आपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.



कोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ते जास्त वेळ जिवंत राहून शकतो. जर त्या जागी इतर व्यक्ती असेल तर तिला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. मग ती व्यक्ती देखील आजारी पडते, ती व्यक्ती घरी जाते, मग घरचे आजारी पडतात आणि अशी शृंखला सुरु होते.

कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी घरात राहणे, कामापुरते बाहेर जाने, लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे व घरी आल्यावर हात नीट धुणे हे उपाय सांगितले आहे.

आता तुम्ही विचार करत असाल कि हे तर तुम्हाला माहितीच आहे, ह्या मध्ये नवीन काय आणि ह्याचा आपल्या आयुष्याची काय संबंध?

ज्या व्यक्तीला सुरवातीला कोरोना होतो तेव्हा त्याला त्याची लक्षणे जाणवत नाही, काहींना जास्त परिणाम होतो तर काहींना कमी आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही ना कोरोना विषाणू बघू शकतात ना विचार, भावना, कंपने आणि उर्जा. हा पण जाणवू शकता, ह्यावर नंतर बोलेन.

आता महत्वाच्या मुद्द्यावर येतो.

विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्यांना कोरोना विषाणू च्या जागी ठेवा आणि मी काय बोलत आहे त्याची जिवंत कल्पना करा, समजून घ्या.

व्यक्ती बाहेरून कितीही सकारात्मक दिसली तरीही ९८ % व्यक्ती ह्या आतून नकारात्मक असतात किंवा अनेक संकटे आणि समस्या मधून जात असतात. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींच्या संपर्कात येतात तेव्हा ते देखील त्यांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा हे बाहेर सोडत असतात ज्यांची तुम्हाला तुमच्या आयुष्याला लागण होऊ शकते. तुम्ही देखील संकटे आणि समस्यांनी ग्रस्त होऊ शकतात.

विचारांची तीव्रता कमी असते त्यामुळे ते विचार तुमच्यावर इतके परिणाम करणार नाहीत, भावनांची तीव्रता जास्त असते तर भावना थोड्या जास्त प्रमाणात, कंपने त्यापेक्षा जास्त प्रमाणात आणि उर्जा तर लगेच परिणाम करते.

ती नकारात्मक ग्रस्त व्यक्ती हवा, ती जागा आणि तेथील वस्तू नकारात्मक करून टाकते व जर तुम्ही त्यांच्या संपर्कात आलात तर तुम्ही देखील नकारात्मकतेने ग्रस्त होऊ शकतात.

निरोगी व्यक्ती ते रोगाने ग्रस्त, दुर्धर आजार, अनेक आजार आणि कमजोर रोगप्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींवर कोरोना वेगवेगळा प्रभाव दाखवतो तसेच विचार, भावना, कंपने आणि उर्जा सुद्धा वेगवेगळे प्रभाव दाखवतात. सकारात्मक व्यक्तींवर नकारात्मक विचार भावना आणि कंपने हे कमी प्रभावशाली असतात व नकारात्मक, संकटे आणि समस्यांनी ग्रस्त व्यक्तींवर जास्त प्रभावशाली असतात.

अनेकांना असे अनुभव आले असतील कि सर्वकाही ठीक होते आणि अचानक आयुष्य बदलून गेले. चांगले सुरु होते तिथे वाईट घडायला लागले आणि वाईट चालू होते तिथे चांगले घडायला लागले त्यांचे एक कारण देखील तुम्ही संपर्कात आलेले विचार, भावना, कंपने किंवा उर्जा असू शकते. तपासल्याशिवाय कारण काय आहे हे सांगू शकत नाही.

म्हणून मी सतत सांगत असतो कि नकारात्मक लोक, परिस्थिती पासून लांब रहा कारण एकदा का नकारात्मकतेचे चक्र तुमच्या आयुष्यात सुरु झाले कि ते काही दिवस महिने किंवा वर्षानंतर थांबेल.

जेव्हा तुम्ही बाहेरून घरी याल तेव्हा घरी पाउल ठेवण्याअगोदर स्वतःचे शुद्धीकरण करत चला. शुद्धीकरण साठी तुम्ही सकारात्मक विचार, मंत्रोच्चार ह्यांचा वापर करू शकता, किंवा घराला, परिसराला यंत्राने सुरक्षित ठेवू शकतात. काही दिवस तरी तुम्हाला क्वारनटाइन मध्ये रहावे लागेल, तशी गरज नाही पण जास्त दिवस राहिलेले चांगले कारण जर तुम्ही ज्या विचार, भावना, कंपने आणि उर्जेने दुषित झाला असाल आणि परत बाहेर जावून त्याच परिस्थिती मध्ये गेलात तर समस्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

वर मी जाणवू शकतो हि शक्यता वर्तवली आहे त्यावर आता लिहितो.

जेव्हा आपण आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवून आयुष्य जगत असतो तेव्हा आपले सहावे इंद्रिय जागृत असते, आपल्याला जाणवायला लागते कि काय चांगले आहे किंवा वाईट आहे. कधी कधी तुम्हाला असा अनुभव आला असेल कि एखादी व्यक्ती भेटली तिच्यात काहीही कमी नव्हती पण तरीही तुम्हाला ती व्यक्ती पटली नाही व तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब राहिलात व नंतर तुम्हाला त्या व्यक्तीचे वाईट स्वरूप समजून आले, ह्याला बोलतात जाणीव हि अनेकदा आर्थिक व्यवहार, जोडीदार निवडताना किंवा कुठल्याही परिस्थितीत जाणवू शकते.

हे विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्या काही मीटर परिसरात प्रचंड सक्रीय असतात, जर तुम्ही जिथे जास्त सक्रीय आहेत अश्या जागेत गेला तर तुम्ही त्यांनी ग्रस्त व्हाल. कंपने आणि उर्जा पृथ्वी च्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत त्याच क्षणी परिणाम करू शकतात.

हा लेख लिहायचे कारण कि लोक घरात आहेत, घराबाहेर पडत नाहीत, जास्त लोकांशी कळत नकळत संपर्क येत नाही आणि त्यापैकी काहींनी फोन करून सांगितले कि त्यांचे आजार बरे झाले, समस्या दूर झाल्या, येणारे पैसे भेटायला लागले, जोडीदार भेटला आणि असे अनेक सकारात्मक बदल आयुष्यात घडायला लागले. हे ह्यासाठी झाले कारण तुम्ही कळत नकळत नकारात्मक विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्यांच्या संपर्कात येत होतात व ते तुमच्या आयुष्यावर परिणाम करत होते.

आता तुम्हाला समजलेच असेल कि तुमच्या आयुष्यावर तुमच्या स्वतःच्या, इतरांच्या विचारांचा, भावनांचा, कंपनांचा आणि उर्जेचा कसा परिणाम होतो ते. आपल्या आयुष्यावर ज्यांच्यामुळे परिणाम होतो मग ते कोरोना सारखे विषाणू असू देत किंवा विचार, भावना, कंपने आणी उर्जा ह्या दिसून येत नाही पण परिणाम करतात.

आता तुम्ही तुमच्या आयुष्याचे निरीक्षण करा.

#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #टेलीपेथी #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

ऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/…/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg/featured…

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

Telegram / टेलिग्राम

https://t.me/joinchat/PisQyhyfsgCJmlT9Tn9VXg

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा. ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc