पैश्यांच्या बाबतीत काही स्पष्टीकरन देण्याचा प्रयत्न करतो, जो तटस्थ आहे, जो मुक्त मनाचा आहे त्याला समजून येईल.
एके ४७ रायफल हि चांगला मनुष्य चांगल्या कामासाठी वापरेल आणि वाईट मनुष्य हि वाईट कामासाठी वापरेल.
संविधान ह्याचा वापर चांगला मनुष्य हा चांगल्या वापरासाठी करेल आणि वाईट मनुष्य हा वाईट वापरासाठी करेल.
असेच काही चित्र हे कायदा सुव्यवस्था, न्यायपालिका ह्याबाबतीतही आहे.
पैसा पण अशीच वस्तू आहे. ह्याचाही वापर हा चांगल्या आणि वाईटासाठी करू शकतो.
चार प्रकारची समाजात लोक असतात आहेत आणि राहणारच
१) वाम, अवैध आणि गुन्हेगारी मार्गाने पैसा कमावणारे
२) सरळ मार्गाने पैसा कमावणारे
३) चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही मार्गांनी पैसे कमावणारे
४) परिस्थितीनुसार चांगल्या आणि वाईट मार्गाने पैसा कमावणारे
हि सर्व लोक कालांतराने आप आपले मार्ग बदलत असतात. हा निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही जर जीव शास्त्राचा अभ्यास केला तर आढळून येईल. अँटिबायोटिक्स ह्या जास्त पावर च्या गोळ्या घेवून घेवून, अतिरेक करून ते विषाणू देखील आपल्या मध्ये बदल करत, आपली जनुके बदलत त्यांची पुढील पिढी हि अँटिबायोटिक्स ला प्रतिसाद देत नाही, त्यावेळेस अजून जास्त पावर ची औषधे निर्माण करावी लागतात. ह्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावर होतोच.
आता वरील चार प्रकारची मानसिकता काळानुसार जगण्याच्या नियमानुसार कायमस्वरूपी निर्माण झालेली आहे. कायमस्वरूपी म्हणजे आपण जो पर्यंत जिवंत आहोत तो पर्यंत. त्यापुढील भविष्य कोणीच सांगू शकत नाही आणि वर्तवू शकत नाही.
आणि हे फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. आंतरराष्ट्रीय उद्योजक, व्यवसायिक हे बंदुका अतेरीक्यांना विविध मार्गांनी विकतात आणि सैनिकांनाही विविध मार्गांनी विकतात.
जगाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर असे जाणवून येईल कि गरीब ते मध्यमवर्गीय हा प्रत्येक वेळेस ह्या न त्या कारणाने भरडला गेला आहे.
गरीब, मध्यमवर्गीय हा रेल्वे ने प्रवास करतो तिथेही गर्दी. श्रीमंत, सत्ताधारी हे आप आपल्या आलिशान गाड्या, विमाने आणि हेलिकॉप्टर ने प्रवास करतो, तिथे फक्त तो, त्याचे कुटुंब किंवा इतर साथीदार असतात.
गरीब, मध्यम वर्गीय हे सतत तुटवड्यामध्ये असतात तर श्रीमंत आणि सत्ताधारी ह्यांना प्रत्येक गोष्ट हि सर्व मार्गांनी आणि भर भरून भेटत असते.
गरीब मध्यम वर्गीय मेला तरी कुणाला काही फरक पडत नाही. श्रीमंत आणि सत्ताधारी मेला तर त्याची दखल संपूर्ण मिडिया घेते, आणि त्यांची नावे ह्या नाही तर त्या कारणाने सामाजिक उपक्रमाद्वारे सतत चर्चेत असतात.
गरीब आणि मध्यमवर्गीय तरून तरुणींना शून्यातून किंवा आहे तिथून सुरवात करावी लागते. श्रीमंत आणि सत्ताधार्यांना शेअर चा पैसा, उच्च पद हे वारसा हक्काने मिळते.
हा फक्त ढोबळ मानाने फरक सांगितला आहे. अजून खोलात शिरलं तर मानुसकिवरून आपला विश्वास कायमचा उडून जाईल.
सांगण्याचा उद्देश एवढाच कि आत्मविकासात मग्न रहा. परिस्थितीनुसार बदलत रहा. आपले आयुष्य हे काही कुठल्या प्रोस्ताहन दिलेल्या पुस्तकाप्रमाणे चालत नाही. परिस्थितीनुसार आपल्या ज्ञान आणि अनुभवाचा वापर करा.
दिवस आहे तशी रात्रही आहे. चांगले आहे तिथे वाईटहि आहे. मनुष्य म्हंटला कि चुकणारच. प्रयत्न करणे कधीही थांबवू नका. जास्तीत जास्त निसर्ग नियमांचे पालन करा, त्या गरजा पूर्ण करा.
इतिहास साक्षी आहे कि जग कोणीही बदलू शकले नाही. निसर्ग साक्षी आहे कि जो काळानुसार बदलत गेला तो आणि त्याच्या पिढ्या टिकल्या, बाकी सगळे काळाच्या ओघात संपले.
बाकी निर्णय आपला.
धन्यवाद,
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार