स्थानिक अर्थव्यवस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्थानिक अर्थव्यवस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एक काळ असा होता जिथे योग्य उद्योग व्यवसाय सुरु व्हायचा आता फक्त विदेशात काहीतरी दाखवणार आणि त्याची नक्कल करत आपल्या इथे उद्योग व्यवसाय उभा राहणार व सपशेल पडणार. मेंदू तुमचा तर अक्कल दुसऱ्याची का? भारतीय बाजारपेठेचा अभ्यास करा, तुमच्या स्वतःचे आकलन करा व करा उद्योग व्यवसाय सुरु. नक्कल करून अपयशी व्हाल तर स्वतःवर विश्वास ठेवून यशस्वी व्हाल. तुमच्यामुळे चार लोकांच्या घरची चूल पेटेल.


अश्विनीकुमार

 


 “मध्यम वर्गीय अर्थव्यवस्थाच उत्तम आहे ना कि श्रीमंत आणि गरिबांची अर्थव्यवस्था. मध्यम वर्गीय जूणे कपडे पुसायला वापरतात व जे देण्यासारखे असतात ते भांडेवाल्याला देतात. पैसा जपून वापरतात व जेव्हा कुणाला गरज असते तेव्हा द्यायला कमी करत नाही. पैसा योग्य वापरला जातो. गरीब अर्थ व्यवस्था त्यांच्या कमाईनुसार कर्जबाजारी असते तर श्रीमंत अर्थव्यवस्था हि स्वतःचे विचार करणारी असते.”


अश्विनीकुमार


 “जगातील १० मोठ्या कंपन्या कुठल्या असे जेव्हा गुगल सर्च मध्ये टाकतो तर प्रथम क्रमांकावर वालमार्ट आणि एमेझोन आहे. वालमार्ट म्हणजे मोठे ऑफलाईन दुकान तर एमेझोन म्हणजे मोठे ऑनलाईन दुकान. एमेझोन तर भारतात आहेतच सोबत त्याने अनेक लहान मोठी दुकाने बंद करून टाकली किंवा त्यांचा धंदा बंद केला. दुसरीकडे एमेझोन मध्ये जे लघु दुकानदार होते त्यांच्यावर अल्गोरिदम द्वारे लक्ष ठेवून स्वतः उत्पादने काढून स्वस्तात विकू लागला. म्हणजे जास्तीत जास्त नफा का कंपनीकडे आणि तिथून अमेरिकेत जावू लागला. एकप्रकारे बोलायला गेल्यास मधला व्यवसायिक ज्याला आपण दलाल बोलतो ते दोघे आज जगातील सर्वोच्च कंपन्या आहेत आणि जे मेहनत करून उत्पादने बनवतात त्यांना कुठेही स्थान नाही. अश्या कंपन्यांचा आदर्श घेवू नका, त्या फक्त नफ्याकडे लक्ष देतात. अजून त्यांची काळी बाजू देखील आहे ती जगासमोर असूनदेखील त्याच्यावर इतकी चर्चा केली जात नाही. स्थानिक उद्योग व्यवसायांवर भर द्या, एक अरबोपती उद्योजक, व्यवसायिक तयार करण्यापेक्षा १०,००० लखपती उद्योजक आणि व्यवसायिक निर्माण करा. भ्रमात फसू नका.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv