मारवाडी उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीत यशस्वी असण्याचे ७ रहस्य
१) पैश्यांवर लक्ष्य ठेवून असणे
मारवाडी उद्योग व्यवसायिक कंपन्या आणि समूह यांनी आपला सर्व गुंतवणूक निधीचे व्यवस्थापन असे करतात कि जिथे दीर्घकालीन उत्पादनक्षम व फायदेशीर आहे तिथेच गुंतवणूक करतात आणि त्या उद्योग व्यवसायाची काटेकोर पणे आर्थिक निरीक्षण करतात.
२) प्रतिनिधी नियुक्त करूनसुद्धा स्वतः निरीक्षण करतात
यशस्वी उद्योग, व्यवसायाला प्रतिनिधी कसे नियुक्त करायचे हे शिकावे लागते. (आताचे उदाहरण रतन टाटा विरुद्ध सायरस मिस्त्री) अन्यथा आर्थिक गुंतवणुकीचा कालावधी हा मर्यादित होत जाईल.
त्यांना पण माहित असले पहिजे कि केव्हा हस्तक्षेप करायचा, त्यांना जाणीवही असते कि हस्तक्षेप करायचा निर्णय हा महागातही पडू शकतो. असमाधानकारक अधिकाऱ्याला बदलणे हे त्या अधिकार्याकडून काम करून घेत राहणे हे सोपे व फायदेशीर ठरू शकते. अकार्यक्षम अधिकारी आणि कुटुंबातील सदस्य ह्यांच्या भावनांना धक्का न पोहचवता त्यांना आरामशीर आणि चालवायला सोप्या अश्या पदावर बदली करतात.
३) योजना पण एक शैली आणि प्रणाली सोबत असलेली
काहीसे अस्पष्ट आहे, तरी आपल्याला सवयीचे स्वभावात, जन्मजात गुणात रुपांतर झालेले दिसून येते. तरीही, हे कदाचित अगोदर सांगितल्याप्रमाणे हे बदल अनुवांशिकतेनुसार संस्थापका कडून पुढील पिढीकडे आले आहेत.
४) नैतृत्व वाढीला प्रोस्ताहन, नैतृत्व हे परंपरागत व्यवस्थेला वाढ थांबवू देत नाही
यशस्वी उद्योजक, व्यवसायिकाचा मुख्य गुण हा आहे कि तो सतत प्रगतीच्या दिशेने जात असतो. अनेक कल्पना त्याच्याकडे असतात पण काहींची तो अंमलबजावणी करतो.
५) योग्य कॉर्पोरेट संस्कृती
कंपनी किंवा समुहाची कार्यशैली हि बाजारानुसार आणि बदलत्या वेळेनुसार फायद्याची असावी.बदल आणि तडजोड करत राहणे हे खूप कठीण आहे.
कंपनीच्या कॉर्पोरेट संस्कृती मध्ये इमानदारीला प्रोस्ताहन देणे हे खूप कठीण असते, खास करून सक्षम मॅनेजर्सना. दिलेले आर्थिक फायदे हे काही कालावधीपर्यंत त्यांना सोबत ठेवू शकतात, कधी कधी हे कामाचा दर्जा हि घसरवतात.
६) काळानुसार आलेल्या अल्पकालीन लोकप्रिय फायदेशीर पद्धतीनुसार हुरळून जाऊ नका
ह्या व्यवस्थापन लहरीचा कालावधी हा फक्त ६ महिन्यांपूरता असतो. प्राध्यापक, आणि व्यवस्थापन विद्यापीठांमध्ये उल्लेखनीय योजना आणि आकर्षक सिद्धांत ह्यांचा आणि यशाचा काही संबंध नसतो.
एक जबाबदार व्यवस्थापक आपल्या दृष्टीकोनाबद्दल सतत चाचणी घेत असतो आणि प्रयोगशील असतो. शाळेमधील वादविवाद स्पर्धेत भाग घेणाऱ्या लहान मुलालादेखील माहित असते कि प्रत्येक प्रश्नाच्या कमीत कमी दोन बाजू असतात आणि जैन तर्कानुसार अनेकांतवादा म्हणजे अनेक बाजू असतात. आलेल्या परिस्थितीनुसार काय बरोबर आहे ह्याचा निर्णय घेणे हि समस्या असते.
७) नवीन विकासाच्या संधी सोडू नका
काही उद्योग स्वतःचे वर्णन करताना सांगतात कि त्यांना सखोल ज्ञान आहे. हे सगळेच उद्योजक बोलतात. जगातील सगळ्यात जुने उद्योग जे आता यशाच्या उंच शिखरावर आहेत तेही संधी गमावल्यामुळे अनेक अपयशाला सामोरे गेले आहेत.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार