ऑनलाईन शॉपिंग समज आणि गैरसमज

भारत हा देश तंत्रज्ञानाने प्रगत पण विचारांनी हा मागासलेला आहे. नागरिक हे जास्तीत जास्त तयार उत्तराच्या शोधात असतात, आणि ते उत्तर देखील सत्य असत्याच्या कसोटीवर न बघता त्यांना काय पाहिजे त्याच दृष्टीकोनातून बघत असतात.
साधे उदाहरण घ्या, गाडी चारचाकी किंवा दुचाकी ह्याचा शोध हा परदेशी लागला, पण आपल्या इकडे त्या गाडीमध्ये लागणाऱ्या मुर्त्या, त्याबाहेरील स्टिकर्स, त्यावर लागणारा जात, धर्म आणि प्रांताचा गर्व असणारा संदेश, दुचाकीवरही सारखेच दिसून येते.
गाडीची किंमत हि लाखांच्या घरात, ह्यामधला करोडोंच्या घरातील नफा हा प्रदेशात जातो, त्यावरील रॉयल्टी देखील प्रदेशात जाते. आता उरला स्टिकर्स चा बाजार, तो तर फक्त लोकलच असतो, त्याचा फायदाही खूप कमी असतो.
ऑनलाईन शॉपिंग हि संकल्पनाही परदेशीच आहे. तिथेही काही हि संकल्पना राबवून काही फायदा नाही झाला, तिथेही लहान उद्योग, व्यवसाय संपवण्यात आले, आणि जी कंपनी टनांनी उत्पादन काढते तिच्या फायद्यासाठी आणि तिला जगभर बाजार उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे.
सामान्य दुकानदारांना, लोकांना जाहिरातीमध्ये दाखवून दिशाभूल करत जे करोडोंचे उलाढाल करत असतात त्यांना प्राधान्य दिले जाते. लोक भावनिक होवून सामान्य दुकानदारांकडून ५० वस्तू खरेदी करतात आणि त्या संपल्या कि ५००० पेक्षा जास्त तसेच उत्पादन मोठी कंपनी हि घेवून तयार असते.
ह्यामध्ये होणारा नफा हा सुश्म आणि लघु उद्योगांना हजारो किंवा लाखोंच्या घरात असतो तर मोठ्या उद्योग व्यवसायांना हा हजारो करोडोंच्या घरात असतो.
कितीही केले तरी आपल्याला दुकानांवर अवलंबून रहावेच लागते. टीव्ही मिडिया ह्यावर ७० टक्के एकाधिकारशाही हि एकाच व्यक्तीची असल्यामुळे ती आपल्याला लहान सहान घटना दाखवत बसत नाही.
त्यांचे पैसेही ह्या व्यवसायात गुंतलेले असतात त्यामुळे फक्त आणि फक्त ह्यासंदर्भातच बातम्या दाखवल्या जातात. आणि सामान्य लोकांनाही इथूनच सामान खरेदी करण्यासाठी प्रोस्ताहित केले जाते.
उत्पादने आहेत म्हणून ऑनलाईन बाजाराला किंमत आहे. कारण त्या काहीच बनवत नाही. तरीही ते बक्कळ पैसा घेवून जातात. एमेझोन काही मूर्ख नाही, अमेरिकन कंपनी आहे, ती बारा हजार करोड गुंतवन्यापूर्वी अनेक वर्ष अगोदर आपल्या भारतीय लोकांच्या जीवनशैली वर संशोधन करण्यासाठी संशोधकांची टीम पाठवून त्यांच्याकडून सगळी माहिती गोळा करून घेतली जाते.
ऑनलाईन शॉपिंग मध्ये दुकानदारांचे ग्राहकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध बनत नाही. ते संबंध फक्त हे नफ्यापुरते असतात. एखादवेळेस तुमचा लोकल दुकानदार हा तुम्हाला पैसे नसतील तर स्वतःच्या नावावर कर्ज काढून ती वस्तू घेवून देतील पण ऑनलाईन दुकानदार असे नाही करणार, आणि नाही तशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे.
हि समस्या काही आपल्याच देशाची नाही आहे, जगभरात हेच चालू आहे. प्रत्येक ठिकाणचे लोकल मार्केट जिथे गावा गावात, घरा घरात बनणाऱ्या वस्तू भेटायच्या खाण्या पिण्याचेही ताजे, रासायनिक खते न वापरता तयार केलेले पदार्थ भेटायचे तेही आता बंद केले आहे.
तेलाचे मार्केट हे आपल्या वस्तीत घरा घरात होते तेही बंद पाडण्यात आले आहे. आता आपल्याला फक्त मोठ्या कंपनीने बनवलेले तेलच घ्यायचे आहे. ग्राहकांची ह्यात चूक नाही आहे, त्यांनाही भाग पडले जात आहे.
कुठल्याही गावात त्या स्त्रीने चुलीवर थापलेल्या भाकरीची चव हि तुम्हाला पंचतारांकित हॉटेल मधल्या डेटोल ने हात धुतलेल्या हातातूनही नाही येणार.
एकदा का लोक भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतली कि लोकउपयोगी कायदे कमजोर करायचे आणि भांडवलशाही सत्ताधारी ह्यांना पोषक कायदे बनवायचे, आणि कायद्याचा वापरही असा करायचा कि सामान्य मनुष्य फसला पाहिजे पण श्रीमंत, सत्ताधारी ह्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये.
ह्याचा फायदा परदेशी कंपन्या घेतात. ते कमी डॉलर गुंतवून अब्जो रुपये घेवून जातात. आणि इथे राजकारणी, शासकीय अधिकारी आणि बडे उद्योजक हे मलाई खात बसतात.
इंटरनेट चा वापर कराल तसा होतो, तुम्ही जर उत्तमरीत्या आपले उत्पादन हे आपल्या परिसरात किंवा लोकल मार्केट मध्येही पोहचवले तरी तुम्ही नफा कमवू शकता. इथे तुम्हाला सरकार कडून काहीच मदत भेटणार नाही. जे काही आहे ते तुम्हालाच तुमच्या क्षमतेनुसार करायचे आहे.
सरकार जो उद्योगपती अब्जोची उलाढाल करतो त्या बोटांवर मोजता येईल इतक्या लोकांवर लक्ष्य देईल कि सामान्य जी करोडोंच्या घरात लोकसंख्या आहे त्यांच्याकडे लक्ष्य देईल?
आपण पण जिथून आपला फायदा होतो तिकडेच लक्ष्य देतो तर सरकारचेही काही चुकत नाही, शेवटी ते त्यांचे कामच झाले. वरून काही परदेशी कंपन्यांना त्यांची सरकार लाच द्यायला परवानगीदेखील देते तिथेही आपण काही करू शकत नाही.
टीव्ही बंद करा, बातम्या बघणे बंद करा, सतत करोडपती उद्योजक व्यवसायीकांचा बोलबाला करणाऱ्या मिडीयाला कायमचे आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाका. संपूर्ण लक्ष्य आपल्या आयुष्याकडे द्या. आपण कशी प्रगती करू त्यावर द्या. आपल्याला मानसिक शांतता ज्यामधून भेटेल ते करा.
परिस्थिती समजून घ्या व त्यावर मात करायला शिका, वादळात सरळ वाढलेले झाड उपटून जाते, आणि लवचिक झाड हि टिकून राहतात. जिथे सरळ वागत येईल तिथे तसेच वागा, आणि जिथे वाकड्यातच शिरले पाहिजे तिथे तसेच वागा.
तुमच्यासाठी जग बदलणार नाही, जगानुसार वेळोवेळी तुम्हाला बदलावे लागेल.
(काही बाबी आपण सार्वजनिक ठिकाण फेसबुक वर बोलू शतक नाही त्यामुळे अधिक माहिती मी इथे देवू शकत नाही. ती माहिती तुम्हाला त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांकडून भेटेल, तेही तुमचे नातेसंबंध घनिष्ट असतील तर.)
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार