एक काळ असा होता जिथे योग्य उद्योग व्यवसाय सुरु व्हायचा आता फक्त विदेशात काहीतरी दाखवणार आणि त्याची नक्कल करत आपल्या इथे उद्योग व्यवसाय उभा राहणार व सपशेल पडणार. मेंदू तुमचा तर अक्कल दुसऱ्याची का? भारतीय बाजारपेठेचा अभ्यास करा, तुमच्या स्वतःचे आकलन करा व करा उद्योग व्यवसाय सुरु. नक्कल करून अपयशी व्हाल तर स्वतःवर विश्वास ठेवून यशस्वी व्हाल. तुमच्यामुळे चार लोकांच्या घरची चूल पेटेल.


अश्विनीकुमार

 


 बाजारपेठ कौशल्यावर चालते ना कि पैश्यांवर, पैसा हा तर बाजारपेठेचा वातावरणासारखा एक भाग झाला आणि ज्याच्याकडे कौशल्य असते तो त्या वातावरणात राहू शकतो.


अश्विनीकुमार


 उद्योग व्यवसायात कोणी तुम्हाला पास नाही करणार, इथे तुम्हाला सिध्द करून पास करून घ्यावे लागते. घोकमपट्टी किंवा पाठांतर आणीबाणीच्या काळात कामी येत नाही तर तुमचे कौशल्य कामी येते व तेच तुम्हाला पास करून देते.


अश्विनीकुमार