महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१८ / १९ च्या अंदाजपत्रकानुसार ३.६७ लाख करोड ची आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हि भारतातील इतर राज्यांपेक्षा सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तुम्हाला फक्त मागणी आणि पुरवठा ह्यामधील तफावत ओळखून, स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करून उद्योग, व्यवसाय सुरु करायचा आहे. २०१९ मधील सुरवात तुम्हाला २०२८ पर्यंत यशाच्या शिखरावर घेवून जाईल. इथे कौशल्यापेक्षा तुमच्या मानसिकतेची क्षमता कामी येईल. जितके तुम्ही मन अंतरमनाने स्थिर असाल तितक्या जास्त उद्योग व्यवसायाच्या संधी तुम्हाला दिसतील, मिळतील. विश्वास ठेवा आणि सतत कृती करताना मनात बोला कि "तुम्ही करू शकता". उद्योग, व्यवसाय आणि तुम्ही ह्यामध्ये कोणीही आले नाही पाहिजे. फक्त शहरांबद्दल बोलत आहे. आता प्रश्न आहे कि ३.६७ लाख करोड हे वाढत जातील त्यापैकी तुम्ही किती कमावणार? साधा नियम आहे कि तुम्ही नाही कमावले तर दुसरा कोणीतरी येवून कमावून जाणारच.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध

कर्ज घेऊन शिक्षण घेण्याअगोदर पालक आणि विद्यार्थी ह्यांनी स्वतःला खालील प्रश्न विचारा


कर्ज घेवून शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही जो पैसा कमावणार तो स्वतःच्या घरासाठी वापरणार कि कर्ज फेडण्यासाठी?
जर ठराविक वर्षे तुम्ही कर्ज फेडण्यात घालवलीत मग तुमच्या घरच्यांसाठी तुमच्या मुलांसाठी पैसे कमावून ठेवण्यासाठी किती वर्षे उरतील?
कर्ज व्यवस्था आज शेतकरी संपवत आहे तर मग उद्या विद्यार्थी देखील नाही संपवणार हे कश्यावरून?
कर्ज घेवून शिक्षण घेवून तुम्हाला किती फायदा झाला आणि शिक्षण संस्थेला किती फायदा झाला?
लाखो रुपये कर्ज घेवून १० २० हजारांची नोकरी लागल्यास काय कराल आणि नोकरी नाही लागल्यास काय कराल?
तुम्ही जे काही शिक्षण घेतले आहे त्याच क्षेत्रात तुम्ही काम करता का?
सरकारी नोकऱ्या मुद्दाम कमी आणि खाजगी क्षेत्रात शोषण मग तुम्ही काय कराल?
तुम्ही कर्ज देखील फेडले त्यामध्ये काही महत्वाची वर्षे घालवली तरीही तुम्ही कायमस्वरूपी नोकरी भेटली का? कि नोकरी जाण्याची सतत भीती आहे?
शिक्षण संस्थेला तर पैसे भेटले पण त्यांनी नोकरी किंवा उद्योग व्यवसायाची हमी घेतली होती का?
आज कोण नफ्यात आहे? शिक्षण संस्था कि तुमच्या सारखी करोडो कुटुंब?
ह्या कर्जामुळे विद्यार्थी आणि पालक ह्यांना किती मानसिक ताण येत असेल?
पालकांना शिक्षणासाठी कर्ज मिळवताना आलेला मानसिक ताण आणि विद्यार्थ्यांना जर नापास झालो कि पैसे बुडतील ह्याचा मानसिक ताण?
पैश्याचे सोंग कोणी घेवू शकत नाही आणि कर्ज घेतले तर फेडावेच लागेल.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध