अनेक स्त्रियांनी पैसे हे साठवून ठेवले होते हे आता नोटा बंद करण्याच्या निर्णयाने बाहेर आले. बचत हा एक उत्तम पर्याय आहे पण कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीचा अतिरेक हा घातकच असतो.

पाणी साठून राहिले तर गढूळ होत जाते, पाणी वाहते राहिले तर साफ राहते.

पैसा जो आपण मेहनतीने कमावतो, आणि हो स्त्रिया ह्या गृहिणी जरी असल्या तरी त्या घरचे काम करतात ह्यानुसार ते त्यांच्याच मेहनतीचे पैसे आहेत. डोक्यातून काढून टाका कि तुम्ही घर गृहिणी आहात तर तुम्ही काहीच नाही करत ते.

तुम्ही जे घरचे काम करता त्या कामाचे बाहेर किती पगार आहे? नाही बोलले तरी सर्व पकडून कमीत कमी आपण २५,००० पंचवीस हजार पकडू. एका घर सांभाळण्याच्या कामामध्ये विविध प्रकारच्या पदांच्या काम तुम्ही घरी करता.

कमीत कमी हुद्द्याचे कामवाली पासून ते जास्तीत जास्त हुद्द्याचे व्यवस्थापन, अकाऊंट ते गुंतवणूकदार अश्या पदांवर येवून संपते. म्हणजे एक गृहिणी लघु, मध्यम उद्योग व्यवसाय आरामात सांभाळू शकते. त्यासाठी तिला एमबीए करायची गरज नाही, हा गुण तिच्यात आहे.

त्यांना पारंपारिक सांस्कृतिक बंधने अनेक असल्यामुळे त्या व्यक्त होऊ शकत नाही. ह्या बंधनानवर मी भाष्य करणार नाही कारण हा एक मानवी इतिहासामधील गुलामगिरीचा वादाचा आणि मोठा विषय आहे.

तरीही स्त्रिया ह्या नाहीतर त्या कारणाने स्वतःच आनंदी रहायचा प्रयत्न करत असतात, त्यामधील एक प्रकार आहे तो भिसी चा. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या मनाचे करायची परवानगी असते, ह्यामध्ये त्या पैश्यानबद्दल निर्णय हि घेवू शकतात.

पैसे हि अशी वस्तू आहे कि ती सतत वापरात आली पाहिजे. आपण पैसे कमावतो किंवा साठवतो त्याचा पहिला उपयोग हा मानसिक, शारीरिक गरजा आणि आरोग्य ह्यासाठी झाला पाहिजे. दुसरा उपयोग स्वतःसाठी, परिवारासाठी झाला पाहिजे.

ह्याचा महत्वाचा उपयोग हा तुमची मानसिक स्थिती मुक्त करण्यासाठी होतो. स्वतःमध्ये परिवारामध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुमचे व घरचे वातावरण हे वैचारिक आणि भावनिक दृष्ट्या स्थिर झालेले असते ह्यामुळे आपल्याला पैश्याचे व्यवहार, गुंतवणूक करण्यासाठी योग्य मानसिकता भेटलेली असते.

एकदा का तुमचे विचार स्थिर झाले कि तुम्हालाही समजते कि आपल्या आयुष्यामधील आर्थिक बाजू कशी सांभाळायची ते. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडूनही उत्तम प्रतिसाद भेटतो.

जिथे भावनिक दृष्ट्या स्थिरता असते तिथे आकर्षणाचा सिद्धांत काम करायला लागतो. कारण आपण योग्य वेळेस योग्य विचार करत असतो, योग्य वेळेस योग्य ठिकाणी असतो, योग्य वेळेस योग्य लोक भेटतात, योग्य वेळेस योग्य कृती होते. नकारात्मक परिस्थितीही आपल्या काम करते.

आर्थिक बाबींमध्ये, गुंतवणूक येते. ह्यामध्ये जो आर्थिक मार्ग जास्त परतावा देतो त्याला प्राधिकरण देणे गरजेचे आहे, त्यानंतर टप्प्या टप्प्याने येत बाकी मार्गांचा अवलंब करावा. अशी गुंतवणूक करावी कि आपल्याला जर गरज भासलीस तर ती लगेच आपण वापरास काढू शकू.

ह्यामध्ये आपली गरज जशी, ऐषआराम, लग्न, मुल, शिक्षण, उच्च शिक्षण, आरोग्य, निवृत्ती नंतरचे आयुष्य, म्हातारपण असे टप्पे ठरवून गुंतवणूक करण्यास सुरवात करावी. हि गुंतवणूक दर १५ दिवसांनी तपासत जावी.

ह्यामध्येही २ प्रकार येतात, पहिला गुंतवणुकीला सतत काम करायला लावणे आणि दुसरा गुंतवणूक आपोआप तुमच्यासाठी काम करत राहणे. पहिला प्रकार हा संपूर्णपणे तर्कावर आधारित आहे. ह्यामध्ये तुम्हाला सतत तज्ञ लोकांची मदत घ्यावी लागेल.

दुसरा प्रकार हा संपूर्णपणे आकर्षणाच्या सिद्धांतावर अवलंबून आहे. ह्यामध्ये ते जेही शिकत जातात ते कुठल्याही तज्ञापेक्षा जास्त ज्ञान असते. ते ज्ञान हे त्यांच्या मन, मेंदू आणि शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये बसलेले असते. म्हणून ते जेव्हा विचार आणि कृती करतात तेव्हा निकाल ह्या त्यांच्या बाजूने असतो.

ह्यांना कसे केले विचारले असता त्यांचे उत्तर "मला माहित नाही. जसे विचार येतात तसेच शरीर कृती करत जाते आणि निकाल माझ्या बाजूने येतो" असे सांगतात. आपण याला आवड म्हणू शकतो किंवा जन्मजात गुण.

आयुष्य जगणे हे सोपे असते पण मनुष्य अतिविचारांमुळे, योग्य वेळी न भेटलेल्या संगतीमुळे तो ते विस्कळीत करून टाकतो. तुम्ही शांत पणे जरी विचार केलात तर तुम्हाला मर्ग सापडू शकतो. जर स्वतःहून नसेल जमत तर तज्ञांची मदत घेतलेली बरी.

तज्ञांची मदत ह्यासाठी बरी पडते कारण तिथे आपल्या भावना जपल्या जातात. भले तो व्यवहार जरी असला तरी आपल्या भावनांचा वापर केला जात नाही व एका शिस्तीत आपल्याला समुपदेशन, मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते.

अनुभवानुसार जवळच्या व्यक्तीकडून जास्त नुकसान झाल्याचे निदर्शनात आले आहे.

धन्यवाद,
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार