विवाहबाह्य संबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विवाहबाह्य संबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

विवाहबाह्य संबंध सुरवात, प्रकार आणि तीव्रता



विवाहबाह्य संबंध ह्याकडे आपण एकाच नजरेने बघू शकत नाही. ह्यामध्ये विविधता असते, त्यानुसार आपल्याला त्याच्याकडे बघितले पाहिजे जेणेकरून भविष्यात होणारे कौटुंबिक वादविवाद आणि गुन्हे हे थांबवता येतील.

अ) विवाहाअगोदर असलेले संबंध :
१) नातेसंबंधातील चुलत, मावस, दूरचे भाऊ बहिण ह्यांच्यामध्ये असलेले संबंध किंवा समवयानुसार नात्यातील जुळलेले संबंध
२) ओळखीच्या पैकी असलेले संबंध, विविध कारणाने बघण्यात असलेली व्यक्ती, परिसरात राहणारी, किंवा नातेवाईक सोडून ओळखीचे असलेले.
३) अनोळखी नात्यातून तयार झालेले संबंध
४) ऑनलाईन तयार झालेले संबंध

हे संबंध विविध कारणांनी जुळतात. काही फक्त एकच कारण नसते. प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असते. एकदा का मुल कारण भेटले कि आपण योग्य उपाय किंवा निर्णय घेवू शकतो. इथे समजूतदारपणा लागतो.

विविध कारणांनी जेव्हा प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह होतो तेव्हा ह्या संबंधांचे काय होते?

१) संबंध कायमस्वरूपी विसरले जातात.
२) संबंध लक्ष्यात असतात पण भावना जुळलेल्या नसतात.
३) संबंध लक्ष्यात देखील असतात व भावना देखील जुळलेल्या असतात.
४) संबंध मैत्रीचे ठेवतात.
५) संबंध थोडे पुढचे ठेवलेले असतात.
६) जुने जसे चालू होते तसेच संबंध सुरु ठेवले जातात.
७) लग्नाचा जोडीदार नाकारून पहिल्या जोडीदाराला पसंदी दिली जाते.
८) दोन्ही बाजूने किंवा एका बाजूने हिंसा केली जाते.

लग्नानंतर जुळलेले संबंध

लग्नानंतर विविध कारणांनी संबंध जुळले जातात त्याची कारणे हि वेगळी असतात.

१) भावनिक करणे.
२) शारीरिक कारणे
३) कौटुंबिक कारणे.
४) लैंगिक कारणे.
५) आर्थिक कारणे
६) मुलभूत कारणे
७) समलिंगी जोडीदार.

जो नवीन कायदा बनवला आहे ज्यामध्ये त्वरित कारवाई चे आदेश दिले आहे त्याचा वापर करून कायदेशीर खंडणी वसूल केली जाते.

अनेकदा जोडीदाराकडून विवाहबाह्य संबंध ठेवायला परवानगी दिली जाते त्याची कारणे वेगळी आहे.

विवाहबाह्य संबंधाला वयाची अट नाही. तरून ते म्हातारपणाचे विवाहबाह्य संबंध असतात त्यामुळे तुम्ही वयाकडे बघून काहीही बोलू शकत नाहीत.

काही विवाहबाह्य संबंध हे पकडले जातात तर काही पकडले जात नाहीत. काही जोडीदार कानाडोळा करतात तर काही तीव्र आक्षेप घेतात. इथे देखील त्यांचे स्वतः चे काही निर्णय जे परिस्थिती नुसार घेतलेले असतात.

अनेकदा जोडीदार मुलांच्या भविष्याकडे बघून दुर्लक्ष्य करतात. समाजाचा दबाव हा देखील एक भाग आहे जिथे अब्रू जावू नये म्हणून घरातील गोष्ट हि घरातच ठेवली जाते.

जर तुम्हाला समस्याचे समाधान पाहिजे तर तुम्ही सर्वांना एकच नियम लावू शकत नाही. घटस्फोट घेणे, दुसरे घर घेवून राहणे, आर्थिक जबाबदारी, भावनिक आणि लैंगिक गरजा ह्या देखील बघणे महत्वाचे आहे.

स्त्री असू दे किंवा पुरुष ह्या दोघांना देखील दोष दिला जातो. घटस्फोटीत स्त्रिया ह्यांच्याकडे संधी म्हणून बघितली जाते आणि पुरुषांचे दोष काढले जातात त्यामुळे ह्या दोघांचे जगणे हे मुश्कील होवून जाते.

चीड एकाच गोष्टीची येते जेव्हा जोडीदाराची हत्या, मुलांची हत्या केली जाते तेव्हा, हत्या करण्यापेक्षा वेगळे झालेले बरे. हत्या म्हणजे हि लोक मनुष्य प्राण्यात राहण्याच्या लायकीची नाही आहे.

समस्या आहे तिथे समाधान पण आहे. जे योग्य समाधान आहे तेच निवडा. भावनांना तुम्ही जखडून ठेवू शकत नाही. भावना ह्या एका क्षणात देखील बदलतात. हे मी अनुभवले देखील आहे आणि बघितले देखील आहे.

योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन तुम्हाला ह्या सर्व परिस्थिती मधून बाहेर काढू शकते. कृपया घरगुती उपाय करून परिस्थिती अजून चिघळवू नका नाहीतर नंतर परिणाम अजून वाईट होत जातील.

#अश्विनीकुमार

#बालक #पालक #कुटुंब आणि #नातेसंबंध

#वैवाहिकजीवन #मुलांचेसंगोपन #गर्भसंस्कार #शिक्षण #आर्थिकआयुष्य #लैंगिकआयुष्य #विवाहबाह्यसंबंध #पती #पत्नी #तणाव #नैराश्य #भांडणे #कौटुंबिकसमस्या #पुरुषअधिकार #मानसिकशोषण #शारीरिकशोषण #लैंगिकशोषण

appointment 8080218797 ह्या व्हास्टएप क्रमांकावर बुक करू शकता.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : Balak Palak Children Parents

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

विवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची कारणे



जेव्हा जोडपे त्यांच्या समस्या घेवून येतात तेव्हा मी अगोदर त्यांना वेगवेगळे अटेंड करतो ज्यामुळे त्यांना व्यक्त होता येतात मग एकत्र. जेव्हा ते एकटे असतात तेव्हा ते मनमोकळे पणाने बोलतात व्यक्त होतात आपल्या भावना व्यक्त करतात.

जेव्हा जोडीदार एकता असताना त्यांच्या आयुष्याबद्दल सांगतो तेव्हा असे आढळून आले कि आजच्या धकाधकीच्या जीवनात, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आणि ऑफिस किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर वेळ घालवल्यामुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात. आता हे प्रमाण वाढत चालले आहे.  जोडीदाराबद्दल च्या भावना जर कमी होत असतील किंवा नसतील तर आपण समजू शकतो पण त्यामध्ये लहान मुलांचा काहीही दोष नाही.

असे अनेक वैवाहिक जोडीदार बघितले जे कामात आणि करिअर मध्ये इतके व्यस्त असतात कि ते घरीच मुल झोपल्यानंतर येतात. काही तर कामानिमित्त भ्रमंतीवर असतात. त्यांना सेक्स केला कि नाही हे देखील माहिती नसते आणि मुल कुणाची आहे हे देखील. त्यांचे काम असते पैसा कमावणे आणि घरी खर्चासाठी मुलांना क्रेडीट कार्ड देणे.

अगोदर हे प्रमाण जे उच्च पदावर होते, जे मालक होते त्यामध्ये दिसून येत होते पण जस जसे कामगार कायदे शिथिल झाले, कामाचे तास वाढले, नोकरीची शास्वती राहिली नाही आणि कार्यालयापासून लांब घर असल्यामुळे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण हे मध्यम वर्ग आणि गरीब लोकांमध्ये देखील वाढले. आता कुणाला फुरसतीचा वेळ उरला नाही आणि नाही इतरांच्या आयुष्यात झाकू शकतात. एकाच इमारतीमध्ये एक सकाळी कामाला जातो तर दुसरा दुपारी आणि तिसरा संध्याकाळी. सुट्टी देखील रविवारची नाही तर कधीही दिली जाते त्यामुळे शेजार संबंध जुळूनच येत नाही.

स्थानिकांचे प्रमाण कमी झाले आणि परप्रांतीयांचे प्रमाण वाढले जे इथे पैसा कमावण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी आलेले असतात. त्यांना ओळखणारे कोणी नसते त्यामुळे ते विवाह झाला असला तरी विवाहबाह्य संबंध ठेवतात. त्यांना माहिती असते कि मुंबई मध्ये ते पैसे कमवायला आलेले असतात व इथे काहीही झाले तरी ते त्यांच्या मूळ राज्यात परत जावू शकतात. एक स्त्री किंवा पुरुष किती वेळा नाही बोलेल? शेवटी काही त्यांच्या जाळ्यात फसतातच.

विवाहबाह्य संबंधामध्ये आता वयाची देखील अट राहिली नाही त्यामुळे नक्की काय चालले आहे ते देखील समजून येत नाही. कॉलेज च्या मुलामुलींचे देखील विवाहित लोकांसोबत संबंध आहेत. वय नातेसंबंध हे सर्व बाजूला सारले गेले. जोडीदार भेटत नाही म्हणून नात्यांमध्ये लग्न झालेली काही उदाहरणे आढळून आली.

नात्यांमध्ये देखील विवाहबाह्य संबंध आढळून आले. हे सहसा समजून येत नाही आणि उघडकीस देखील येत नाही. कारण सर्वांना ते एकमेकांचे नातेवाईक आहेत असाच भास होतो. सम वय किंवा थोडेफार वयामधील अंतर असते, भाऊ बहिण आहेत असे सांगतात किंवा इतर जे काही नाते असेल ते पण त्यांचे प्रेमप्रकरण सुरु असते. तेव्हा जोडीदाराला जास्तच मानसिक धक्का बसतो जेव्हा त्याला समजते कि आपल्या वैवाहिक जोडीदाराचे त्याच्याच ज्याला किंवा जिला ते भाऊ बहिण मानत असतात त्यांच्यासोबत संबंध आहेत.

पुरुष हेट्रोसेक्शुल जरी असाल तरी तो सहसा समलिंगी संबंध ठेवत नाही किंवा त्यांचे तसे करण्याचे प्रमाण कमी असते पण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात भले ते हेट्रोसेक्शुल असले तरी समलिंगी आकर्षण दिसून येते. अनेकदा स्त्रिया ह्या जेव्हा मैत्रिणीकडे वेळ घालवतात तेव्हा काही स्त्रिया ह्या समलिंगी संबंध ठेवतात किंवा आकर्षित होतात. नवरा जेव्हा पकडतो तेव्हा त्याला वाटते कि त्याची बायको हि समलिंगी आहे पण असे नसते, नैसर्गिक आहे, कारण स्पष्ट नाही. अनेकदा अश्या प्रकारचे विवाहबाह्य संबंध देखील निर्माण होतात.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. विवाहबाह्य संबंधांची कारणे हि बदलत जातात. ह्यामध्ये मुख्य कारणे शारीरिक आणि मानसिक गरज पूर्ण न होणे हे आहे. सोबत पैसा देखील महत्वाचा आहे. आताच्या काळात स्त्रियांकडे पैसे देखील आहे व ते त्यांच्या पायवर देखील उभ्या आहेत त्यामुळे अनेकदा त्या स्वतः निर्णय देखील घेतात. धाडस देखील दाखवतात. अनेकदा स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त धाडसी दिसून आल्या आहेत आणि त्या नैसर्गिक आहेत देखील कारण मुलांना सांभाळायचे काम देखील त्यांचेच असते म्हणून त्यांना निसर्गाने धाडसी बनवले आहे.

माझे म्हणणे इतकेच आहे कि कुणाचा जीव ह्या अश्या संबंधामुळे जाता कामा नये आणि मुलांची फरफट होता कामा नये, बाकी निर्णय तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीने घेतलेला बरा. कृपया अश्या नाजूक संबंधांच्या वेळेस तज्ञांची मदत घेत जा, समुपदेशन करत जा ह्यामुळे आपण टोकाचे पाउल उचलत नाही व योग्य निर्णय घेतला जातो.

लोक अनेक समस्यांमधून जात असतात आणि त्यांना वाटते कि ते एकटेच आहे पण असे काही नसते, तुमच्यासारख्या समस्या ह्या अनेकांना आहेत फक्त तुम्हाला महिती नाही कारण चार भिंतीच्या गोष्टी कधीही बाहेर येत नाही किंवा आणत नाही पण मनातल्या मनात झुरत जातात. असे झुरण्यापेक्षा त्या भावनांचा निरचा केलेला बरा. इथे समुपदेशन आणि आकर्षणाचा सिद्धांत खूप प्रभावशाली काम करतो, तुम्हाला अश्या समस्यांमधून बाहेर काढतो आणि सोबत संमोहनाचे उपचार घेतले तर अजून प्रभाव पडतो.

अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : Balak Palak Children Parents