तुमचे लक्ष्य तुमच्या भावनांवर प्रभाव पाडते.
तुमच्या भावना तुमच्या कृतीवर प्रभाव पाडतात.

तुमची कृती तुमच्या निकालावर प्रभाव पाडते.
तुमचा निकाल तुमच्या परिणामांवर प्रभाव पाडतो.

तुमचे परिणाम हे तुमचे भाग्य ठरवतात.
तुमचे भाग्य तेव्हाच तुमच्या ताब्यात राहील जेव्हा
तुम्ही तुमचे लक्ष्य तुमच्या ताब्यात ठेवाल.

जोन्ह असराफ

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



बकऱ्या सारखे आयुष्य का जगत आहात,
जेव्हा तुम्ही वाघासारखे आयुष्य जगू शकता?
आरोपी सारखे आयुष्य का जगत आहात,
जेव्हा तुम्ही लीडर सारखे आयुष्य जगू शकता?
घेणारे का बनून राहत आहात,
जेव्हा जग देणाऱ्या भोवती असते?
परत उठा. खंबीरपणे उभे राहा.

रोबिन शर्मा

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



लहान मुल हि वयस्कर लोकांपेक्षा जास्त क्रिएटिव्ह असतात. अशक्य आहे हे त्यांना माहित नसते हा त्यांचा मुख्य गुण असतो.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

तुम्ही चोर आहात कि राजा आहात

तुम्ही चोर आहात कि राजा आहात


एक गृहिणी आपल्या मुलाला घेवून बाजारातून चालली होती, त्यावेळेस त्या बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने आपल्या आईला विचारले "आई तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" आई म्हणाली "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोडे पुढे गेल्यावर पुढून नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच आईला म्हणाला "आई तो बघ आजून एक चोर आला", आई म्हणाली "हळू बोल, ते मारतील आपल्याला, तो राजा आहे." मुलगा आईला म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." आई म्हणाली "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे."
आपले अंतकरण, आपल्या भावना आणि आपले विचार हे शिपाई आहेत, आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण चोर आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण राजा आहोत. निवड तुमची आहे.
तुम्ही चोरासारखे जगत आहात कि राजा सारखे?
भीष्मराज बाम

अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
8080218797



शैक्षणिक जगतात अगोदर शिकवले जाते व परीक्षा नंतर होते,
आयुष्यात अगोदर निकाल हाती येतो नंतर मनुष्य शिकतो.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



पैश्यांचा ओघ हा तुम्ही चांगले किंवा वाईट, इमानदार किंवा बेइमानदार, सज्जन किंवा दुर्जन, लहान किंवा मोठा बघून नाही येत, पैश्यांचा ओघ हा एकसुराने त्याच्याच आयुष्यात येतो जो त्याचे महत्व समजतो व तो कमावण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो, एक प्रकारे उर्जा आहे, विजेचा झटका हा इमानदार किंवा बेइमानदार माणूस बघून नाही लागत, तो सगळ्यांना एकसारखा लागतो.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

“आपल्या आयुष्यात मानसिक व शारीरिक आरोग्याला व रुपयांना सर्वात वरचे स्थान देणे किती गरजेचे आहे?” वास्तविकतेवर आधारित


आपल्या आयुष्यात मानसिक व शारीरिक आरोग्याला व रुपयांना सर्वात वरचे स्थान देणे किती गरजेचे आहे हे खालील उदाहरणावरून समजेल,
काल स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले हॉस्पिटल चे बिल
ICU चा फक्त गोळ्यांचा खर्च दिवसाला २०,००० (वीस हजार)ते २५,००० (पंचवीस हजार) रुपये
एकूण फक्त गोळ्यांवर खर्च झालेली रक्कम १,५०,००० (दीड लाख)रुपये
संपूर्ण उपचाराचा खर्च ७,००,००० (सात लाख) ते ८,००,००० (आठ लाख) च्या घरात.
इमानदारीने इतके पैसे उभे करणे शक्यच नाही, जर खानदानी श्रीमंत किंवा अगोदर पासून आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर काही समस्या नाही, माणूसएका झटक्यात गरीब होतो, मानसिक त्रास तो वेगळा. हे माझ्या समोर घडणाऱ्या काही प्र्संगापैकी एक, मग विचार करा किती लोक जे आपल्या संपर्कात येतच नाही ते पैसे नसल्यामुळे स्वतःचा, घरच्यांचा जीव जात असताना बघत असतील त्यांची काय परिस्थिती असेल, हे मी सांगतो ते काल्पनिक कथा नाही आहे, ज्याला अनुभव येतो किंवा जो ह्या अनुभवातून जात असतो त्यालाच वास्तव माहित असते.
डॉक्टर हा उच्च शिक्षित आणि समाजातील आदरणीय, प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व समजले जातेपण जो माणूस ह्या सगळ्या परिस्थितीतून जातो त्यालाच डॉक्टरांचे खरे रूप दिसून येते. कुठल्याही पदवीने माणसाला शहाणपण येत नाही, जर स्वभावाने चांगला माणूस असेल आणि तो डॉक्टर असेल तर तो स्वभावाने चांगलाच राहणार, आणि जर स्वभावाने वाईट असेल तर तोच गुण त्याच्या पेश्यामध्ये दिसून येईल.
तुमच्या पेक्षा जास्त पदवीधर आणि उच्च पदवीधरांचा अनुभव खरेच माणुसकीसाठी समाजसेवा करणाऱ्या लोकांनी घेतले आहे, जरा त्यांचे अनुभव ऐका नाहीतर एक महिना फिरा त्यांच्यासोबत, अक्षरक्ष तुमच्या अंगावर शहारा येईल असे अनुभव येतील.
ह्याच मध्ये तुम्हाला माणुसकीची जान असणारे पदवीधर आणि उच्च शिक्षित पण भेटतील, जे अक्षरक्ष देवापेक्षा मोठे वाटतील तुम्हाला असे अनुभव पण येतील.
म्हणून मी सतत बोलत असतो कि खरे शिक्षण शाळा, विद्यापीठ आणि घराबाहेर सुरु होते. जो कमी वयात अनुभव घेतो तो आयुष्य उत्तम जगू शकतो, जो असे अनुभव उशिरा घेतो तो मानसिक तणावात जातो, कारण लहानपणात मनुष्य लवकर शिकतो, त्याच्या मेंदूची वाढ होत असते, मोठे होई पर्यंत आपल्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते व एक प्रकारे खूप नकारात्मक गोष्टींची सवय झालेली असते, ती एका झटक्यात बदलणे शक्य नाही.
वीस वर्षांपूर्वी लावलेले वडाचे रोपटे आता मोठे झाड झालेले असते, रोपटे एका हाताने आरामात उखडून टाकू शकता, पण इतके मोठे झाड तुमच्या हातात पण येणार नाही आणि उखडून टाकण्याची तर दूरची गोष्ट.
जगात सर्वकाही चांगलच आहे आणि चांगलच झाले पाहिजे म्हणजे तुम्ही भ्रमात आहत व मानसिक दृष्ट्या कमजोर आहात, जगात सर्वकाही वाईटच आहे आणि वाईटच झाले पाहिजे म्हणजे तुम्ही भ्रमात आहत व मानसिक दृष्ट्या कमजोर आहात, जग चांगल पण आहे आणि वाईट पण आहे, ह्या दोन्ही गोष्टी होतच राहणार, येणाऱ्या वेळ प्रसंगांना बघून मला तोंड देत अनुभवत मिळवत जगावे लागणार आहे, म्हणजे तुम्ही हुशार आहात आणि मानसिक दृष्ट्य सक्षम आहात.
वाचा, विचार करा, निर्णय तुमचा आहे, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचे कि लाचारासारखे आयुष्य जगायचे. तुम्ही जर काळानुसार चाललात तर तुम्ही टिकाल, जर नाही चाललात तर संपून जाल.
तुमच्या आर्थिक उन्नती साठी आजच संपर्क करा, जर वर्तमान बदलला नाही तर तो पुढे जाऊन भविष्यकाळ होणार आहे. तुमचे आणि तुमच्या मुलांचे भविष्य सर्वांगीण विकासाचे, श्रीमंतीचे आणि समृद्धीचे करायचे आहे कि अंधारमय करायचे आहे.
धन्यवाद

अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७

वाचा आणि विचार करा “५ लाखात शहरात घर”, “५०० रुपयात मोबाईल”, “घर बसल्या लाखो कमवा”


फुकट आणि स्वस्त च्या मागे पळणे म्हणजे आपली पैसे न कमवण्याची, कमी आत्म विश्वासाची मानसिकता दर्शवते.
१) एक जाहिरात पुन्यासारख्या शहरात काही लाखात स्वस्तात घर, बुकिंग रक्कम फक्त १००० + सेवाकर १४५, जाहिरातीवर विश्वास बसण्यासाठी वापर केला गेला सरकारी योजनेचा, मुख्यमंत्री आणि एका मोठ्या मंत्र्याचा फोटो वापरण्यात आला, त्यावर कमावलेली रक्कम "१०,००,००,००० (१० करोड)" पेक्षा जास्त, हे पैसे कमवायला लागलेला कालावधी फक्त २ ते ३ दिवस.
२) ५०० रुपयात मोबाईल, जाहिरातीवर विश्वास बसण्यासाठी हि कल्पना मेक इन इंडिया ह्या कार्यक्रमात साकार करण्यात आली, कमी खर्चाचे व्यासपीठ सरकारचे, काही मोठ्या मंत्र्यांचे चेहरे. मोबाईल ची किंमत २५१ आणि ५०० रुपये, पहिल्या दिवशी ३०००० लोकांनी बुक केले व बुकिंग ची आत होती कि पूर्ण पैसे भरणे, पहिल्याच दिवशी कमावलेली रक्कम ७५,00,000 (७५ लाख).लोकांचे नशीब चांगले म्हणून पाह्लीयाच दिवशी वेबसाईट क्रेश झाली नाहीतर हि पण रक्कम करोडोंच्या घरात गेली असती.
३) घर बसल्या संगणकावर पैसे कमवा, ४ तासात १० किंवा १५ हजार कमवा दररोज, फक्त सुरवातीला १००, २००, ५०० किंवा १००० रुपये भरा, जाहिरात बनवायला खर्च वेबसाईट कमीत कमी एक पेज ५०० रुपये वर्षाचे, पेपर जाहिरात २०० ते ३०० अंदाजे, छोटे पत्रक स्थानकाबाहेर वाटण्यासाठी १००० रुपयात २००० ते ३००० साईझ नुसार, कमाई दिवसाला लाखो रुपये.
४) उद्योग व्यवसाय भरभराटीला आणा, एक दिवसाचा कोर्स ते ८ दिवसाचा कोर्स सर्व समस्यांचे समाधान फी हजार पासून ते लाखांपर्यंत, विश्वास बसण्यासाठी मोफत व्याख्यान, शब्दांनी संमोहित करायचे (फक्त कमजोर मानसिकतेची लोक किंवा समस्यांनी ग्रासलेली लोक लगेच आकर्षित होतात), १०० तून एखाद दुसरा ज्याच्या वर सकारात्मक परिणाम झाला आहे तो उठून उभा राहून आपला अनुभव सांगणार, तात्पुरते प्रोस्ताहन देणारे भाषण. गुंतवणूक सभागृह किंवा शाळेचा वर्ग ३ तासांसाठी भाड्याने घेणे, फी कमीत कमी १००००, १०० तयार झालेली लोक २० * फी १०००० = २०००००.
५) मानसिक विकारांपासून मुक्ती मिळवा, निराशा, भीती, कमी आत्मविश्वास, तोतरेपणा, न्यूनगंड, स्मरण शक्ती वाढवा, १ ते ८ दिवसांचा कोर्स करा आणि आयुष्य सुख समाधानाने जगा. ४ क्र्मांकासाराखेच इथे पण कमावून जातात.
उदाहरण तर खूप आहेत आणि त्याचे भयंकर वास्तव हि बघितले आहे, पैसा आणि ताकद खूप काही करू शकते, एकदा का पोलिस स्टेशन शी तुमचा संपर्क झाला कि चांगलेच अनुभवास येईल.
वास्तवात या, तुमच्याकडे आज पैसे आहेत तर सगळे तुम्हाला विचारतील, विविध प्रकारचे लोभ दाखवून तुमच्या जवळचा एक एक पैसा काढण्याचे काम करतील, अन्न, वस्त्र, निवारा, सरकार, वीज वितरक, पाणी वितरक ह्या सर्वांना आपणा पैसा पुरवतो, ते काही आपल्याला फुकट नाही देत, तुमच्याकडून एक एक रुपयाचा हिशोब घेतला जातो, सरकारला कर नाही भरला तर लगेच तुमच्यावर फौजदारी कारवाई करतील, पैसे नसतील तर किराणावाला अन्न नाही देणार, घरभाडे नाही भरले तर सोसायटी कारवाई करते, वीज वितरक वीज मित्र चे कनेक्शन कापून टाकतो, पाणी वितरक पाणी देत नाही, ह्याला खालील पर्याय आहेत,
१) मानसिक दृष्ट्या सक्षम बना
२) आर्थिक दृष्ट्या सक्षम बना
३) नुसते शिक्षित नका बनू तर अनुभव घेवून हुशार बना
४) मुलांना मुलभूत गरजा पूर्ण कश्या करायच्या ह्याच्याबद्दल प्रत्यक्ष प्रशिक्षण द्या, त्यानंतर त्यांच्या शिक्षणाकडे बघा.
काही शंका असल्यास संपर्क करा.

धन्यवाद,

अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक
८०८०२१८७९७

श्रीमंतीकडे व यशाकडे खेचून नेणारी उत्तेजना


फार पूर्वीच्या काळी,एका महान योध्यासमोर अशी एक परिस्थिती उदभवली कि रणांगणावर विजय निश्चित करण्यासाठी त्याला खात्रीलायक निर्णय घ्यायला हवा होता. तो एका शक्तिशाली शत्रूशी सामना देण्यासाठी आपली सेना पाठवणार होता, पण शत्रूच सैन्यबळ संख्येन अधिक होत. त्यान आपले सैनिक जहाजांवर चढवले, शत्रूच्या प्रदेशाकडे कूच केल,तिथ आपले सैनिक आणि शस्त्रसामुग्री उतरवली आणि आपली सगळी जहाज पेटवून जाळून टाकण्याची आज्ञा दिली. युध्द सुरु होण्यापूर्वी आल्या सैनिकांना तो म्हणाला, 'आपली जहाज भस्मसात झालेली तुम्ही बघतच आहात. आता आपण युद्धात जिंकल्याशिवाय परतू शकणार नाही. आता पर्याय म्हणजे आपण जिंकू अथवा मरू !'
आणि ते जिंकले
यश मिळवण्यासाठी, मग ते कुठल्याही क्षेत्रात असो, प्रत्येकाला आपले मागील पूल जाळावेच लागतात, परतीचे सगळे दोर कापून टाकावे लागतात, फक्त अस करण्यानेच कुणीही, ज्याला ज्वलंत मानसिक शक्ती म्हणतात, जी यशासाठी अत्यावश्यक असते, ती मिळवू शकतो.
थिंक बिग ग्रो रिच
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७

गुंतवणूक करताना समजून घेण्यासारखे काही मुलभूत मुद्दे



१) महागाई - महागाई चा दर जसा वाढत जातो तसे आपल्याला आपण केलेल्या गुंतवनुकीमधून परतावा भेटणे आवश्यकच आहे, आज महगाई चा दर हा १५ % आहे असे समजूया व दर साल महागाई हि दुप्पट किंवा त्या पेक्षा जास्त वाढ असेल तर आपल्या परतावा हा त्याच्याच जवळपासच्या दराने झाला पाहिजे.
२) घर किंवा मालमत्ता घेणे - ह्यासाठी आपली आर्थिक बाजू मजबूत पाहिजे कारण घर किंवा इतर मालमत्ता ह्यांचा व्यवहार हा लाखांचा असतो आणि जर कर्ज घेतले तर गाढवासारखे काम करतच राहावे लागेल, आपल्या अनेक इच्छांवर पाणी सोडावे लागेल, हे मी माझ्या पगारी मित्र मैत्रिणींचे जगणे जवळून बघत आहे.
३) मुलांचे शिक्षण, लग्न
४) उच्च राहणीमान ह्यामध्ये गाडी, पार्टी, सहल (राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय), महागड्य वस्तू व इतर.
५) आरोग्य
६) मुलभूत गरजा
७) म्हातारपण
जर आपल्याकडे पैसा आणि वेळ असेल तर उत्तम गुंतवणूक करून वयाच्या ३५ ते ४० पर्यंत निवृत्त होवून आपल्या स्वप्नांचे आयुष्य जगू शकाल, आर्थिक व्यवहाराला पैसा आणि वेळ हा द्यावाच लागतो.
ज्यांनी ९० च्या दशकात भविष्य ओळखून गुंतवणूक केली ते लोक २० आणि काही १० वर्षातच करोडपती झाले, कारण ९० नंतर काळ हा थोडा वेगाने बदलत होता व २००० उजाडताच बदल हा अत्यंत वेगाने व्हायला सुरवात झाली, जे मुक्त विचारांचे होते, मानसिक दृष्ट्या सक्षम होते ते टिकून राहिले, आणि जे गाफील होते ते मुंबई बाहेर आणि आता तर बदलापूर आणि टीटवाळा ह्या स्टेशनच्या पुढपर्यंत फेकले गेले.
जे कधी काळी उच्च मध्यमवर्गीय होते ते आता कनिष्ठ मध्यम वर्गीय झाले. असो निसर्गाचा नियम आहे कि जो काळानुसार बदलत जातो तोच जगतो, बाकी विरोध करणारे कमजोर होत जात संपून जातात. थोडे आजू बाजूला निरीक्षण केल्यावर आपल्याला जाणवून येईल.
शेअर, मुच्युअल फंड, कमोडीटी, मालमत्ता, सोने चांदी (किंवा इतर धातू कारण भारतापेक्षा जास्त सोने चीन आयात करतो, भारतात ते सोने जमा करून ठेवले जाते आणि चीन मध्ये ते सोने इलेक्ट्रोनिक्स मध्ये वापरले जाते, सोने विकत घेताना ते आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनेच विकत घ्या), बॉंड, फिक्स डीपोझीट व शेवटी पोलिसी ह्यामधील जी गुंतवणूक जास्त परतावा देते ती वरच्या क्रमवार ठेवा व त्यानंतर एक एक करून खालील क्रम लावा. गुंतवणूक हि दीर्घ काळासाठी केलेली बरी पण आपल्याला हे आयुष्य काही गॅरंटी देवून भेटलेले नाही इथे कधीही काहीही होऊ शकते म्हणून आपल्या गुंतवणुकीवर लक्ष्य ठेवत जा.
जसे तुम्ही कृती करत जाल तसे तुम्ही शिकत जाल, मग त्यामधील कठीण शब्द पण समजत जातील. बाजार वर जात असेल तर गुंतवणूक आहे तितकीच करत जा, आणि जेव्हा बाजार खाली जाईल तेव्हा जास्त गुंतवणूक करत जा आणि खाली जाण्याचा तळ गाठलेला बाजार हा गुंतवणूक करण्यासाठी अतिशय उत्तम असतो.
ह्या जगामधली प्रत्येक गोष्ट शेअर बाजार सुद्धा मानसिकतेवर अवलंबून आहे. आपण जर थोडा अभ्यास अजून वाढवला तर कंपन्यांनी घेतलेले आंतरराष्ट्रीय कर्ज व त्याचा दर, तेलाच्या किमती, डॉलर च्या किमती, त्या त्या देशातील निवडणुका, त्या कंपनीतील उच्च पदाधिकारी, मालक, नवीन सौदा व इतर अनेक जे गुंतवणुकीला परिणामकारक ठरू शकतात अश्या घटनांवर आपल्याला लक्ष्य ठेवावे लागते, ह्या गोष्टी जर आपण आत्मसात करू शकलो तर एक प्रकारे तुम्ही वर्तवलेले प्रत्येक भाकीत खरे ठरू शकते.
आर्थिक व्यवहार करताना नेहमी आपले मन आणि मेंदू हा शांत ठेवावा लागतो मग भले तो एक रुपयाचा व्यवहार असो किंवा १ अब्जचा, माझ्या कडे सल्ला किंवा प्रशिक्षणासाठी आलेल्यांची गुंतवणूक वाढली व काहींचे नुकसान कमी झाले आणि हे फक्त त्यांच्या भावना शांत केल्यामुळे झाले. प्रत्येकाकडे क्षमता असते पण ती भावनिक वादळामुळे झाकली जाते.
गुंतवणूक जरी दीर्घ पल्ल्याची असली तरी आपण वर्तमानात जगत असतो त्यामुळे थोडी रक्कम आपल्या जीवनशैली नुसार वापरत जाल. भविष्यासाठी आपण वर्तमान संपूर्णपणे नाकारू शकत नाही, माझे सर्वांना एकच म्हणणे आहे कि आपले स्वप्नांचे आयुष्य झोपेत किंवा भविष्यात नका जगू, वर्तमानात जगा.
शेवट हे बोलू संपवतो कि आपल्या मुलांना लहानपणापासून आर्थिक व्यवहारांचे धडे द्या जेणे करून मोठ्यापनी ते सन्मानाने जगू शकतील.
धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७



सतत पैश्यांचे व्यवहार देवाण घेवाण करत राहा, असेच तुम्ही शिकाल,
भीती घालवण्यासाठी भीतीचा सामना करावा लागतो.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७





जोपर्यंत चेहऱ्यावर जोरदार मुक्का बसत नाही
तोपर्यंत प्रत्येकाकडे एक योजना असते.
- माईक टायसन (जगजेत्ता मुष्टीयोद्धा)

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

बिझनेसचा नवीन फंडा


1) उबर या जगतील सर्वात मोठी टॅक्सी पुरवणार्या कंपनीकडे स्वतःची एकही टॅक्सी नाही.
2) फेसबुक ही जगातील सर्वात मोठी व लोकप्रीय सोशल मिडिया कंपनी स्वतः कसलेही लिखाण करत नाही.
3) अलिबाबा या जगातील सर्वात मोठी विक्री कराणार्यात कंपनीकडे एक खिळा सुद्धा स्टॉकमधे नसतो.
4) एअरबन या जगातल्या सगळ्यात मोठ्या भाड्याची घरे पुरवणार्याा कंपनीचे स्वतःचे एकसुद्धा घर नाही. बिझनेसचा नवीन फंडा
5) ऍपल या जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन व टॅबलेट बनवणसार्या् कंपनीची स्वतःची फॅक्टरी नाही.
6) व्हॉट्सअप या दिवसातुन 30 लाखांपेक्षा जास्त संदेशांची देवाण घेवाण करणार्यास कंपनीकडे स्वतःचा सर्व्हर सुद्धा नाही.
7) नाइकी या जागातील आघाडीच्या पादत्राणे बनवणार्याे कंपनीची कुठेही स्वतःची फॅक्टरी नाही.
या कंपन्यांना हे कसे जमले?
कारण बिझनेस करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहीजे, दुकान पाहीजे, भांडवल पाहीजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.
लोकांची गरज ओळखा, ती पुरवणारी एखादी नवीन कल्पना किंवा प्रॉडक्ट शोधुन काढा, ‘आऊटसोर्सींग व ऑफशोअरींग’ सारख्या तंत्रांचा उपयोग करून निरनिराळ्या एजन्सीज ना आपल्या पंखाखाली एकत्र करा, मार्केटींगवर जास्तीत जास्त भर द्या, ग्राहकाला उत्तम सेवा द्या, अत्यंत प्रामाणीक व पारदर्शी व्यवहार ठेवा,आपल्याबरोबरच आपल्याबरोबर काम करणार्या एजन्सीजचा पण विकास करा,ग्लोबल मार्केटमधे शिरा हे आत्ताच्या बिझनेसचे फंडे आहेत.
कल्पना तुमची, पैसा दुसर्याेचा हे मुळ तत्व आहे.
इंटरनेट वरून साभार
लेखक माहित नाही

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७ चला उद्योजक घडवूया समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

धीर धरण्याची शक्ती भाग २

जस जसे वर्ष पुढे चालले होते आणि मुल वयाने मोठी होत होती त्यावेळेस संशोधक मुलांच्या आयुष्यातील विविध भागांवर लक्ष्य ठेवून होते. त्यांना जे सापडले ते आश्चर्यजनक होते.
ज्या मुलांनी धीर धरला होता आणि त्यामुळे त्यांना अजून एक गुलाब जाम भेटला होता त्यांचा SAT स्कोर जास्त होता, जास्तीत जास्त सदाचाराने, नम्रतेने वागत होते, शरीराने जाड होण्याचे प्रमाण कमी होते, तणावाला उत्तम प्रकारे हाताळत होते, सामाजिक कौशल्य उत्तम होते असे त्यांचे पालक म्हणत होते, आणि आयुष्यःच्या बाकीच्या भागातही त्यांचे गुण उत्तम होते. (संशोधनाच्या अधिक माहितीसाठी क्रमांक एक, दोन व तीन वर क्लिक करा)
संशोधक मुलांचा सतत ४० वर्षे पाठपुरवठा करत होते, कसेही वातावरण किंवा परिस्थिती असू द्यात जी मुल दुसऱ्या गुलाब जाम साठी धीर धरत, स्वतःवर ताबा ठेवून वाट बघत थांबली होती ती त्या वातावरणात, परिस्थितीत यशस्वी झाली होती. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर जी मुल धीर धरू शकत होती ती आयुष्यात यशस्वी झाली होती. म्हणून जो धीर धरू शकतो तो जग जिंकू शकतो.
आता आपल्याला ठरवायचे आहे आल्या मुलांना कसे संस्कार द्यायचे ते, त्यासाठी आपल्याला ते संस्कार आपल्या मध्ये बिंबवावे लागेल.
अश्विनीकुमार फुलझेले
निर्वाणा
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक
८०८०२१८७९७
solution.nirvana@gmail.com