जर तुम्ही 
स्वप्न 
बघणार असाल तर 
मोठे स्वप्न 
बघा.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षककाही स्त्रिया भविष्य वर्तवितात,
मी माझे भविष्य बनविते.

स्त्रियांसाठी

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षककाही लोक भविष्य वर्तवितात,
मी माझे भविष्य बनवतो.

^पुरुषांसाठी

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकश्रीमंत आणि गरीब 
लोकांमधला प्राथमिक फरक 
"भीतीला कसे हाताळतात" 
हा आहे. 

रोबर्ट कियोसाकी

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक#१ पैसे कमवा

#२ तो पैसा अजून पैसे कमवण्यासाठी वापरा

#३ पुन्हा पुन्हा करा


समृद्धीच्या दिशेनेअश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


भीतीच्या बंधनांपासून 
मुक्त व्हा

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकआज आम्ही वाघाचे पिल्लू आहोत
उद्याचे आम्ही वाघ आहोत
^मुलांसाठी


आज आम्ही वाघिणीचे पिल्लू आहोत
उद्याचे आम्ही वाघीण आहोत
^मुलींसाठीविद्यार्थी आज वाघ, वाघिणीचे पिल्ले आहेत
उद्याचे वाघ, वाघीण आहे
^विद्यार्थ्यांसाठीतुमचे करू शकता हा विचार तुमच्या बुद्धिमत्तेपेक्षा अधिक महत्वाचा आहे.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकसुप्रभात

आपली निवड

सकारात्मक नकारात्मक

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकसुप्रभात 

नवीन दिवस
नवीन सुरवात
ध्येयाच्या दिशेने

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकसुप्रभात

आजचा मंत्रा

माझा माझ्यावर आणि माझ्या 
क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकउद्योग धंद्यामध्ये काही समस्या नसतात, समस्या असतात त्या माणसामध्ये.
माणसामधील समस्या दूर करा, उद्योग धंद्यामधील समस्या आपोआप दूर होतील.

शिव खेरा

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकसुप्रभात 

आजचा मंत्र

पैसा माझ्याकडे विविध मार्गाने येत आहे.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकमनावर घेवू नका 
हा फक्त धंदा आहे.

स्त्रियांसाठी

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकमनावर घेवू नका 
हा फक्त धंदा आहे.

पुरुषांसाठी

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकगरीब लोकांकडे मोठा टिव्ही असतो.
श्रीमंत लोकांकडे मोठे वाचनालय असते.

जिम रोह्न

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

उद्योजक व सर्वांगीण विकास


शिव खेरा चे प्रसिद्ध वाक्य आहे "उद्योग धंद्यामध्ये काही समस्या नसतात, समस्या असतात त्या माणसामध्ये. त्या माणसामधल्या समस्या दूर करा, उद्योग धंद्यामधल्या समस्या आपोआप दूर होतील."

गाडीच्या चार चाकापैकी एक जरी चाकामध्ये हवा नसेल किंवा कमी असेल तर गाडी चालवायला त्रास होतो तसेच माणसाच्या आयुष्याचे आहे, जर माणसाच्या आयुष्याच्या गाडीच्या एकही चाकामध्ये हवा कमी असेल किवा नसेल तेव्हा त्रासाला सामोरे जावे लागते.

जर तुम्ही मनाने श्रीमंत असाल पण तुमच्याकडे पाहिजे तसे आरोग्य नसेल, पाहिजे तसे पैसे येत नसतील, पाहिजे तसे नातेसंबंध नसतील म्हणजेच जीवनातील बाकींच्या चाकामधली हवा पूर्णपणे निघाली असेल किंवा कमी असेल तेव्हा आयुष्य पाहिजे तसे जगता येत नाही. त्या साठी तुम्हाला स्वतःचे डॉक्टर बनावे लागेल, जो माणूस (स्त्री किंवा पुरुष) स्वतःची समस्या नीट जाणतो तोच निदान करणाऱ्याला नीट सांगू शकतो. त्यासाठी व्यावसायिकाची मदत घेतलेली चांगली कारण त्यांचे हे रोजचे काम असते.


"संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली" लेखक रोबिन शर्मा ह्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे "एक जरी नकारात्मक विचार असेल तरी तुम्ही ऐश आरामाचे जीवन नाही जगू शकत" त्या साठी तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अंगामधील सकारत्मक आणि नकारात्मक गोष्टी लिहून काढावे लागतील आणि तीन भाग करावे लागेल पहिला म्हणजे विचारासंबधी, दुसरा भावनासंबधी आणि तिसरा कृतीसंबधी. धाग्याचा गुंता सोडवणे सोपे आहे, एक जरी टोक पकडले तरी सगळा गुंता सोडवला जातो तसेच माणसाच्या आयुष्याचे आहे, कितीही कठीण प्रसंग किंवा परिस्थिती असो जर त्याचे टोक भेटले कि मार्ग निघून येतो. नेहमी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा "आयुष्य सोपे आहे, त्याला कठीण बनवू नका."


जसे आपण लिहित जातो कधी कधी तसेच मार्ग पण सापडत जातात आणि आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. हा पहिला सकारात्मक अनुभव. जर मार्ग स्वतहून सापडत नसेल तेव्हा व्यावसायिकाची मदत घ्या कारण केस कापायला आपण माळ्याकडे नाही जात, न्हाव्याकडेच जातो. असे करता करता आपल्याला आपल्यामधील सुप्त गुण कळत जातात, आपल्या मधील असीम शक्ती उफाळून बाहेर येते, शक्यतांचे प्रमाण वाढत जाते, जे नकारात्मक योगायोग होते ते सकारात्मक होत जातात. नकारात्मक लोक दूर होत जातात व सकारत्मक नवीन लोक जवळ येत जातात आणि तुम्ही आनंद, हर्ष, जल्लोष, प्रेम, निसर्ग अश्या उच्च कंपनांच्या ठिकाणी आकर्षित व्हाल.


दुसरा पर्याय दिवसाची विभागणी खालील प्रमाणे करा 


ध्यान - श्वासावर लक्ष्य केंद्रित करणे, बिंदूवर किंवा एखाद्या वस्तूवर लक्ष्य केंद्रित करणे, मंत्र म्हणजे शब्दांचा समूह (पारंपारिक पद्धतीच्या जागी आपल्याला जशी गरज आहे तसे तयार करणे आणि महत्वाचे ह्यासाठी व्यावसायिकाची मदत घेतलेली चांगली) आपल्यामध्ये ज्या गुणाची कमी आहे त्याचे पुनरुच्चार करणे उदाहणार्थ इच्छाशक्तीची कमी असेल तर "माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे ", "दिवसेंदिवस माझी इच्छाशक्ती वाढत चालली आहे" किंवा "माझा सर्वांगीण विकास होत चालला आहे"
दुसरी महत्वाची सूचना म्हणजे मंत्र हे वर्तमान काळामध्येच असले पाहिजे कारण माणूस जगताना वर्तमानकाळात जगतो, जर चुकून भेटणार आहे आसे भविष्य काळामधला मंत्र जर जप करत राहिलात तर ते तुम्हाला वर्तमानात कधीच भेटणार नाही. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि त्याची आवड निवड पण वेगळी असते किंवा जे तुम्हाला आवडते ते दुसर्याला आवडत नसेल त्यामुळे तुम्हाला हवा तसाच मंत्र बनवा.


प्रार्थना म्हणजे वाक्यांचा समूह तुम्हाला जो तुमच्यात बदल पाहिजे किंवा जे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्याचे वाक्य तयार करा व सगळ्या वाक्यांना मिळवून प्रार्थना तयार करा. जर काही शंका असतील तर मला इ मैल करा.


व्यायाम - व्यायामाचे खूप महत्व आहे. व्यायामामुळे तुमचे शरीराचे कंपन वाढते, आजार कमी होत जातात व निरोगी राहता येते, ताण कमी होतो, इच्छाशक्ती वाढत जाते, एकाग्रता वाढते, शरीर मजबूत होत जाते, चीर तरुण राहता येते, शुक्राणूंची वाढ होते आणि इतर अनेक फायदे आहेत. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये कराटे व किक बॉक्सिंग पण येते आणि खेळ. तुम्हाला ज्याचा छंद आहे तो व्यायम प्रकार निवडा किंवा सगळे प्रकार एकदा करून बघा आणि जो समजण्यास व करण्यास सोपा वाटला तो निवडा. मी आता इथे खालील दोन प्रकारांबद्दल माहिती देतो


• मैदानी व्यायाम - स्ट्रेचिंग (शरीराचे स्नायू मोकळे करणे व शरीर गरम करण्यासाठी), जॉगिंग (मध्यम गतीने धावणे), डबल बार, चीन अप आणि पूल अप, सूर्य नमस्कार किंवा डीप्स, एब्स पाच प्रकार हे सगळे प्रकार येतात जसे आपण कपडे घालताना पूर्ण परिधान करून निघतो तसेच व्यायामाचे आहे, प्रत्येकाचे कमीत कमी दोन सेट मारले तरी पुरेसे आहे. जेव्हा आपण मैदानात व्यायाम करतो तेव्हा आजू बाजूला लक्ष्य विचलित करणाऱ्या खूप गोष्टी असतात त्यामुळे तुम्हाला फक्त व्यायामावर लक्ष्य केंद्रित ठेवावे लागेल. काहीही शंका किंवा मदत लागली असल्यास मला तुम्ही इ मैल आणि whatsapp वर संपर्क साधू शकता.


• व्यायामशाळा - व्यायाम शाळेमध्ये तुम्हाला उपकरणांद्वारे व्यायाम करायला भेटेल पण त्या आगोदर जो कोणी जाणकार असेल त्यांच्याकडून उपकरनांबद्दल माहित करून घ्या कि ती उपकरणे बरोबर आहेत कि नाही कारण एक जरी इंच इकडे तिकडे असेल तर तुम्हाला गंभीर दुखापत होऊ शकते. व्यायाम शाळेची जागा थोडो मोठी आणि हवा खेळती असणारी असावी आणि प्रशिक्षक मित्रासारखा असावा मग व्यायाम करायला खूप मजा येते.


घरी पण व्यायाम करू शकता पण मी असा सल्ला देईल कि बाहेर गेल्यावर नवीन लोकांशी ओळख होते त्यामुळे आत्मविश्वास वाढतो व समविचारी मित्र भेटतात.


डायरी - डायरी मध्ये तुम्हाला कसे आयुष्य जगायचे आहे ते आता जगत आहे असे समजून लिहा. उदाहरणार्थ तुम्ही वन रूम किचन मध्ये राहत असाल आणि तुम्हाला तीन रूम किचन विकत घ्यायचे स्वप्न असेल तर ते तुम्ही वर्तमानकाळात लिहून काढा. प्रत्येक जन वेग वेगळे काम धंदे करत असेल म्हणून मी इकडे उदाहरण नाही देत. थोडक्यात म्हणजे तुम्ही तुमचे स्वप्नातले आयुष्य जगत आहात असे लिहित जा.


नोंदवही - नोंद वही खिशात राहील अशी घ्यावी आणि त्यामध्ये रोजची कामे लिहून काढावी, जी पण महत्वाची कामे असतील ती तुम्ही अगोदर करून टाकल त्यामुळे तुमच्या डोक्यावरचा ताण कमी होईल व बाकीच्या कामांकडे निट लक्ष्य केंद्रित होईल.
डायरी किंवा नोंदवही ह्या मध्ये लिहिलेली जर मनाप्रमाणे होत नसेल तर त्यावर प्रतिक्रिया करू नका, आरामात राहा सकारात्मक विचार करा, जे तुमच्या हातात आहे ते बदलण्याचा प्रयत्न करा, ते आज नाही तर उद्या बदलेल, आणि जे आपल्या हातात नाही त्याबद्दल विचार करणे सोडून द्या किंवा आशेवर सोडून द्या. ज्या पण नकारात्मक प्रतिक्रिया तुम्ही देत असाल त्या कमी होत जातील व तुमच्यातील उर्जा वाढत जाईल. तुमचे कार्यालयातले, घरातले व समाजामधले नातेसंबध अधिक मजबूत होत जातील. जिथे अगोदर समस्या दिसत असतील तिथे तुम्हाला समाधान दिसत जाईल. कितीही वर्ष जुन्या समस्या असतील त्या सुटत जातील.


आहार - व्यायामाअगोदर अर्धा एक तास अगोदर केळ खात जा आणी व्यायाम करून घरी आल्यावर कुठच्या प्रकारची शरीर यष्टी पाहिजे त्याप्रमाणे केळ, अंडी किंवा जे पण मोसमी फळ असेल ते खात जा. नाश्ता, दुपारचे जेवण व ताक किंवा दही, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचे रस्त्यवरचे पदार्थ आणि रात्रीचे जेवण असे तुम्हाला जमेल तसे, तुमच्या आवडीप्रमाणे, वेळेप्रमाणे आहार घेत जा. प्रादेशिक आहार उत्तम आहे सीलबंद पदार्थांपेक्षा. आहार तज्ञाची मदत घेतलेली उत्तम राहील. सगळ्यात महत्वाचे शांतपणे आहार घ्या. मनात विचारांचा गोंधळ चालू देवू नका. काही दिवसातच तुमची पचनक्रिया सुधारेल, चेहरा उजळेल आणि तुम्हाला शरीरामध्ये तरतरी जाणवेल आणि बरेचशे आजारपण दूर होतील.


वाचन - वाचनामध्ये मी पहिली पसंदी आत्मविकासाच्या पुस्तकांना देईल. दररोज सकाळी आत्मविकासाची पुस्तक वाचत जा आणि जीवनात वापरात आणायचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला जे बनायचे आहे त्यानुसार आणि तुम्ही जे काम करत असाल त्या वर नवीन सुधारणा असलेली पुस्तके वाचत जा. वाचा आणी प्रयोग करा. ह्यामुळे तुमचा मेंदू पूर्णपणे कार्यरत होईल, परिस्थिती नुसार तुम्ही बदलत जाल, जिथे अगोदर तुम्हाला नुकसान व्हायचे तिथे तुम्हाला फायदा होईल किंवा नुकसानाची तीव्रता कमी होईल. आत्मविश्वास वाढत जाईल. एकसारखे रटाळ जीवन सोडून तुम्ही धोका पत्करून भरारी घ्याल आणि जरी उंचावरून पडले तरी परत अधिक उंचावरून पडण्याच्या तयारीत लागल. शेवटी तुम्ही आकाशाला गवसणी घालायला लागाल. पुस्तक वाचणे हा माझा छंद आहे. ह्यामध्ये मी तुम्हाला मनापासून मदत करेन.


टिव्ही वरील बातम्यांचे कार्यक्रम बघणे टाळा, संभाषण सुधारण्यासाठी तुम्ही चर्चा बघू शकता, त्यामध्ये काही जुने दिग्गज पत्रकार आहे जे मुद्देसूद बोलतात त्यांच्याकडून तुम्हाला कसे मुद्देसूद संभाषण करायचे हे शिकू शकता. उद्योगधंद्या संदर्भातले कार्यक्रम तुम्ही बघू शकता, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती, शेअर मार्केट संबधी कार्यक्रम, विज्ञान वाहिनी आणि हॉलीवूड सिनेमे इत्यादी आत्मविकासाच्या वाहिनी बघू शकता. हॉलीवूड सिनेमे जास्त बघण्यापेक्षा ऐकायचा प्रयत्न करा कारण त्यामध्ये तत्त्वज्ञान असते, अंध श्रध्धा नसते, जास्तीत जास्त नैसर्गिक नियम वापरले जातात. त्यांचे सुपर हिरो हे उंच उडी मारताना पण भौतिक शास्त्राचा वापर करतात आणि सगळ्यात महत्वाचे तुम्हाला त्या सिनेमा मधील काही प्रयोगांचा उल्लेख आत्मविकासाच्या पुस्तकात सापडेल. काही सिनेमांचे प्रोस्ताहनपर भागाची मालिका येत्या काळात सुरु करेन.


संभाषण - ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांशी संवाद करताना नेहमी सामान्य विचारांपासून सुरवात कराल, त्या मध्ये त्यांच्या विषयी, कामाविषयी, कुटुंबाबद्दल विचारपूस कराल, जास्त खाजगी विचारपूस नको. आणि कुठेही भावनिक होऊ नका. वादाचे विषय जसे राजकारण आणि धर्म टाळत जा. हसतमुखाने केलेली साधी विचारपूस सुद्धा अनोळखी माणसाला जवळ आणते. आणि जसे आपण माणसे जोडत जातो तसेच आपला उद्योग धंदा भरभराटीला येतो. जिथे मोठ्या कंपन्या जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करतात तिथे तुम्हाला एक रुपया खर्च करायची गरज नाही. एक म्हण कायमची लक्ष्यात ठेवा "बोललेला शब्द परत मागे घेत येत नाही", माणसाच्या किंवा जगाच्या इतिहासाकडे बघितल्यावर तुम्हाला अनुभव येईल. 


आताच्या इंटरनेटच्या युगात ते लगेच पसरले जाते. जे सत्य आहे त्याला पूर्ण जगातून पाठिंबा मिळतो, अगोदर इतकी जलद संभाषणाची साधने नव्हती त्यमुळे जे असत्य आहे तेच जास्ती करून पसरले जायचे व खरे बोलणारी लोक एकटी पडायची, इंटरनेटमुळे सत्याला जगातून पाठींबा मिळतो आणि असत्याला घरातून पण पाठींबा मिळत नाही. आणि लोकांचा माणुसकी वरचा विश्वास वाढत चालला आहे.


बदल हा मानवी गुणधर्म आहे, माणसाचा स्वभाव जन्मजात असतो आणि जर त्याला आहे तसे ठेवून बदल करतो गेलो तर परिणाम सकारात्मक होतात. जशी निसर्गात विविधता आहे तशीच प्रत्येक माणसाच्या स्वभावात पण आहे त्यामुळेच जग सुंदर दिसते. नैसर्गिक गरजा जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाच्या सारख्या असतात, त्या कुणीही बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आहे तसे परिपूर्ण आहात. मी आपल्या प्रतिसादाची वाट बघतो. धन्यवाद.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकहार माणू नका,
त्रास सहन करा,
आयुष्यभर विजेत्यासारखे रहा.

मुहोम्मद अली

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकयशस्वी लोक आणि अयशस्वी लोक

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकयश आणि लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकपैशांचा प्रवाह

कर्मचारी
तुमच्याकडे काम आहे.

व्यवसाय मालक
तुमच्याकडे स्वतःची प्रणाली आहे
आणि लोक तुमच्याकडे काम करतात.

स्वयं रोजगार
तुम्ही काम मिळवता.

गुंतवणूकदार
पैसा तुमच्यासाठी काम करतो.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकमोठा विचार करा, वेगाने विचार करा, पुढचा विचार करा.
कल्पनांवर कुणा एकाची मक्तेदारी नाही आहे.

धीरूभाई अंबानी

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकमाफ करा आमच्याकडे 
नकारात्मक वायफळ साठी 
जागा नाही आहे.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकनियम क्रमांक १ - पैसे गमाउ नका
नियम क्रमांक २ - पहिला नियम विसरू नका

वारन बफेट

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

भारत, उद्योगाच्या संधी आणि जागतिक मंदी


 जागतिक मंदी बोलली कि सगळ्यांना धडकी भरते कारण मागच्या मंदी मध्ये भारताला पण फटका पडला होता ५० हजार पगार पर्यंत कारकुनांचे ठीक होते पण १ लाख च्या पुढे पगार घेणार्यांना नोकरी व पगाराला मुकावे लागले. ते त्यांच्या एका उच्च पद व जीवनशैली वरून नोकरी व पगार गमवून जमिनीवर यायला लागले. तसेच शेअर बाझार कोसळल्यावर झाले होते. लोकांनी आपले कुटुंब संपवले होते.

                भौतिक शास्त्राचा एक नियम आहे कि जो जितक्या वेगाने वरती जाईल तो इतरांपेक्षा कमी वेळेत जास्त उंची गाठेल पण तो तितक्या वेगाने आती उंचावरून खाली येईल. निसर्ग नियम आणि भौतिक शास्त्राचे नियम जगामध्ये सगळ्यांना सारखे आहे. 

                भारता मध्ये लोकांचे बघण्याचे दृष्टीकोन पारंपारिक आणि जुने आहेत पण आताच्या माहिती तंत्रज्ञाच्या युगात पारंपारिक विचार लुप्त व्हायला लागले, जागतिक नागरिकत्व व समानतेचे विचार वाढू लागले. कधी काळी अमेरिका आणि युरोपीय देश यांची उद्योग धंद्यावर मक्तेदारी होती ती आता चीन व भारतासारख्या देशांकडे वळू लागली. अमेरिका व युरोपियन देशांमध्ये लोकसंख्या कमी आहे त्या मुळे तिथे एक जरी उद्योग सुरु झाला कि तो जागतिक दर्जाचा बनतो. वेस्ट मध्ये बरेचशे आंतरराष्ट्रीय उद्योग असे आहेत कि ज्यांचा कच्चा माल भारत चीन व इतर आशियाई देशांमधून कमी किमतीला जातो व वेस्ट मध्ये तयार होवून परत आशिया खंडात महाग विकला जातो.

                भारत व चीन मध्ये लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे अती श्रीमंत, श्रीमंत, उच्च मध्यम वर्गीय, मध्यम वर्गीय, कनिष्ठ मध्यम वर्गीय आणि गरीब (ह्या मध्ये पण मध्यम वर्ग सारखे तीन प्रकार आहेत) आणि प्रत्येक वर्ग आप आपल्या लोकसंख्येप्रमाणे जास्त आहे. इथे तुमची चार आण्याची वस्तू पण विकली जावू शकते ते आगदी ४ करोड ची पण. पाश्चिमात्य देशातील उद्योगाप्रमाणे भारत आणि चीन ला दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर व ग्राहकावर अवलंबून नाही राहावे लागत.

वरील माहिती संशिप्त स्वरुपात तुम्हाला समजण्यासाठी दिली आहे. आता पुढे जावूया. लोक आता जागतिक मंदीच्या भीती मधून बाहेर आले असतील, पण जे काळानुसार न बदलणारे असतात त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे कोणी काहीच करू शकत नाही जसे एका उद्योगाचे असते तसेच घराचे पण असते "जसा उद्योगाचा मालक तसा उद्योग, जसा घराचा मालक तसे घर" मालकाची एक चुकी उद्योग कायम बंद करू शकते आणि सर्व कामगारांना रस्त्यावर आणू शकते तसेच घराच्या मालकाची चुकी पूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणू शकते.

  भारतामध्ये मागणी खूप आहे, मागणीच्या मानाने पुरवठा आणि गुणवत्ता कमी आहे कमी आहे. खूप तज्ञ लोक अपुऱ्या मार्गदर्शनामुळे  नोकरी करणे पसंद करतात व धाडस दाखवायचे प्रयत्न करत नाहीत. पाश्चीमात्य देशांमध्ये तज्ञ लोकांना प्रोस्ताहन दिले जाते व शिक्षण व्यवस्था भांडवलदार निर्माण करण्यासारखी आहे.

एक गोष्ट लक्ष्यात ठेवा कि नोकरी लगेच शिक्षण संपल्यावर भेटत नाही आणि उद्योग लगेच चालू केल्या केल्या भरभराटीला येत नाही. खरे शिक्षण शाळा, विद्यापीठ आणि घराच्या बाहेर असते ना कि शाळेत किंवा घरी. अनुभवला दुसरा पर्याय नाही. असो, निसर्गाचा नियम लक्ष्यात ठेवा "जर तुम्ही बी पेरली तर झाड उगवते" बी कुठेहि पेरा ते झाड बनतेच. ना कष्ट, ना सकारत्मक नकारात्मक नियम, फक्त निसर्ग नियम, तुम्हाला बिल्डिंग च्या भीतीवर पण झाड दिसेल व ते वाढायचे काम करत असेल.
त्याच प्रमाणे तुमच्या मनात येणाऱ्या नवीन कल्पनांचे आहेत. कल्पना एक बी आहे असे समजा आवश्यक त्या गोष्टी हवा, पाणी, सूर्य प्रकाश म्हणजे सकारत्मक विचार, कृती, इच्छाशक्ती ह्या गोष्टी भेटल्या म्हणजे ते कोंब, रोपटे व झाडा पर्यंत चा प्रवास करेन, पण त्या उलटे जर तुम्ही केले तर ते बी निसर्ग नियमानुसार खराब होत जाते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरी पेक्षा उद्योग करणे खूप सोपे आहे.

  भारतात मोठ्या उद्योगांपेक्षा उलाढाल करण्यात सूक्ष्म उद्योगापासून ते मध्यम उद्योगांचे आर्थिक उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात चालते आणि इथे तुम्ही माल बनवणे म्हणजे उत्पादना पासून ते व्यावसायिक सेवा पुरवण्या पर्यंत कशाचा हि उद्योग चालू करू शकता व अंतर्गत बाजारपेठ मोठ्या प्रमाणात असल्या मुळे सहसा जागतिक मंदीचा फटका सगळ्या उद्योगांना नाही बसत व मंदी मध्ये हि तुमचा उद्योग नेहमी प्रमाणे चालू शकतो.

तुम्हाला गरज आहे ती बाजार पेठ फिरण्याची, समजून घेण्याची, संधी ओळखायची आणि जर बाजारपेठ मध्ये संशोधन करताना संधी आली तर ती पकडण्याची. मागणी व पुरवठा ह्या मधले अंतर बघा आणि ते भरून काढा, त्यामध्ये पण वेळेचे बंधन असते, काही कायम स्वरूपी असतात तर काही दीर्घ ते लघु कालावधी साठी असतात व काही प्रत्येक वेळेस ठराविक काळातच उपलब्ध असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावनांवर आपला पूर्ण ताबा असला पाहिजे. फायद्यामध्ये आनंद व तोट्या मध्ये दुख ह्या भावना यायला नको, हो पण तरण्याची भावना असलीच पाहिजे.

  हाच नियम सेवा पुरवणाऱ्या व्यवसायांवर पण लागू होतो. विशेषज्ञ ची कमरता आहे आणि जे विशेषज्ञ आहेत ते धाडस नाही दाखवत व पारंपारिक नोकरी पत्करतात. माल किंवा वस्तू बनवणे हा एक उद्योगाचा एक भाग झाला आणि त्याची टक्केवारी उद्योगामध्ये फक्त २० टक्के इतकी आहे बाकी ८० टक्के उद्योग हा विक्री, व्यवस्थापन, नियोजन, ग्राहक संपर्क व इतर कार्यालयीन गोष्टी वर अवलंबून असतो. तुम्ही कितीही गुणवत्ता पूर्वक माल किंवा वस्तू बनवा पण जर ती तुम्हाला ग्राहकांना पटवून देत नाही आली तर ती विकली जाणार नाही, एक म्हण आहे "न बोलनऱ्याकडून सोने पण विकले जात नाही, पण बोलनऱ्याकडून पितळ पण सोन्याच्या भावात विकले जाते"

  तसेच व्यवस्थापनाचे आहे. व्यवस्थापन हा संपूर्ण पणे मानसिक आहे. त्यासाठी तज्ञ लोकांना घेतलेले उत्तम असते. तज्ञ मध्ये २ प्रकार असतात एक पदवीधर आणि दुसरा अनुभवी. मी तुम्हाला अनुभवी तज्ञ घेण्याबद्दल सुचवेल. कारण त्यांनी घेतलेले बरे वाईट निर्णय व त्यातून मार्ग काढत जाने ह्यामुळे त्यांची निर्णय क्षमता वाढलेली असते.

भारताचा उद्योग व व्यवसायांची उलाढाल इतक्या कोटी रुपयांची आहे कि तुम्ही त्यामधून वर्षाला १००० कोटी जरी कमविले तरी समुद्रातून एक थेंब काढण्यासारखे आहे आणि ह्या मध्ये मी अजून संपूर्ण जगाची वार्षिक आर्थिक उलाढाल बद्दल उल्लेख नाही केला मग तर १०,००० कोटी पण कमी आहेत. आता हे तुम्हाला ठरवायचे आहे कि तुम्हाला ह्यामधून किती कमवायचे आहे ते. हे तर गुंतवलेल्या पैश्यांची आकडेवारी आहे, जेव्हा तुम्ही उद्योग, व्यवसाय सुरु कराल तेव्हा तुम्ही गुंतलेले पैसे आणि आणि गुंतवणुकीसाठी तयार असलेले पैसे बघून थक्क व्हाल.

चला मग तयार व्हा उद्योगपती बनायला. कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त २० वर्षात निवृत्त व्हा व स्वतःचे आयुष्य जगा. समाजसेवा पण करू शकता, पण माझ्या मते उद्योगपती अगोदर पासूनच समाजसेवक असतो कारण त्यःच्या हाताखाली काम करणाऱ्यांचे घर दिलेल्या पगारातून चालू असते हीच सगळ्यात मोठी समाजसेवा झाली. असो आपापले स्वप्न.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


फेसबुक पेज - https://www.facebook.com/chalaudyojakghadwuyaपैसा हे सहावे इंद्रीयासारखे आहे, ह्याशिवाय तुम्ही तुमच्या पाच इंद्रियाचा पूर्णपणे वापर नाही करू शकत. 

डब्लू. सोमेरसेट मौघम
ब्रिटिश नाटककार

१८७४ - १९६५

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७ऐश आराम 
हि मानसिक स्थिती आहे.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७नकारात्मक लोकांना उपाय नाही पाहिजे.
उपाय म्हणजे काही तरी नकारात्मक शोधायचे काम करतात.

टोम झीगलर

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७श्रीमंत माणसे पुढच्या चार पिढ्यांसाठी योजना करतात.

गरीब माणसे शनिवार रात्रीची योजना करतात.

ग्लोरीया स्टाईनम

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७शूर बना 

धोका पत्कारा 

अनुभवला दुसरा पर्याय नाही आहे

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७जेव्हा तुमच्या हातात पैसा असतो, तेव्हा फक्त तुम्ही आपण कोण आहोत हे विसरून जाता.

पण 

जेव्हा तुमच्या हातात एकही पैसा नसतो तेव्हा, अख्ख जग तुम्ही कोण आहात हे विसरून जातो.

हेच आयुष्य आहे.

बिल गेट्स


अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७