शुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्याशुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या

आपल्या आयुष्यात शुद्धीकरणाचे खूप महत्व आहे. जर आपण ठराविक वेळेस शुद्धीकरण करत राहिलो तर जी उर्जा आणि भावना साठून काळी झालेली असते व तिचे गाळात रुपांतर होवून ती तुमच्या आयुष्यात नवीन चांगले काही घेऊन येवू देत नाही आणि आले तरी साठू देत नाही, सर्वकाही वाहून नेले जाते.

मग कधीतरी वैतागून तुम्ही तुमच्या अंतर्मनातील अथांग खोल तलाव ढवळता आणि जे नकारात्मक होते ते भूतकाळाच्या गाळात साठून त्यांनी एक स्वरूप प्राप्त केले जे त्या व्यक्तीला वास्तवात दिसायला लागते, तशी परिस्थिती परत निर्माण होते पण काळी, लोक आयुष्यात येतात पण जे वाईट झाले आहेत तेच, आणि काही तर अश्यात लग्न करून आपले आयुष्य हे नर्क करून घेतात, स्त्रिया तर पती परमेश्वर मानतात म्हणजे नकारात्मक जोडीदारासोबतच ते आयुष्य व्यतीत करतात व बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही.

गाळ हा काढून बाहेर टाकायचा असतो, त्याचा वापर खतासारखा केला जातो, तो गाळ अंतर्मनाचा तलाव स्वतः वापरू शकत नाही, आणि जर अध्यात्मिक लोक असतील विविध प्रकारच्या बाधा होण्याची दाट शक्यता असते.

तुम्ही आयुष्य जगत आहात, उर्जा, भावना प्रवाहित होत आहेत, त्यापैकी काही साठून राहत आहे, तुमचे शरीर वजनदार बनत आहे पण तुम्हाला समजून येत नाही कारण हे उर्जा आणि भावनेचे वजन असते. आणि बस एकदा तलाव धवळला कि सर्व संपले. इथून भाग्याची जागा दुर्भाग्य घेते.

शुद्धीकरणाचे प्रकार

आत्मा शुद्धी : खूप महत्वाचा टप्पा ज्यामुळे आपण अनेक विधी करतो, खासकरून व्यक्ती मृत्यू मुखी पडल्यावर, वारल्यावर. हे आपल्या भारतीय शास्त्राचे महत्व आहे. इथे तज्ञांची मदत ह्यासाठी घ्यावी लागते कारण जिवंत असताना देखील शुद्धीकरण करण्याची गरज लागते. जर तुमचा अध्यात्मावर विश्वास आहे आणि त्यानुसार आयुष्य जगत असाल तर तुम्हाला कालांतराने तुम्ही उर्जा शुद्ध करून घ्यावी लागते जेणे करून अलौकिक संकटे हि टाळली जातात.

शरीर शुद्धीकरण : ह्यामध्ये काही प्रकार आहेत. जसे उर्जा, कंपने, भावना, विचार, स्वभाव आणि सवयी.

नंतरचा भाग येतो तो आयुष्य शुद्धीकरणाचा. त्या संदर्भात फक्त महत्वाचे मुद्दे देण्यात येतील.

खाजगी आयुष्य शुद्धीकरण, आर्थिक आयुष्य शुद्धीकरण (सर्व प्रकारचे आर्थिक आयुष्य), वास्तू शुद्धीकरण (सर्व प्रकारच्या वास्तू खाजगी, व्यवसायिक ते सार्वजनिक), पुरुष, स्त्रिया, लहान मुले, आणि ज्येष्ठ शुद्धीकरण, शैक्षणिक शुद्धीकरण, वैवाहिक शुद्धीकरण, लैंगिक शुद्धीकरण.

ह्या शुद्धीकरणामध्ये नकारात्मक साठलेले, न वापरलेले गाळ काढून परत तुमचे आयुष्य सुख, समाधान, समृद्धी, संपत्ती आणि पैश्याने प्रवाहित केले जाते. नवीन नद्यारूपी मार्ग हि पुनरजीवित केले जातात. खूप बरे वाटते, हलके वाटते, परमोच्च आनंद गाठल्यासारखे वाटते, भाग्यशाली चमत्कारिक आयुष्य जगायला सुरवात होते, जे हवे ते मिळते आणि ते देखील अमर्याद मिळत जाते.

मी जे सांगत आहे ते अनुभवण्याचा भाग आहे आणि अनुभव हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे ठराविक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, बाकी तुम्ही इनबॉक्स, किंवा व्हास्टएप मेसेज ह्याद्वारे विचारू शकता, तेव्हा फक्त माहिती दिली जाईल ना कि प्रक्रिया केली जाईल, ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी फक्त.

धन्यवाद
अश्विनीकुमार

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

Image by Sabine Zierer from Pixabay

पैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे?


पैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे?

पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग

संपत्ती किंवा पैसे कमावण्याचे मार्ग

वारसाहक्क

धार्मिक, सामाजिक नियमानुसार.

उद्योग पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.

व्यवसाय पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.

नोकरी

धोक्याची सूचना : नोकरी आता पारंपारिक पिढीजात राहिली नाही. कंपनीचा मालक त्याची कंपनी हि त्याच्या वारसांना किंवा सामाजिक संघटना असेल तर त्यांना देईल पण नोकरी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देवू शकत नाही. कितीही मोठे पद का असेना ह्यासाठी देखील अनेक कुटुंबे रांगेत असतात. हा थोडी हुशारी वापरून, धूर्तपणा, कपट आणि वाम मार्गांनी तुम्ही हि नोकरी पिढीजात करू शकता पण धोके हे राहणारच.

व्यवसायात साधे लहान दुकान आणि त्यासोबत सुरु असलेला व्यवसाय हा पुढच्या पिढीला देवू शकतो पण नोकरी नाही.त्यानंतर तुमचे संस्कार आणि पुढच्या पिढीचा निर्णय आहे कि तो व्यवसाय करायचा कि नाही आणि त्याला कमी लेखून त्यापेक्षा कमी पगाराची नोकरी करायची.

मराठी समाजाने सोडले ते परप्रांतीय समाजाने पकडले. संधी जो तिचा फायदा घेतो तीचीची असते ना कि सोडणार्यांची. म्हणून मुंबई मध्ये उच्चभ्रू वस्तीत परप्रांतीय जास्त आहेत आणि मराठी कमी. आणि त्याच उच्चभ्रू वस्तीत अनेक परप्रांतीय लघु व्यवसाय करून लाखोंमध्ये फायदा उचलत आहेत.

आपला नेता असणे, तो श्रीमंत असणे, काही मराठी राजकारणी श्रीमंत असणे म्हणजे मराठी समाज नाही. मराठी समाज तोच जो समृद्ध असेल, ज्याच्याकडे सर्वकाही असेल ना कि अपवाद राजकारणी किंवा धर्मकारणी.

जात, धर्म, राजकारण, इतिहास असेच चालत राहणार फक्त तुमचे आयुष्य सरासरी ६० ते १०० वर्षांचे आहे. तुम्ही ठरवा कि तुम्हाला तुमचे कुटुंब बघायचे आहे कि भूतकाळात जावून डिप्रेशन ह्या मानसिक आजाराने ग्रस्त व्हायचे आहे.

जर मुंबईत राहून तुम्हाला तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसे कमावता येत नसेल, किंवा श्रीमंत बनण्याच्या संधीचा फायदा घेता येत नसेल तर तुमच्यात आर्थिक मानसिकता नाही. हि मानसिकता निर्माण करावी लागते त्यानंतरच तुम्हाला संधी दिसायला लागतात.

तुमच्यात आर्थिक मानसिकता असेल, तुम्ही आर्थिक साक्षर असाल तर तर तुम्ही आज तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसा खेचत आहात आणि नाही तर तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचा प्रवाह हा नीट वाहत नाही. आयुष्य मस्करी नाही, हॉस्पिटल मध्ये जेव्हा घरची व्यक्ती एडमिट असते, जीवनमरणाचा प्रश्न असतो आणि लगेच पैसे उभे करायचे असतात तेव्हा महत्व समजते पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो.

भावनेला किंमत नाही. आर्थिक आयुष्य आणि इतर आयुष्य वेगवेगळे ठेवून जगावे लागते, जिथे जास्त वेळ द्यायची वेळ येईल तेव्हा पैश्यांना निवडा कारण आता जगण्यासाठी पैसा लागतो. पैसा असेल तेव्हा तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता आणि अजून जास्त पैसा असेल तेव्हा तुम्ही समाजसेवा करू शकता पण ह्यासाठी देखील पैसा पाहिजेच.

आर्थिक दृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनण्यासाठी मी २ कोर्स सुरु केले आहे, पहिला आहे मानसिकतेचा आणि दुसरा आहे पैसे सर्व मार्गांनी खेचून आणण्याचा.

जे फॉलोअर्स आहेत, जे समविचारी आहेत आणि ज्यांनी पैसे कमावण्याच्या आड येणारे सर्व मार्ग बंद केले असतील अश्यांचे स्वागत.

रिझल्ट येतो पण कोर्स कठीण आहे, त्यामुळे पूर्ण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असाल तरच पाउल उचला नाहीतर नाही. कमजोर लोक हि तोवर नैराश्य आणि हृदय विकार किंवा इतर तस्तम विकारांनी ग्रस्त होण्याची शक्यता असते.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf