मुंबई मध्ये लक्षणीय रित्या मराठी दुकानदारांची संख्या कमी का होत आहे?मुंबई मध्ये लक्षणीय रित्या मराठी दुकानदारांची संख्या कमी झाली आहे. एक काळ होता जेव्हा गुजराती, मारवाडी आणि इतर परप्रांतीय समुहांची दुकाने कमी प्रमाणात होती आणि मराठी माणसांची दुकाने हि जास्त प्रमाणात होती. नंतर मराठी माणूस हा स्वतः दुकान चालवायचे सोडून भाड्याने द्यायला लागला, घरी मुलांना नीट संस्कार न भेटल्यामुळे मुलांनी देखील दुकानाकडे दुर्लक्ष्य केले आणि शेवटी ते दुकान मारवाडी ह्याने विकत घेतले.

एकदा का दुकान मारवाड्याकडे गेले मग ते त्यांच्याच समाजात फिरत बसते आणि मराठी दुकान गेले, घर गेले व मुंबई च्या बाहेर ठाणे कल्याण दहिसर आणि वाशीच्या पुढे रहायला गेला. आज परिस्थिती अशी आहे कि लाईनीत मारवाड्यांची किराणामालाची, स्टेशनरी ची, मेडिकल ची महत्वाची दुकाने आहेत जिथे काही ग्राहकांना दिवसातून एकदा हे जावेच लागते आणि हे न संपणारे नफ्याचे चक्र आहे. म्हणून मारवाडी आज श्रीमंत आहेत. त्यांनी आपल्यावर मात नाही केली तर आपण मागे हटलो. इतरांना दोष देवून काहीही फायदा नाही.

पुढचा ठेच, मागचा शहाणा.

भावनिक मुद्द्यांपासून, लोकांपासून लांब रहा आणि सर्व लक्ष्य हे आर्थिक प्रगतीकडे केंद्रित करा. हि मी जिथे सुशिक्षित मराठी राहतात तिथली परिस्थिती मांडली आहे, ज्या गावच्या जमिनी परप्रांतीयांनी घेतल्या आहेत त्याचे काय? त्याची तर माहिती आम्हाला भेटत नाही. जी माहिती भेटते ती फक्त वादविवादाच्या मुद्द्यांची.

गुजराती आणि मारवाड्यांना मारामारी करता ये नव्हती आणि नाही तरीही ते मुंबई सारख्या ठिकाणी जिथे कधी काळी गुंड आणि स्मगलर्स ह्यांचे वास्तव्य होते अश्या वेळ पासून आपले दुकान चालवत आहेत. त्या वेळेस मराठी लोकांचा दबदबा देखील होता पण शेवटी आज परिस्थिती अशी आहे कि जिथे मराठी लोकांनी जागा काबीज केल्या होत्या त्या कालांतराने त्या परप्रांतीयांच्या घश्यात गेल्या.

काही सत्य उदाहरणे अशी आहेत जिथे झोपडपट्टी होती ती जागा एका युपी च्या व्यक्तीने काबीज करून ठेवली होती, अनेक वर्षे गेली आणि आज तिथे मोठी इमारत उभी राहिली कारण जवळपास तिथली सर्व जागा हि त्याच्या नावे होती. आज तो २० ३० वर्षांनी करोडपती झाला. अशी उदाहरणे मुंबई मध्ये खूप आहेत.

ते कुणाच्या ना अध्यात ना मध्यात, काही झाले तरी दुसऱ्यांना हाताशी धरून आपले काम काढून घेतात. जे शहराचे कायदा व सुव्यवस्था सांभाळतात, जे शहराचे व्यवस्थापण बघतात त्यांच्या कर्मचार्यांना आणि अधिकार्यांना सतत चिरीमिरी देवून आपले खास बनवून घेतात.

जिथे मारवाड्यांचे दुकान असते त्या समोरच्या नाक्यावर स्वतः ची रूम असलेली मराठी तरून मुल उभे असतात, त्यांचे विषय हे संपूर्ण पणे वेगळे असतात. दारू, मुली, सन, उस्तव, जयंती ह्यापुरते त्यांचे अस्तित्व असते आणि शेवटी जस जसे वय वाढत जाते तस तसे ते मुंबई बाहेर फेकले जातात.

जर कुठल्या मारवाड्याची बायको किंवा मुलगी सुंदर असेल तर त्या ग्रुप मधील काही मुल तिला पटवण्याचा प्रयत्न करत बसणार आणि नाही जमले तर तिची बदनामी करणार. शेवटी हातात काही लागत नाही.

इथे नाक्यावर मराठी मुल तर समोर मारवाड्याचा मुलगा हा दुकान सांभाळत असेल, जेव्हा दुपारचा खाली वेळ भेटेल तेव्हा मारवाड्याचा मुलगा हा त्या मुलांसोबत थोडा वेळ घालवेल आणि जेव्हा गिऱ्हाईकांची गर्दी वाढेल तेव्हा तो परत जावून दुकान सांभाळेल.

नवीन जोडपे येते तेव्हा ते दुकान घेतात, तिथेच दिवसरात्र राहतात, तिथेच नवरा बायकोचा शरीर संबंध प्रस्थापित होतो, तिथेच मुल जन्माला येते, मुल मोठे होवून शाळेत जायला लागते, दुकानातील गिर्हाईक वाढत जातात, प्रगती होते, जवळच एक खोली भाड्याने किंवा विकत घेतात व आपल्या कौटुंबिक यशाचा आनंद घेतात.

मराठी दुकानदारांसाठी इतकेही नैराश्याचे क्षण नाही कारण मला असे मराठी दुकानदार भेटले जे गुजराती, मारवाड्यांच्या तोडीस तोड आहेत पण त्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी आहे. जास्तीत जास्त मराठी दुकानदारांचे अनुभव हे वाईट आले.

गुजराती आणि मारवाड्यांच्या मुलांकडे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात तर मराठी मुलांकडे फक्त नोकरी. गुजराती आणि मारवाड्याची मुल लहानपणापासून व्यवहार शिकतात तर मराठी मुल हि खेळ. गुजराती आणि मारवाड्याची मुल हि भावनेला ताब्यात ठेवतात तर मराठी मुल हि वाहून जातात.

शेवटी लक्ष्यात ठेवा कि पैसाच कामी येतो. ज्याचे कोणी आयसीयु मध्ये भरती आहे आणि त्याच्याकडे पैसा नाही अश्यांची काय अवस्था होत असेल तो विचार करा. अनेकांकडे साधे दररोज चे पोट भरण्यासाठी देखील पैसे नाही आहेत ते कसे दिवस काढत असतील, नुकत्याच जन्म झालेल्या आईला अन्न भेटत नसल्यामुळे दुध येत नसेल तर ती कशी करत असेल?

मुलभूत गरजांकडे लक्ष्य ठेवा आणि ते पूर्ण करा, फक्त तुमच्या कुटुंबापुरते तुम्ही बघितले तरी चालेल कारण एक तरी मराठी कुटुंब हे पैश्यांअभावी गरीबित खितपत तर नाही पडले हीच माझ्यासाठी आनंदाची बाब झाली.

आपण प्रत्येकाला बदलू नाही शकत पण आपण बदललो कि आपले बघून इतर देखील बदलतील, वेळ प्रसंगी आपण त्यांना थोडी मदत देखील करू शकतो.

लिहायचे खूप आहे पण इथेच थांबवतो. अजून इतर समाजाची काळी बाजू हि मी मांडली नाही ती तुम्हाला अनुभवाने शिकायची आहे. इथे लोक भावनिक आहे आणि कल्पनेत रमतात त्यामुळे त्यांना आपला आयुष्यातील काळी बाजू बघण्यात काहीही रस नसतो कारण त्यांना जागे व्हायचे नसते अश्यांना झोपून राहू द्या, तुम्ही फक्त जे प्रगती करत आहेत जे कृतीशील आहे अश्यांसोबातच रहा.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.नोकरी करणार्यांनी उद्योजक व्यवसायिक ह्याबद्दल विनाकारण प्रोस्ताहित होवून आपली नोकरी सोडून उद्योग व्यवसाय सुरु करू नका. हा फक्त गाजावाजा आहे. उलट ८ तास कामाचे तास आणि कामापासून ३ किलोमीटर च्या परिसरात घर ह्या तुमच्या मुलभूत गरजा आहेत. तुमच्या हक्कांवर, पगारातील पैश्यांवर अनेकांनी गदा आणत ते श्रीमंत उद्योजक आणि व्यवसायिक झाले. ज्याची स्वतः ची कंपनी असेल तो ८ काय ४८ तास देखील काम करेल तो त्याचा स्वतःचा निर्णय आहे पण जर कर्मचार्यांना थांबवून काम करून घेत असेल तर ते चुकीचे आहे. उद्योग व्यवसायाच्या काळ्या बाजूमध्ये कामगारांचे शोषण देखील येते पण हे दाबून ठेवले जाते.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूयाजेव्हा पहिले १० उद्योगांची यादी बघतो तेव्हा असे दिसून येते कि भले मुख्य कार्यालय हे मुंबई मध्ये का असेना पण त्यांच्या मालकांचा जन्म हा महाराष्ट्राच्या बाहेर झालेला असतो. भले सर्व च्या सर्व १० मराठी नको पण कमीत कमी १ तरी उद्योजक त्या यादीत असा पाहिजे ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला असावा आणि त्याचे आडनाव देखील मराठी असावे. म्हणजे २०१९ मध्ये देखील आपण मागे आहोत. पुढील १० वर्षांचे लक्ष्य ठेवले कि मी खात्रीशील सांगू शकतो कि एका तरी मराठी उद्योजकाचे नाव हे भारतातील १० श्रीमंत उद्योजकांच्या यादीत येईल. हे नाव तुमचे देखील असू शकते, तुम्ही एक पाउल तरी उचला. सर्वकाही शक्य आहे.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

मराठी तरून तरुणींना "कुठला व्यवसाय करू?" "कुठली नोकरी करू?" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर


मराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटेल तिथे ओळख काढून उद्योग व्यवसाय सुरु करतात किंवा नोकरीला सुरु करून दिवसाला किंवा महिन्याला पगार मिळवायला सुरवात करतात आणि आश्चर्याची गोष्ट हो असते कि त्यांच्याकडे रहायला घर देखील नसते म्हणजे विचार करा जर आपण मुंबई मध्ये राहून आपले घर असून आपण कमी का कमावतो? कमावण्याचे इथे मी फक्त कायदेशीर मार्गांबद्दल बोलत आहे ना कि बेकायदेशीर मार्गांबद्दल.

अनेकांना वाटते कि भ्रष्टाचार हा फक्त सरकारी नोकरी मध्ये होतो ना कि खाजगी. हा साफ खोटा गैरसमज आहे. माझ्या संपर्कात अशी लोक होती ज्यांचा पगार कमी पण कंपनीला आणि त्यांच्या ग्राहकांना फसवून त्यांनी प्रचंड पैसे कमावले व स्वतःचे घर देखील घेतले. इथे नियम एकच लागू होतो तो म्हणजे जो पकडला गेला तो चोर.

मी जेव्हा नोकरीला होतो तेव्हा मी एक एक पैश्यांचा हिशोब मालकाला द्यायचो आणि तुटपुंजा पगार घेवून घरी यायचो आणि त्याच कंपनीत माझा जो परप्रांतीय मित्र होता तो लेडीज बार मध्ये पैसे उडवत बसायचा. तरीही शेवटी थोड्याश्या अनबन मुळे मालकाने मला काढून टाकले आणि तो परप्रांतीय मुलगा अजून देखील त्याच कंपनीमध्ये कामाला आहे.

भ्रमात राहू नका. लोक कुठकुठच्या मार्गांनी पैसे कमावतात हे मला बिलकुल माहित नव्हते पण जस जसे परप्रांतीय संपर्कात आले, मराठी लोकांशी संपर्क थोडा कमी झाला तस तसे मला विवध मार्ग दिसू लागले आणि जेव्हा एक मार्ग वापरून बघितला त्यातील पैसे कमावणे किती सोपे असते हे बघितले तेव्हा समजले कि परप्रांतीय इतके पैसे कसे कमावता ते.

जर तुम्ही धाडसाचे बोलत असाल तर कोण बोलते कि मराठी तरुणांमध्ये धाडस नाही आहे म्हणून? पण त्यांना असे संस्कार दिले जातात कि ते फक्त आणि फक्त गुलाम म्हणून जगले पाहिजे. नोकरी केली तरी मालक जे शोषण करून पगार देत असतो त्यामध्ये समाधान मानायला सांगतात मग मालक काय शोषण करतच बसतो. मी जेव्हा काम करायचो तेव्हा मला वाटायचे कि मी इमानदारीने काम करतो आणि मालक देखील पण जेव्हा त्याने मला सी ए कडे त्याची फाईल घेवून पाठवले तेव्हा कळाले त्याची कमी किती आणि तो पगार किती देतो.

फक्त पैसे कमवत आहे म्हणून ती व्यक्ती चांगली असा अर्थ होत नाही. राजकारणी लोक सोडून जर कोणी मराठी पैसे कमवत असेल तर लोकांना ते बघवत नाही आणि तिथेच परप्रांतीय घोटाळे करून करोडोची संपत्ती जमवत असेल तर ते त्याची चर्चा करत बसतील. हे जे वास्तव सांगत आहे ते के बघितले आहे पुराव्यानिशी ते सांगत आहे. तरीही एक प्रश्न यायचा कि मग इन्कमटॅक्स आणि इडी ह्या खात्यातील कर्मचारी काम करतात तरी काय? नंतर ह्या प्रश्नाचे विचार करणे सोडून दिले.

महत्वाची बाब म्हणजे जे परप्रांतीय आहे त्यापैकी काही बिलकुल मारा मारी करत नाही, आणि ह्यामध्ये तर मराठी तरून पुढे होता. तरीही त्यांचे धाडस इतके असते कि ते ब्लेकमेल करायला पाठी पुढे पाहत नाही. ते प्रयत्न करतात जर हा घाबरला तर मला पैसे देईल आणि नाही तर धमकी देवून सोडून देईल, जास्तीत जास्त मारेल पण मारून टाकणार नाही म्हणून १०० पैकी ५ तरी त्यांच्या जाळ्यात फसतातच.

वास्तव आयुष्यात जगायला शिका. सिनेमा वेगळा आणि त्या सिनेमामध्ये कोणा कोणाचे पैसे लागले तो देखील एक संशोधनाचा भाग आहे. वास्तव आयुष्यात जर तुम्ही संधी चा फायदा नाही उचलला तर दुसरा ती संधी घेवून जाईल. संधी प्रत्येक ठिकाणी असते तुम्हाला ती फक्त शोधायची आहे, नसेल तर निर्माण करायची आहे जसे माझ्या ऑफिस मधील मित्राने निर्माण केली तशी, पगार कमी वर कमाई जास्त.

तुम्ही आणि तुमचे पैसे कमावण्याचे मार्ग हे गुप्त ठेवा. खासकरून जर तुमचा जास्तीत जास्त संपर्क हा मराठी लोकांसोबत येत असेल तर, आणि सहसा परप्रांतीय लोकांसोबत चर्चा करताना देखील तुमचे पैसे कमावण्याचे मार्ग उघड करू नका हा पण ते कुठ कुठल्या मार्गाने पैसे कमावतात हे त्यांच्या काढून जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

फक्त आणि फक्त समविचार आणि सम कृतीशील लोकांसोबतच रहा. समविचारी लोकांसोबत राहिल्यामुळे तुम्हाला सतत विरोधाचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे तुम्ही नैराश्यात जाणार नाही. सम कृतीशील म्हणजे जिथे लोक भावनिक सणांच्या सुट्ट्या घेत असतील तिथे तुम्ही तुमच्या साथीदारासोबत नवीन संधी साधण्यासाठी कामावर जात असाल.

म्हणून मी माझ्या प्रत्यके लेखामध्ये बोलत असतो कि जर आर्थिक मानसिकता, साक्षरता आणि भावनिक दृष्ट्या सक्षम असाल तरच उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक किंवा मोठ मोठ्या आर्थिक व्यवहारात उतरा, धाडस दाखवा नाहीतर पहिले आर्थिक दृष्ट्या साक्षर व्हा, सक्षम व्हा, मानसिक दृष्ट्या समक्ष आणि साक्षर व्हा त्यानंतरच मोठ मोठ्ये आर्थिक व्यवहारांकडे वळा.

श्रीमंत बनण्याच्या वाटेवर भले तुमची गाडी कितीही मोठी असली तर तुम्हाला एकट्यानेच प्रवास करायचा आणि आणि अश्या अनेक गाड्या त्या मार्गाने जात असतात. प्रत्येक जन आपल्या कामात व्यस्त असतो कोणीही बाहेर बघत नाही.

जागृत झाला असाल तर बिनधास्त मोठी झेप घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.


धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया


संस्कृती मध्ये फक्त धर्म आणि अध्यात्म नाही तर आपली उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीची संस्कृती देखील येते. विदेशी औद्योगिक संस्कृती च्या नादाला लागल्यामुळे आपले स्थानिक शेती शेती निगडीत व सूक्ष्म, लघु, मध्यम हा धोक्यात आले व काही वर्षात तो संपूर्ण कुण्या एका मोठ्या कंपनीच्या हातात जाईल. आता देखील वाटचाल त्याच दिशेने चालली आहे. राजकारणी, धर्म कारणी आणि समाज कारणी ह्यांच्या नादि लागू नका कारण एकदा का कुण्या एका मोठ्या कंपनीने बाजारपेठ काबीज केली कि अनेक वर्षे ती शोषण करूनच सोडेल.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

ब्लॉग लिंक : http://www.udyojakghadwuya.com/2019/07/blog-post.html

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

तुमची निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे?दिवसभरात तुम्ही जे निर्णय घेतात त्यापैकी विनाकारण वेळ वाया घालवणारे निर्णय किती घेता?

तुमचा वेळ आज कुठले कपडे घालू ह्याचा विचार करण्यात तर नाही जात आहे ना?

उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार ह्यांना वेळेचे फार बंधन असते. उद्योजकांना कधीही कुठेही जावे लागते त्यासाठी त्यांना तश्या प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक असते आणि महत्वाचे म्हणजे आज कुठले कपडे घालू ह्या नको त्या तोट्याच्या विचारात वेळ घालवू शकत नाही.

फक्त उद्योजकच नाही तर तुम्ही कोणीही असा फक्त एक लक्ष्यात ठेवा कि तुम्ही विनाकारण तुमचा बहुमुल्य वेळ विविध डिझाईन चे कपडे खरेदी करण्यात तर घालवत नाही ना?

वेळ हि न भरून निघणारी संपत्ती आहे. आज तुम्ही शाळेत किंवा कॉलेज मध्ये आहात पण बघता बघता हे दिवस निघून जातील व तुम्ही अश्या ठिकाणी पोहचाल जिथे तुम्हाला वेळेचे महत्व समजून येईल.

जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल तर तुम्ही डिझाईन आणि स्टाईल ह्यावर लक्ष्य केंद्रित न करता तुम्हाला गणवेशासारखे कपडे घालावे लागतील ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ कुठले कपडे घालु ह्या मध्ये न घालवता तुम्ही तुमच्या ध्येयावर वर्तमानातील कामावर लक्ष्य केंद्रित करू शकता.

आता आपण यशस्वी उद्योजकांचे उदाहरण घेवू ज्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ वाचवता येईल व त्याचा वापर करून तुम्ही तो वाचलेला वेळ हा आत्मविकासासाठी वापराल.

स्टीव्ह जॉब : काळ्या रंगाचा टरटल नेक टी शर्ट आणि निळी जीन्स.

मार्क झुकसबर्ग : राखाडी टी शर्ट आणि निळी जीन्स.

मतील्डा काह्ल (आर्ट डायरेक्टर सोनी कंपनी) : सफेद ब्लाउज आणि काळी पेंट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा : राखाडी किंवा निळ्या रंगाचे सूट.

हा लेख फक्त उद्योजकांसाठी नाही तर ज्यांना ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे, ज्यांना विनाकारण वेळ वाया न घालवता ध्येय साध्य करण्यासाठी आपले आवडीचे काम करण्यासाठी ज्यांना वेळ हवा आहे त्यांना त्या सर्वांसाठी आहे. वेळ हि कधीही न भरून निघणारी संपत्ती आहे, त्याचा योग्य वापर करा, आज जिवंत आहोत पण उद्या किंवा पुढच्या क्षणी नसू म्हणून जे कामाचे आहेत त्यावरच लक्ष्य केंद्रित करा आणि ते निर्णय घेण्याची सवय लावून घ्या.

यशावर कुणाची मक्तेदारी नाही आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. यशाचे नियम सर्वांना एकसारखेच आहे. जो ते नियम वापरेल तो यशस्वी बनेल जसे भौतिक शास्त्राचा गुरुत्वाकर्षणाचा नियम.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

https://www.flickr.com/photos/scobleizer/5179395448/in/photostream/
https://www.flickr.com/photos/acaben/541326656

कोण बोलतो कि फिटनेस (शारीरिक आरोग्य) च्या क्षेत्रात पैसा नाही म्हणून?


तुम्हाला फिटनेस ट्रेनर व्हायचे आहे? बिनधास्त व्हा. फिटनेस क्षेत्रात खूप पैसा आहे. तुम्ही अगदी खोर्याने देखील पैसा काढू शकता. हो हे शक्य आहे. विश्वास नाही बसत मग पुढील लेखात दिलेली फिटनेस ट्रेनर आणि त्यांची फी बघा.

ट्रेनर नाव : समीर जौरा
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : फरहान अख्तर. भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, अभिनेता, प्लेबॅक गायक, निर्माता, आणि टीव्ही होस्ट.
फी : ३ ते ४ लाख रुपये महिना. पोषण आहारासकट.

ट्रेनर नाव : यास्मिन कराचीवाला
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : कॅटरिना कैफ. अभिनेत्री.
फी : १२ सत्रांचे १९,५०० (एकोणीस हजार पाचशे).

ट्रेनर नाव : सत्यजित चौरसिया
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : आमीर खान. भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि टीव्ही टॉक शो होस्ट
फी : १० हजार ते १ लाख. ग्राहक आवडल्यास विनामुल्य सेवा ट्रेनिंग द्यायला तयार.

ट्रेनर नाव :  समीरा आणि नम्रता पुरोहित
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : सारा आली खान, अभिनेती, सैफ अली खान आणि अम्रिता सिंग ह्यांची मुलगी. अभिनेते वरून धवन, आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर. २०११ पासून फेमिना मिस इंडीया पेजंट ह्यांना ट्रेन करत आहे.
फी : १२ सत्रांचे ३२ हजार. व्यक्तीक ट्रेनिंग.

ट्रेनर नाव :  मनिष अडविलकर
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : सलमान खान. भारतीय चित्रपट अभिनेता, निर्माता, (कधीकधी) गायक आणि टीव्ही व्यक्तित्व. मिस्टर इंडीया विजेते आणि आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डींग विजेते.
फी : घरी येवून शिकवायचे ४ हजार रुपये प्रती सत्र. स्वतःच्या व्यायामशाळेत शिकवायचे ३५ हजार रुपये महिना.

ट्रेनर नाव :  पायल गिडवानी तिवारी
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेत्री करीना कपूर, अभिनेता आणि नवाब सैफ अली खान.
फी : प्रती वर्ग ६ हजार रुपये.

ट्रेनर नाव :  डीयान पांडे
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेता बादशाह शाहरुख खान. अभिनेत्री बिपाशा बासू आणि लारा दत्ता.
फी : वार्षिक २२ हजार.

ट्रेनर नाव :  सिंडी जोर्डन
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेत्री आणि मोडेल जेकलीन फर्नांडीस.
फी : १२ वर्गाचे १२ हजार रुपये.

ट्रेनर नाव :  राधिका कार्ले
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेत्री सोनम कपूर.
फी : प्रती महिना ५० हजार रुपये.

ट्रेनर नाव :  क्रिस गेथीन
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेता हृतिक रोशन.
फी : २० लाख प्रती महिना.

हो तुम्ही हि जी फी बघत आहात ते वास्तव आहे. माझे जे प्रसिद्ध विद्यार्थी आहेत त्यांना मी ५ ते २५ हजार चार्ज करतो आणि माझ्यापेक्षा जास्त फी घेणारे सुद्धा आहेत. तुम्ही कुठल्या आर्थिक स्तरावर आयुष्य जगत आहात ह्यावर अवलंबून आहे. दृष्टीकोन बदलला तर सर्वकाही बदलते व श्रीमंत आणि समृद्ध अनुभव यायला लागतात. कौशल्यापलीकडे जावे लागते.

जर उंच इमारत बांधायची असेल तर अंतरमनापासून काम करायला घ्या. तुमचे जितके अंतरमन खोल व मजबूत असेल तितक्याच उंच इमारती तुम्ही बांधू शकता. हो आणि किंमत हि मोजावी लागते, नुसती आर्थिक नाही तर सर्वकाही. जो ध्येयाशी एकनिष्ठ असतो तो कुठलीही किंमत मोजायला तयार असतो आणि तोच पुढे जातो.

धाडस असेल तरच पुढे या नाही तर सर्वसामान्य आयुष्य जगा. निसर्गाचा नियम एकच आहे कि काहीही करून तुम्ही जिवंत राहण्यासाठी धडपड केली पाहिजे मग उंच शिखरावर जगा नाहीतर पर्वताच्या पायथ्याशी.

जर तुम्हालाही व्यवसायिक आयुष्यात आर्थिक प्रगती करायची असेल तर आजच संपर्क करा. हा नियम खाजगी आयुष्यात देखील लागू होतो, खाजगी आयुष्यात देखील प्रगती करायची असेल तर आजच संपर्क कराल.धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया


अनेकांना जेव्हा एका दुकानात गर्दी बघून असे वाटते कि त्यांचा उद्योग व्यवसाय हा तेजीत चालू आहे पण त्यांना हे नाही माहिती कि अनेकदा त्यांना गिर्हाईक नसताना, एक रुपयाचा पण धंदा नसताना चे दिवस बघितलेले असतात. हेच वास्तव आहे आज धंदा आहे तर उद्या नाही पण परवा असेल, एकदम नुकसान देखील होईल तर एकदम नफा देखील होईल. त्यांना दिवसभर दुकानात राबावे लागते व खरेदी करायला फिरायला निघणारे हे रात्री कधीतरी निघतात तेव्हा त्यांची दुकानाच्या गर्दीवर नजर जाते. त्यामुळे कधी तरी तुम्ही बाहेर जाल आणि दुकानातील गर्दी बघून हा विचार नका करू तो किती कमवतो, त्याचे किती तरी दिवस हे विना गिर्हाईकाचे घालवले आहेत. अनुभवला पर्याय नाही.

#अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

#मानसशास्त्रआणिआकर्षणाचासिद्धांत #मानसशास्त्र #आकर्षणाचासिद्धांत #अंतरमन #अंतरमनाचीशक्ती #अध्यात्म #अध्यात्मिकशक्ती #प्रोत्साहन #प्रेरणा #आत्मविश्वास #आत्मविकास #चलाउद्योजकघडवूया #उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #तणाव #नैराश्य #नकारात्मकविचार #ग्राहक #श्रीमंती #समृद्धी #भाग्य #marathi #marathistatus #marathikavita #marathibana #marathimotivational #marathiinspirations


मुंबईत महाराष्ट्रात, भारतात आणि जगात विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय आहेत. सर्वांचे ज्ञान मला नाही आणि असे अनेक उद्योग व्यवसायाचे मार्ग आहे जे मला माहितच नव्हते. प्रत्येक दिवशी नवीन शिकायला मिळते. थोडक्यात पैसे कमावण्याचे मार्ग अनेक आहेत आणि तुम्हाला जो नवीन मार्ग वाटत आहे तो तुमच्या माहितीत नवीन असेल पण बाजारपेठेत उपलब्ध असेल. प्रत्येक गोष्ट विकताना बघितली आहे आणि प्रत्येक सेवा पुरवताना बघितले आहे. तुमच्याकडे पर्याय अनेक आहेत त्यापैकी पारंपारिक, अपारंपरिक किंवा काळानुसार चे पर्याय तुम्ही निवडू शकता. विनाकारण तुम्ही कल्पना हि अडगळीत टाकू नका तर तिच्यावर काम करा. कल्पना शक्तीला मुक्त जरा व मर्यादेची चौकट ओलांडा.

#अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

अपयश हे आजचे शेवट हि नाही व कायमस्वरूपी देखील नाही त्यामुळे अपयशीच होणार हा विश्वास दृढ करायची गरज नाही

आपल्या आयुष्यातील अपयश दूर करणारा लेख


नेहमी प्रमाणेच पश्चिम महाराष्ट्र मधून एक व्यवसायिक समुपदेशनासाठी आला होता. अनेक वर्षे तो अपयशाने ग्रासला होता. जस जसे समुपदेशन पुढे जात होते तस तसे सर्व समस्यांमधून मूळ समस्या हि दिसायला लागली होती.

आता जे सांगेन ते तुम्ही तुमच्या अंतर्मनात कायमस्वरूपी रुजवून ठेवा.

त्या व्यवसायिकाने इतके अपयश बघितले होते कि त्याचा दृढ विश्वास बसला होता कि तो जे काही करेल त्यामध्ये तो अपयशीच होईल. आणि इथेच तो चुकला होता. यश अपयश हे येतच असते. काहींच्या आयुष्यात यश अपयशाचा कालावधी हा थोडा जास्त वेळ असतो ह्याचा अर्थ असा नाही कि ती अवस्था हि कायमस्वरूपीच असलीच पाहिजे.

सामान्यतः लोक हि कुठलीही अवस्था मग ती यश अपयश असो, आरोग्याविषयी असो, खाजगी किंवा व्यवसायिक आयुष्याविषयी असो ते हीच अवस्था किंवा परिस्थिती कायमस्वरूपी राहील असे समजतात, स्वतला दुर्भाग्यशाली समजतात, ते मानसिकताच इतकी टणक करून टाकतात कि ती परत भुशभूषित करून तिच्यात यशाची बी देखील नाही पेरू शकत.

अजून एक चुकी अशी होते ज्यामध्ये इतक्या नकारात्मक विचारात देखील सकारात्मक विचार कल्पना येत असतात पण त्या प्रचंड प्रमाणात असलेल्या नकारात्मक विचारांमुळे कल्पनांमुळे अडगळीत टाकले जातात. संधी आयुष्यात येत असते ती तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा पकडायची असते आणि ती जे पकडतात तेच चमत्कारिक आयुष्य जगतात. अगदी शून्य काय वजा मधून लोकांनी अवकाशात झेप घेतली आहे ज्याला इतर लोक भाग्यशाली असे म्हणतात.

यशस्वी आयुष्य जगा किंवा अपयशी नेहमी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा कि सतत आपल्या आयुष्याच्या जमिनीची मशागत करत राहा, जर यशस्वी आयुष्य जगत असाल तर कुठेतरी अपयशाचे बीज पडले असेल ते नंतर फोफावत जाईल, ह्या मशागती मध्ये तुम्ही ते बीज किंवा रोपटे आरामात काढू शकता, पण एकदा का जर त्याचा वटवृक्ष झाला कि तो वटवृक्ष मुळासकट काढायला खूप त्रास होतो.

यशाचे बीज रोवले गेले तर त्याला खतपाणी घालायचे व जर अपयशाचे बीज रोवले गेले तर त्याला लवकरात लवकर समूळ काढायचे बघायचे, हि सतत चालणारी क्रिया आहे, काही हुशार आणि समजूतदार लोक हि आत्मविकासाची क्रिया आपोआप चालेले अश्या परिस्थितीत आणून ठेवतात व काही तज्ञांची मदत घेत असतात.

रात्र आहे तर दिवस देखील आहे, उत्तर धृवामध्ये ६ महिने रात्र असते तर ६ महिने दिवस देखील असतो. कुठेतरी तुमच्या ह्या अंधकारमय आयुष्याला शेवट हा आहेचच. फक्त मानसिक रित्या आपण एखाद्या लहान समस्येचे मोठ्या समस्येत कल्पनेत रुपांतर करतो व नंतर ते वास्तवात उतरवतो.

कुठलीही परिस्थिती हि कायमस्वरूपी नसते, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीची सवय करून घेऊ नका. यश अपयश ह्या दोघांची सवय करून घ्या. दोन्ही परिस्थितीत स्थिर आणि शांत मनाने रहा, भावनांवर ताबा ठेवा. आयुष्यात यश अपयश हे निरंतन चालत राहणारच आहे. तुम्हाला फक्त सामना करण्यासाठी सक्षम बनायचे आहे.

आपण जर अश्या परिस्थिती मधून जात असाल तर आजच संपर्क करा. विनाकारण नकारात्मक परिस्थिती मध्ये राहू नका.

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांतप्रत्येकामध्ये जन्मजात कौशल्य असते आणि ते जरुरी नाही कि जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हाच ते बाहेर येते, तुम्ही आत्मविकास करून ते कौशल्य कधीही बाहेर कधी शकता. प्रत्येक ठिकाणी कठीण परिश्रम कमी येत नाही निसर्गाने आपल्याला हव्या असलेल्या शक्त्या अगोदरच देवून ठेवल्या आहेत. ज्याचा विश्वास असेल कि संकटाच्या वेळेस तुमच्या मधील कौशल्य, शक्ती जागी होईल तर त्याला कधीही सोप्या पद्धतीने कौशल्य आणि शक्ती प्राप्त नाही होणार आणि ज्याचा विश्वास आहे कि सोप्या पद्धतीने भेटेल त्याला ते सोप्या पद्धतीने भेटतेच. हा अंतर्मनाचा खेळ आहे.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.

#मानसशास्त्रआणिआकर्षणाचासिद्धांत #मानसशास्त्र #आकर्षणाचासिद्धांत #अंतरमन #अंतरमनाचीशक्ती #अध्यात्म #अध्यात्मिकशक्ती #प्रोत्साहन #प्रेरणा #आत्मविश्वास #आत्मविकास #चलाउद्योजकघडवूया #उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #तणाव #नैराश्य #नकारात्मकविचार #marathi #marathimulgi #marathimulga #marathijokes #marathistatus #marathikavita #marathifunny #marathibana #marathiactress #marathifc #marathimotivational #marathiinspirationsज्ञान, कौशल्य, अनुभव, तज्ञ आणि आवड असली तरी सर्वांना एकसारखे पैसे मिळत नाही. अशी अनेक लोक आहे ज्यांच्याकडे सर्वकाही आहे पण ते पैसे कमवू शकत नाही, संधी मिळत नाही, पण दुसरीकडे नको तिथे प्रवाहाने पैसा जातो. इथे तुम्हाला काळानुसार बदलून जगावे लागेल, मानसिक दृष्ट्या सक्षम आणि स्थिर व्हावे लागेल, दुसरा पर्याय नाही. जग फक्त यशस्वी लोकांकडे बघते आणि अयशस्वी लोकांना दुय्यम वागणूक दिली जाते. भले यशस्वी लोकांकडे गुण नसले तरी त्यांची वाहवा होते आणि अयशस्वी लोकांमध्ये नसलेल्या उणीवा काढल्या जातात. आयुष्यात समान संधी अस्तित्वात नाही आहे. काळानुसार बदलून, संधी साधून जगावे लागते.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध

सर्व शिव भक्तांना महाशिवरात्री च्या हर्दिक सुभेच्छाज्यांचा अध्यात्मावर विश्वास आहे त्यांच्या साठी एक नवीन पुरातन अध्यात्मिक साधना व तंत्र विद्या असलेले मानसिक व शारीरिक प्रशिक्षण घेवून येत आहे. उपचार पद्धत देखील विकसित केली गेली आहे ज्याचा फायदा शारीरिक व मानसिक आजार बरा करण्यासाठी होतो. आताच्या वैज्ञानिक वैद्यकीय उपचारासोबत हि उपचार पद्धती चमत्कारासारखे काम करते.

तंत्र साधनेचे नाव आहे आयुष्य मंथन. तुम्हाला पुराणातील समुद्र मंथन हि कथा माहितच असेल. ह्याच समुद्र मंथनातून अनेक दैवी वस्तू निघत असतात ज्यांची शक्ती प्रचंड असते. जे हलाहल विष निघाले होते तसे. रत्ने आणि दैवी शक्त्या निघाली होत्या. आयुष्य मानसिक आणि शारीरिक मंथनातून तुम्ही देखील तुमच्यातील अलौकिक दैवी शक्त्या जागृत करू शकता. पाहिजे तसे आयुष्य जगू शकता, सर्व समस्या दूर करू शकता. जर कुठची अलौकिक समस्या असेल तर त्याचे निदान आरामात होते.

महाशिवरात्री अध्यात्मिक आस्था आणि विश्वास असणाऱ्यांसाठी आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्याची योग्य वेळ.

विवाह जुळून येत नसतील अश्यांसाठी उत्तम योग आहे. एक मान्यतेनुसार शिव आणि पार्वती चा विवाह दिन आहे. जर तुम्ही करू शकत असतील तर कडक उपास किंवा झेपेल असा उपवास केला तर त्याचे फळ मिळते.

एका मान्यतेनुसार समुद्र मंथनातून जे विष निघाले होते ते शिव ने प्राशन केले होते. जर आपल्या कुठल्याही समस्या ह्या महादेवा समोर ठेवल्या कि महादेव ते प्राशन करून तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांपासून तुम्हाला मुक्त करतील.

संतान प्राप्ती साठी देखील हि वेळ उपयुक्त आहे. मुल होण्याची शक्यता वाढते.

महादेव श्रुष्टी चे विनाशक देखील आहे व निर्माते देखील आहे. विनाशानंतर नव श्रुष्टी चे निर्माण केले जाते आणि ह्याच मार्गाने आपण आपल्या आयुष्याचे नवनिर्माण करू शकतो.

जर कुठली अघोरी साधना, उपाय किंवा उपचार सुरु असतील तर त्याचे फळ मिळण्याची शक्यता आहे. अघोरी शिवाचे अंश आहेत सैन्य आहे.

जवळच्या मंदिरात जावून शिवलिंगाचा जलाभिषेक केला तरी खूप फायदा होतो. किंवा घरी पिठापासून शिवलिंग बनवून त्याचा दुधाभिषेक केला तरी घरातील सर्व समस्या दूर होतील.

मुलांचे शिक्षण, वयात येणाऱ्या समस्या, नोकरी व्यवसाय, लग्न ह्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.

जरी काहीही समस्या नसेल तरीही तुम्ही आपली अध्यात्मिक उर्जा वाढवण्यासाठी शिव उपासना करत राहू शकता.

आपल्या जर अध्यात्मिक आणि अलौकिक समस्या असतील तर त्या फोन, व्हास्टएप, फेसबुक मेसेज ह्या मार्गाने कळवाल. जर समस्या मोठी असेल तर ईमेल कराल.

आयुष्य मंथन ह्या शिव साधनेसाठी आजच संपर्क करा व आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करा.

फेसबुक आयडी : "आपले अंतरमन"

धन्यवाद
अश्विनीकुमार

अध्यात्म, मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्धआयुष्यात काही प्रश्नांची उत्तरे न शोधलेली बरी. कदाचित ती प्रश्ने धोकादायक किंवा तुमच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ करणारी असू शकतात. त्यामुके प्रत्येक प्रश्नांची उत्तरे हि भेटलीच पाहिजे असा हट्ट धरून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू नका. काही अनुत्तरीत प्रश्नांमुळे आपण सुखी समाधानी आयुष्य जगत असतो तर काही प्रश्नांची उत्तरे भेटल्यामुळे आपण दुखी असमाधानी आयुष्य जगायला लागतो. योग्य आणि गरजेच्याच प्रश्नांची उत्तरे शोधा.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.जर तुम्ही तुमच्या मनासारखे आयुष्य जगत असाल किंवा घडत असेल तर आयुष्यातील प्रत्येक क्षण हा दीर्घकालीन आहे आणि जर तुम्ही तुमच्या मनासारखे आयुष्य जगत नसाल किंवा तसे काहीच घडत नसेल तर प्रत्येक क्षण अल्पकालीन आहे. आनंदात प्रत्येक क्षण हा संथ गतीने जात असतो आणि आपण आनंदाचा पूर्णपणे आस्वाद घेतो तर दुखात प्रत्येक क्षण इतक्या जलद गतीने जातो कि ह्यामध्ये आपण महिने वर्षे किंवा आयुष्य घालवून टाकतो. आनंदाला मर्यादित कालावधी आहे म्हणून सतत आत्मविकास करत आनंदी क्षण निर्माण करावे लागतात आणि दुखांचे निराकरण करावे लागते. आता तुम्ही ठरवा कि तुम्हाला कसे आयुष्य जगायचे आहे ते.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.अंतर्मनाच्या शक्ती मध्ये देखील स्वजीवी, परजीवी आणि मृतजीवी असे प्रकार असतात. स्वजीवी स्वतःवर अवलंबून असतात, परजीवी स्वजीवी वर अवलंबून असतात आणि मृतजीवी हे मृत जीवांवर अवलंबून असतात.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.

आपल्या सवयींना, अंतर्मनातील विचारांना, कृतीला आपल्या आयुष्यावर हवे होऊ देवू नकाउच्च पदावर असलेले किंवा जास्त कमावणारे अशी लोक त्यांची स्वतःची जीवनशैली बनवतात. अर्थात तो शिस्तीचा भाग असतो, एकप्रकारे रिच्युअल्स सारखे ते त्यांचे दररोजचे आयुष्य जगत असतात. हि जर सवय त्यांना उच्च पदावर घेवून जात असेल आणि पैश्यांचा प्रवाह त्यांच्या आयुष्यात आणत असेल तर हीच सवय त्यांचा कधी कधी प्रचंड घात करू शकते.
उदाहरणार्थ
एकदा एका कोर्टात गुन्हेगारी खटला चालू होता. अ वकील होता तो ब वकीलापेक्षा जास्त निष्णात होता तर ब वकील हा नुकताच वकील झाला होता. पहिल्याच सुनावणीत ब वकिलाला समजते कि त्याचा टिकाव अ वकीलासमोर लागू शकणार नाही, अ वकिलाने खूप चांगल्या प्रकारे पुरावे, साक्षीदार आणि जबाबी गोळा केलेल्या असतात.
मध्यंतरानंतर परत कोर्ट सुरु होते. ब वकिलाला करण्यासारखे काहीच नसते, तो फक्त अ वकिलाचे निरीक्षण करायला लागतो, अगदी सूक्ष्म मधली सूक्ष्म हालचाल देखील टिपू लागतो जसे कि अ वकिलाचे बोलणे, हालचाली, देहबोली आणि इतर कामाची गोष्ट (ह्याला बोलतात चौकटीबाहेर विचार करणे, कौशल्याने परिपूर्ण असलेला, सर्वगुण संपन्न व्यक्ती देखील खाजगी व व्यवसायिक आयुष्यात कसा हरतो ह्याचे उत्तम उदाहरण आहे. नीट लक्ष्य देवून वाचा.).
जे उच्च पदावर असतात किंवा श्रीमंत असतात ते महत्वाच्या कामाच्या वेळेस ठरलेले कपडे घालणार, तीच गाडी घेणार, तोच रस्ता पकडणार, त्याच वेळेवर निघणार हे ठरलेलेच असते.
थोड्या निरीक्षणाने ब वकिलाचे लक्ष्य अ वकिलाच्या एका हालचालीवर वर जाते, अ वकील सतत आपल्या कोटाच्या बटनाला नकळत, सवयीचा भाग म्हणून किंवा अंतर्मनातील सवयीनुसार हात लावत असतो. कोर्टाची आजची सुनावणी संपते व कोर्ट पुढची सुनावणीची तारीख देते. ह्या मधल्या वेळेत ब वकिलाला देखील प्रतिवाद सक्षम रीतीने मांडण्यासाठी पुरावे आणि जबाबी दिसून आल्या.
आता पुढच्या सुनावणी साठी ब वकिलाचे ध्येय होते कि अ वकिलाचे लक्ष्य विचलित करायचे. (ज्यांचे अंतर्मन ध्येयाच्या दिशेने प्रचंड एकाग्र असते तेच अंतर्मन तितक्याच प्रचंड शक्तीने विरुद्ध दिशेने देखील काम करते.). ब वकिलाने अ वकील जिथे कपडे धुवायला टाकतो त्या धोब्याला संपर्क केला. तिथे जावून ब वकिलाने धोब्याचे लक्ष्य दुसरीकडे वेधून अ वकिलाच्या कोटाचे ते बटन काढले जिथे अ वकील अजाणतेपणे हात लावत होता.
दुसर्या दिवशी ब वकिलाने त्याचे कमजोर पुरावे आणि जबानी सोबत प्रतिवाद सुरु केला तेव्हा अ वकिलाला त्याच्या प्रतिवादाला उत्तर देता नाही आले. अ वकिलाचा सारखा हात त्याच्या कोटाच्या बटनाकडे जात होता आणि ते बटन ब वकिलाने कालच काढून टाकले होते, त्यामुळे अ वकिलाचे अंतर्मन नीट काम करत नव्हते, गोंधळले होते. जेव्हा पण अ वकील वाद करायला सुरवात करत होता तेव्हा त्याचा हात बटन नसलेल्या जागेवर जात होते ज्यामुळे अ वकील गोंधळून जात होता.
अंतर्मनाचे लक्ष्य विचलित होणे हि खूप मोठी गोष्ट आहे. जर काही लोक एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला अंतर्मनापासून जोडले गेले असतील किंवा एकरूप झाले असतील आणि जर ती वस्त किंवा गोष्ट आपल्याकडे नसेल तर आपले अंतर्मन पूर्णपणे गोंधळून जाते. ह्याचा फायदा अनेकदा विविध प्रकारचे व्यवसायिक जसे कि वकील, सर्जन, अधिकारी आणि राजकारणी सारख्या व्यक्ती घेत असतात.
आपण अनेकदा अजाणतेपणे काही विशिष्ठ कृती करत असतो, कोणीही दुसरा व्यक्ती किंवा संस्था ह्याचा वापर किंवा गैरवापर करून घेवू शकते, कदाचित तुमच्या आयुष्याचा ताबा देखील घेउ शकते.
कटू आहे पण सत्य आहे.
म्हणून मी सतत सांगत असतो कि कधीही कुठल्याही वस्तूवर किंवा व्यक्तीवर जीव लावू नका, अगदी स्वतःवर सुद्धा नाहीतर ह्या छोट्याश्या कृतीमुळे तुम्ही तुमचे आयुष्य संपूर्णपणे भरकटवून टाकाल. प्रत्येक कृती मर्यादेतच चांगली असते आणि अतिरेक होतो तिथे सर्वकाही संपून जाते.
आता निर्णय तुमचा आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.एका छोट्याश्या स्वच्छ पाण्याने भरलेल्या ग्लासात दुषित थेंब टाकला कि संपूर्ण पेल्यातील पाणी हे खराब होवून जाते आणि जर तोच थेंब स्वच्छ पाण्याच्या तलावात पडला तरी काहीही होत नाही. आपल्या अंतर्मनातील तलाव हा स्वच्छ सकारात्मक विचारांच्या पाण्याने भरून टाका मग दररोज पडणारे नकारात्मक दुषित थेंब तुमचे आयुष्य नकारात्मकता भरून दुषित करू शकणार नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.राजकारणात नेते, कार्यकर्ते आणि प्यादे असतात. बळी फक्त प्याद्यांचा दिला जातो. जर तुम्ही राजकारणात असाल तर चुकुनही प्यादे बनू नका किंवा प्याद्यांसोबत राहू नका. इथे चांगले किंवा वाईट काही नाही. विनाकारण तर्कात अडकू नका.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध

बोधकथा "भावनांवर आणि स्वतःच्या कृतीवर कठीण परिस्थितीत ताबा ठेवायला शिका"एकदा एक सिंह हा शिकार करण्यासाठी निघालेला असतो. सिंहाचे हे नेहमीचेच काम असते. सहसा सिंहाला शिकार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, शिकार सहसा भेटत नाही. पण आज जेव्हा सिंह शिकारीला निघतो तेव्हा एका ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त शिकार त्याला आयती भेटते. तो नेहमीच्या सवयीप्रमाणे कृती करतो. दबक्या पावलाने शिकारीच्या जवळ जातो. हरीणांच्या समूहाला पळायला जागा नसते. सिंह हा हल्ला करतो व हरिणांना मारून टाकतो.

सिंह तिथेच ताव मारतो. आयती शिकार, जास्त प्रमाणात अन्न उपलब्ध झाल्यामुळे तो दाबून खातो. सिंह पोट भरले असल्यामुळे तिथेच आराम करतो. शिकार पकडण्यासाठी त्याला जास्त मानसिक आणि शारीरिक शक्ती खर्च न झाल्यामुळे त्याला लगेच गाढ झोप लागते व सिंह झोपून जातो.

इतक्यात त्या सिंहावर जंगली कुत्र्यांचा समूह हल्ला करतो. इथे एक नियम लक्ष्यात ठेवा, तुम्ही कितीही शक्तिशाली का असेना, तुम्ही जास्तीत जास्त १० जणांना मारू शकता पण ५० १०० लोकांना नाही मारू शकत. इथे सिंहावर शिकारी कुत्रे भारी पडले, सिंह जखमी झाला, रक्तबंबाळ झाला आणि शेवटी शिकारी कुत्र्यांच्या समुहाने सिंहाची शिकार केली.

सिंहाला वाटले कि हरीणांचा समुह हा त्याचा शिकार होता पण इथे जंगली कुत्र्यांच्या समुहाने सिंहाचा शिकार करायचे ठरवले होते म्हणून त्यांनी हरिणांना त्या जागी ठेवले होते.

सिंह एकटा होता म्हणून हरला, जंगली कुत्र्यांनी एका सिंहाला समुहाने मारले, जर एक एक जंगली कुत्रा गेला असता तर सिंहाने आरामात त्यांना मारले असते. हे जे विचार आहेत ते बाजूला ठेवा, जो कमजोर असतो तो समुहात राहतो आणि समुहातच शिकार करतो. जो विनाकारण धाडस दाखवायला जातो तो मरतोच. जंगली कुत्र्यांनी समुहात शिकार केली ती योग्यच केली कारण त्यांना त्यांची मर्यादा हि माहिती होती.

आयुष्यात आणी जंगलात ध्येय असते ते म्हणजे जिवंत राहणे, जो जिवंत राहिला तो जिंकला आणि जो मेला त्याचे अस्तित्व नष्ट झाले. जंगलात पुतळे उभे करत नाहीत.

परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन शांत ठेवून कृती करा. संकटे, कठीण परिस्थिती तुम्हाला हरवत नाही तर तुमचे अंतर्मन तुम्हाला हरवते.

आपले अनुभव इनबॉक्स, ईमेल किंवा व्हास्टएप द्वारे शेअर कराल.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.


महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१८ / १९ च्या अंदाजपत्रकानुसार ३.६७ लाख करोड ची आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हि भारतातील इतर राज्यांपेक्षा सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तुम्हाला फक्त मागणी आणि पुरवठा ह्यामधील तफावत ओळखून, स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करून उद्योग, व्यवसाय सुरु करायचा आहे. २०१९ मधील सुरवात तुम्हाला २०२८ पर्यंत यशाच्या शिखरावर घेवून जाईल. इथे कौशल्यापेक्षा तुमच्या मानसिकतेची क्षमता कामी येईल. जितके तुम्ही मन अंतरमनाने स्थिर असाल तितक्या जास्त उद्योग व्यवसायाच्या संधी तुम्हाला दिसतील, मिळतील. विश्वास ठेवा आणि सतत कृती करताना मनात बोला कि "तुम्ही करू शकता". उद्योग, व्यवसाय आणि तुम्ही ह्यामध्ये कोणीही आले नाही पाहिजे. फक्त शहरांबद्दल बोलत आहे. आता प्रश्न आहे कि ३.६७ लाख करोड हे वाढत जातील त्यापैकी तुम्ही किती कमावणार? साधा नियम आहे कि तुम्ही नाही कमावले तर दुसरा कोणीतरी येवून कमावून जाणारच.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध

कर्ज घेऊन शिक्षण घेण्याअगोदर पालक आणि विद्यार्थी ह्यांनी स्वतःला खालील प्रश्न विचारा


कर्ज घेवून शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही जो पैसा कमावणार तो स्वतःच्या घरासाठी वापरणार कि कर्ज फेडण्यासाठी?
जर ठराविक वर्षे तुम्ही कर्ज फेडण्यात घालवलीत मग तुमच्या घरच्यांसाठी तुमच्या मुलांसाठी पैसे कमावून ठेवण्यासाठी किती वर्षे उरतील?
कर्ज व्यवस्था आज शेतकरी संपवत आहे तर मग उद्या विद्यार्थी देखील नाही संपवणार हे कश्यावरून?
कर्ज घेवून शिक्षण घेवून तुम्हाला किती फायदा झाला आणि शिक्षण संस्थेला किती फायदा झाला?
लाखो रुपये कर्ज घेवून १० २० हजारांची नोकरी लागल्यास काय कराल आणि नोकरी नाही लागल्यास काय कराल?
तुम्ही जे काही शिक्षण घेतले आहे त्याच क्षेत्रात तुम्ही काम करता का?
सरकारी नोकऱ्या मुद्दाम कमी आणि खाजगी क्षेत्रात शोषण मग तुम्ही काय कराल?
तुम्ही कर्ज देखील फेडले त्यामध्ये काही महत्वाची वर्षे घालवली तरीही तुम्ही कायमस्वरूपी नोकरी भेटली का? कि नोकरी जाण्याची सतत भीती आहे?
शिक्षण संस्थेला तर पैसे भेटले पण त्यांनी नोकरी किंवा उद्योग व्यवसायाची हमी घेतली होती का?
आज कोण नफ्यात आहे? शिक्षण संस्था कि तुमच्या सारखी करोडो कुटुंब?
ह्या कर्जामुळे विद्यार्थी आणि पालक ह्यांना किती मानसिक ताण येत असेल?
पालकांना शिक्षणासाठी कर्ज मिळवताना आलेला मानसिक ताण आणि विद्यार्थ्यांना जर नापास झालो कि पैसे बुडतील ह्याचा मानसिक ताण?
पैश्याचे सोंग कोणी घेवू शकत नाही आणि कर्ज घेतले तर फेडावेच लागेल.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध