भावात मिळतो. पण त्याला जोड लागते ती सामाजिक इच्छाशक्ती ची. ती नाही म्हणून हे असले बहिष्कार वगैरे पळपुटे आवाहन करावे लागतात.
आपल्या कडे कामगार, इंजिनीअर,कंपनीचे मालक सर्वच राजकारण, धर्म यावर चर्चा करण्यात गुंतलेले. चीन मध्ये मी जातो बर्‍याच वेळा पण तिथे मी पहिले की ड्युटीवर असलेला व्यक्ती एकमेकांना बोलायचे सोडा एकमेकांकडे पहात सुद्धा नाहीत.
बाबा रामदेव परवडला. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून लिव्हर आणि पी अँड जी च्या उरात धडकी भरवली त्याने. एखाद्या प्रॉडक्टला संपवायचं असेल तर त्याच्या पेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून संपवता येतं, बहिष्काराने नाही.
तेव्हा असले मेसेजेस फॉरवर्ड करून स्वतः चे हसे नका करून घेऊ. चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्या ऐवजी, प्राचीन अन अर्वाचीन भारताच्या इतिहासाचा वृथा अभिमान सोडा.
आणि
भारताला सर्व स्तरांवर सक्षम कस बनवता येईल ह्यावर विचार करा ….
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७ 
               
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकतुमची मुल हि तुमची प्रतिबिंब असतात.
अश्विनीकुमार
बालक पालक
८०८०२१८७९७

तुम्ही भाग्यशाली आहात कि दुर्भाग्यशालीअनेक लोकांना हा प्रश्न पडत असेल कि "मी सोडून बाकीचे भाग्यशाली का आहे?" एकदा एक शिक्षक सफेद कपडा ज्यावर काळा ठिपका असतो ते घेवून येतो. तो विद्यार्थ्यांना कपडा दाखवतो आनि विचारतो "तुम्हाला काय दिसत आहे?" पहिला विद्यार्थी "सर काळा ठिपका", दुसरा विद्यार्थी "सर लहान काळा ठिपका", तिसरी विद्यार्थिनी "गोल आकाराचा काळा ठिपका". असे एक एक करून सगळे विद्यार्थी काळ्या छोट्या ठिपक्या बद्दलच बोलत असतात.
शिक्षक निराश होतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो "मी एक सफेद कपडा घेवून आलो ज्यामध्ये फक्त एकच काळा ठिपका आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना तो फक्त छोटासा काळा ठिपका दिसला पण कोणीही तो ठिपका सोडून बाकी इतक्या मोठ्या सफेद भागाकडे लक्ष्य नाही दिले."
शिक्षक पुढे म्हणाले "आपले आयुष्यही असेच असते. आपण आपल्या आयुष्यात जास्त प्रमाणात घडणाऱ्या चांगल्या घटना, आनंदाचे क्षण सोडून एखाद दुसरी काल, परवा किंवा काही वर्षांपूर्वी घडलेली एखाद दुसरी वाईट घटना किंवा क्षण लक्ष्यात ठेवून आपले वर्तमान आयुष्य दुखात आणि भविष्य अशीच काही घटना किंवा क्षण घडेल ह्या भीतीत जगत असतो."
शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे आणि जगभरातील अध्यात्मिक ग्रंथामध्ये हि उल्लेख आहे कि भाग्यशाली तोच असतो जो संपूर्ण लक्ष्य फक्त समस्येकडे केंद्रित करून नाही ठेवत, त्यांचे संपूर्ण लक्ष्य हे उत्तराकडे, संधीकडे असते. तुम्ही ज्यावर लक्ष्य केंद्रित कराल ते तुमच्या आयुष्यात घडणारच, दुसर्या भाषेत तुम्ही घडवत आहात.
आता तुम्ही ठरवा कि तुम्हाला कसे जगायचे आहे ते.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७ 
               
चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

<! - ->


१६व्या वर्षीच कुटुंबातल्या भीषण आर्थिक अडचणींमुळे तिला लग्न करावं लागलं, १८व्या वर्षी ती दोन मुलींची आई झाली,
१९८६ ते १९८९ ही तीन वर्षे तीने ५ रुपये रोजावर शेतमजूरीचं काम केलं,
नंतर मात्र तिने ‘आकाशात झेप घ्यायची’ ठरवलं,
अतोनात बिकट परिस्थितीतसुद्धा अपरिमित कष्टांची परिसीमा करून तिने शिक्षण पूर्ण केलं,
आणि प्रगतीचा ध्यास घेत यशाची शिखरं पादाक्रांत करत करत आज ही भारतीय ‘दुर्गा’ अमेरिकेतल्या ‘कि सॉफ्टवेअर सोल्युशन्स’ची सीईओ आहे....
आज भेटूया आपल्या भारतातल्या या अजून एका दुर्गेला...ज्योथी रेड्डी’ला
#Bharatiyans
प्रचंड इच्छाशक्ती, असामान्य आत्मविश्वास आणि जबरदस्त कार्यशक्ती असलेल्या माणसाने ठरवले तर काहीही अशक्य नसते हे ज्योथी रेड्डीने तिच्या चिकाटी, कठोर परिश्रम आणि असामान्य कर्तुत्वाने साऱ्या जगाला दाखवून दिले.
ज्योथीचे स्वप्न आहे की भारतातल्या प्रत्येक अनाथ मुलाची स्वतःची अशी एक स्वतंत्र ओळख असावी, त्यांना समान संधी मिळावी आणि ग्रामीण भागातील प्रत्येकाला व्यवसायाची संधी मिळावी.
ज्योथीचा जन्म विशाखापट्टणम येथील वारंगम गावात १९७० साली झाला. पाच बहिणींमध्ये ज्योथी सगळ्यात लहान. घराची परिस्थिती अतिशय गरीब आणि हलाखीची आणि म्हणूनच ज्योथीची रवानगी अनाथ आश्रमात झाली.
लहान वयातच जीवनाने तिला नानाविविध धडे द्यायला सुरुवात केली होती. अनाथआश्रमात सुख-दुःख वाटायला तिला कोणी सवंगडी नव्हते पण ह्या गोष्टीकडे फार लक्ष न देता, खंत न मानता ज्योथीने शिक्षणात पुरेपूर लक्ष घातले.
अनाथ आश्रमात राहून सरकारी शाळेत ज्योथीचं शिक्षण सुरु झालं. सुट्टीच्या काळात ज्योथी सुपेरिटेंडेंटच्या घरी घरकाम करत करत काही छोटे मोठे कोर्स पण करायची. लहाणपणीच तिला एक गोष्ट नक्की लक्षात आली की ती शिकली आणि चांगली नोकरी मिळाली तर आणि तरच तिचे आयुष्य बदलू शकेल.
माणूस ठरवतो आणि नशीब उधळून लावतं असं नेहेमीच वाढून ठेवलेलं ताट ज्योथीच्या बाबतीत सुद्धा सामोर आलं.
दूरच्या चुलत भावाशी तिचं लग्न लावून देण्यात आलं. १६ व्या वर्षी लग्न झाल्यावर २ वर्षांतच ज्योती दोन मुलांची आई सुद्धा झाली.
आता परिस्थिती खूपच बिकट झाली. चरितार्थ चालवण्यासाठी शेतावर ५ रुपये रोजचे अशाप्रकारे ज्योथी काम करू लागली. नोकरी उच्च शिक्षण आणि त्यातून पुढे मिळू शकणारं चांगल जीवन ही सगळीच स्वप्न भंगून गेली.
त्याच काळात ‘नेहरू युवा केंद्रा’कडून एक संधी चालून आली.
केंद्र सरकार तर्फे तरुणांसाठी चालवण्यात येणाऱ्या योजनांचा प्रसार करण्याचे काम ज्योथीला मिळालं. पण त्यातून मिळणारं मानधन तिच्या दोन मुलांच्या प्राथमिक गरज देखील पूर्ण करू शकत नव्हतं. आणि आता म्हणून महिन्याचं उत्पन्न वाढविण्यासाठी ती दिवसा बाकीचं काम आणि रात्री पेटीकोट शिवायला लागली.
हे करत असतानाच ज्योथीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटीतुन कला शाखेतलं शिक्षण पूर्ण केलं. यासोबतच ती टायपिंग सुद्धा शिकली. खरतरं हे अजिबातच सोपं नव्हतं कारण पैश्यांची चणचण तर होतीच पण घरी लक्ष देताना ओढाताण होत असल्याने जवळच्या नातेवाईकांचा भयंकर त्रास सुद्धा तिला सहन करावा लागत होता.
१९९४ मध्ये ज्योथी बी.ए. झाली आणि १९९७ मध्ये पदव्युत्तर शिक्षण काकतीय युनिव्हर्सिटी मधून घेतल्यानंतर ज्योथीला एका शाळेत ३९८ रुपयाच्या पगाराची विशेष शिक्षकाची नोकरी मिळाली.
ह्या नोकरीसाठी रोज ज्योथीला दोन तासांचा प्रवास करावा लागत असे आणि येण्याजाण्यात तिचा बराचसा पगार सुद्धा खर्च व्हायचा. म्हणून आता यावर तोडगा म्हणून कल्पक आणि कष्टाळू ज्योथीने प्रवासात साड्या विकायला सुरुवात केली.
तिच्या या सगळ्या एकांड्या संघर्षात ज्योथी एक फार महत्वाची गोष्ट शिकली आणि ती म्हणजे (Time management ) वेळेचा सदुपयोग.
शिक्षकाची नोकरी आणि साड्यांची विक्री यातून ज्योथी आता पुरेसे कमावत होती पण 'अजून चांगल आयुष्य' ही तिची भूक मात्र ज्योतीला शांत बसू देत नव्हती.
आणि यातच तिच्या एका नातेवाईकाला अमेरिकेहून भेटायला आलेल्या एका दूरच्या नातेवाईकाला पाहून ज्योतीलाही अमेरिकेला जायचे ध्यास लागले.
नव्या स्वप्नांनी पछाडलेल्या ज्योथीने आता कॉम्पुटर कोर्स केला आणि तो दिवस उजाडला.
नवरा आणि समाजाच्या विरोधाला न जुमानता, आपल्या दोन्ही मुली मिशनरी -हॉस्टेल मध्ये ठेवून त्यांची नीट व्यवस्था लावून ज्योथी अमेरिकेला रवाना झाली.
अमेरिकेत जम बसवणे इतके सोपे आहे का?
पण कामाच्या बाबतीत वाघीण असणाऱ्या ज्योतीला ‘पण’ या शब्दांनी आणि या शब्दामुळे जन्म घेणाऱ्या प्रश्नांनी कधीच छळलं नाही.
स्वतःचा खर्च भागवण्यासाठी तिने गॅस स्टेशन (पेट्रोल पम्प ) वर काम करायला सुरुवात केली.
बेबी सिटींग, हमाली अशी काम सुद्धा ज्योथीने तिथे कुठलीही तमा न बाळगता केली. विडिओ-पार्लर मध्ये काम केलं. एका गुजराथी परिवाराकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत असताना नातेवाईकांच्या मदतीने तिला एका कंपनीत काम मिळालं आणि नंतर अश्याच दुसऱ्या एका कंपनीत तिला सॉफ्टवेअर रिक्रुटरचा जॉब मिळाला.
इंग्रजी भाषा आणि उच्चार यांचा पहिल्यांदा जरासा अडथळा होता पण त्यावर सुद्धा ज्योथीने कष्टाने अभ्यास करत करत मात केली.
तिच्यातला उद्योजक जागा झाला.
मेक्सिकोला स्टॅम्पिंग’साठी गेली असता तिच्या मनात एक कल्पना आली,”आपण सुद्धा सहजच असाच एक उद्योग सुरु करू शकतो.” कारण ज्योथीला या संदर्भातल्या सगळ्या पेपरवर्कची व्यवस्थीत माहिती होती.
आता या नवीन ध्यासाने झपाटलेल्या ज्योथीने स्वतःजवळ असलेली सर्व बचत पणाला लावून आता तिने एक ऑफिस चालू केलं आणि आजही ज्योथी 'की सॉफ्टवेअर सोल्युशन्स' यशस्वीपणे चालवते आहे.
ज्योतीच्या दोन्ही मुली आता अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून इंजिनीअर झाल्या आहेत आणि लग्न करून अमेरिकेतच स्थायिक झाल्या आहेत.
ज्योती आता भारतातल्या स्वतःच्या स्वप्नांवर काम करते आहे ज्यात ती युवकांना ट्रैनिंग आणि नोकरीच्या संधी उपलध करून देते. ज्योतीला एक स्कूल सुरु करायचे आहे ज्यात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना बालवाडी ते पदव्युत्तर पर्यंतचे सर्व शिक्षण घेता येईल.
ज्योथी अनेक सामाजिक संस्थांशी जोडले गेली आहे. स्वतःच्या अनाथालायातले दिवस लक्षात ठेवून मुद्दामून ठरवून सध्या अनेकानेक अनाथालयांची कायदेशीर सल्लागार म्हणून ज्योथी आत्ता काम पाहते आहे.
ज्योथी जेव्हा जेव्हा भारतात येते तेव्हा तेव्हा ती इथे अनेकानेक सेमिनार्स घेते आणि इथल्या युवकांना आणि विशेषतः स्त्रियांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ती प्रोत्साहन देते .
ज्योथी म्हणते, " परिस्थिती काहीही असो महिलांनी शिकलंच पाहिजे, त्यांनी आर्थिकदृष्टा स्वतंत्र असलंच पाहिजे. महिला कदाचीत आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर एकतर वडिलांवर, नवऱ्यावर अथवा मुलावर अवलंबून असतात. पण, आता हे चित्र बदललं पाहिजे, त्यांनी असे करण थांबवलं पाहिजे. हे त्यांच्यासाठी, समाजासाठी आणि पर्यायाने देशासाठी सुद्धा प्रगतीचे आणि ‘चांगल्या आयुष्यासाठीचे’ उत्तम द्योतक ठरेल."
स्वतःच्या उदाहरणावरून केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सुद्धा प्रत्येक स्त्रीला अविरत प्रेरणा देणाऱ्या ज्योथी रेड्डीच्या जिद्दीला आणि संघर्षाला Team Bharatiyans’चा प्रणाम.
वैशाली देवकर
Team Bhartiyans
(बातमी सौजन्य–इंडिया टाईम्स)

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७ 
               
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक