कौटुंबिक हिंसाचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कौटुंबिक हिंसाचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नकारात्मक आई वडील आणि नकारात्मक वातावरणात वाढणाऱ्या मुलांना कश्या प्रकारे त्रास सहन करावा लागतो?



आपल्या भारतात आई वडिलांना देवाची उपमा दिलेली आहे आहे देवाचा दर्जा देखील पण लोक हे विसरतात कि ते देखील मनुष्यच आहे.

जी मुलं लहानपणापासून आई वडिलांचे सकाळ दुपार आणि संध्याकाळ भांडणे बघत असतात त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

काही घरात जोडपे आपल्या लहान मुलांसमोर मारामारी करतात, एकमेकांना शिव्या देतात तेव्हा मुलांवर काय प्रभाव होत असेल?

घरी मुल किंवा मुले असून देखील ते दुर्लक्षित राहतात त्यांच्यावर काय प्रभाव होत असेल?

मानसिक आणि शारीरिक छळ तर सामान्य आहे पण काही घरात लैंगिक छळ देखील केला जातो तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

स्वतःच्या मुलांना टाकून बोलले जाते आणि नातेवाइकांच्या, शेजाऱ्यांच्या मुलांना डोक्यावर घेतले जात असेल तर त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

काही घरात तर असे आढळून आले कि आई वडील दोन्ही किंवा दोन्हीपैकी एकाला मुलं नको असते तेव्हा अनेकदा त्यांना बोलून दाखवले जाते आणि ते देखील कोवळ्या वयात, अश्या वेळेस मुलांवर किती खोल आघात होत असेल?

काही आई वडील तर न एकूण घेता रागवायला सुरवात करतात. ह्यामुळे न्युनगंड निर्माण होतो, भीती निर्माण होते, तणाव नैराश्यात जातात, नवीन काही करायला घाबरता. अशी मुल त्या घरात कशी वाढली असतील?

जर मानसिक रुग्ण असतील तर त्यांनी आपल्या मुलांना कसे वाढवले असेल?

अति राग, अति काळजी किंवा कुठल्याही भावनांचा अतिरेक हा मानसिक आजारच आहे आणि ह्या सर्व नकारात्मक रुपात आपल्या मुलांवर काढल्या जातात तेव्हा विचार करा कि त्या घरात मुलं कशी वाढत असतील?

मुलांसमोर विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवले जातात, मुलं बाहेर गेल्यावर सभ्यतेचा बुरखा पांघरलेला समाज हा त्यांना चिडवत असतात, टोमणे मारतात, अश्लीश शब्द वापरतात तेव्हा त्या मुलांवर कसा परिणाम होत असेल?

मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळ होत असून देखील त्यांना शेजाऱ्यांच्या घरी, नातेवाइकांकडे किंवा ओळखीच्या व्यक्तीकडे सोडून जातात व आल्यावर मुलांची विचारपूस देखील करत नाही अश्या मुलांची मानसिकता कशी झाली असेल?

लहान किंवा मोठ्या भावंडांमध्ये घरी राजकारण चालत असेल आणि ज्याची चूक नसेल तरीही त्यालाच शिक्षा दिली जात असेल तर त्याच्या मानसिकतेवर किती मोठा आघात होत असेल?

घरचे सोडून जात, धर्म, इतिहास आणि राजकारण करत बसत मुलांकडे दुर्लक्ष्य करतात आणि सर्व दोष इतर जात, धर्म आणि राजकीय पार्टीला देत बसतात. त्यांना इतिहास माहिती असतो पण मुलांना काय पाहिजे हे माहिती नसते.

दुसऱ्या जातीधर्माचे कधी घरी आले नाही आणि वाईट केले नाही, स्वतःच्या चुकीच्या निर्णयांचे खापर त्यांच्यावर फोडले जाते आणि घरी मुलांना देखील लक्ष्य केले जाते मग त्या मुलांना कसे वाटत असेल?

मुलांना जन्म द्यायचा कि नाही हे सर्वस्वी आई वडिलांवर अवलंबून असते. कारण ते मोठे असतात अनुभव आलेला असतो. नंतर जन्माला आलेले बाळ हे सर्वस्वी आई वडील व कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून असते.

स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे अनेक प्रकार आहेत आणि काही परिस्थिती नुसार लवकर देखील पायावर उभे राहण्याचा पर्यंत करतात म्हणून तुम्हाला अनेकदा गरीब लहान मुले काम करताना दिसून येतात. पण मध्यम वर्गात शिक्षण पूर्ण होवून पायावर उभे राहता येते. तोपर्यंत मुलं हि आई वडिलांवर अवलंबून असतात.

पायावर उभे राहण्यासाठी फक्त पैसा आणि नोकरी नाही तर मानसिकता देखील तशी घडवावी लागते आणि हे सर्व संस्काररूपाने आपल्याला मिळते. त्यामुळे आपण मुलांना दोष देवू शकत नाही.

साधे उदाहरण ज्या घरात सर्वकाही उत्तम चालू आहे अश्यांचे घ्या. इंटरनेट च्या काळात आता घरगुती हिंसाचार हे लपून राहणार नाही. खूप कमी मुलं हि सुख समाधानाने आयुष्य जगतात आणि बाकी विविध प्रकारचे मानसिक आजार जसे तणाव, नैराश्य, चिंता, भीती आणि इतर नकारात्मक भावना घेवून आयुष्य जगतात व तशी परिस्थिती निर्माण करतात.

आयुष्य म्हणजे मस्करी नाही आणि मुलांना जन्माला घालणे देखील मस्करी नाही. मुलं जन्माला घालण्यासाठी फक्त सेक्स करावा आणि आणि कुठलाही लैंगिक दोष नसावा लागतो पण नंतर दिले जाणारे संस्कार ह्याबद्दल काय? मुलं आई वडिलांचे बघून शिकत असतात व कायमस्वरूपी अंतर्मनात रुजवत असतात.

अनुभव अमर्यादित आहे. ते सर्व लेखांच्या स्वरुपात मांडू शकत नाही. तुमचे जर बालपण हे नकारात्मक वातावरणात गेले असेल तर तुम्हाला उपचाराची सक्त गरज आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे भविष्य हे अंधकारमय होण्यापासून वाचवू शकता व आयुष्य पुनर्निर्मित करू शकता.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

घरगुती निर्माण होणारे ताण तणाव व त्यामुळे होणारे गंभीर गुन्हे - भाग १



पतीने दारूच्या नशेत पत्नीचा खून केला आणि कारण होते कि पत्नी मुलाची शाळेची फी भरण्यासाठी पती कडे पैसे मागत होती.

हे कारण शुल्लक वाटत आहे पण ह्यामागे स्वभाव आणि सवय देखील लपलेली आहे.

पती रिक्षाचालक आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. लग्नाला ११ वर्षे होवून गेली. पती सर्व पैसे दारूत घालवायचा. घरखर्चाला पैसे देत नव्हता. पैश्यांवरून इतकी वर्षे भांडणे होत होती.

खुनाच्या अगोदर जेव्हा पती दारू पिऊन घरी आला तेव्हा पत्नी ने मुलाच्या शाळेच्या फी साठी पैसे मागितले व ह्यावरून परत भांडण सुरु झाले. पती ला राग अनावर झाला व त्याने पत्नी चा गळा आवळून खून केला.

पतीला काही पश्चाताप नाही झाला, उलट त्याने हत्येला आत्महत्येत बदलण्याचा प्रयत्न केला, मृतदेह हा छताला लटकवून फरार झाला.

शेवटी सत्य हे बाहेर आलेच, शवविच्छेदनात मृत्यूचे खरे कारण समोर आले आणि पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पती पत्नी मध्ये भांडणे होतात व नाही देखील, असा काही नियम अहि कि लग्न झाल्यावर भांडणे हि झालीच पाहिजे, हे प्रेमाचे प्रतिक आहे वगैरे, हा शुद्ध मुर्खपणा आहे.

जर वरील घटनेतील स्त्री ने स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवत वेगळे रहायचा निर्णय घेतला असता तर तिला आयुष्याची ११ वर्षे वाया घालवावी नसती लागली.

पती ना परमेश्वर असतो, ना पत्नी लक्ष्मी आणि ना हि विवाह कायमस्वरूपी बंधन असते. हे सर्व मानसिक बंधने, आणि खोटे विश्वास असतात.

शेवटी पत्नील जीव गमवावाच लागला ना? जिवापेक्षा महत्वाचे काहीही नाही. आणि किती वर्षे भांडण करण्यात घालवायचे? मग जगायचे कधी? ह्यालाच आयुष्य बोलतात का? कोणी समाज तरी आला का जीव वाचवायला? समाजानेच कठोर नियम बनवले आहे ना?

स्त्रियांसाठी कठोर कायदे बनवले आहे पण त्याचा दुरुपयोग जास्त होतो आन ज्यांना गरज आहे अश्या स्त्रियांना न्याय देखील भेटत नाही आणि उशिरा न्याय भेटल्याचा काहीही फायदा नाही.

हे गरीब ते श्रीमंत अश्या सर्व घरात आढळून येते, एड्स सारखे विचार करू नका कि एड्स फक्त विशिष्ट वर्गांच्या लोकांना होतो असे बोलत गरीब, मध्यम वर्ग आणि श्रीमंत एकमेकांकडे बोट दाखवत बसतात.

लग्नानंतर ३ महिने ते ३ वर्ष पुरेसी आहेत निर्णय घ्यायला, आणि मुल होण्याच्या अगोदर जो निर्णय घ्यायचा तो घ्यायचा, कारण एकदा का तुम्ही मुल वाढवण्यात व्यस्त झालात तर अजून काही वर्षे भुरकन उडून जातात व समस्या हि आक्राळ विक्राळ रूप घेते.

दारू तर अनेक लोक पितात पण सर्व काही बायकोला मारत नाही किंवा खून करत नाही, जर व्यक्ती खुनशी स्वभावाची असेल तर तर ती खून करणारच.

११ वर्षे पती चा अत्याचार सहन करण्याची क्षमता होती तर मग वेगळे होवून तीच सहनशक्ती आयुष्य परत सुरु करण्यासाठी का नाही वापरली? उलट तुमच्या आयुष्याची नवीन सुरवात चांगली झाली असती.

स्त्रियांनी मानसिक गुलामीतून बाहेर पडणे गरजेचे आहे. जग तुमच्यासाठी बनलेले आहे, तुम्ही रपत सुरवात करू शकता, अश्या अनेक स्त्रिया आहे ज्यांना नवर्यानी सोडले पण त्यांनी प्रगती केली. चौकटीतून बाहेर पडा.

वैवाहिक जोडीदार फक्त पुरुष नाही तर महिला देखील स्वभावाने वाईट असू शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या परिस्थिती नुसार अदलाबदल करून लेख वाचू शकतात, नाण्याच्या दोन्ही बाजू बघत जा.

ज्या स्त्रिया अश्या किंवा इतर कुठल्याही मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात आहे त्यांच्यासाठी विशेष समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध आहेत, ह्याचा फायदा घेवून स्त्रिया नकारात्मक आयुष्यातून बाहेर पडून आपले नवीन आयुष्य घडवू शकतात.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीने आपल्या १८ वर्षाच्या प्रियकराच्या मदतीने प्रेमाला विरोध करणाऱ्या ४५ वर्षीय वडिलांचा खून केला



नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीने आपल्या १८ वर्षाच्या प्रियकराच्या मदतीने प्रेमाला विरोध करणाऱ्या ४५ वर्षीय वडिलांचा खून केला

आपल्या मुलांवर लक्ष्य ठेवा, फक्त डोळ्यांनी नाही तर त्यांच्या भावनिक दृष्टीवर देखील लक्ष्य ठेवा. ह्या १५ वर्षांच्या मुलीने पहिले वडिलांना झोपेच्या गोळ्या दिल्या, त्यानंतर तिने तिच्या प्रेमिला बोलावले आणि दोघांनी मिळून चाकूचे अनेक वार करून मारून टाकले. ते इथेच नाही थांबले, त्यांना शरीर कुठे नष्ट करायचे ह्यावरून भीती वाटली तर त्यांनी शक्कल लढवली आणि बाथरूम मध्ये त्या मुलीने स्वतःच्या वडिलांचे शरीर जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

वडिलांचे वय काय तर ४५, पेशाने व्यवसायिक, ह्यांचे देखील समजावण्यामध्ये चूक झाली, त्यांनी पहिले समजून घेतले पाहिजे कि त्यांची मुलगी प्रेमात आंधळी तर झाली नाही ना? हे आंधळेपण भावनिक असते पण दुधारी असते, एकतर कमजोर करते किंवा इतके धाडस देते कि कुणाचा जीव घ्यायला देखील कमी करत नाही. खरे म्हणजे अश्या केसेस उघड झाल्या पाहिजे पण बदनामी होईल म्हणून कोणीही आपल्या घरच्या समस्या ह्या उघड करत नाही व तेव्हाच समजते जेव्हा कुठला गुन्हा घडतो.

अजून किती समाजाच्या दबावाखाली रहायचे? मरेपर्यंत? शेवटी गेलाच ना जीव? समाज काय आहे तिथेच अब्जो वर्षे राहील पण तुमचे आयुष्य सरासरी ६० ते १०० वर्षांचे समजा, मग महत्वाचे काय समाज कि तुमचा जीव?

इथे आडनाव जैन आहे, फक्त विशिष्ट समाजातून ती व्यक्ती येते म्हणून काय त्यांना समस्या नसतात काय? जैन असो, पाटील असो, कुलकर्णी असो किंवा कांबळे प्रत्येकाच्या घरात काही ना काही समस्या आहेत प्रत्येक जन कौटुंबिक हिंसाचाराचा शिकार झालेला आहे. ह्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हि जवळच्या पोलीस स्टेशन किंवा कोर्टात केस चालू असताना भेटेल ती देखील पुराव्यासकट.

जात धर्म किंवा प्रांत अश्या तार्किक विचारांच्या समुहात तुम्ही राहत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही पण जेव्हा समविचारी, समकृतीशील, समभावना, सम भावनिक आणि शारीरिक गरजा असलेल्या लोकांसोबत राहिलात तर तुम्ही सुखी, समाधानी श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगू शकाल, प्रत्येक क्षण हा चमत्काराने भरलेला असेल, अश्या नकारात्मक घटनांपासून तुम्ही लांब रहाल किंवा त्यामधून लगेच बाहेर पडाल नाहीतर नाही.

वडिलांचे वय ४५ वरून व्यवसायिक, जर त्यांनी व्यवसायातील हुशारी देखील वापरली असती तरी त्यांना जीव गमावण्याची गरज पडली नसती. १५ आणि १८ वर्षांच्या मुलांच्या हातून मरण्याची वेळ आली नसती.

प्रत्येकाची एक मानसिक मर्यादा असते आणि एकदा का ती पार झाली तर त्या व्यक्ती शरण पत्करतील किंवा वार करतील. नुकतेच वयात आलेल्यांना कसे समजवायचे? त्यांच्या हातात मोबाईल आहे, त्यावर बघणाऱ्या मालिका आणी सिनेमावर वर विश्वास ठेवून ते त्याला वास्तव मानतात, गुन्हे करतात, आणि पोलीस लगेच पकडतात. खूप कमी लोक पोलिसांपासून पळू शकतात. श्रीमंत, सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय असतो ती गोष्ट वेगळी.

समजावून, थोडा वेळ देवून अनेकांना सुधारताना बघितले आहे पण जर तुम्ही विरोध करत असाल तर तुम्हाला देखील विरोधाचा सामनाच करावा लागेल, दररोज टोमणे मारणे, ओरडणे, मारणे ह्यामुळे तुम्हाला अजून वाईट परिस्थिती चा सामना करावा लागेल. आणि इज्जत काय फक्त मुली आणि स्त्रियांनी राखायची नसते तर पुरुषांनी आणि मुलांनी देखील राखायची असते.

मी स्वतः शेवटच्या बाकावर बसणारा मुलगा होतो, काळ सर्वकाही ठीक करते, जास्तीत जास्त लोकांचे चांगले होताना बघितले आहे. वयात मस्ती करण्याची देखील एक मर्यादा असते ती कधीही ओलांडायची नाही आणि कुठलेही वय हे मस्तीचे नसते, निसर्ग नियमानुसार आपले काम आहे जगण्यासाठीची धडपड करणे पैसा कमावणे त्यामुळे अश्या क्षणिक सुखाच्या मागे धावू नका.

हे आकर्षण आणि सेक्स फक्त क्षणिक सुख आहे, भले सेक्स हि मुलभूत नैसर्गिक गरज असली तरी इतर सर्व नैसर्गिक गरजांपैकी हि एक गरज आहे. सरासरी ६ मिनटे सेक्स चा कालावधी आहे, म्हणजे आपण सर्वकाही सांभाळून सेक्स साठी देखील वेळ देवू शकतो त्यामुळे इतके काही खून वैगरे करण्याची गरज नाही. आणि काळानुसार तुमची आवड देखील कमी कमी होत जाते.

सिनेमा वेगळा आणि वास्तव आयुष्य वेगळे, समाजाचे नियम घराबाहेर वेगळे आणि घरात पाळले जाणारे वेगळे, तुम्ही ह्या पृथ्वीवर काही क्षणासाठी आला आहात त्यामुळे आपल्या आयुष्यावर लक्ष्य केंद्रित करा, आपल्या कुटुंबावर लक्ष्य केंद्रित करा, प्रत्येक समस्येला उत्तर आहे, शांत मनाने नाही तर शांत भावनेने विचार करा आणि मार्ग काढा म्हणजे मार्ग निघेलच.

जर तुमच्या घरी देखील समस्या असतील तर आजच संपर्क करा, आपली सेवा हि ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज :

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

Image by Maret Hosemann from Pixabay