धीर धरण्याची शक्ती भाग १


मार्शमेलो (आपण इथे गुलाब जाम हा शब्द वापरूया) प्रयोग स्टेनफोर्ड प्राध्यपक वाल्टर मिशेल यांनी महत्वाच्या मानसिक अभ्यासाची एका मागून एक अशी शृंखला सुरु केली.
ह्या प्रयोगाच्या वेळी ४ ते ५ वर्ष वयाच्या १०० हून अधिक मुलांवर चाचणी घेण्यात आली, ह्या प्रयोगाद्वारे जे आरोग्य, पैसा, काम आणि आयुष्यात विश्वास ठेवण्यासारखे व अतिशय महत्वाचा माणसातील गुण निदर्शनास आला.
आता आपण प्रयोगाबद्दल बोलूया व तो गुण आपण आल्या आयुष्यात कसा वापरू शकतो ते हि बघूया.
गुलाब जाम प्रयोग
प्रत्येक लहन मुलाला एकांत खोलीत नेण्यात आले, त्यांना खुर्चीवर बसवून त्यासमोरील टेबलावर त्यांच्या समोर गुलाब जाम ठेवण्यात आला.
खुर्चीवर बसणाऱ्या प्रत्येक मुलासोबत प्रयोगकर्ता एक करार करत होता.
प्रयोगकर्ता बोलला कि मी आता खोली बाहेर जात आहे. जर मी बाहेर असताना हा गुलाब जाम नाही खाल्ला तर तुम्हाला बक्षीस म्हणून अजून एक गुलाब जाम देण्यात येईल. असो, जर प्रयोगकर्ता येण्याच्या आत त्या लहान मुलाने ठरवले कि तो गुलाब जाम खायचा मग त्या मुलाला अजून एक गुलाब जाम नाही भेटणार.
निर्णय सोपा होता : फक्त एक आता लगेच खायचे किंवा थोडी वाट बघून एक सोडून दोन खायचे.
प्रयोगकर्ता १५ मिनिटांसाठी खोली सोडून जातो.
खालील व्हीडीओ मध्ये बघू शकता कि एकटी वाट बघत असणारी लहान मुल आपले मनोरंजन करत असतात. प्रयोगकर्त्याने दरवाजा बंद करताच काही मुल गुलाब जाम वर तुटून पडतात व खाऊन टाकतात. उरलेली काही शरीराचे चाळे करत असतात, उड्या मारतात व खुर्ची सरकवत असतात, अश्याने ते स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, पण काही वेळाने ते गुलाब जाम खायचा मोह टाळू शकत नाही. आणि शेवटी त्याच्यामधील काही मुल धीर धरण्यामध्ये यशस्वी झाले.
१९७२ साली प्रसिध्द झालेला हा प्रयोग द मार्शमेलो प्रयोग म्हणून ओळखण्यात येतो, त्यावेळेस हा प्रयोग फार प्रसिध्द नव्हता, कारण त्याचा महत्वाचा व माणसाच्या सर्वांगीण विकासाशी निगडीत भाग हा नंतर आला. तो भाग किंवा प्रयोगाचा निष्कर्ष हा पुढील दुसऱ्या भागात बघू.
अश्विनीकुमार फुलझेले
निर्वाणा
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक
८०८०२१८७९७
solution.nirvana@gmail.com

💸 सोनारच श्रीमंत का ?💸


1) स्वतचे शुन्य रुपये भांडवल लावता लोकांकडून दरमहा एक हजार किंवा त्या पेक्षा ही पैसे जमा करण्याची स्किम मध्ये आपलेच पैसे आपल्या ला व्याजने किंवा त्याचे सोने दिले जाते
यावर सरकारी व पोलिस कायदेशीर नियंत्रण पाहिजे कारण एखादा सोनार आर्थिक बुडाला खुप लोकांचे नुकसान होईल
2)साध्य सराफी दुकान बंद आहे कारण सरकारने आणलेल्या नविन कायद्या मुळे अनैतिक (गैरव्यावहार ) कोणालाही करता येणार नाही पण बंद चे कारण असे सांगतात की एक टक्का कर लावणार आहे म्हणून पण तो तर ग्राहक देणार आहे ना मग सराफाच्या खिशातून थोड़ी जाणार आहे
आणि खरच सराफाना ग्राहकांची इतकी काळजी आहे का ?
3)आपण आपली सोन्याची वस्तु पॉलीश ला देतो तर त्यातील पॉलीश झाल्यावर आपले सोने नक्कीच कमी भरते
हे कोणालाही माहित नाही कारण ज्या आसिड मध्ये टाकले जाते ते सोन्यातील काही अंश सोने वितळून खाली जाते पण वस्तुचा आकार तसाच राहतो व ते वितळलेल सोने आपल्यास दिले जात नाही उलट पॉलिश ची मजूरी पण घेतात
4)बहुतेक लोक सोनाराकडे महिन्याची एक हजार किंवा त्या पेक्षाही जास्त ची पावती लावतात कोणतीही सिक्युरिटी आपण त्या कडून न घेता देत असतो हे सरकार मान्य आहे का किंवा याचे कुठे रजिस्टर केले जाते का हे सरकारी नियामत आहे का ?
आपण जे पैसे देती त्यावर स्वतःचे भांडवल म्हणून उपयोग करतात काही पैशाचे सोने घेतात व बकीच्या उरलेले पैसे तुमच्या आमच्या गरजू व्यक्तीला 5 ते 10 ℅ टक्याने सिक्युरिटी घेऊन मगच व्याजाने देतात
5)आपण जर एक हजार रुपये त्याकडे मागितले तर सराफ लगेच सिक्युरिटी मागतो मग तरी आपण देताना कोणतीही सिक्युरिटी घेत नाही इतका अविश्वास का ?
6)सोने घेताना जर दागिने घेतला तर 22 क्यारेट सोने म्हणून देतात व 3 ℅ मजूरी असे आपल्या कडून घेतले जाते व हेच सोने मोडायला गेल्यावर लगेच घट हा प्रकार 10 ते 20 ℅ पर्यन्त आपल्यावर लादन्यात येतो म्हणजे आपल्याला 10 ते 20 ℅ सोन्यात फसवलेले असते
7)स्री वर्ग मंगलसूत्र किंवा पोत यात मनी टाकतात किंवा आहेरात देण्या साठी घेत असतात त्या वेळेस सांगितले जाते की मणि ला मजूरी नाही पण आपणास कोणास माहित नसते की मणि च्या आत मध्ये लाख असते व त्या शिवाय मणि ला आकार येत नाही पण त्याच्या आत मध्ये लाख ही बहुता अंशी तशीच असते व तिच्या वजना सह आपल्यास विकल्या जाते यात सराफाचा खुप मोठा फायदा होत असतो
8)सराफांच्या म्हनण्या नुसार एक ग्राँम ला 30 रुपये ते 50 रुपये नफा मिळतो आणि दुकानात कमीत कमी 10 ते 15 लोक कामाला ठेवलेले आसतात एका दिवसांचा दुकान खर्च कमीत कमी 20 ते 30 हजार रुपये असतो मग इतक्या कमी नफ्यात इतका मोठा खर्च रोज कसा निघतो म्हणजे रोज किती किलो सोने विकल्या जाते
उदा. :- चहा विक्रित 50 ℅ नफा आहे व चहा रोज सर्वजन पित असतात तरी ही तो गरीबच आहे व राहतो मग सोने असे किती विकल्या जाते की इतका मोठा खर्च करुण सुद्धा सराफ श्रीमंत कस काय हे रहस्य सर्वाना कळाले पाहिजे
9)सध्या पान टपरी पेक्षा सराफी दुकाने जास्त झाली आहेत म्हणजे यात नक्कीच मोठा फायदा असणार आहे
10) सर्वानी सराफाचि महिन्याची पावती बंद करा दोन ते तीन महिन्या तुम्हाला दुकान अर्धा माल दुकानात दिसेल किंवा बंद झालेले दिसेल कारण खुपशा सोनरानी लोकांचा पैसा रियालइस्टेट मध्ये लावलेला आहे व ते क्षेत्र सध्या मंदीचे आहे रोज जे लोक पैसे देतात त्यावर हे साईकल चालू आहे हे कधिही बंद पडू शकते त्या पेक्ष्या सरकारी बैंक मध्ये सुद्धा आशा स्किम आहेत त्यात गुंतवा म्हणजे देशाचे कल्याण होईल
11)स्री वर्ग पायातील पैजन जेव्हा घेता त्या वेळेस पूर्ण वजनाच्या चांदीचे व मजूरी घेतली जाते पण मोडायला गेल्यास फक्त ५०℅ रक्कम मिळते म्हणजे त्यात ५०℅ मिक्स आहे हे सोनाराला माहित असते पैजन मध्ये बनवताना चांदी सरखा दिसणार KDM नावाचा ६ ते ७ रुपये ग्राम चा धातु मिक्स केलेला असतो व आपल्या कडून घेताना पूर्ण चांदीचे पैसे घेतले जातात
12)दिवाळी व दसरऱ्याला सात ते दहा लाखांची फोरव्हीलर कर गिफ्ट केलि जाते म्हणजे किती मोठा प्रॉफिट यात मिळणार असतो कारण घर घालून कोणी धंदा करात नाही
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकमानसिक दृष्ट्या सक्षम लोक कल्पना करू शकतात, अगोदर स्वतःवर विश्वास ठेवा त्यानंतर उद्योगाचा विचार करा, निसर्गाचे नियम तुम्हाला, मला, धीरूभाई अंबानीला आणि बिल गेट्स ला सारखेच आहे, फक्त फरक आहे तो आत्मविश्वासाचा, आणि प्रवाहाविरुद्ध पोहायचा.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकसामान्य मानसिकतेची लोक सन साजरे करतात,
उद्योजक मानसिकतेची लोक त्या सणामध्ये नफा कमावून घेतात.
फक्त मेलेला मासाच हा प्रवाहासोबत वाहत जातो.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकउद्योजक, व्यावसायिक किंवा गुंतवणूकदार बनणे हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, कोणीही बनू शकते, एकदम सोपे आहे, फक्त तुम्हाला मानसिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे, तार्किक शैक्षणिक विश्वास सोडा, आपल्या स्वप्नांवर, कल्पनांवर विश्वास ठेवा, किमत मोजायला तयार राहा आणि झेप घ्या आपल्या ध्येयाच्या दिशेने.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

प्रोस्ताहन + मोफत = मानसिक गुलाम


मोफत या संकल्पनेवर माझा विश्वास नाही, ह्या मोफत शब्दांनी अनेक साधू संतांना, राजकारणी लोकांना, करोडपती बनवले आहे व त्यांचे ९८ % अनुयायी आहे तसे राहिले आहे. अधिक संशोधनासाठी, अमेरिका, युरोप व इतर जगप्रसिद्ध विद्यापीठातील झालेले संशोधन तुम्ही तपासू शकता. मोफत सेमिनार घेवून संभाषण कौशल्याचा वापर करून १०० पैकी २० लोक तयार होतात मग बाकीचे ८० त्यांचे काय?, ती माणसे नाहीत का? २ दिवस मोफत सेमिनार, ८ दिवस कार्यशाळा ह्यामध्ये त्या लोकांवरील लहापणापासून झालेले संस्कार, आलेले चांगले वाईट अनुभव हे संपूर्ण पने बदलू शकतात का? नाही. जे प्रयोग जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी केले आहे त्यामध्ये त्यांनी महत्वाचे सत्य सांगितली आहे "ज्या मुलावर गर्भापासून ते वयाच्या ७ वर्षांपर्यंत जसे संस्कार होतात तेच त्यांचे व्यक्तिमत्व व स्वभाव आयुष्यभरासाठी बनून जातो". जे पण कार्यशाळा करतात त्यामधील ९८ % आहे तसेच राहतात व २ % बदलतात. मला मानसिक गुलामांची फौज नाही बनवायची आहे, त्यासाठी शाळा आणि विद्यापीठे आहेतच, मला त्यांना मानसिक गुलामीतून मुक्त करून त्यांच्या आयुष्याच्या रथाची दोरी त्यांच्याच हातात द्यायची आहे. मला आशा आहे कि तुम्हाला समजले असेल. काहीही शंक असल्यास फोन कराल.

धन्यवाद
अश्विनीकुमारआपल्याकडे कितीही उत्तम कल्पना असू दे, उच्च शिक्षण असू दे, जर तुमच्याकडे संभाषण कौशल्य, माणूस जोडण्याची कला नसेल तर ना तुम्हाला नोकरी मध्ये पदोन्नती भेटेल आणि नाही उद्योग किंवा व्यवसायात यश.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

<! - ->
जेव्हा कुंभाराला मडके बनवायचे असते तेव्हा तो ओली माती वापरतो, कारण ओल्या मातीचा गुणधर्म लवचिक असून ती कुंभार जो आकार देईल तो ती धारण करते, ह्यामध्येही वेळेला व भौतिकशास्त्राच्या नियमाला खूप महत्व असते, तुम्हाला ओली माती सुकन्याअगोदर तिला आकार द्यायचा असतो आणि जर कुंभाराची हि वेळ चुकली तर तो सुबक असा आकार नाही देवू शकत. असेच काही बालकांचे आहे, त्यांच्या आयुष्याला सुंदर आकार देण्यासाठी तुम्हाला गर्भापासून ते ७ वर्षापर्यंत संस्कार करावे लागतात, जर तुम्ही ह्या वयात मुलांना घडवण्यात चुकलात तर एखादवेळेस मातीचे भांडे परत तोडून ओली माती करून नवीन बनवता येईल पण हाच नियम सजीव मनुष्य प्राण्याला लावू शकत नाही, ह्यासाठीच मी बालक पालक आणि कुटुंब हे नवीन फेसबुक खाते बनवले आहे, वैज्ञानिकंच्या मते ज्या घरतील वातावरण मैत्रीपूर्ण, सकारत्मक असते त्या घरची मुले हि आयुष्यत लवकर जम बसवतात. निर्णय आपल्या हातात.
धन्यवाद
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७
उद्योजकीय मानसिकता = उद्योजक / व्यवसायिक = व्यवहाराचे उत्तम ज्ञान असणारा जो नोकरी करता करता गुंतवणूक करणारा असू शकतो, उद्योजक किंवा व्यवसायिक असू शकतो. उद्योजकीय मानसिकतेच्या लोकांमध्ये संभाषण कौशल्य, व्यावहारिकता व आत्मविकास दिसून येतो. हि लोक पैसे गुंतवताना नफा, तोटा याचा विचार न करता त्यांचे संपूर्ण लक्ष्य हे प्रयत्न करण्यावर असते, ते शिकण्यापेक्षा समजून घेत असतात. जर तुमच्यामध्ये उद्योजकीय मानसिकता असेल तर तुम्ही उद्योग किंवा व्यवसाय चालू करू शकतात, जर नसेल तर तुम्ही आत्म विकासापासून सुरवात करा.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकउद्योजक बनण्यासाठी किंवा आपल्या स्वप्नांचे आयुष्य जगण्यासाठी यश अपयशापेक्षा प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकजगात २ प्रकारची माणसे असतात, पहिली जी नुसती स्वप्न बघतात व दुसरी जे दुसऱ्यांना स्वप्नांसारखे वाटणारे आयुष्य आता ह्या क्षणी वर्तमानात जगत असतात. पहिला फक्त स्वप्न बघतो, दुसरा हा कृती करतो. आता तुम्हाला ठरवायचे आहे कि कुणासारखे बनायचे आहे, पहिल्या माणसासारखे कि दुसऱ्या माणसासारखे.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकभौतिक शास्त्राचा एक नैसर्गिक नियम आहे "प्रत्यक कृतीची समांतर आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते". आपण जर सकारात्मक कृती करत असाल तर त्याची प्रतिक्रिया सकारात्मक कृतीनेच होते, आणि तीच जर नकारात्मक कृती असेल तर नकारात्मक प्रतिक्रिया. आता तुम्हाला ठरवायचे आहे कुठची कृती सतत करत राहायची आहे ते.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक सुभेच्छाज्यांनी परंपरा मोडत, आपल्या क्षेत्रात तज्ञांच्या मताने सर्वोत्तम काम केले अश्या अनेक व्यक्तीमत्वापैकी तीन व्यक्तिमत्वांची ओळख करून देतो.अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

गुंतवणूकदार बना व भविष्य उज्वल करा

गुंतवणूकदार बना व भविष्य उज्वल करा


गुंतवणूक करताना दीर्घ कालावधीचा विचार करावा, जर आज महागाई १५ % असेल तर २० वर्षांनी किती असेल ह्याचा अंदाज तुम्ही सरकारी आकड्यानुसार घेवू शकता, व ज्या गतीने किंवा पटीने महागाई वाढत असेल त्यानुसार आपली गुंतवणूक सुद्धा वाढली पाहिजे. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत, आणि सगळे समजायला सोपे आहे, ह्यासाठी प्रत्येक माणूस हा आर्थिक बाबतीत सुशिक्षित असला पाहिजे. त्या मध्ये जास्त खोलात जायचे नसते, फक्त जेव्हा आपली गुंतवणूक आपल्याला पाहिजे त्या टक्क्यापर्यंत किंवा सरासरी टक्क्यांपर्यंत निकाल देत नसेल तेव्हा थोडे फेरफार करून तो टक्का आपण वधारू शकतो.

गुंतवणूक करण्यासाठी ज्ञानापेक्षा भावनांवर ताबा हा खूप महत्वाचा असतो. अनेक लोक हे ज्ञान नसतानादेखील उत्तम गुंतवणूक करतात पण त्यांचा त्यांच्या भावनांवर ताबा नसतो त्यामुळे त्यांची गुंतवणूक चुकते आणि अश्या वेळेस आमच्यासारख्या तज्ञ लोकांची मदत घेतलेली नेहमी बरी कारण आम्ही वेळीच उपचार केले म्हणून एकतर तोटा जास्त होण्याचे प्रमाण कमी होते किंवा नफा मिळण्यास सुरवात होते पण जर तुम्ही सगळेच गमावून नंतर तज्ञ लोकांची मदत घ्यायचा प्रयत्न केला तर जगातील कितीही विद्वान असू देत, कुणीही काही करू शकत नाही म्हणून हुशार बना, वर्तमानात पूर्ण जगताना भविष्य पण सुखकर करून टाका.

पहला कदम हा टीव्ही वरील कार्यक्रम बघत जा, झी वरील तज्ञ राजेश तांबे यांचा पासवर्ड श्रीमंतीचा कार्यक्रम बघत जा, माझावरील कार्यक्रम मराठी बिग बोस हा उद्योगपतींच्या मुलाखतीचा कार्यक्रम बघत जा ह्यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल. विचार बदलेल तेव्हा कृती बदलेल, कृती बदलेल तेव्हा सवय बदलेल, सवय बदलेल तेव्हा स्वभाव बदलेल आणि जेव्हा स्वभाव बदलेल तेव्हा भाग्य बदलेल आणि हेच आर्थिक शिक्षण आपल्या मुलांना लहानपणापासून द्या व त्यांचे भविष्य उज्वल करून टाका. धन्यवाद. अश्विनीकुमार ८०८०२१८७९७ चला उद्योजक घडवूया समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकतीच लोक पुढे जातात जी
ध्येयाने झपाटलेली असतात,
निर्भय असतात व
आत्मविकासात गुंग असतात.

तुमचे व्यक्तिमत्व ह्यापैकी कुठले आहे?

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकहे सर्वकाही पैश्याबद्दल आहे, न कि स्वातंत्र्याबद्दल.
जर तुम्हाला वाटत असेल कि तुम्ही स्वतंत्र आहात
तर विना पैश्याचे कुठेतरी जावून दाखवा.
भ्रमात राहू नका, वास्तवात या.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

उद्योग किंवा व्यवसाय कसा सुरु करायचा

उद्योग किंवा व्यवसाय कसा सुरु करायचा


जेव्हा नोकरी शोधताना पगारासाठी कुठलीही नोकरी शोधता तेव्हा तुम्ही द्विधा मनस्थितीत नसतात मग उद्योग चालू करतानाच का तुम्ही द्विधा मनस्थितीत येता? तेव्हा का नाही तुम्ही कुठलाही उद्योग सुरु करून त्यामधून महिन्याची नियमित उत्पन्न सुरु करत? तुम्हाला महिनाभर साहेब जितका वेळ सांगेन तितका वेळ काम करावेच लागते त्यानंतरच तुम्हाला पुढच्या महिन्यात पगार भेटेल तसेच उद्योगाचेही आहे, तुम्हाला ठराविक रक्कम आगाऊ घेवून आपले काम सुरु करायचे असते व ठराविक वेळेत ती वस्तू किंवा सेवा समोरच्या ग्राहकाला द्यावी लागते. नोकरीतील चुका ह्या साहेब खपवून घेत नाही व वस्तू किंवा सेवा ह्यामधील चुका ग्राहक खपवून घेत नाही. उद्योग किंवा व्यवसाय करणे हे नोकरी करण्यापेक्षा कितीतरी पटीने सोपे आहे. 

१) कुठल्याही एका वस्तू किंवा सेवेची कल्पना करा
२) किमंत ठरवण्यासाठी पुढील बेरीज करा
कच्चा माल किंमत + जागेचे भाडे + विजेचा खर्च + कर्मचारी किंवा कामगार यांचा पगार + (ऐच्छिक कर्जाचे हफ्ते) * कमीत कमी २५ % नफा = एकूण उत्पन्न.
३) जिथे आर्थिक बाजू येते तिथे मानसिक आणि भावनिक दृष्ट्या मजबूत राहावे लागते, कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय हा मानसिक व भावनिक कमजोरीने नाही करता येत.
४) कमीत कमी ३ ते ५ किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी उद्योगाचा विचार करावा.
५) उद्योग किंवा व्यवसाय हा तोट्यात चालला असेल तर त्यावर आपण खालील पर्याय करू शकता
अ) कर्मचारी यांच्यावर जास्त गुंतवणूक करावी व तज्ञ अनुभवी कर्मचारी ठेवावे. (कायमची गुंतवणूक.)
ब) आमच्यासारख्या तज्ञ लोकांची मदत घ्यावी. (ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक व नंतर तासानुसार गुंतवणूक)
क) उद्योग दुसऱ्या उद्योगपतीला विका
ड) जास्त तोटा होण्याअगोदर उद्योगातून बाहेर पडा व दुसरा उद्योग सुरु करण्याच्या मागे लागा.


आयुष्यात मरेपर्यंत एक गोष्ट लक्ष्यात ठेवा तुम्ही पैश्याने गरीब झालात तर चालेल ती आज नाही उद्या कमी भरून काढू शकतो पण जर मनाने गरीब झालात तर तुमचे आयुष्य व तुमच्या पुढील पिढीचे आयुष्य धोक्यात येईल. स्वतःपुरता विचार नका करू नेहमी ७ पिढ्यांचा विचार करून ठेवा.


मी लोकांना पहिले मानसिक दृष्ट्या सक्षम करतो जेणेकरून भविष्य उ
ज्वल होते. तुमचे उद्योगाच्या दिशेने एक पाऊल तुम्हाला मानसिक गुलामीतून मुक्त करते व मर्यादा ओलांडायला लावते ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो, त्यानंतर मी माझे काम चालू करतो.

उद्योजक कुठल्याही शैक्षणिक संस्थेतून निर्माण केला जावू शकत नाही, त्याला स्वतःच्या मनात विचारात आणि कृतीत स्वतहून बदल करावा लागतो. कृती म्हणजे तुमचे पंख आहे तुम्ही जेवढे कृतीचे पंख वापरून मजबूत कराल तेवढ्या उंच स्वप्नांच्या आकाशात तुम्ही भरारी मारू शकतात.

लक्ष्यात ठेवा गर्दी फक्त पायथ्याशी असते, शिखरावर खूप कमी लोक असतात.


भीतीचा सामना करा,
भविष्य उज्वल करा,
जे उत्तम आहे त्यावर तुमचा हक्क आहे,
भीतीच्या पलीकडे अमर्याद आयुष्य तुमची वाट बघत आहे.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकश्रीमंत आणि समृद्धीचे विचार तुम्हाला
श्रीमंत आणि समृद्ध नाही बनवत,
तुमचा विश्वास आणि तुमची भावना बनवतात.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षकउरलेला वेळ कसा घालवतात हा एकमेव फरक
गरीब
आणि
श्रीमंत
माणसांमध्ये असतो.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक