बेडूक आणि विंचू ह्यांची कथाबेडूक आणि विंचू हे खूप चांगले मित्र (ज्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता अशी व्यक्ती घरची किंवा बाहेरची.) असतात. विंचूला एकदा नदी पार करून पलीकडे आपल्या नातेवाईकांना भेटायला जायचे असते.
तो आपली समस्या बेडकासमोर मांडतो.
विंचू : मला नदी पार करून पलीकडे माझ्या नातेवाईकांना भेटायला जायचे आहे. पण समजत नाही कि मी नदी पार कशी करू.
बेडूक : तू बरोबर बोललास. मी पण तुला मदत केली असती पण तू मला डंख मारू शकतो म्हणून मी मदत नाही करू शकत.
विंचू : आपण इतके वर्षांचे मित्र आहोत. मी तुला डंख कसे मारणार? तू माझ्या मैत्रीवर विश्वास ठेवू शकतो.
बेडूक : ठीक आहे. चल बस पाठीवर. मी आताच तुला नदी पार करून देतो.
विंचू बेडकाच्या पाठीवर बसतो आणि बेडूक नदीत उतरून पोहायला लागतो. नदीच्या मध्यभागी गेल्यावर विंचू डंख मारतो. आणि बेडूक तडफडायला लागतो.
बेडूक : अरे मूर्ख तू हे काय केलेस, तू मलाच डंख मारलास. मैत्रीचा विश्वासघात केलास. माझ्यासोबत तू पण बुडून मरशील हे तुलाही माहित होते ना?
विंचू : मित्रा मला माफ कर. डंख मारणे हि काही माझी सवय नाही आहे कि जिला मी ताब्यात ठेवू शकतो. हा माझा स्वभाव आहे, ह्यामुळे नकळत माझ्याकडून कृती होवून जाते.
ते दोघेही बुडून मरून जातात.
बोध :
जर स्वभाव चांगला असेल जगभरातील व्यसन जरी असतील तरी ती व्यक्ती डंख मारत नाही. पण जर स्वभाव वाईट असेल आणि निर्व्यसनी असेल तर तो डंख मारत राहिल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्याकडे दोन पर्याय आहे. पहिला दुसर्यांच्या अनुभवातून शिका, ह्याला हुशार समजूतदार म्हणतात. दुसरा स्वतः अनुभव घ्या आणि शिका, ह्याला मुर्खपणा म्हणतात.
हा नियम जगभरात सगळीकडे सारखाच आहे. मनुष्य घरचा असो किंवा बाहेरचा स्वभाव चांगला असेल तर चांगलाच वागेल आणि वाईट असेल तर वाईटच वागेल. इथे तुमच्या भावनांना कींमत नाही.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार