अपयश हे आजचे शेवट हि नाही व कायमस्वरूपी देखील नाही त्यामुळे अपयशीच होणार हा विश्वास दृढ करायची गरज नाही

आपल्या आयुष्यातील अपयश दूर करणारा लेख


नेहमी प्रमाणेच पश्चिम महाराष्ट्र मधून एक व्यवसायिक समुपदेशनासाठी आला होता. अनेक वर्षे तो अपयशाने ग्रासला होता. जस जसे समुपदेशन पुढे जात होते तस तसे सर्व समस्यांमधून मूळ समस्या हि दिसायला लागली होती.

आता जे सांगेन ते तुम्ही तुमच्या अंतर्मनात कायमस्वरूपी रुजवून ठेवा.

त्या व्यवसायिकाने इतके अपयश बघितले होते कि त्याचा दृढ विश्वास बसला होता कि तो जे काही करेल त्यामध्ये तो अपयशीच होईल. आणि इथेच तो चुकला होता. यश अपयश हे येतच असते. काहींच्या आयुष्यात यश अपयशाचा कालावधी हा थोडा जास्त वेळ असतो ह्याचा अर्थ असा नाही कि ती अवस्था हि कायमस्वरूपीच असलीच पाहिजे.

सामान्यतः लोक हि कुठलीही अवस्था मग ती यश अपयश असो, आरोग्याविषयी असो, खाजगी किंवा व्यवसायिक आयुष्याविषयी असो ते हीच अवस्था किंवा परिस्थिती कायमस्वरूपी राहील असे समजतात, स्वतला दुर्भाग्यशाली समजतात, ते मानसिकताच इतकी टणक करून टाकतात कि ती परत भुशभूषित करून तिच्यात यशाची बी देखील नाही पेरू शकत.

अजून एक चुकी अशी होते ज्यामध्ये इतक्या नकारात्मक विचारात देखील सकारात्मक विचार कल्पना येत असतात पण त्या प्रचंड प्रमाणात असलेल्या नकारात्मक विचारांमुळे कल्पनांमुळे अडगळीत टाकले जातात. संधी आयुष्यात येत असते ती तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा पकडायची असते आणि ती जे पकडतात तेच चमत्कारिक आयुष्य जगतात. अगदी शून्य काय वजा मधून लोकांनी अवकाशात झेप घेतली आहे ज्याला इतर लोक भाग्यशाली असे म्हणतात.

यशस्वी आयुष्य जगा किंवा अपयशी नेहमी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा कि सतत आपल्या आयुष्याच्या जमिनीची मशागत करत राहा, जर यशस्वी आयुष्य जगत असाल तर कुठेतरी अपयशाचे बीज पडले असेल ते नंतर फोफावत जाईल, ह्या मशागती मध्ये तुम्ही ते बीज किंवा रोपटे आरामात काढू शकता, पण एकदा का जर त्याचा वटवृक्ष झाला कि तो वटवृक्ष मुळासकट काढायला खूप त्रास होतो.

यशाचे बीज रोवले गेले तर त्याला खतपाणी घालायचे व जर अपयशाचे बीज रोवले गेले तर त्याला लवकरात लवकर समूळ काढायचे बघायचे, हि सतत चालणारी क्रिया आहे, काही हुशार आणि समजूतदार लोक हि आत्मविकासाची क्रिया आपोआप चालेले अश्या परिस्थितीत आणून ठेवतात व काही तज्ञांची मदत घेत असतात.

रात्र आहे तर दिवस देखील आहे, उत्तर धृवामध्ये ६ महिने रात्र असते तर ६ महिने दिवस देखील असतो. कुठेतरी तुमच्या ह्या अंधकारमय आयुष्याला शेवट हा आहेचच. फक्त मानसिक रित्या आपण एखाद्या लहान समस्येचे मोठ्या समस्येत कल्पनेत रुपांतर करतो व नंतर ते वास्तवात उतरवतो.

कुठलीही परिस्थिती हि कायमस्वरूपी नसते, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीची सवय करून घेऊ नका. यश अपयश ह्या दोघांची सवय करून घ्या. दोन्ही परिस्थितीत स्थिर आणि शांत मनाने रहा, भावनांवर ताबा ठेवा. आयुष्यात यश अपयश हे निरंतन चालत राहणारच आहे. तुम्हाला फक्त सामना करण्यासाठी सक्षम बनायचे आहे.

आपण जर अश्या परिस्थिती मधून जात असाल तर आजच संपर्क करा. विनाकारण नकारात्मक परिस्थिती मध्ये राहू नका.

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत



प्रत्येकामध्ये जन्मजात कौशल्य असते आणि ते जरुरी नाही कि जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हाच ते बाहेर येते, तुम्ही आत्मविकास करून ते कौशल्य कधीही बाहेर कधी शकता. प्रत्येक ठिकाणी कठीण परिश्रम कमी येत नाही निसर्गाने आपल्याला हव्या असलेल्या शक्त्या अगोदरच देवून ठेवल्या आहेत. ज्याचा विश्वास असेल कि संकटाच्या वेळेस तुमच्या मधील कौशल्य, शक्ती जागी होईल तर त्याला कधीही सोप्या पद्धतीने कौशल्य आणि शक्ती प्राप्त नाही होणार आणि ज्याचा विश्वास आहे कि सोप्या पद्धतीने भेटेल त्याला ते सोप्या पद्धतीने भेटतेच. हा अंतर्मनाचा खेळ आहे.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.

#मानसशास्त्रआणिआकर्षणाचासिद्धांत #मानसशास्त्र #आकर्षणाचासिद्धांत #अंतरमन #अंतरमनाचीशक्ती #अध्यात्म #अध्यात्मिकशक्ती #प्रोत्साहन #प्रेरणा #आत्मविश्वास #आत्मविकास #चलाउद्योजकघडवूया #उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #तणाव #नैराश्य #नकारात्मकविचार #marathi #marathimulgi #marathimulga #marathijokes #marathistatus #marathikavita #marathifunny #marathibana #marathiactress #marathifc #marathimotivational #marathiinspirations



ज्ञान, कौशल्य, अनुभव, तज्ञ आणि आवड असली तरी सर्वांना एकसारखे पैसे मिळत नाही. अशी अनेक लोक आहे ज्यांच्याकडे सर्वकाही आहे पण ते पैसे कमवू शकत नाही, संधी मिळत नाही, पण दुसरीकडे नको तिथे प्रवाहाने पैसा जातो. इथे तुम्हाला काळानुसार बदलून जगावे लागेल, मानसिक दृष्ट्या सक्षम आणि स्थिर व्हावे लागेल, दुसरा पर्याय नाही. जग फक्त यशस्वी लोकांकडे बघते आणि अयशस्वी लोकांना दुय्यम वागणूक दिली जाते. भले यशस्वी लोकांकडे गुण नसले तरी त्यांची वाहवा होते आणि अयशस्वी लोकांमध्ये नसलेल्या उणीवा काढल्या जातात. आयुष्यात समान संधी अस्तित्वात नाही आहे. काळानुसार बदलून, संधी साधून जगावे लागते.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध

सर्व शिव भक्तांना महाशिवरात्री च्या हर्दिक सुभेच्छा



ज्यांचा अध्यात्मावर विश्वास आहे त्यांच्या साठी एक नवीन पुरातन अध्यात्मिक साधना व तंत्र विद्या असलेले मानसिक व शारीरिक प्रशिक्षण घेवून येत आहे. उपचार पद्धत देखील विकसित केली गेली आहे ज्याचा फायदा शारीरिक व मानसिक आजार बरा करण्यासाठी होतो. आताच्या वैज्ञानिक वैद्यकीय उपचारासोबत हि उपचार पद्धती चमत्कारासारखे काम करते.

तंत्र साधनेचे नाव आहे आयुष्य मंथन. तुम्हाला पुराणातील समुद्र मंथन हि कथा माहितच असेल. ह्याच समुद्र मंथनातून अनेक दैवी वस्तू निघत असतात ज्यांची शक्ती प्रचंड असते. जे हलाहल विष निघाले होते तसे. रत्ने आणि दैवी शक्त्या निघाली होत्या. आयुष्य मानसिक आणि शारीरिक मंथनातून तुम्ही देखील तुमच्यातील अलौकिक दैवी शक्त्या जागृत करू शकता. पाहिजे तसे आयुष्य जगू शकता, सर्व समस्या दूर करू शकता. जर कुठची अलौकिक समस्या असेल तर त्याचे निदान आरामात होते.

महाशिवरात्री अध्यात्मिक आस्था आणि विश्वास असणाऱ्यांसाठी आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्याची योग्य वेळ.

विवाह जुळून येत नसतील अश्यांसाठी उत्तम योग आहे. एक मान्यतेनुसार शिव आणि पार्वती चा विवाह दिन आहे. जर तुम्ही करू शकत असतील तर कडक उपास किंवा झेपेल असा उपवास केला तर त्याचे फळ मिळते.

एका मान्यतेनुसार समुद्र मंथनातून जे विष निघाले होते ते शिव ने प्राशन केले होते. जर आपल्या कुठल्याही समस्या ह्या महादेवा समोर ठेवल्या कि महादेव ते प्राशन करून तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांपासून तुम्हाला मुक्त करतील.

संतान प्राप्ती साठी देखील हि वेळ उपयुक्त आहे. मुल होण्याची शक्यता वाढते.

महादेव श्रुष्टी चे विनाशक देखील आहे व निर्माते देखील आहे. विनाशानंतर नव श्रुष्टी चे निर्माण केले जाते आणि ह्याच मार्गाने आपण आपल्या आयुष्याचे नवनिर्माण करू शकतो.

जर कुठली अघोरी साधना, उपाय किंवा उपचार सुरु असतील तर त्याचे फळ मिळण्याची शक्यता आहे. अघोरी शिवाचे अंश आहेत सैन्य आहे.

जवळच्या मंदिरात जावून शिवलिंगाचा जलाभिषेक केला तरी खूप फायदा होतो. किंवा घरी पिठापासून शिवलिंग बनवून त्याचा दुधाभिषेक केला तरी घरातील सर्व समस्या दूर होतील.

मुलांचे शिक्षण, वयात येणाऱ्या समस्या, नोकरी व्यवसाय, लग्न ह्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.

जरी काहीही समस्या नसेल तरीही तुम्ही आपली अध्यात्मिक उर्जा वाढवण्यासाठी शिव उपासना करत राहू शकता.

आपल्या जर अध्यात्मिक आणि अलौकिक समस्या असतील तर त्या फोन, व्हास्टएप, फेसबुक मेसेज ह्या मार्गाने कळवाल. जर समस्या मोठी असेल तर ईमेल कराल.

आयुष्य मंथन ह्या शिव साधनेसाठी आजच संपर्क करा व आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करा.

फेसबुक आयडी : "आपले अंतरमन"

धन्यवाद
अश्विनीकुमार

अध्यात्म, मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध



आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरे न शोधलेली बरी. कदाचित ती प्रश्ने धोकादायक किंवा तुमच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ करणारी असू शकतात. त्यामुके प्रत्येक प्रश्नांची उत्तरे हि भेटलीच पाहिजे असा हट्ट धरून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू नका. काही अनुत्तरीत प्रश्नांमुळे आपण सुखी समाधानी आयुष्य जगत असतो तर काही प्रश्नांची उत्तरे भेटल्यामुळे आपण दुखी असमाधानी आयुष्य जगायला लागतो. योग्य आणि गरजेच्याच प्रश्नांची उत्तरे शोधा.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.



जर तुम्ही तुमच्या मनासारखे आयुष्य जगत असाल किंवा घडत असेल तर आयुष्यातील प्रत्येक क्षण हा दीर्घकालीन आहे आणि जर तुम्ही तुमच्या मनासारखे आयुष्य जगत नसाल किंवा तसे काहीच घडत नसेल तर प्रत्येक क्षण अल्पकालीन आहे. आनंदात प्रत्येक क्षण हा संथ गतीने जात असतो आणि आपण आनंदाचा पूर्णपणे आस्वाद घेतो तर दुखात प्रत्येक क्षण इतक्या जलद गतीने जातो कि ह्यामध्ये आपण महिने वर्षे किंवा आयुष्य घालवून टाकतो. आनंदाला मर्यादित कालावधी आहे म्हणून सतत आत्मविकास करत आनंदी क्षण निर्माण करावे लागतात आणि दुखांचे निराकरण करावे लागते. आता तुम्ही ठरवा कि तुम्हाला कसे आयुष्य जगायचे आहे ते.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.



अंतर्मनाच्या शक्ती मध्ये देखील स्वजीवी, परजीवी आणि मृतजीवी असे प्रकार असतात. स्वजीवी स्वतःवर अवलंबून असतात, परजीवी स्वजीवी वर अवलंबून असतात आणि मृतजीवी हे मृत जीवांवर अवलंबून असतात.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.

आपल्या सवयींना, अंतर्मनातील विचारांना, कृतीला आपल्या आयुष्यावर हवे होऊ देवू नका



उच्च पदावर असलेले किंवा जास्त कमावणारे अशी लोक त्यांची स्वतःची जीवनशैली बनवतात. अर्थात तो शिस्तीचा भाग असतो, एकप्रकारे रिच्युअल्स सारखे ते त्यांचे दररोजचे आयुष्य जगत असतात. हि जर सवय त्यांना उच्च पदावर घेवून जात असेल आणि पैश्यांचा प्रवाह त्यांच्या आयुष्यात आणत असेल तर हीच सवय त्यांचा कधी कधी प्रचंड घात करू शकते.
उदाहरणार्थ
एकदा एका कोर्टात गुन्हेगारी खटला चालू होता. अ वकील होता तो ब वकीलापेक्षा जास्त निष्णात होता तर ब वकील हा नुकताच वकील झाला होता. पहिल्याच सुनावणीत ब वकिलाला समजते कि त्याचा टिकाव अ वकीलासमोर लागू शकणार नाही, अ वकिलाने खूप चांगल्या प्रकारे पुरावे, साक्षीदार आणि जबाबी गोळा केलेल्या असतात.
मध्यंतरानंतर परत कोर्ट सुरु होते. ब वकिलाला करण्यासारखे काहीच नसते, तो फक्त अ वकिलाचे निरीक्षण करायला लागतो, अगदी सूक्ष्म मधली सूक्ष्म हालचाल देखील टिपू लागतो जसे कि अ वकिलाचे बोलणे, हालचाली, देहबोली आणि इतर कामाची गोष्ट (ह्याला बोलतात चौकटीबाहेर विचार करणे, कौशल्याने परिपूर्ण असलेला, सर्वगुण संपन्न व्यक्ती देखील खाजगी व व्यवसायिक आयुष्यात कसा हरतो ह्याचे उत्तम उदाहरण आहे. नीट लक्ष्य देवून वाचा.).
जे उच्च पदावर असतात किंवा श्रीमंत असतात ते महत्वाच्या कामाच्या वेळेस ठरलेले कपडे घालणार, तीच गाडी घेणार, तोच रस्ता पकडणार, त्याच वेळेवर निघणार हे ठरलेलेच असते.
थोड्या निरीक्षणाने ब वकिलाचे लक्ष्य अ वकिलाच्या एका हालचालीवर वर जाते, अ वकील सतत आपल्या कोटाच्या बटनाला नकळत, सवयीचा भाग म्हणून किंवा अंतर्मनातील सवयीनुसार हात लावत असतो. कोर्टाची आजची सुनावणी संपते व कोर्ट पुढची सुनावणीची तारीख देते. ह्या मधल्या वेळेत ब वकिलाला देखील प्रतिवाद सक्षम रीतीने मांडण्यासाठी पुरावे आणि जबाबी दिसून आल्या.
आता पुढच्या सुनावणी साठी ब वकिलाचे ध्येय होते कि अ वकिलाचे लक्ष्य विचलित करायचे. (ज्यांचे अंतर्मन ध्येयाच्या दिशेने प्रचंड एकाग्र असते तेच अंतर्मन तितक्याच प्रचंड शक्तीने विरुद्ध दिशेने देखील काम करते.). ब वकिलाने अ वकील जिथे कपडे धुवायला टाकतो त्या धोब्याला संपर्क केला. तिथे जावून ब वकिलाने धोब्याचे लक्ष्य दुसरीकडे वेधून अ वकिलाच्या कोटाचे ते बटन काढले जिथे अ वकील अजाणतेपणे हात लावत होता.
दुसर्या दिवशी ब वकिलाने त्याचे कमजोर पुरावे आणि जबानी सोबत प्रतिवाद सुरु केला तेव्हा अ वकिलाला त्याच्या प्रतिवादाला उत्तर देता नाही आले. अ वकिलाचा सारखा हात त्याच्या कोटाच्या बटनाकडे जात होता आणि ते बटन ब वकिलाने कालच काढून टाकले होते, त्यामुळे अ वकिलाचे अंतर्मन नीट काम करत नव्हते, गोंधळले होते. जेव्हा पण अ वकील वाद करायला सुरवात करत होता तेव्हा त्याचा हात बटन नसलेल्या जागेवर जात होते ज्यामुळे अ वकील गोंधळून जात होता.
अंतर्मनाचे लक्ष्य विचलित होणे हि खूप मोठी गोष्ट आहे. जर काही लोक एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला अंतर्मनापासून जोडले गेले असतील किंवा एकरूप झाले असतील आणि जर ती वस्त किंवा गोष्ट आपल्याकडे नसेल तर आपले अंतर्मन पूर्णपणे गोंधळून जाते. ह्याचा फायदा अनेकदा विविध प्रकारचे व्यवसायिक जसे कि वकील, सर्जन, अधिकारी आणि राजकारणी सारख्या व्यक्ती घेत असतात.
आपण अनेकदा अजाणतेपणे काही विशिष्ठ कृती करत असतो, कोणीही दुसरा व्यक्ती किंवा संस्था ह्याचा वापर किंवा गैरवापर करून घेवू शकते, कदाचित तुमच्या आयुष्याचा ताबा देखील घेउ शकते.
कटू आहे पण सत्य आहे.
म्हणून मी सतत सांगत असतो कि कधीही कुठल्याही वस्तूवर किंवा व्यक्तीवर जीव लावू नका, अगदी स्वतःवर सुद्धा नाहीतर ह्या छोट्याश्या कृतीमुळे तुम्ही तुमचे आयुष्य संपूर्णपणे भरकटवून टाकाल. प्रत्येक कृती मर्यादेतच चांगली असते आणि अतिरेक होतो तिथे सर्वकाही संपून जाते.
आता निर्णय तुमचा आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.



एका छोट्याश्या स्वच्छ पाण्याने भरलेल्या ग्लासात दुषित थेंब टाकला कि संपूर्ण पेल्यातील पाणी हे खराब होवून जाते आणि जर तोच थेंब स्वच्छ पाण्याच्या तलावात पडला तरी काहीही होत नाही. आपल्या अंतर्मनातील तलाव हा स्वच्छ सकारात्मक विचारांच्या पाण्याने भरून टाका मग दररोज पडणारे नकारात्मक दुषित थेंब तुमचे आयुष्य नकारात्मकता भरून दुषित करू शकणार नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.



राजकारणात नेते, कार्यकर्ते आणि प्यादे असतात. बळी फक्त प्याद्यांचा दिला जातो. जर तुम्ही राजकारणात असाल तर चुकुनही प्यादे बनू नका किंवा प्याद्यांसोबत राहू नका. इथे चांगले किंवा वाईट काही नाही. विनाकारण तर्कात अडकू नका.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध

बोधकथा "भावनांवर आणि स्वतःच्या कृतीवर कठीण परिस्थितीत ताबा ठेवायला शिका"



एकदा एक सिंह हा शिकार करण्यासाठी निघालेला असतो. सिंहाचे हे नेहमीचेच काम असते. सहसा सिंहाला शिकार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, शिकार सहसा भेटत नाही. पण आज जेव्हा सिंह शिकारीला निघतो तेव्हा एका ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त शिकार त्याला आयती भेटते. तो नेहमीच्या सवयीप्रमाणे कृती करतो. दबक्या पावलाने शिकारीच्या जवळ जातो. हरीणांच्या समूहाला पळायला जागा नसते. सिंह हा हल्ला करतो व हरिणांना मारून टाकतो.

सिंह तिथेच ताव मारतो. आयती शिकार, जास्त प्रमाणात अन्न उपलब्ध झाल्यामुळे तो दाबून खातो. सिंह पोट भरले असल्यामुळे तिथेच आराम करतो. शिकार पकडण्यासाठी त्याला जास्त मानसिक आणि शारीरिक शक्ती खर्च न झाल्यामुळे त्याला लगेच गाढ झोप लागते व सिंह झोपून जातो.

इतक्यात त्या सिंहावर जंगली कुत्र्यांचा समूह हल्ला करतो. इथे एक नियम लक्ष्यात ठेवा, तुम्ही कितीही शक्तिशाली का असेना, तुम्ही जास्तीत जास्त १० जणांना मारू शकता पण ५० १०० लोकांना नाही मारू शकत. इथे सिंहावर शिकारी कुत्रे भारी पडले, सिंह जखमी झाला, रक्तबंबाळ झाला आणि शेवटी शिकारी कुत्र्यांच्या समुहाने सिंहाची शिकार केली.

सिंहाला वाटले कि हरीणांचा समुह हा त्याचा शिकार होता पण इथे जंगली कुत्र्यांच्या समुहाने सिंहाचा शिकार करायचे ठरवले होते म्हणून त्यांनी हरिणांना त्या जागी ठेवले होते.

सिंह एकटा होता म्हणून हरला, जंगली कुत्र्यांनी एका सिंहाला समुहाने मारले, जर एक एक जंगली कुत्रा गेला असता तर सिंहाने आरामात त्यांना मारले असते. हे जे विचार आहेत ते बाजूला ठेवा, जो कमजोर असतो तो समुहात राहतो आणि समुहातच शिकार करतो. जो विनाकारण धाडस दाखवायला जातो तो मरतोच. जंगली कुत्र्यांनी समुहात शिकार केली ती योग्यच केली कारण त्यांना त्यांची मर्यादा हि माहिती होती.

आयुष्यात आणी जंगलात ध्येय असते ते म्हणजे जिवंत राहणे, जो जिवंत राहिला तो जिंकला आणि जो मेला त्याचे अस्तित्व नष्ट झाले. जंगलात पुतळे उभे करत नाहीत.

परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन शांत ठेवून कृती करा. संकटे, कठीण परिस्थिती तुम्हाला हरवत नाही तर तुमचे अंतर्मन तुम्हाला हरवते.

आपले अनुभव इनबॉक्स, ईमेल किंवा व्हास्टएप द्वारे शेअर कराल.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.