ध्येय गाठण्याचा प्रवास
हा कधी कधी ध्येय गाठून
जितके शिकतो त्यापेक्षा
जास्त शिकवून जातो.
अश्विनीकुमार
लेखक अश्विनीकुमार. उद्योग व्यवसाय गुंतवणूक सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण आणि कायदेशीर मदत. मानसिक विकास - संमोहन, आकर्षणाचा सिद्धांत, ध्यान. अध्यात्मिक विकास - ध्यान साधना, मंत्र साधना, जप, उपाय. अघोरी विकास - तंत्र साधना, मंत्र साधना, उपाय. वास्तू - वास्तू उर्जा शास्त्र (सर्व प्रकारच्या वास्तू). उर्जा शास्त्र - वास्तू उर्जा शास्त्र, शारीरिक उर्जा शास्त्र, रेकी हिलिंग. स्पर्शन चीकीस्ता.
उद्योग, व्यवसाय आणि शेअर बाजारात प्रगतीसाठी, वाढीसाठी आणि आर्थिक आत्मविकासासाठी आवाहने असणे महत्वाचे आहे. जो संकटांचा सामना करतो, समस्यांना तोंड देतो त्याच्यात विविध क्षमता कौशल्ये निर्माण होतात व ती व्यक्ती अजून सक्षम बनत जाते. आर्थिक आत्मविकासासाठी आवाहने आणि अडचणींचा स्वीकार करा, उद्योग, व्यवसाय व शेअर बाजारात संकटे आणि समस्यांमधून मार्ग काढायला शिका. तुम्ही जितक्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना कराल तितक्या अद्भुत क्षमता तुमच्यात जागृत होतील.
अश्विनीकुमार
सल्ला, मार्गदर्शन, प्रशिक्षण
काल मी पुण्यातील एका यशस्वी उद्योजकाला भेटलो ज्याची नेटवर्थ ₹३० कोटींपेक्षा कमी नाही आणि लहान इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या वितरणात आहे.
चर्चेदरम्यान, त्याने सांगितले की गेल्या १0 वर्षांत त्याने तीनदा शेअर बाजारात प्रवेश केला आहे आणि आतापर्यंत सुमारे ₹३ कोटी वाया गेले आहेत.
तो पुढे म्हणाले की जर मी हे शेअर्स फक्त पोर्टफ़ोलिओ मध्ये ठेवले जरी असते तर सध्याच्या मूल्यांकनानुसार ते जवळपास ₹१८ कोटी झाले असते.
मला त्याच्याबद्दल वाईट वाटले. शेअर बाजारातून प्रत्येकजण यशस्वी होऊ शकत नाही, संपत्ती निर्माण करू शकत नाही, श्रीमंत बनू शकत नाही.
तुम्ही हुशार उद्योजक, व्यवसायिक असू शकता पण तरीही तुम्ही वाईट गुंतवणूकदार होऊ शकता. आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे काम नाही.
भीती आणि लोभाची भावना उफाळून येणे सामान्य आहे पण ह्या भावनांद्वारे कृती करण्यापासून स्वतःला रोखणे हे सोपे काम नाही आणि हाच फरक एक यशस्वी गुंतवणूकदार आणि अयशस्वी गुंतवणूकदार मधला आहे.
हे तितके अवघड नाही आहे. सर्वात कठीण कार्य म्हणजे प्रथम मनात विचार करणे आणि मनात सोडवणे की मला मध्येच शेअर्स विक्री करण्याची गरज नाही.
जास्तीत जास्त लोकांना क्षणात नफा हवा असतो म्हणून ते शेअर्स विकत घेतात पण काही शेअर्स मुळातच फंडामेंटली मजबूत असतात तरीही ते पर्वा करत नाही नंतर काही वर्षांनी त्यांना पश्चाताप होतो.
झाड लावल्यावर देखील ४, ५ वर्षे जातात व त्यानंतर ते फळ देत, ह्याचा अर्थ असा नाही कि आपण सतत जमीन खोदून आपण बी वाढत आहे कि नाही ते तपासात बसणार आहोत. अश्या कृतीमुले सुपीक जमिनीत देखील झाड वाढणार नाही.
तुम्ही शेअर ट्रेडिंग करा, उद्योग व्यवसाय करा किंवा इतर कुठलाही मार्ग तुम्ही ज्याने पैसा कमावता आहे तो करा पण एक कालावधी देत चला, हजारदा छोटे मोठे उतार चढाव येतील पण दीर्घकाळात तुम्हाला फायदाच मिळेल. धीर धरायला शिका.
धन्यवाद
अश्विनीकुमार
“तुम्ही आणि तुमच्या ध्येयामध्ये काहीच अडथळे नसतील आणि तुम्हाला तुमचे ध्येय हे अंतर्मनांत सुस्पष्ट दिसत असेल तर तुम्ही ते ध्येय ह्या क्षणी साध्य कराल. आणि ज्याच्या ध्येयात अडथळे असतात तो ध्येय कधीच गाठू शकत नाहीत आणि गाठले तरीही आयुष्याचा खूप मोठा भाग खर्च झालेला असतो. ध्येयाशी एकनिष्ठ रहा.”
अश्विनीकुमार
तुम्हाला येणारा प्रश्न अगदी योग्य आहे कि त्यांना उद्योग व्यवसाय करता येत नाही म्हणून त्यांचे उद्योग व्यवसाय हे डबघाईला आले म्हणून. आता पुढे मी मुख्य मुद्द्यावर हात घालणार आहे.
कुठलाही उद्योग व्यवसाय पकडू जे सामान्य लोक सुरु करतात. काहींची आर्थिक परिस्थिती उत्तम असते तर काहींची नसते पण ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहेत ते काही २०० ५०० करोड उभे करू शकत नाही जे व्हिसी देवू शकतात आणि नाही सर्वांनाच व्हिसी ची गरज लागते.
आता आपण विश्लेषण करू
खाद्य पदार्थ व्यवसाय
१) रस्त्यावरील खाद्यपदार्थ ते खानावळ
२) १ ते ५ तारांकित हॉटेल्स
एक स्टार्टअप येते व बोलते कि मी तुम्हाला घरोघरी जेवण डिलिव्हर करेन. आता समजा मला जर जेवण मागवायचे झाले तर माझ्याकडे स्थानी हॉटेल्स चे नंबर आहेतच मग ह्यांची काय गरज? रात्री पण अनेक खाद्यपदार्थ व्यवसाय सुरु असतात. आणि समजा माझ्या घरापासून १ किलोमीटर लांब जर एखादे प्रसिद्ध हॉटेल्स माझ्या परिसरात डिलिव्हरी देत नसेल तर समजू शकतो, तिथे ह्यांची मदत कामी येते का? हो, फक्त थोडे किलोमीटर वाढतात.
स्वतःचे उत्पादन काही नाही आणि ना हि डिलिव्हरी चा अनुभव. फक्त भारतातील प्रसिद्ध विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्या विद्यापीठातून जास्तीत जास्त विद्यार्थी भारताबाहेर स्थायिक झाले. ग्रासरूट हा शब्द लागू होत नाही. ग्रासरूट वाले अनेक उद्योजक आणि व्यवसायिक आहेत आपल्याकडे जे परदेशी गेलेल्या लोकांपेक्षा जास्त भारतात कमावतात.
ह्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसायांवर लक्ष केंद्रित करायचे, चांगली कितीतरी घरे इमानदारीत चालत होती महिन्याला काही हजार ते लाखोंचे उलाढाल करायचे, आरामात स्थानिक स्तरावर उत्तम बाजारपेठ काबीज करून जगत होते तिथे लक्ष गेले स्टार्टअप वाल्यांचे.
नाही बोलले तरी एककेंद्री झाले तर करोडोंचा टर्नओव्हर आहे, पण त्यामध्ये अनेक इमानदार उद्योजक व्यवसायिकांचे मरण आहे. आणि खर्च अनेक उद्योजक व्यवसायिक हे डबघाईला आलेसुद्धा.
स्टार्टअप वाले आणि व्हिसी सोबत सरळ संपर्कात नसलेले ग्राहक जे स्थानिक उद्योजक व्यवसायिकांच्या संपर्कात होते तसे. नवीन स्टार्टअप चेन उतरली, माल घेण्यापासून ते देण्यापर्यंत, ग्राहकांचा डाटा हे सर्व त्यांच्याकडे आले.
आता समजा एक व्यवसायिक एक हॉटेल सुरु करत आहे, तो तुम्हाला सूट देईल का? नाही ना, कारण सामान्य व्यवसाय हे असेच चालतात. चांगली चव असेल तर चालेल आणि नसेल तर बनाद होवून जाईल कारण कुठलाही व्हिसी प्रकारच नाही, एक रुपया पण कोणी देणार नाही.
आता येतो स्टार्टअप वाला, त्याल पैसे मिळतात व्हिसीकडून, मग तो सूट द्यायला सुरु करतो, ग्राहकांसोबत भावनिक टच नाही तर ते फक्त नफ्याचा किंवा भविष्याचा एक ग्राफ आहेत. मग अप्रत्यक्ष जे जुने उद्योजक व्यवसायिक होते त्यांच्याकडे ग्राहक कमी होतात, असे करत करत शेवटी फटका पडत एक एक उद्योग व्यवसाय हा तोट्यात जावून बंद होतो पण इथे व्हिसी च्या पैश्यानी स्टार्टअप घाट्यात पण उद्योग व्यवसाय करू शकतात.
असे बिचारे कितीतरी उद्योग व्यवसाय अबंड झाले ह्यावर कुणाचे लक्ष्यच नाही, सोबत नको तिथे क्लाउड किचन तयार झाले, ह्या अगोदर असे व्यवसाय नव्हते का? होते ना? मग विनाकारण कश्याला नाव द्यायचे क्लाउड किचन वगैरे?
स्टार्टअप वाले अनेक वर्षे व्हिसी च्या पैश्यांवर बाजारपेठेत जागा पकडून राहणार व अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्ये व्यवसायांना टार्गेट करणार आणि वरून पैसे देवून स्वतःची इमेज मार्केटिंग पण करणार?
म्हणजे अगोदर काय उद्योजक व्यवसायिक तयार झाले नव्हते का? का कोणी चितळे ला नावे ठेवत नाही? चितळे ने तर असे काही केले नाही बाकी पण भाकरवडी बनवतातच ना? ह्याला बोलतात उद्योग व्यवसाय करण्याची भारतीय पद्धत, स्टार्टअप वाल्यांची आहे का? चितळे नां कधी इमेज मार्केटिंग नाही करावी लागली कारण आम्ही ग्राहक म्हणून त्यांची साक्ष देतो.
एक जर इमानदारीत एखाद्या मार्जिन वर व्यवसाय करत असेल त्याचा तो मार्जिन कमी कमी होत जाईलच ना, तो कसा भरून काढणार, चला काही साठवलेले पैसे असतील पण त्यापुढे काय? समजायला पाहिजे. व्हिसी काय पैश्यांवर पैसे ओतू शकतो पण सामान्य उद्योजक व्यवसायिक नाही.
स्टार्टअप सोडा आणि तुमच्या स्थानिक बाजारपेठेत जावून एखाद्या उद्योग व्यवसायाला प्रसिद्ध करा. जर तुमच्या आवडीनुसार नसेल तर तुम्ही उद्योग व्यवसाय सुरु करा नाहीतर अश्या उद्योग व्यवसायात गुंतवणूक करा, एक खात्री देतो कि तुम्ही जितके शेअर बाजारात नाही कमावणार तितके तुम्ही स्थानिक बाजारपेठेत गुंतवणूक करून कामवाल.
एकत्र या, एकमेकांना सपोर्ट करा, भावनि होवून सपोर्ट नको तर तो त्या लायक असलाच पाहिजे अश्यांना सपोर्ट करा, दीर्घकाली असेल अश्यांना सपोर्ट करा मग बघा गल्लोगल्लीत मराठी उद्योजक व्यवसायिक दिसतील व हे स्टार्टअप वाले गाशा गुंडाळून जातील. हे एकट्याचे काम नाही.
मला आशा आहे मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला समजले असेल, मुक्त चर्चा मान्य आहे, विरोधी विचारांचा देखील आदर आहे, फक्त ट्रोलर मान्य नाहीत, त्यांना ब्लॉक करण्यात येईल. विरोधी विचारात अनेकदा शिकायला मिळते पण ट्रोलर मध्ये नाही. आपण भले, आपले घर भले आणि आपला उद्योग व्यवसाय भला, राजकारणापासून चार हात लांब.
धन्यवाद
अश्विनीकुमार
एक स्टार्टअप (startup) आहे तर दुसरा व्हिसी (VC), ते दोघे एकमेकांना युनिकोर्न बनवत राहिले.
स्टार्टअप म्हणजे नवीन उद्योग व्यवसाय, व्हिसी म्हणजे नवीन आणि लघु उद्योग व्यवसायांनमध्ये गुंतवणूक करणारी कंपनी.
अश्विनीकुमार
हा केवळ प्राध्यापकांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी आनंदाचा क्षण होता कारण सर्व मित्रांपैकी (प्राध्यापकाचे विद्यार्थी) काही जण खूप दिवसांनी भेटत होते म्हणून. सर्वजण कॉलेज संपल्यानंतर कोण कुठे होते आणि आपल्या मित्रांच्या आयुष्यात घडलेल्या, घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी उस्तुक होते. त्यांनी एकमेकांशी शेअर केले, ते आयुष्यात कसे पुढे गेले. कॉर्पोरेट जगतात वरिष्ठ पदांवर असलेले काही चांगले लीडर बनले; तर काही लोक व्यवसायात चांगले काम करत होते. त्या सर्वांची लग्ने झाली होती आणि छान कुटुंब होते. टप्पे गाठण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्याची स्वतःची वेळ होती. दर्जेदार संभाषण चालू होते, पण काही वेळातच संभाषण काम, नातेसंबंध, जीवनातील ‘तणाव’ आणि ‘टेन्शन’ या तक्रारींकडे वळले.
प्रोफेसरने त्यांना चहा ऑफर केली आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चहा तयार करण्यास सांगण्यासाठी स्वयंपाकघरात गेले. १०-१५ मिनिटांनी त्याची सुंदर बायको प्रसन्न हसरा चेहरा घेवून आली. एक गोष्ट लक्षात आली की तिने वेगवेगळ्या प्रकारच्या कपमध्ये चाय आणली होती !!! (क्रिस्टल कप, काचेचे कप, सिरॅमिक कप, चमकणारे, काही साधे दिसणारे, काही सामान्य, काही उत्कृष्ट आणि काही महाग ...). विद्यार्थ्यांना वाटले की प्रोफेसरकडे सारखे कप नसतील आणि अतिथींची संख्या जास्त आहे; त्याच्या पत्नीने वेगवेगळ्या कपमध्ये चहा दिली असेल.
त्या सर्वांच्या हातात कप होता तेव्हा प्रोफेसर म्हणाले, "तुम्ही लक्षात घेतल्यास, सामान्य, साधे आणि स्वस्त कप मागे टाकून सर्वांनी छान दिसणारे आणि महागडे कप घेतले आहेत !!!"
तो आश्चर्याचा क्षण होता, कारण कोणाच्याही लक्षात आले नाही की चहाचे काही अतिरिक्त कप आहेत आणि त्यांचा कप असताना, कोणीही सामान्य कप घेतले नाहीत आणि ते सर्व सर्व्हिंग ट्रेवर सोडले गेले.
प्राध्यापक पुढे म्हणाले, “तुमच्यापैकी प्रत्येकाला सर्वोत्तम कप हवे होते. तुमच्यासाठी फक्त सर्वोत्तमच हवे हे तुमच्यासाठी सामान्य असले तरी ते तुमच्या असंतोषाचे, समस्यांचे आणि जीवनातील तणाव आणि तणावाचे कारण देखील असू शकते.
सगळे मित्र गोंधळून प्रोफेसरकडे पाहू लागले; ते समजू शकले नाहीत; निवडलेल्या कपमध्ये चहा घेण्याचा जीवनातील तणाव आणि तणावाशी काय संबंध आहे.
प्रोफेसर पुढे म्हणाले आणि त्यांचा उत्सुक चेहरा पाहून स्पष्टीकरण दिले, “कप स्वतःच चहामध्ये गुणवत्ता वाढवत नाही याची खात्री बाळगा. बहुतांश घटनांमध्ये, ते फक्त अधिक महाग आहे; आणि काही प्रकरणांमध्ये आपण जे पितो ते देखील लपवते. तुम्हाला खरोखर चहा हवी होती, कप नव्हे! पण तुम्ही जाणीवपूर्वक सर्वोत्कृष्ट कपसाठी गेलात… आणि मग तुम्ही एकमेकांच्या कपांवर नजर टाकू लागलात.”
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर जीवन चहा असेल तर; आणि नोकरी, पैसा, समाजातील दर्जा किंवा पद आणि प्रेम वगैरे कप आहेत!!! ते फक्त जीवन ठेवण्यासाठी आणि ठेवण्यासाठी साधने आहेत. आमच्याकडे असलेल्या कपचा प्रकार आम्ही जगत असलेल्या जीवनाची गुणवत्ता परिभाषित किंवा बदलत नाही. कृपया कपांना तुम्हाला चालवू देऊ नका !! चहाचा आनंद घ्या...!!!”
अश्विनीकुमार
“झाडावर चढून पाठलाग करण्यापेक्षा किंवा खालून बाण मारण्यापेक्षा, त्यांनी जमिनीवर अरुंद तोंड असलेली एक जड काचेची भांडी ठेवली होती, ज्यामध्ये माकडांचे आवडते अन्न होते, असा सापळा रचला.
मग ते मागे सरकले आणि लपले, माकड जवळ येण्याची वाट पाहत.
थोड्या वेळाने एक माकड तिथे आले, त्या माकडाला त्या रुंद तोड असलेल्या काचेच्या बरणीत ठेवलेले त्याचे आवडते अन्न दिसले व त्या माकडाने अरुंद तोंडाच्या बरणीत हात टाकले व आपले आवडते अन्न मुठीत पकडले व अन्न बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, माकडाने मुठी बांधल्यामुळे त्याचा हात काही अरुंद तोंडाच्या बरणीतून बाहेर निघत नव्हता
माकड हात बाहेर खेचत होता, परंतु काही उपयोग झाला नाही. अन्न सोडल्याशिवाय अरुंद तोंडाच्या भांड्यातून हात काढण्याचा कोणताही मार्ग नव्हता.
सोडून देण्याऐवजी, माकड आपले रात्रीचे जेवण सोडण्यास नकार देत चिकाटीने तिथेच थांबला.
शिकारी मग सापळ्यात अडकलेल्या माकडाकडे जाऊन स्वतःच्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी माकड पकडतील.”
“त्या माकडासारखे होऊ नकोस,” त्या माणसाने इशारा दिला, “आयुष्यात, दुसर्या दिवशी लढण्यासाठी आणि माणूस म्हणून वाढण्यासाठी, केव्हा सोडायचे, केव्हा पुढे जायचे आणि जे काही तुम्हाला मागे ठेवत आहे ते कधी सोडायचे हे तुम्हाला माहित असले पाहिजे. "
मतितार्थ:
भविष्यात काहीतरी चांगले मिळवण्यासाठी काहीवेळा तुम्हाला सोडून द्यावे लागेल आणि तुमच्याकडे जे आहे ते सोडून द्यावे लागेल. जिद्दीमुळे तुमचे पतन होऊ देऊ नका!
अश्विनीकुमार
आपल्या उद्योग व्यवसाय संदर्भात नवीन नातेसंबंध बनवायचे आहे.
प्रत्यक्ष बाजारपेठ कशी चालते ह्याचा अनुभव घ्यायचा आहे.
इतरांनी केलेल्या नफा तोटा संदर्भात माहिती काढायची आहे.
जवळपास चायवाला आणि खानावळ ते महागडे हॉटेल येथे उद्योजक व्यवसायिकांच्या जेवणाच्या वेळेस जावून त्यांचे काय विषय सुरु आहेत ह्याचा मागोवा घ्यायचा आहे.
अश्विनीकुमार
तुमच्या आर्थिक आयुष्याचा अभ्यास करायचा आहे.
बाजारपेठेचा अभ्यास करायचा आहे.
तुमचा अनुभव कश्यात आहे पहिला तो मार्ग निवडायचा आहे.
उद्योग व्यवसाय करण्याचे अजून २ किंवा ३ मार्ग शोधून काढायचे आहे.
दीर्घकालीन व अल्पकालीन मार्ग शोधून काढायचे आहे.
सर्व मार्गांचा अतिसूक्ष्म व खोलवर अभ्यास करायचा आहे.
अश्विनीकुमार
एक काळ असा होता जिथे योग्य उद्योग व्यवसाय सुरु व्हायचा आता फक्त विदेशात काहीतरी दाखवणार आणि त्याची नक्कल करत आपल्या इथे उद्योग व्यवसाय उभा राहणार व सपशेल पडणार. मेंदू तुमचा तर अक्कल दुसऱ्याची का? भारतीय बाजारपेठेचा अभ्यास करा, तुमच्या स्वतःचे आकलन करा व करा उद्योग व्यवसाय सुरु. नक्कल करून अपयशी व्हाल तर स्वतःवर विश्वास ठेवून यशस्वी व्हाल. तुमच्यामुळे चार लोकांच्या घरची चूल पेटेल.
अश्विनीकुमार
नवीन इंटरनेट स्वस्त झाले, त्यामध्ये विदेशी भ्रम पसरवणारे प्रोस्ताहन देणारे प्रशिक्षक आले ज्यांचा आणि उद्योग व्यवसायाचा काही संबंध नाही, त्यामध्ये शून्यातून करोडपती असे उदाहरण देत होते. म्हणजे जगात कोणी करोड च्या आत कमावणारा नकोच असे त्यांचे म्हणणे होते जे वास्तवाला धरून नव्हते.
इंग्रजी बोलणे, त्यामध्ये ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही अश्यांना न्यूनगंड, असे वाटायचे कि आपल्यातच काही कमी आहे का? जर काही हजार आणि लाखो रुपये कमावून पण मी अपयशी आहे का? माझे दर कमी आहेत का? कि मी माझी किंमत करत नाही? असे प्रश्न मनात येवू लागले व त्याचा परिणाम हा व्यवसायावर व्हायला लागला.
सर्वात अगोदर तर मी त्या व्यवसायिकाचा इंटरनेट चा वापर हा कामापुरता करायला लावला. भारतीय अर्थव्यवस्था कशी उत्तम आहे आणि बदलाची मानसिकता कशी आणि केव्हा ठेवायची हे समजावून सांगितले. त्यांचे दर योग्य का आहेत हे देखील सांगितले. आणि ह्यामुळे फिक्स ग्राहक कसे मिळतात जो पाया असेल व नंतर अल्पकालीन ग्राहक कसे मिळतात हे त्यांच्या व्यवसायातून दाखवून दिले.
जो खर्च होता तो कमी करायला लावला, जास्तीत जास्त खर्च हा खाजगी जीवनावर होता, फक्त महिन्याला इतके लाखो कमावतात म्हणून इतका खर्च करायचा असतो किंवा अशी जीवनशैली जगायची असते असे सर्व वायफळ खर्च बंद करायला लावले.
पैसा वाचायला लागला, जिथे काम कमी असेल तिथे बचत कामी यायला लागली, पाया भक्कम झाला, हळू हळू वाढ होऊ लागली, नवीन व्यवसायिकांचे आवाहने पेलता येवू लागली, योग्य दर असल्यामुळे ग्राहक काही सोडून जात नव्हते व जे कटकटीचे ग्राहक होते त्यांना सरळ नाही बोलायचे हे सांगितले, ह्यामुळे ना उधारी, ना कमी पैसे आणि ना हि नकारात्मक माउथ पब्लिसिटी झाली.
इथे जोडीदाराची साथ लागते जर ती भेटत नसेल तर कोणीही काहीही करू शकत नाही, जोडीदाराला स्पष्ट शब्दात बोलायला शिका, आयुष्य म्हणजे सिनेमा नाही. नकारात्मक जोडीदारासोबत आयुष्य घालवण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे. हा काही कठीण निर्णय नाही हे लक्ष्यात ठेवा.
मुलांना अगोदरपासून योग्य संस्कार देणे गरजेचे आहे. त्यांना स्वतंत्र पण द्या सोबत लक्ष देखील ठेवा, आयुष्याचा सामना करायला लावा, सुरुवातीपासून भावनिक दृष्ट्या सक्षम बनवा, हे खाजगी सांगण्याचा उद्देश हाच आहे कि खाजगी आयुष्याचा देखील मानसिकतेवर प्रभाव पडतो.
शारीरिक आणि मानसिक आरोग्याला पहिले महत्व द्या, ह्या मार्गावरील सर्व अडथळे दूर करा, लाखो रुपये आजारपणावर खर्च करण्यापेक्षा काही हजार रुपये आरोग्यावर खर्च केलेले कधीही उत्तम.
आता येणाऱ्या ग्राहकांना अभिमानाने सांगतात कि ५ वर्षे झाले मी व्यवसायात आहे आणि इथेच एक स्थैर्य दिसते, ग्राहकांना विश्वास असतो कि जेव्हा गरज असेल तेव्हा ती व्यक्ती इथे असेलच म्हणून कोणीही नवीन जरी आला तरी फुकटात काही घेत नाही आणि इतरांना देखील योग्य माहिती देत सांगतात कि इथे तुम्हाला योग्य दरात चांगली सेवा मिळणार आहे. मी देखील फुकट किंवा कमी जिथे तिथे जात नाही कारण अनुभव घेतले आहे, आणि इंटरनेट रीव्ह्युव वर विश्वास नाही पण जे तिथे प्रत्यक्ष जावून अनुभव घेतले त्यांच्या सांगण्यानुसार जातो व ९९ % माहिती हि योग्यच मिळालेली असते व त्यानुसार पुढे सांगितले जाते.
ह्यामुळे व्यवसाय दुप्पट होऊ शकत होता पण केला नाही, कारण जितके झेपते तितकेच काम करायचे, विनाकारण ताण घ्यायचा नाही, कर्ज घ्यायचे नाही नाहीतर असे उद्योजक व्यवसायिक ह्यांचे फोटो भिंतीवर दिसून येतात, कारण काय तर हायपरटेन्शन, हृदयविकार चा झटका किंवा इतर आजार. हे सांगितले आहे ते वास्तव आहे. आयुष्यात जन्म मृत्यू मध्ये परत संधी भेटत नाही त्यामुळे जे आयुष्य जगत आहात ते हुशारीने जगा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
अश्विनीकुमार
"नवीन दिवस नवीन सुरुवात."
"आजचा दिवस सकारात्मक जाईल."
"आज मी आनंद मौज मजेने दिवस घालवेल."
हे वाक्य बोलून करा भले तुम्ही कर्जात का असेना, आर्थिक विवंचनेत का असेना तुम्ही हि परिस्थिती फक्त सकारात्मक मानसिकतेनेच बदलू शकता. सकारात्मक मानसिकतेवाला उद्योजक व्यवसायिक हा कुठल्याही परिस्थितीवर मात करून परत भरारी घेवू शकतो.
अश्विनीकुमार
अश्विनीकुमार
अश्विनीकुमार
अश्विनीकुमार
अश्विनीकुमार
सुरुवातीला लागणारे मानसिक शारीरिक व सामाजिक विकासाचे शिक्षण दिले जात नाही. ज्याला संस्कार बोलतात.
कौशल्य विकासावर भर दिला जात नाही.
भावनांवर ताबा ठेवायला शिकवले जात नाही.
अध्यात्म, मानसशास्त्र ह्याची योग्य माहिती दिली जात नाही.
विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक क्षमता ओळखण्याचा प्रयत्न केला जात नाही.
इयत्ता आठवी ते बारावी जिथे जबाबदारीची जाणीव करून द्यायची असते तिथे १० वी १२ वी च्या परीक्षेची भीती घालतात.
इयत्ता आठवीत आर्थिक परिस्थिती मध्ये शिक्षण सोडावे लागल्यामुळे अनेक विद्यार्थी काळाच्या ओघात वाहून जातात तर काहीच पुढे जातात.
शिक्षण प्रचंड महाग करून ठेवले.
चौकटीबाहेर विचार करायचा शिकवला जात नाही. काही शिक्षक असतात जे आपल्या विद्यार्थ्यांना अगोदरच हि माहिती देवून ठेवतात पण हा शिक्षणाचा भाग नाही.
मोची कसे बनावे, दुकान कसे सुरु करावे, फोटोग्राफी चा व्यवसाय कसा सुरु करावा, प्लंबर कसे बनावे ह्या आणि अश्या अनेक क्षेत्रांना वाव दिली जात नाही किंवा त्यांना खालच्या दर्ज्याचे काम म्हणून हिणवले जाते.
नोकरी शिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही.
स्थानिक बाजारपेठेला अनुसरून शिक्षण पद्धती बनवली जात नाही, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ती देखील फक्त अमेरिका बाजारपेठेला अनुसरून शिक्षण पद्धती तयार केली जाते.
नोकरी ह्या फक्त एकाच मार्गामुळे अनेक लघु उद्योजक व्यवसायिक तयार होणे कधीच बंद झाले.
ज्यांनी शिक्षण सोडले किंवा चौकटीबाहेर पाउल ठेवले त्यापैकी अनेक प्रगतीपथावर आहे.
अश्विनीकुमार