शेअर बाजार, उद्योग व्यवसायात चढ उतार होत असतांना तुम्ही तुमचे मन आणि भावना शांत ठेवायला शिकला असाल तर तुमच्या आयुष्यात संघर्ष अस्तित्वात नाही.


अश्विनीकुमार

 

तुम्ही शेअर ट्रेडिंग करा, उद्योग व्यवसाय करा किंवा इतर कुठलाही मार्ग तुम्ही ज्याने पैसा कमावता आहे तो करा पण एक कालावधी देत चला, हजारदा छोटे मोठे उतार चढाव येतील पण दीर्घकाळात तुम्हाला फायदाच मिळेल. धीर धरायला शिका.


काल मी पुण्यातील एका यशस्वी उद्योजकाला भेटलो ज्याची नेटवर्थ ₹३० कोटींपेक्षा कमी नाही आणि लहान इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या वितरणात आहे.


चर्चेदरम्यान, त्याने सांगितले की गेल्या १0 वर्षांत त्याने तीनदा शेअर बाजारात प्रवेश केला आहे आणि आतापर्यंत सुमारे ₹३ कोटी वाया गेले आहेत.


तो पुढे म्हणाले की जर मी हे शेअर्स फक्त पोर्टफ़ोलिओ मध्ये ठेवले जरी असते तर सध्याच्या मूल्यांकनानुसार ते जवळपास ₹१८ कोटी झाले असते.


मला त्याच्याबद्दल वाईट वाटले. शेअर बाजारातून प्रत्येकजण यशस्वी होऊ शकत नाही, संपत्ती निर्माण करू शकत नाही, श्रीमंत बनू शकत नाही.


तुम्ही हुशार उद्योजक, व्यवसायिक असू शकता पण तरीही तुम्ही वाईट गुंतवणूकदार होऊ शकता. आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे काम नाही.


भीती आणि लोभाची भावना उफाळून येणे सामान्य आहे पण ह्या भावनांद्वारे कृती करण्यापासून स्वतःला रोखणे हे सोपे काम नाही आणि हाच फरक एक यशस्वी गुंतवणूकदार आणि अयशस्वी गुंतवणूकदार मधला आहे.


हे तितके अवघड नाही आहे. सर्वात कठीण कार्य म्हणजे प्रथम मनात विचार करणे आणि मनात सोडवणे  की मला मध्येच शेअर्स विक्री करण्याची गरज नाही.


जास्तीत जास्त लोकांना क्षणात नफा हवा असतो म्हणून ते शेअर्स विकत घेतात पण काही शेअर्स मुळातच फंडामेंटली मजबूत असतात तरीही ते पर्वा करत नाही नंतर काही वर्षांनी त्यांना पश्चाताप होतो.


झाड लावल्यावर देखील ४, ५ वर्षे जातात व त्यानंतर ते फळ देत, ह्याचा अर्थ असा नाही कि आपण सतत जमीन खोदून आपण बी वाढत आहे कि नाही ते तपासात बसणार आहोत. अश्या कृतीमुले सुपीक जमिनीत देखील झाड वाढणार नाही.


तुम्ही शेअर ट्रेडिंग करा, उद्योग व्यवसाय करा किंवा इतर कुठलाही मार्ग तुम्ही ज्याने पैसा कमावता आहे तो करा पण एक कालावधी देत चला, हजारदा छोटे मोठे उतार चढाव येतील पण दीर्घकाळात तुम्हाला फायदाच मिळेल. धीर धरायला शिका.


धन्यवाद

अश्विनीकुमार