मानसशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मानसशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


आयुष्य जगतांना आपल्या विरुद्ध असणाऱ्या व्यक्तीला शत्रू समजण्याची गरज नाही तर त्याला प्रतिस्पर्धी समजा. ह्यामुळे भले प्रतिस्पर्धी जरी असले तरी तुमचे मित्र जास्त बनतील व जे मर्यादा ओलांडतील ते आपोआप शत्रू. ह्या जगात सर्वच तुमचे मित्र नाही आणि सर्वच तुमचे शत्रू नाही, स्वतःला सेफ ठेवत आयुष्य जगा.


अश्विनीकुमार

जर तुम्ही एकदा हार मानली तर ती सवय बनते. हि सवय बदलण्यासाठी माझ्या मोफत ५ प्रमुख टिप्स.👇


 यशाचा प्रवास म्हणजे डोंगर चढण्यासारखा आहे. सुरुवात नेहमीच सर्वात कठीण असते. या आव्हानात्मक क्षणांमध्ये तुमच्या स्वप्नांप्रती असलेल्या तुमच्या वचनबद्धतेची खरी परीक्षा होते.


एकदा हार मानणे ही सवय बनते आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या आयुष्यापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही.


कोणत्याही परिस्थितीत दृढनिश्चयी मानसिकता विकसित करण्यासाठी आणि जिंकण्यासाठीची पाच प्रमुख रणनीती पुढीलप्रमाणे:


👉आव्हाने स्वीकारा: आव्हानांना प्रगतीच्या संधी म्हणून पहा. प्रत्येक अडथळा ही आपली कौशल्ये आणि चारित्र्य सुधारण्याची संधी असते. अडचणींचा स्वीकार करून त्यांचा सामना केल्या अडचणींचे रुपांतर यशाकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांमध्ये होते.


👉तुमच्या 'का' यावर लक्ष केंद्रित करा: तुमच्या उद्देशाचा अर्थ सुस्पष्ट करा आणि त्यावर तीक्ष्ण लक्ष केंद्रित करा. जेव्हा प्रवास कठीण होतो, तेव्हा 'का' सुरुवात केली हे लक्षात ठेवणं तुम्हाला पुढे जायला मदत करतं. ते तुमच्या दृढनिश्चयाला बळकटी देते आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती प्रदान करते.


👉सकारात्मक मानसिकता जोपासा: प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकतेची सोनेरी कडा पाहण्यासाठी तुमच्या मनाला प्रशिक्षित करा. सकारात्मक मानसिकता तुम्हाला अपयशातून शिकण्यास, बदलांशी जुळवून घेण्यास आणि इतरांना अडचणी येतात तेव्हा उपाय शोधण्यास सक्षम करते. तुमचा दृष्टिकोन ठरवतो तुम्ही आयुष्यात किती पुढे जाल ते.


👉स्वतःला सकारात्मकतेने वेढून घ्या: तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या समान विचारसरणीच्या व्यक्तींची एक सपोर्ट सिस्टम बनवा. सकारात्मक ऊर्जा संक्रामक आहे आणि कठीण काळात तुम्हाला प्रेरित ठेवण्यासाठी एक शक्तिशाली शक्ती असू शकते.


👉ध्येये विभाजित करा: तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या स्वप्नांचे व्यवस्थित मेनेज होऊ शकतील अश्या छोट्या ध्येयांमध्ये विभाजित करा. तुमच्या स्वप्नांना व्यवस्थापित करण्यायोग्य, छोट्या-मोठ्या ध्येयांमध्ये विभाजित करा. वाटेत छोटे विजय साजरे करा, कारण ते वेग वाढवतात आणि तुमचे  स्वप्न साध्य होण्यावर तुमचा विश्वास मजबूत करतात. प्रगती कितीही लहान असली तरी प्रगतीच असते.


लक्षात ठेवा, सुरुवात ही तुमच्या यशोगाथेतील फक्त एक अध्याय आहे. चिकाटी ठेवा, उत्साही रहा आणि पुढे जात रहा. तुमची स्वप्ने तुमच्या आवाक्यात आहेत आणि प्रवास हा ध्येयापर्यंत पोहचण्याइतकाच महत्त्वाचा आहे.


अगणित लोकांचे ध्येय आणि स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचे आणि प्रशिक्षण देण्याचे सौभाग्य लाभले आहे. गुरु, मार्गदर्शकाच्या मदतीने योग्य कौशल्ये अपग्रेड करून, अंतर्मनात दडलेली सुप्त शक्ती जागृत करून तुम्ही न समजलेली नवीन संधी उघडू शकता.



🌠मला फॉलो करा अश्विनीकुमार


सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण


#मानसशास्त्र #मानसिकता #आत्मविकास #प्रोस्ताहन #प्रेरणा #व्यक्तिमत्वविकास


Image by Rudy and Peter Skitterians from Pixabay

शेअर बाजार, उद्योग व्यवसायात चढ उतार होत असतांना तुम्ही तुमचे मन आणि भावना शांत ठेवायला शिकला असाल तर तुमच्या आयुष्यात संघर्ष अस्तित्वात नाही.


अश्विनीकुमार

 

तुम्ही शेअर ट्रेडिंग करा, उद्योग व्यवसाय करा किंवा इतर कुठलाही मार्ग तुम्ही ज्याने पैसा कमावता आहे तो करा पण एक कालावधी देत चला, हजारदा छोटे मोठे उतार चढाव येतील पण दीर्घकाळात तुम्हाला फायदाच मिळेल. धीर धरायला शिका.


काल मी पुण्यातील एका यशस्वी उद्योजकाला भेटलो ज्याची नेटवर्थ ₹३० कोटींपेक्षा कमी नाही आणि लहान इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या वितरणात आहे.


चर्चेदरम्यान, त्याने सांगितले की गेल्या १0 वर्षांत त्याने तीनदा शेअर बाजारात प्रवेश केला आहे आणि आतापर्यंत सुमारे ₹३ कोटी वाया गेले आहेत.


तो पुढे म्हणाले की जर मी हे शेअर्स फक्त पोर्टफ़ोलिओ मध्ये ठेवले जरी असते तर सध्याच्या मूल्यांकनानुसार ते जवळपास ₹१८ कोटी झाले असते.


मला त्याच्याबद्दल वाईट वाटले. शेअर बाजारातून प्रत्येकजण यशस्वी होऊ शकत नाही, संपत्ती निर्माण करू शकत नाही, श्रीमंत बनू शकत नाही.


तुम्ही हुशार उद्योजक, व्यवसायिक असू शकता पण तरीही तुम्ही वाईट गुंतवणूकदार होऊ शकता. आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे काम नाही.


भीती आणि लोभाची भावना उफाळून येणे सामान्य आहे पण ह्या भावनांद्वारे कृती करण्यापासून स्वतःला रोखणे हे सोपे काम नाही आणि हाच फरक एक यशस्वी गुंतवणूकदार आणि अयशस्वी गुंतवणूकदार मधला आहे.


हे तितके अवघड नाही आहे. सर्वात कठीण कार्य म्हणजे प्रथम मनात विचार करणे आणि मनात सोडवणे  की मला मध्येच शेअर्स विक्री करण्याची गरज नाही.


जास्तीत जास्त लोकांना क्षणात नफा हवा असतो म्हणून ते शेअर्स विकत घेतात पण काही शेअर्स मुळातच फंडामेंटली मजबूत असतात तरीही ते पर्वा करत नाही नंतर काही वर्षांनी त्यांना पश्चाताप होतो.


झाड लावल्यावर देखील ४, ५ वर्षे जातात व त्यानंतर ते फळ देत, ह्याचा अर्थ असा नाही कि आपण सतत जमीन खोदून आपण बी वाढत आहे कि नाही ते तपासात बसणार आहोत. अश्या कृतीमुले सुपीक जमिनीत देखील झाड वाढणार नाही.


तुम्ही शेअर ट्रेडिंग करा, उद्योग व्यवसाय करा किंवा इतर कुठलाही मार्ग तुम्ही ज्याने पैसा कमावता आहे तो करा पण एक कालावधी देत चला, हजारदा छोटे मोठे उतार चढाव येतील पण दीर्घकाळात तुम्हाला फायदाच मिळेल. धीर धरायला शिका.


धन्यवाद

अश्विनीकुमार

आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची?




ध्यान:

झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्याची गरज भासत नाही.

जर गाढ शांत झोप लागत नसेल तर पुढे मी ध्यानाचे तीन प्रकार सांगत आहेत ते फोलोव करा.



पहिला प्रकार

मन एकाग्र करणे म्हणजे श्वासावर, विचारावर, वस्तूवर किंवा जी कृती करून आपले मन एकाग्र होते ती कृती करणे.



दुसरा प्रकार

विचारांवर लक्ष्य केंद्रित करणे व सकारात्मक विचार करणे. जर नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना सकारात्मक विचारांनी बदलणे.



तिसरा प्रकार

तुम्हाला तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष्य केंद्रती करायचे आहे. कल्पना करायची आहे कि प्राण उर्जा किंवा कॉस्मिक उर्जा हि तुमच्या शरीरातून वाहत आहे.



तुमच्या क्षमतेनुसार, मर्यादेनुसार ध्यान करा.



काहींना एक मिनिट पुरेसा आहे तर काहींना एक दिवस.



व्यायाम :



जिथे शारीरिक हालचाल होते त्याला व्यायाम बोलतात.



व्यायाम हा फक्त शारीरिक हालचालींशी निगडीत नाही तर मन आणि शरीर ह्यांचे मिलन आहे.



काहींना गैरसमज असतो कि व्यायाम बोलले कि फक्त शारीरिक हालचाल बाकी काही नाही.



योग, धावणे (जागेवर देखील धावू शकता.), सूर्यनमस्कार, पुश अप व इतर व्यायाम प्रकारांचा तुम्ही वापर करू शकता.



व्यायामाचे प्रकार असे निवडा कि ज्यामुळे सर्व शरीराचा व्यायाम झाला पाहिजे. दररोज व्यायाम करायची सवय लावून घ्या.



आहार : स्थानिक ऋतूनुसार जे पिकते तोच आहार घ्या. आहार सहसा बदलू नका. आहार तुमची पचनसंस्था मजबूत ठेवतो. परदेशी आहारापासून लांब रहा. चिभेचे चोचले पुरवू नका.



आजू बाजूचे वातावरण / सहवास : तुमच्या आजू बाजूचे वातावरण हे सकारात्मक पाहिजे. तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात राहत आहात ती लोक सकारात्मक, मुक्त मनाची, कामी येणारी आणि प्रोस्ताहन देणारी पाहिजे.



किती सोपे आहे हे तुम्हाला समजलेच असेल. आता ह्या क्षणापासून कायमस्वरूपी सवय लावून घ्या. जर स्वताहून सवय लागत नसेल तर तुम्ही प्रशिक्षक ची सेवा घेवू शकता. फुकटच्या नकारात्मक मित्रांच्या समूहापेक्षा एक व्यवसायिक फी घेणारा प्रशिक्षक कधीही चांगला. यशस्वी लोकांकडे मित्र कमी आणि प्रशिक्षक जास्त असतात.



धन्यवाद

अश्विनीकुमार


मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत


सवा कोटी मुंबई च्या लोकसंख्येत एकटेपणा का जाणवतो?



मुंबई ची लोकसंख्या सवा कोटी. उच्च पदावर कामाला. दररोज लोकांच्या संपर्कात. सर्व व्यवसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी तरीही एकटेपणा का जाणवतो? कोणीच आपल्याला समजून घेवू शकत नाही हि भावना का उत्पन्न होते? अशी कसली मानसिक अवस्था निर्माण होते ज्यामुळे एकटेपणा जाणवतो? हा एकटेपणा फक्त त्या व्यक्तीलाच का जाणवतो? इतर समजून घेण्यात कमी पडतात का?

असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. चला मानले कि इथे बाह्य स्वरूप म्हणजे सुंदरता महत्वाची असेल पण जे सुंदर आहेत जे देखणे आहेत त्यांना देखील एकटेपणा का जाणवतो?

मितभाषी असणे, कमी बोलणे, लोकांमध्ये न मिसळणे हा स्वभाव असेल आणि ती व्यक्ती स्वतःची कंपनी इंजोय करू शकत असेल तर काही समस्या नाही. हा स्वभावाचा भाग झाला पण चार चौघात मिसळून, राहून एकटेपणा जाणवणे, कोणी आपलेसे न वाटणे हा मानसिक आजार तर नाही पण त्या व्यक्तीला भावना व्यक्त करता आली नाही किंवा तिला जसे जगायचे आहे तसे जगता आले नाही किंवा भूतकाळात अशी काही घटना झाली असेल ज्यामुळे तिला अजून त्रास होत असेल हे जेव्हा समुपदेशन होईल तेव्हाच मी सांगू शकेन.

आताची जीवनशैली देखील अशी केली गेली आहे कि एकटेपणा शिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही. कारण जिथे काम करतो तिथे जर जवळीक निर्माण केली तर गैरफायदा उचलला जातो जसे एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लोक भीतीने कुणाच्याही अंगावरून पळून जाण्यास पाठी पुढे बघत नाही तशी स्पर्धा विनाकारण निर्माण केली गेली आहे. ह्यामुळे देखील एकटेपणा जाणवतो.

काहींचे संगोपनच असे गेले असते कि खूप कमी लोक त्यांच्या संपर्कात आलेले असतात, त्यांना चार चौघात किंवा जगात कसे वावरायचे ह्याबद्दल संस्कार भेटलेले नसतात त्यामुळे त्यांना एकटेपणा येतो.

ह्यापैकी काही लोकांचे असे असते कि चुकून कोणीही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांना वाटते कि जग असेच आहे. मग हळू ती ती व्यक्ती त्यांचे शोषण करायला लागते, त्यांना वाटते कि हे प्रेमात असे चालते, विश्वासात मैत्रीच्या नात्यात असे चालते, मग शोषण हळू हळू वाढत जाते आणि जेव्हा अतिरेक होतो तेव्हा ती लोक जागे होतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशी लोक नवीन नातेसंबंध नाकारतात.

मी वर स्पष्ट केल्याप्रमाणे स्वभाव असेल आणि त्याचा मानसिक शारीरिक आरोग्यावर काही परिणाम होत नसेल तर ठीक आहे कारण अशी लोक त्यांच्या स्वभावानुसार आयुष्य इंजोय करतात, त्यांना ते एकटेपणात जे काही करतात त्याच्यात आनंद वाटतो, किंवा नुसते झोपले तरी काही समस्या नाही.

पण जिथे अंतर्मनात मानसिक शांती नसते ती लोक काय करत असतील? ती लोक काही ना काही मनोशारीरिक आजार निर्माण करतात ज्यामुळे कारण मिळते व डॉक्टर कडे जावून आपले मन मोकळे करण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांना देखील त्यांच्या मानसिकतेची कल्पना नसते, ते उपचार करतात, थोडे बोलतात व विषय तिथे संपून जातो मग परत आजारपणाचे चक्र सुरु होवून जाते.

जर त्यांना वाटले कि डॉक्टर देखील लक्ष्य देत नाही, आपण सतत जात असतो म्हणून डॉक्टर देखील आपल्याला महत्व देत नाही असे त्यांना वाटते आणि हे स्वाभाविकच असेल कारण शारीरिक रोगांवर इलाज करणारे डॉक्टर असतात त्यामुळे त्याचे लक्ष्य हे शारीरिक आजार बरे करण्यावरच असते. मानसिक आजारांचे डॉक्टर वेगळे असतात आणि तिथे उपचार पद्धती हि वेगळी असते. मग ह्या गैरसमजेतून ते मनोशारीरिक आजाराचे शारीरिक आजारात रुपांतर करतात आणि आजारपण वाढवतात.

आपला मेंदू खूप काही करू शकतो त्यापैकी एक आजारपण देखील निर्माण करू शकतो. तुम्ही एकलेच असेल कि किती चांगला आनंदी व्यक्ती होता पण अचानक सोडून गेला? त्याचे मुख्य कारण मानसिकच होते, जर ह्या मानसिकतेवर वेळेवर उपचार झाले असते तर त्या व्यक्तीचा जीव वाचवता आला असता.

आता इथे देखील स्त्री पुरुष भेदभाव वाढला आहे. जो तो येतो तो स्त्रियांकडे लक्ष्य देतो आणि पुरुषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष्य केले जाते. अनेक अध्यात्मिक गुरु देखील स्त्रियांना महत्व देतात आणि पुरुषांकडे दुर्लक्ष्य करतात. हे भांडवलशाही युगात प्रमाण वाढले आहे. जर भर रस्त्यात स्त्री रडली कि सगळे तिचे अश्रू पुसायला जातात आणि पुरुष रडला कि हसतात, हो हा आपला सुसंकृत समाज आहे. स्त्रियांची सांत्वना करण्यास अनेक पुरुष आणि स्त्रिया पुढे सरसावतील पण पुरुषांची सांत्वना करण्यात कोणीही पुढे येणार नाही आणि आले तरी खूप कमी स्त्री पुरुष पुढे येतील.

तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखी मानसिक समस्या अनेकांना आहे फक्त ते तुम्हाला समजून येणार नाही. जेव्हा व्यक्ती माझ्याकडे येते आणि स्वतःला व्यक्त करते तेव्हा समजते कि ती किती मोठ्या मानसिक आणि शारीरिक समस्येने ग्रस्त आहे म्हणून नाहीतर त्यांचे बाह्य स्वरूप हे सामान्यच दिसून येते. असेच काही गुन्हेगारांचे देखील आहे,ते आपल्या आजूबाजूला असतात पण आपण ओळखू शकत नाही, जेव्हा ते आपली शिकार करतात तेव्हा आपल्याला त्यांचे खरे स्वरूप समजून येते.

मी हे नाही बोलत कि सतत चारचौघात रहा किंवा सर्व कार्यक्रम समारंभ अटेंड करा, माझे म्हणणे इतके आहे कि जो एकटेपणा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत आहे त्यामधून बाहेर पडा आणि नंतर तुम्हाला पाहिजे तसे आयुष्य जगा. जर तुम्ही समस्येत आहात तर हाच एकटेपणा जीवघेणा ठरू शकतो त्यापेक्षा नेहमी तज्ञांची मदत घेतलेली बरी. जरी कोणी नसले तरी तज्ञ तुम्हाला मदत करू शकतात.

जर आपण कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मानसिक समस्येतून जात असाल, किंवा तुमचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण झाले असेल तर बिनधास्त व्यक्त व्हा, मी जज करत नाही कारण मला वास्तव माहिती आहे आणि तुम्ही ज्या समस्येतून गेला आहात त्या समस्येतून अनेक लोक गेली आहेत किंवा जात आहेत. आणि अनेकांनी अश्या समस्यांमुळे निर्माण झालेल्या मानसिक आणि शारीरिक आजारांवर मात करत आयुष्यात नवीन सुरवात केलेली आहे.

कृपया hi hello किंवा good morning चे मेसेज पाठवू नका, सरळ विषयावर या.

लेख कृपया नावासकट शेअर करण्यात यावा. मी मनोरंजन आणि ग्राहक मिळवण्यासाठी लेख नाही लिहित आहे तर लोकांचे जीव वाचावे ह्यासाठी लिहित आहे, ह्याच लेखांमुळे अनेक आत्महत्या करणार्यांपैकी एक आत्महत्येचा विचार सोडून परत आपले आयुष्य पुनर्जीवित करत आहे. पैसा देखील महत्वाचा आहे पण जेव्हा व्यक्तीचा जीव वाचला जातो तेव्हा मिळणारे समाधान शब्दात नाही सांगू शकत. अनुभवला पर्याय नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1