सुमारे 85% श्रीमंत स्वयंनिर्मित आहेत.

 - नशीबामुळे नाही

- प्रतिभामुळे नाही

- श्रीमंत घरात जन्मले म्हणून नाही


ते त्यांच्या सवयींमुळे करोडपती आहेत.


या 8 सवयी तुम्हाला करोडपती बनवतील:


1. दररोज किमान 30 मिनिटे वाचन करा.


वाचनामुळे तुमचे मन चौकटीमधून मुक्त होते. नवीन माहिती आणि ज्ञान मिळते. सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होते.


वाचन हे ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम आणि स्वस्त मार्ग आहे.


विविध प्रकारची पुस्तके वाचा:


- आत्म-विकास (मानसिक आणि अध्यात्मिक)

- यशस्वी व्यक्तींची आत्मचरित्र

- उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक


2. फक्त ज्ञान मिळवत बसू नका, कृती करा, अंमलात आणा.


कृती केल्या शिवाय, अंमलात आणल्याशिवाय तुम्ही मिळवलेले ज्ञान व माहिती तुम्हाला शून्य फायदा/लाभ देईल.


जेव्हा तुम्ही प्रयत्न करून अयशस्वी होतात तेव्हा तुम्ही सर्वात जास्त शिकता.


त्यामुळे प्रयत्न करून अपयशी होण्यास घाबरू नका.


3. स्वत: मध्ये गुंतवणूक करा.


स्व-गुंतवणूक तुम्हाला कोणत्याही स्टॉक किंवा मालमत्तेपेक्षा अधिक ROI देईल.


यामध्ये सातत्याने गुंतवणूक करा:


- पुस्तके

- मार्गदर्शक, गुरु

- अभ्यासक्रम, कोर्सेस


हीच सवय तुम्हाला ९८% लोकांच्या पुढे घेऊन जाईल.


4. सखोल आणि लक्ष केंद्रित काम/कार्य.


काही तासांचे अविचलित काम करणे अत्यंत आवश्यक आहे.


- 3 अग्रक्रमाचे काम/कार्य लिहा

- तुमचा फोन एअरप्लेन मोडवर ठेवा

- काही चांगले संगीत ऐका

- तुम्ही काम/कार्य पूर्ण करण्यापूर्वी उठू नका


हे तुम्हाला 8 तासांचे काम/कार्य अवघ्या 4 तासात पूर्ण करण्यास मदत करेल.


5. तुमच्या वेळेचा मागोवा ठेवा. ट्रेक रेकोर्ड ठेवा.


वेळ ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे.


श्रीमंत लोकांना वेळेचे महत्व माहिती आहे आणि म्हणून ते नेहमी त्यांच्या वेळेचा हुशारीने/सुज्ञपणे वापर करण्याचा प्रयत्न करतात.


तुम्ही तुमचा वेळ कुठे घालवत आहात याचा मागोवा घ्या, ट्रेक करा आणि जिथे तुमचा वेळ वाया जातो ते सर्व रस्ते कायमस्वरूपी बंद करा.


6. तुमचे शरीर आणि मन असे दोन्हींवर काम करा.


तुमच्या यशासाठी तुमचे शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.


तुमचे मन विकसित/उन्नत करण्यासाठी:


- ध्यान करा

- प्रश्न विचारा

- ज्ञान मिळवा


आपल्या शरीराची विकसित/उन्नती करण्यासाठी:


- व्यायाम

- बाहेर फिरायला जा

- सर्व हानिकारक अन्न काढून टाका


7. दिनचर्या/नित्यक्रम ठरवा.


दिनचर्येची/नित्यक्रमाची शक्ती अत्यंत अत्यंत कमी दर्जाची समजली जाते.


हे तुम्हाला बनवते:


- अधिक कार्यक्षम

- तणाव कमी होतो

- स्वयं चालना निर्माण होते


जीवनात सातत्य निर्माण करण्यासाठी दररोज एकाच वेळी झोपा आणि जागे व्हा.


8. दररोज कृती करा/ दिसू द्या.


जे दिवस तुम्हाला सोडून द्यावेसे वाटतात तेच दिवस सर्वात जास्त मोजले जातात.


दररोज कृती करा/ दिसू द्या आणि काही आठवड्यांनंतर हार मानू नका.


दृढनिश्चय, चिकाटी आणि संयम बाळगा. धीर धरा.


तुम्ही शेवटपर्यंत पोहोचला आहात!


वाचल्याबद्दल धन्यवाद!


जर तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल, तर कृपया:


1. फोलोव करा 

इंस्टाग्राम : udyojakghadwuya

युट्युब : @udyojakghadwuya

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


2. हि पोस्ट शेअर करा.


धन्यवाद
अश्विनीकुमार