समाजाला लागलेला हृदय विकाराचा झटकानाव : शुभम केचे
वय : २३ वर्ष
काम : रेडीओ जॉकी
नाव : अश्विनी एकबोटे
वय : ४४ वर्ष
काम : रंगकर्मी, क्लासिकल डांसर, कलाकार, नट
नाव : शाळिग्राम पाटील
वय : ५७ वर्ष
काम : सहाय्यक पोलिस आयुक्त
इतक्या कमी वेळेत हृदय विकाराने मृत्युच्या बातम्या बघितल्यावर लेख लिहण्यापासून स्वतःला परावृत्त नाही करू शकलो. ह्याला जबाबदार मी देखील आहे कारण आत्मविकास समुपदेशन आणि प्रशिक्षण हे इंटरनेत द्वारे गरजू लोकांपर्यंत नाही पोहचू शकलो.
एखादी व्यक्ती जरी ती माझ्या घरची असेल आणि तिचा मृत्यू ठरविक वयानंतर झाला तर मान्य करेन, पण जेव्हा एखाद्या आजाराने असे पटापट मृत्यू व्हायला लागले तर रहावत नाही.
ह्याला कारणही तसेच आहे. आता मी जात, धर्म, भाषा, प्रांत आणि देश ह्यापलीकडे फक्त मनुष्य प्राणी आणि निसर्ग धर्म मानणारा झालो आहे. वरील मंडळी हि एका अश्या पदावर होती ज्याला प्रसिद्धीचे वलय आहे त्यामुळे ह्यांच्या बातम्या बाहेर आल्यात, पण बाकी सामान्य माणसांचे काय? ज्यांच्याकडे पैसा आहे पण प्रसिध्द नाही अश्यांचे काय? त्यांचा मृत्यू हा त्यांच्या घरचे, नातेवाईक व परीचयांच्या पलीकडे कुणालाच काही माहित नाही.
भांडवलशाही आणि त्याला पूरक असणारे वातावरण भारतात असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील माणसांवर प्रचंड दबाव असतो, कारण तो एक गेला कि त्यासारखे लाखो त्यांची जागा घ्यायला तयार असतात. आणि आपल्या इथली लोक २१ शतकातही जात धर्माच्या नावाखाली एकत्र होतील पण मनुष्य प्राण्याच्या हितासाठी, त्याच्या नैसर्गिक मुलभूत गरजांसाठी कधीच एकत्र होणार नाही.
प्रत्येक जन आपला स्वार्थ बघत आहे. स्पर्धा प्रचंड आहे, ताण प्रचंड आहे, तणावही प्रचंड आहे आणि आगीत तेल ओतल्यासारखे पिढ्यान पिढ्या चालत येणारे संस्कार आणि ते सांभाळण्यासाठी समाज टाकत असलेला दबाव अतिप्रचंड आहे. हे सगळे विनाकारचे अनैसर्गिक, स्वार्थी प्रवृत्तीने निर्माण करून तीच प्रवृत्ती हे टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत आहे.
नवतरुनांना संधी नाही, ज्यांना संधी भेटली त्यांच्यावर कामाचे प्रचंड ओझे, आप आपली जीवनशैली टिकवण्याची अनैसर्गिक चढाओढ, कौटुंबिक सदस्यांच्या आपआपसात वाढलेल्या अपेक्षा, चौकटीबाहेर विचार न करू देणारी समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि शिक्षण पद्धत ह्याचा उलटा परिणाम हा मनुष्य जातीवर व्हायला लागला आहे.
ज्या भावना ज्यासोबत आपण आपले आयुष्य जगत असतो त्या कश्या सांभाळायच्या, ज्या नैसर्गिक भावना आहेत त्या तर व्यक्त करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आनि त्या पूर्ण केल्याशिवाय चैनही पडत नाही. ह्याबद्दलचे शिक्षण कोण देणार?
विचार आणि भावना ह्यांचा शरीरातील अवयवांचा खूप जवळचा संबंध आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित अपघात सोडले तर जास्तीत जास्त आजार हे मनोशारीरिक असतात. ती गोष्ट वेगळी आहे ज्याच्या किंवा जिच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत काम करत आहे हे अपघात किंवा इतर नकारात्मक घटनेपासून आपोआप लांब होतात.
तणाव आणि चिंता ह्यांचा आपल्या यकृत, पित्ताशय किंवा लिव्हर ह्यावर परिणाम होतो. पोटाचे लहान मोठे आजार होतात. सतत चीड चीड करणाऱ्याला एसिडीटी चा त्रास असतो. आपोआपच तो ह्या आजाराला पूरक अश्या कृती करत जातो ज्यामुळे हे आजार उद्भवतात.
अति भावनिक व्यक्ती हिला हृदयाचा झटका येणे, किडनी फैल होणे असे आजार होण्याची शक्यता जास्त असते आणि होताना मी बघितलेसुद्धा आहे. द्वेष करणारी व्यक्ती हि सतत ह्या न त्या कारनाने अपघाताला सामोरे जावे लागते. ठेच लागण्यासारखा अपघात असेल तर काही समस्या नाही पण जर गाडी चालवताना असेल तेव्हा मात्र गंभीर पणे विचार करावा लागेल.
कौटुंबिक, नातेवाईक आणि सामाजिक जाणिव कमी कमी होत चालली आहे. काल्पनिक दबाव हा खूप आहे. जेवढे जवळचे नातेसंबंध निस्वार्थ होते ते जवळपास स्वार्थी होत चालले आहे. अगोदर घरी मन मोकळे करू शकत होते पण आता घरीच प्रत्येकाला समस्या आहे.
अपवाद फक्त जे भावनिक दृष्ट्या सक्षम आहेत ते आहे पण त्यांची संख्या पण हि खूप कमी आहे. ह्याला कारणही आपली शिक्षण पद्धती आहे. आपल्यापेक्षा जास्त समस्या ह्या इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये आहे ज्यांची नक्कल सध्या आपण करत आहोत.
खालील काही महत्वांच्या मुद्द्यांवरून तुम्हाला आताची परिस्थिती कशी चालली आहे त्याचा अंदाज येईल. व तुम्हाला मुळ कारण सापडेल.
धार्मिक पारंपारिक संस्कार आणि त्यानुसार बनलेले कायदे हेदेखील नैसर्गिक मुलभूत गरजांना महत्व देत नाहीत आणि निसर्गापुढे तर कुणाचेच चालू शकत नाही. माणसाला माणसासारखे बघितलेच जात नाही. प्रत्येक जन हा धर्म, जात, कायदा आणि ग्राहक ह्या नजरेने बघतो.
का नाही सरकारी नोकरीच्या जागा वाढवल्यात? का खाजगी कंपन्यांसाठी कामगार कायदे शिथिल केले? का पदे भरली जात नाहीत? का कंपनीचा मालक, आणि व्यवस्थापन सगळ्या बाबतीत गब्बर होत चालले आहे आणि का कामगारांच्या नोकरीवर नोकरी जाण्याची टांगती तलवार लटकत ठेवली जात आहे?
का सरकारी नोकरीत कंत्राट पद्धत सुरु केली आहे? का उच्च पदाधिकारी किंवा जो भ्रष्ट व्यवस्था टिकवून ठेवतो त्याला आणि त्याची नोकरी जपण्यात येत आहे? सरकार आणि खाजगी कंपन्या का आपल्या कनिष्ठ दर्ज्यांच्या कामगारांचे शोषण करत आहे?
लोकांकडे पैसा वाढला ना मग का लगेच सरकार कडून कर वाढवले जातात आणि का खाजगी कंपन्यांना त्यांची बिनकामाची उत्पादने विकली जाण्यासाठी कर कमी केले जातात? सरकारी खाजगी बँका सामान्यांना जीवनावश्यक वस्तू किंवा इतर गोष्टींसाठी ० टक्के व्याजावर कर्ज देत नाही? का बँका चंगळवाद आणि निर्थक गोष्टींवर ० टक्के कर्ज देते?
का बातम्या देणार्या वाहिन्या ह्या जीवनाव्यक्षक मुलभूत गरजांवरील बातम्या दाखवत नाहीत? का ते सतत भडकाऊ, हिंसक आणि नकारात्मक बातम्या सतत प्रसारित करत असतात? धडधडीत खोट्या बातम्या का प्रसारित केल्या जातात?
का नुसता यशाचा गवगवा केला जातो आणि जो अपयशी आहे त्याला तुच्छ नजरेने बघितले जाते? जिथे अपयशीला मदतीची गरज असते का तिथे सर्वकाही यशस्वी वर खर्च केले जाते?
हे असेच सुरु राहणार. ह्याला पर्याय एकच "आत्मविकास". तुम्ही जेवढे मनाने खंबीर व्हाल तेवढेच तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. ह्याचा फायदा सर्वांगीण विकासासाठी होतो, ज्यामध्ये आर्थिक, व्ययक्तिक, शैक्षणिक आरोग्य ह्यावर होतो.
जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे.
दिवस आहे तर रात्र हि आहे.
सुख आहे तिथे दुखहि आहे.
प्रत्येक समस्येला समाधान आहे.
काही शंका असल्यास फोन कराल
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार