आपल्या महाराष्ट्रात अनेक असे चविष्ट पदार्थ आहेत ज्यांची बर्गर किंवा पिझ्झा विक्री सारखी शहरातील मोक्याची आणि घनिष्ट रहदारीची जागा निवडून जगभरात उपहारगृहांची (रेस्टॉरन्ट) साखळी निर्माण करून अब्जो रुपये कमवू शकतो आणि हि शक्यता नाही आहे कारण अगोदरच पश्चिमेकडील उपहारगृहे तेवढे रुपये कमवत आहेत. न्यूनगंड झटका आणि लागा कामाला. छोटा विचार करणे हा गुन्हा आहे.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


आजारपण, हॉस्पिटल, औषध बनवणार्या कंपन्या, मनुष्याचा जीव आणि भांडवलशाही

औषध बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा कधी होईल? आजार बरा झाल्यावर कि आजार परत परत होत राहिल्यावर?

मी जर डेंगू वर औषध बनवत असेल तर जर शासनाने डेंगूचे संपूर्ण उच्चाटन केले तर माझा उद्योग चालेल कसा?

सरकारी हॉस्पिटल्स का कमी आहेत? कारण खाजगी हॉस्पिटल्स नि नफा कमवावा म्हणून.

आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेनुसार हृद्य विकाराने मृत्यू होणार्यांची संख्या हि खूप जास्त आहे. भारताची लोकसंख्या २०१३ च्या आकड्यानुसार १२५.२० करोड आहे असे समजू, ह्यानुसार हृद्य विकारामुळे दर ३३ सेकंदाला एकाचा मृत्यू हा होत असतो.हे वास्तव आहे, आकडे सगळे सरकारी आणि निम सरकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. "६,२०,००० करोड आकड्यात सहा लाख वीस हजार करोड रुपयांची उलाढाल हि हृद्य रोग संबंधी आजार, केंसर, तीव्र श्वसन रोग, आणि मानसिक आजार ह्यांची आहे."

संशोधनावरील खर्च कमी करण्यासाठी माणसांवर प्रयोग करावे लागतात त्यासाठी आपला देश हा उत्तम आहे कारण इथे गरिबी, बेकारी खूप आहे आणि भ्रष्ट शासनव्यवस्था पण ज्यामुळे कंपन्या आपली उत्पादने हि खूप कमी वेळात खर्च वाचवून बाजारात उपलब्ध करून देतात. इथले नागरिक हे भावनिक असल्यामुळे ते समोरच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतात. त्यामुळे समोरचा जसा नाचवत जाईल तसे ते नाचत जातात, भले ह्यामध्ये त्यांचा जीव गेला तरी त्यांना काहीही फरक पडत नाही.

तुम्ही फक्त उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीचे हिमनगाचे फक्त टोक बघितले आहे, त्याखाली ते कसे काम करते ह्याचा बिलकुल अंदाज नाही आणि येणारही नाही. जे डॉक्टर ह्या व्यवस्थेनुसार चालतात किंवा मजबुरीने चालवून घेतात ते सामान्य जीवन जगतात आणि जे ह्या विरुद्ध उभे असतात ते गरीबीचे जीवन जगत असतात आणि तोच इमानदार आणि सभ्य समाज अश्या डॉक्टर पासून लांब जातो.

हॉस्पिटल मध्ये पाय ठेवला कि त्यांना अगोदरच टार्गेट असते कि इतका नफा झाला पाहिजे किंवा आलेल्या पेशंट कडून इतका पैसा निघालाच पाहिजे तेव्हा तेही मजबूर असतात. शेवटी त्यांनाही जीवन जगायचेच असते. आज जर त्यांनी काम नाही केले तर त्यांचे घर चालणार कसे? औषधे आता इतकी महत्वाची केली आहे कि आम्ही मनुष्य प्राणी ह्यांनी तीच खात जगत रहावे. बाकी ताजी फळे-भाज्या ह्याच्यामधून आम्हाला काहीच भेटत नाही. बाळंतीन स्त्री नैसर्गिक रित्या बाळ जन्माला घालूच शकत नाही, तिला सिझरिंग च करावे लागेल.

लोक भावनिक मुद्दे जसे जात, पात धर्म, प्रदेश बोलीभाषा ह्या मध्ये इतके गुंतलेले आहे कि त्यांना आपल्या जिवापेक्षा हे मुद्दे खूप महत्वाचे वाटतात आणि त्यासाठी ते रस्त्यावरही उतरायला तयार असतात. अश्याच सामान्य लोकंच्या जीवनशैलीचा फायदा घेत अनेक मोठ मोठ्या हॉस्पिटल्स, औषध बनवणार्या कंपन्या आणि नकली औषध बनवणार्या कंपन्यांचे मोठ मोठे केसेस दाबून टाकेल जातात. लोक आपला हजारो वर्षांचा इतिहास गर्वाने सांगतील पण ८ महिन्यापूर्वी झालेल्या पोलीस कारवाईचे त्यांना अ कि ब असे काहीच आठवणार नाही.

इथे कुपोषणाने दररोज मरणाऱ्या शेकडो गरिबांच्या बाळांसाठी बातमी देण्यासाठी वृत्त वाहिन्यांना वेळ नाही पण एका प्रसिद्ध कलाकाराच्या घरी जन्माला येणाऱ्या एका बाळासाठी दिवस, आठवडे आणि महिने खर्च करतील. आणी ह्याच बातम्या सामान्य, सभ्य, इमानदार आणि सरळ मार्गाचा मुखवटा घेवून चालणारा समाज हा डोक्यावर घेईल. जशी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समाजाला सवय झाली आहे तशीच गरिबांच्या मरण्याची देखील झाली आहे.

भ्रमाचा मुखवटा फाडा आणि ह्या वास्तवात ताठ मानेने कसे जगू शकाल ह्याबद्दल विचार करा. कोणीही तुमचे घर चालवणार नाही, कोणीही तुम्हाला पोसणार नाही, तुमचे तुम्हालाच बघायचे आहे. भावनिक दृष्ट्या कणखर बना, ह्यामुळे तुम्ही जग नाही तर एखादा तरी जीव वाचवू शकता किंवा भले करू शकता आणि हाच आनंद अब्जोंच्या घरात आहे. कमेंट योध्यांपासून लांब रहा, जे नुसते कमेंट कमेंट खेळत असतात. एकदा का तुम्हीं त्यांच्यात गुंतला की संपूर्ण दिवस हा तुमचा खराब निघून जातो.

बोध :
भांडवलशाही मध्ये मनुष्याच्या जिवापेक्षा कंपनी आणि सत्ताधारी ह्यांचा नफा हा खूप महत्वाचा आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


आता जे ध्येय गाठले गेले आहे ह्याचा अर्थ असा नाही होत कि ते काल विचार केला आणि आज ध्येय गाठले. ह्यासाठी अनेक महिन्यांची, वर्षांची खडतर तपश्चर्या लागते.
४० वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध हावर्ड युनिवर्सिटी ने १९५३ साली आकडे काढायला सुरवात केली कि पदवीच्या शेवटच्या वर्षातील किती विद्यार्थ्यांनी आपले ध्येय स्पष्ट पणे लिहून ठेवले होते आणि ते ते साध्य करण्यासाठी योजनाही आखून ठेवली होती ह्यावर संशोधन करायचे ठरवले आणि माहिती गोळा करायला सुरवात केली. हे विद्यार्थी एका जगप्रसिद्ध युनिवर्सिटी मधले विश्वातील अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते, ह्यामुळे तुम्हाला वाटत असेल कि ह्यामधील सर्वच किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे उत्तर हे सकारात्मक असेल, बरोबर?
तुमचे उत्तर साफ चुकीचे आहे. वास्तवमध्ये संपूर्ण वर्गामधून फक्त ३ टक्के विद्यार्थ्यांनीच आपले ध्येय, स्वप्न लिहून ठेवले होते. आता ह्या संशोधनाचा महत्वाचा भाग सुरु होणार आहे. २० वर्षांच्या कालावधीनंतर संशोधकांनी परत ह्या विद्यार्थ्यांचे आकडे गोळा करायला सुरवात केली. ह्या मध्ये असे आढळून आले कि ज्या ३ टक्के विद्यार्थ्यांनी आपले ध्येय आणि स्वप्न लिहून ठेवली होती त्यांनी ९७ टक्के विद्यार्थ्यांनि कमावलेल्या एकूण संपत्ती पेक्षा जास्त संपत्ती कमावली होती. संशोधकांनी अजून एक नमूद केली होती कि हे ३ टक्के विद्यार्थी उरलेल्या ९७ टक्के विद्यार्थ्यांपैकी जास्त निरोगी आणि आनंदी होते.
मी जेव्हा तणावात गेल्यावर आयुष्यात सर्वांगीण अपयशी झाल्यावर जेव्हा आत्मविकासात गुंग झालो होतो तेव्हा हे संशोधन माझ्या नजरेस आले होते आणि त्यावेळेस मला समजले होते कि आपले ध्येय आणि स्वप्न पूर्ण करणे हे इतके सोपे होते.
मग मीही माझे ध्येय आणि स्वप्ने लिहून ठेवायला सुरवात केली. इतरांपेक्षा मला जास्त वेळ लागला पण ती ध्येय आणि स्वप्ने माझी पूर्ण झाली. तेव्हा मला जाणवले कि आपली ध्येय आणि स्वप्ने हि दररोज न चुकता लिहून ठेवणे हे काही महिन्यांनी किंवा वर्षांनी फळ देतेच.
जरुरी नाही कि तुम्ही माझ्यासारखीच ध्येय आणि स्वप्ने हि लिहून ठेवली पाहिजेत. प्रत्येक मनुष्य हा ह्या जगामध्ये विशेष असतो, त्याची ध्येय आणि स्वप्ने हि वेगवेगळी असतात, त्याच्या मानसिक आणि शारीरिक गरजाही ह्या वेगवेगळ्या असतात, आणि खाजगी आयुष्यातील ध्येय आणि स्वप्ने हि तज्ञ व्यक्तींशिवाय कधीच दुसऱ्या व्यक्तींना सांगायची नाही.
ह्या दररोजच्या छोट्याश्या कृतीद्वारे तुम्ही पाहिजे ते मिळवू शकता. आपली अनेक ध्येय आणि स्वप्ने हि पूर्ण करू शकता.
धन्यवाद
अश्विनीकुमार
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


नदी कधीही कुणाला समुद्र किती लांब आहे हे विचारत नाही. ती वाहतच जाते आणि शेवटी समुद्राला मिळते. तुम्हीही कधीही तुमचे ध्येय आणि स्वप्न किती लांब आहे ते विचारू नका, सतत प्रयत्न करत राहा, अश्याने तुम्हाला तुमचे ध्येय भेटेलच आणि स्वप्न पूर्ण होतीलच.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


शिक्षित होणे सोपे आहे, प्रशिक्षित होणे देखील सोपे आहे. पण प्राविण्य मिळवणे कठीण आहे.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

यशस्वी होण्याची ९ रहस्य



एका गरीब घरच्या तरुणीने एकदा मला प्रश्न केला कि “मी यशस्वी कशी होणार?” “यशस्वी होण्यासाठी मला कुठल्या मार्गाचा अवलंब करावा लागे?”
मला त्यावेळेस काही सुचले नाही. पण हा प्रश्न काही मला शांत बसवत नव्हता. कारण गरीब लोकांचे चांगलेच अनुभव गाठीशी होते. गरिबांना कधीच कोणी माणुसकीच्या नजरेने बघत नाही, अर्थात अपवाद असतात पण त्यांही संख्या अगदीच नगण्य असल्यामुळे ती असून नसल्यासारखी आहे.
मला अगदी कमी शब्दात आणि सामान्य गरीब, मध्यम वर्गीय ह्यांना समजेल अश्या भाषेत आणि उदाहरण देवून सांगायचे होते. त्यासाठी माझा खजिना म्हणजेच पुस्तके, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेखक आणि शास्त्रज्ञांचा भरणा आहे ती परत चाळायला सुरवात केली.
मला माहित होते कि हीच पुस्तक रुपी खजीण्यामधील हजारो रुपयांची गुंतवणूक मला पुढे जावून लाखो रुपयांचा फायदा करून देईल, आणि दिलेच. अर्थात आवड होती आणि पाहिजेच, मी पुढे स्पष्ट करेन.
यशाची ९ रहस्य
१) आवड : ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रीयल डिझायनर फ्रीमन थोमस ने सांगितले आहे कि “मी मला जे आवडेल तेच करत गेलो”. जेवढी यशस्वी व्यक्तिमत्व होवून गेले आहे ते त्यांना जे आवडेल किंवा जे करण्यापसून त्यांना आनंद भेटत होता तेच ते काम करत होते, ना कि पैश्यांसाठी.
२) केरोल कोट्टा कम्युनिटी एन्ड नेशनल इनिशेटीव्ह चे उपाध्यक्ष ह्यांनी सांगितले “मी जे करतो ते करण्यासाठी मी दुसऱ्यालाही पैसे देईल.” आणि महत्वाचा मुद्दा जर तुम्ही तुमच्या आवडीचे करत आहात तर पैसा आणि प्रसिद्धी आपोआप तुमच्याकडे येईल.
३) रुपर्ट मरडॉक ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांचे मालक सांगतात “काहीही सप्या मार्गाने भेटत नाही, कठीण परिश्रम करावे लागते. पण मला हे करताना मजा वाटते.” हो मजा वाटते हे तुम्ही बरोबर ऐकले, तुम्ही तुमचे आवडीचे काम करता तेव्हा ते काम करताना तुम्हाला आनंद होतो व मजा येत असते.
४) एलेक्स गार्डनर म्हणतो “जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमचे नाक क्ष्याम्ध्ये तरी खुपसून बसावे लागेल, आणि त्यामध्ये प्राविण्य मिळवावे लागेल. इथे काही चमत्कार वगैरे नाही आहे, आहे ते फक्त सराव, सराव आणि सराव.”
५) लक्ष्य केंद्रित करा. नॉर्मन फ्रेडरिक केनेडियन फिल्म सेंटर चा संस्थापक, डायरेक्टर, नट आणि प्रोड्युसर म्हणतो “माझ्या मते तुम्हाला एका वेळेस एकाच कामावर लक्ष्य केंद्रित करावे लागेल.”
६) पुढे जायला सतत प्रेरित करत रहा. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वतला पुढे जायला प्रेरित करत रहावे लागते. तुम्हाला लाजाळूपणा आणि स्वतःविषयी अविश्वास ह्याच्या पलीकडे जाण्यासाठी प्रेरित करत रहावे लागेल.
७) गोल्डी होण अमेरिकन नटी म्हणते “मी नेहमी स्वतःवर अविश्वास दाखवायची. कि मी हे काम करू शकत नाही, मी हुशार नाही आहे, मला नाही वाटत कि मी हे करू शकते म्हणून.”
कधी कधी स्वतःला प्रोस्ताहित करणे इतके सोपे नसते. त्यासाठी आईचा अविष्कार करण्यात आला.
८) फ्रेंक गेरी अमेरिकन आर्किटेक म्हणतो “माझी आई मला प्रोस्ताहित करत होती.”
९) सेवा करा. शेर्विन न्युलंड अमेरिकन सर्जन आणि रायटर म्हणतो “डॉक्टर म्हणून सेवा करणे हा माझ्यासाठी बहुमान आहे.”
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे २ मार्ग आहेत, पहिला मला २००० रुपये फी देवून वरील ९ रहस्य आत्मसात करून घ्याल, आणि दुसरा स्वतःहून हे वरील ९ रहस्य आत्मसात करायचा प्रयत्न करा आणि यशवी व्हा.
जीवनात सर्वकाही शक्य आहे. जर वरील ९ व्यक्तिमत्व यशस्वी होऊ शकतात तर तुम्ही पण होऊ शकता. बिनधास्त प्रयत्न करा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

कधी काळी इंटरनेट हा सामान्य लोकांचा आवाज होता ज्यावर गर्भ श्रीमंत, बेईमान आणि सत्ताधारी लोकांचा वावर नव्हता

कधी काळी इंटरनेट हा सामान्य लोकांचा आवाज होता ज्यावर गर्भ श्रीमंत, बेईमान आणि सत्ताधारी लोकांचा वावर नव्हता
कधी काळी इंटरनेट हा सामान्य लोकांचा आवाज होता ज्यावर गर्भ श्रीमंत, बेईमान आणि सत्ताधारी लोकांचा वावर नव्हता. आम्हाला त्यावेळेस २ मोठ्या सोशल नेटवर्किंग साईस्ट प्रमोट करायचे पैसे मिळायचे. एका जुन्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटची एकाधिकारशाही नव्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट ने मोडीस काढली. हे चालूच असते, कोणी येणार, कोणी जाणार.
भारतात सोशल नेटवर्क साईट ला जास्त मागणी ह्यासाठी आली की लोकांच्या भावना परंपरा, संस्कृती आणि जुने विचार ह्यामुळे ते साधे घरच्या जवळच्या लोकांसमोरही व्यक्त होऊ शकत नव्हते ते फेक अकाउंट बनवून आपले नाव लपवून व्यक्त होऊ लागले, आणि आता काळ बदलण्याने नाव आणि फोटोसकट व्यक्त होऊ लागलेत. सामान्य लोक इंटरनेट आणि सोशल नेटवर्क चा गर्भ श्रीमंत, सत्ताधारी आणि बेईमान लोकांविरुद्ध वापर करू लागली.
ह्याची चुणूक ह्या ताकदवर श्रीमंत लोकांना लागली, ज्याच्याकडे पैश्यासोबत सत्ता आहे तो काही मूर्ख नाही आहे. शालेय शिक्षणात जरी ते शून्य असतील किंवा पैसे देऊन पास झाले असतील तरी आयुष्याच्या शिक्षणात ते उच्च शिक्षित असतात. आणि ह्या सोशल नेटवर्क चे मालक पण फक्त पैसा कमावण्यासाठी बसले असतात. सत्ताधारी श्रीमंत पैसे देऊन आपला प्रचार, आपले खोटे कसे खरे आहे, सत्य पूर्णपणे दडपून टाकायचे आणि सत्य असलेच तरी फक्त मनोरंजन पोहचू द्यायचे लोकांपर्यंत.
जी कमजोर मानसिकतेची लोक असतात ज्यांना सामान्य, मध्यम वर्गीय (लाचार) समजूया ज्यांना प्रत्येक वेळेस मदतीची गरज असते ते एक विशिष्ट विचारसरणीकडे (धर्म, देश, प्रदेश, भाषा, राहणीमान व इतर) किंवा जे काही समूह बांधण्यासाठी गरजेचे असते (ह्याला शास्त्रीय म्हणजेच वैज्ञानिकांच्या भाषेत ब्रेनवॉश म्हणतो) अश्या परिस्थिती कडे आकर्षित होतात.
ते काही विचार न करता आंधळेपणाने नैतृत्व बोलेल ते करतात आणि त्यांच्या मुलांनी जर मर्यादा ओलांडायची बोलले तर त्यांनाच पाय त्यांच्या आई वडील, मित्र मंडळी यांच्याकडून जोरदार खेचले जातात म्हणून सगळ्या आत्मविकासाच्या पुस्तकात (गीता, कुराण, बायबल व इतर धर्मीय धार्मिक पुस्तके ही पण आत्मविकासाची पुस्तके आहे, फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे आणि काय घेतले पाहिजे काय सोडले पाहिजे हे समजायला हवे. मी "नास्तिक" आहे हे तुमच्या माहितीकरता इथे नमूद करतो).
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मानसिक दृष्ट्या सक्षम लोक आदरयुक्त असतात, पण त्यांचा गैरफायदा घेतला की ते पहिल्याच चुकीमध्ये शहाणे होतात किंवा समोरच्याला सोडत नाही कारण त्यांना माहीत असते की एकाने गैरफायदा घेतला आणि त्याला माफ केले तर बाकीचे पण गैरफायदा घेऊ शकतात, आणि समाजात तुमचा दरारा गेला की लोक तुम्हाला इज्जत देत नाही.
असो हा सामाजिक इतिहासाचा अभ्यास संशोधन, आत्मविकास आणि मानसशास्त्राचा भाग थोडा बाजूला ठेवूया आणि मूळ मुद्द्याकडे येउया. आता जेव्हा तुम्ही बघाल तर सामान्य लोकांचे हत्यार इंटरनेट आणि सोशल नेटवर्क हे आता संपूर्णपणे भांडवलशाही, सत्ताधारी लोकांच्या हातात गेले आहे. आता फक्त मनोरंजनासाठी ह्याचा उपयोग होत आहे. त्यांच्या प्रत्येक जाहिरातीला लाखोंच्या वर लाईक आहेत आणि हे लाईक पण काही वेळेतच भेटतात.
काळ कुठचाही असू द्यात, वर्चस्व फक्त आणि फक्त श्रीमंत आणि सत्ताधारी यांचेच राहिले आहे. जगामधील मीडिया आणि भारतामधील 70 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मीडिया ही एकाच्या मालकीची आहे. ह्याला बोलतात अप्रत्यक्ष हुकूमशाही. जगातील कुठल्याही देशामध्ये जा, तिथे सामान्य लोकांची संख्या ही लाखो आणि करोडोंमध्ये असते, तुम्ही पण इतक्या मोठ्या समूहाला ताब्यात ठेवू शकता कारण ह्या सामान्य लोकांच्या समूहाला नेहमीच एक नैतृत्व लागते आणि तुम्ही त्या नैतृत्वाला काबूत केले की आपोआपच हा संपूर्ण समूह तुमच्या ताब्यात येईल. समूहाचं नाही तर त्यांच्या सात पिढ्यासुद्धा, कारण त्यांनी त्यांच्या मुलांना लहानपणापासून तीच शिकवण दिलेली असते.
एक सामान्य उद्योजक, व्यवसायिक ह्याला त्याच्या पेज किंवा पोस्ट ला लाईक मिळवायला खूप मेहनत करावी लागते तेच श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांना अजिबात मेहनत करावी लागत नाही कारण त्यांचे भावनिक भक्त जे लाखोंच्या संख्येत असतात तेच त्यांचे पोस्ट पसरवतात आणि त्या पोस्ट आपोआप करोडो लोकांपर्यंत पोहचतात. म्हणजे एकाठिकाणी मोठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या जिथे सामान्यांना काही स्थान नाही आणि स्थान मिळवायचे असलेच तर तुमच्याकडे तितका पैसा पाहिजे किंवा तुमच्या कडून काहीतरी फायदा झाला पाहिजे भले मग तो फायदा तुमच्या मृत्यूपासून का होईना. आणि दुसरीकडे फक्त इंटरनेट कनेक्शन पाहिजे जे खूप स्वस्त असते आणि खूप कमी गुंतवणुकीमध्ये उत्तम मार्केटिंग आणि विक्री करता येते. ग्राहकांपर्यंत थेट संपर्क होतो. हे झाले फायदे.
समुद्रात पोहायचे म्हंटले की छोटे मासे पण येणार आणि शार्क मासे पण येणार पण आयुष्यामधील शार्क मासे हे देवमाशाच्या आकाराचे असतात त्यांना सोबत म्हणून पिरान्हा सारखे भक्त मासे सरंक्षणासाठी असतात. तुमचे एक उत्तम दर्जाचे उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे दुय्यम दर्जाचे उत्पादन जे टीव्ही, वृत्तपत्र, सार्वजनिक मोक्याच्या ठिकाणी लागलेले जाहिरातींचे फरक अधिक इंटरनेट द्वारे सरळ ग्राहकांसोबत संपर्क त्याच्यात भर म्हणून त्यांनी पैसे देऊन उभे केलेले भक्तगण अशी स्पर्धा असते. आता तुम्ही सांगा जिंकणार कोण?
ह्याला पर्याय आहे, जिथे एक प्रश्न तिथे हजार उत्तर, जिथे एक समस्या तिथे हजार समाधान. आपले प्रत्येक क्लिक, लाईक आणि शेअर हे सोशल नेटवर्किंग साईट वरून ट्रेक केले जाते. ती सगळी माहिती गोळा करून ठेवतात आणि आता ही ट्रेकिंग सिस्टिम इतकी पुढे गेली आहे की ती तुमच्या संपूर्ण ब्राऊजर वर नजर ठेवून असते. जे तुम्ही लाईक करता किंवा नुसते बघता तरी तेच उत्पादन दुसऱ्या वेब पेज वर दिसून येते. एक प्रकारे तुमच्यावर लक्ष्य ठेवून आहे, जासूसी चालू आहे, ही उद्योग जगतातील काळी बाजू, अश्या अनके रक्ताने माखलेल्या बाजू पण आहेत, जो हाडाचा उद्योजक आहे त्याला मी काय बोलत आहे हे समजले असेल.
ही ट्रेकिंग तुम्ही मोडू शकता, दिशाही बदलू शकता, जो हे करू शकतो तो इंटरनेट वर करोडो रुपये कमावून घेऊन जाऊ शकतो. तुमच्या लाईक, शेअर आणि क्लिक वर ताबा मिळवून, पण हा ताबा मिळवायचा कसा? कारण ते इतक्या सुंदर जाहिराती काढतात की काय बोलायचे, सामान्य मानसिकतेचा मनुष्य आरामात फसून जातो, आणि भावनिक मुद्दे असतील तर त्याच्या प्रत्येक लाईक्स, क्लिक, कंमेंट्स आणि शेअरिंग हे त्या व्यक्तीला किंवा त्याच्या विरोधातील व्यक्तीला प्रसिद्धी देत असतात.
हेच आपले लाईक्स, क्लिक्स, कमेंट्स आणि शेअरिंग जर आपण आपल्या उद्योजक, व्यावसायिकाला दिले तर तो आपल्या मधील एक आपला उद्योग, व्यवसाय वाढवू शकतो. हेच जर नाव उद्योजकांसाठी केले तर त्यांचा उद्योग लवकर भरभराटीला येऊ शकतो. आपल्याकडे असलेल्या कल्पना, सूचना किंवा सल्ला त्याला दिला तर त्याचा खूप फायदा होईल.
समाजसेवा फक्त पैसा आणि वेळ देऊन नाही करता येत आणि फक्त गरिबांना, पीडित, आजारी लोकांना मदत लागते हे मन मेंदूतून काढून टाका. तुम्ही कोणत्याही उच्च पदावर राहा ते ज्ञान सुद्धा तुम्ही दान करू शकता. ज्या परंपरागत समाजससेवेच्या मर्यादा चालत आल्या आहेत त्याच्या मर्यादा वाढवा. हे तुम्ही जगभरातील अविकसित देशांपर्यंत आपले कौशल्याचे दान पोहचवू शकता.
आपल्या मन मेंदूतील फिल्टर काढून हा लेख वाचाल. जर तुम्ही विशिष्ट फिल्टर लावून वाचत असाल तर तुम्हाला काहीच समजणार नाही आणि कदाचित तुम्ही नकारात्मक अर्थ घेवू शकता. मी एक मनुष्य प्राणी आहे आणि ज्या नैसर्गिक गरजा जगातील सर्व मनुष्य प्राण्याला लागू आहेत त्या मलाही लागू आहे. असा विचार जरी तुम्ही केला तरी ९९ टक्के तणावापासून तुम्ही मुक्त होऊ शकता ह्याची मी हमी देतो.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


एका जंगलात एक बाळंतीन हरीणी बाळाला जन्मं देणार असते...
तिला बाळाला जन्म देण्यासाठी जागा भेटते. एक नदी वाहती नदी असते आणि तिच्या विरुद्ध बाजूला उंच वाढलेले सुकलेले गवत असते.
हरिणीच्या प्रसूती कळा सुरु होतात तेवढ्यात तिचे लक्ष्य हे समोरुण दबक्या पावलाने येणाऱ्या सिंहाकडे जाते....
पाठी फिरण्यासाठी जेव्हा मान फिरवते तेव्हा एक शिकारी तिच्यावर बाणाचा नेम धरून उभा असतो......
ती उंच वाढलेल्या सुकलेल्या गवताकडे बघतच तिथे वीज पडून आग लागते....
सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते...
तेवढ्यात सिंह झेप घेतो..... दुसरीकडे वीज हि शिकार्याच्या अंगावर पडते आणि त्याचा नेम चुकून सिंहाला लागतो.... आणि दोघेही मरतात.....तेवढ्यात जोरदार पाउस सुरु होतो आणि वणवा विझून जातो....
तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो...आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...
आणि या सगळ्या घटना घडत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या गोंडस हरणाला जन्मं देते...
बोध :
शिकारी, सिंह, हरीण आणि तिच्या पोटातील बाळ ह्यापैकी ज्यांची त्या परिस्थितीवर ताबा मिळवायची किंवा जगण्याची इच्छा जास्त त्याच्याच बाजूने परिस्थिती फिरते.
शिकारीला शिकार पाहिजे होती आणि सिंहालाहि भक्ष्य पाहिजे होते पण ते दोघेही आपल्या इच्छे सोबत एकरूप होऊ शकले नाहीत, पण ह्याउलट हरिणी ची इच्छा हि गोंडस बाळाला जन्म द्यायची होती आणि ती ह्या इच्छेसोबत एकरूप होती आणि बाळ हे नैसर्गिक रित्या जन्माला येण्याच्या इच्छे मध्ये होते त्यामुळे संपूर्ण परिस्थिती हि त्यांच्या बाजूने फिरली गेली.
आकर्षणाचा सिद्धांत हा निसर्ग नियमानुसारच काम करतो, तो निसर्ग ज्या मध्ये ब्रम्हांडाचे घटक आहेत तेच आपल्यामध्येही आहेत म्हणजे आपण निसर्ग आणि ब्रम्हांडाशी जुळलेलो आहोत. जो निसर्ग आणि ब्रम्हांडाशी एकरूप असतो तो असे चमत्कारिक आयुष्य जगत असतो.
निसर्ग आणि ब्रम्हांड कधीच भेदभाव करत नाही. त्याच्यासाठी सगळेच समान आहेत. आणि आत्मविकास आपल्याला परत ह्याच्याशी एकरूप करून देतो.
जर तुम्ही अश्या समस्यांनी ग्रस्त असाल तर तुम्हाला तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आत्मविकासाची गरज आहे.
आपन जर अश्या परिस्थितीतून गेला असाल तर nirvana.self.development@gmail.com इमेल वर नक्की शेअर कराल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


चला उद्योजक घडवूया
श्रीमंत, समृद्ध आयुष्याकडे
समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण
“व्ययक्तिक”
आपल्या सोयीनुसार ऑनलाईन
आणि ऑफलाईन उपलब्ध
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



तुम्हाला तुमच्या मुलांना वयाच्या २३ वर्षी डॉक्टर, इंजिनिअर व पदवीधारक किंवा
वयाच्या २६ वर्षापर्यंत उच्च पदवीधारक बनवायचे आहे कि वयाच्या ९ ते १६ वर्षांपर्यंत
यशस्वी उद्योजक, व्यवसायी किंवा गुंतवणूकदार बनवायचे आहे? जे आपल्या हाताखाली वरील
शिक्षित व उच्चशिक्षित मुलांना कामाला ठेवतील किंवा त्यांनी गुतंवणूक केलेल्या उद्योग किंवा
व्यवसायामध्ये पगारावर काम करून गुंतवणूक वाढवून देतील. निर्णय तुमचा, मुलं तुमची,
त्यांची भविष्य तुमच्या हातात, पूर्णपणे जबाबदार तुम्ही.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



जेव्हा तुम्ही जे प्रसिद्ध उद्योजक किंवा यशस्वी व्यक्ती आहेत त्यांच्यासारखे आयुष्य मागतात तेव्हा तुम्हाला त्यांच्यासारखे आयुष्यच भेटेल. भले ते त्यांच्या आयुष्याच्या एका भागात अतिशय यशस्वी किंवा स्वप्नवत आयुष्य जगत असतील पण त्यांच्या आयुष्यातील बाकीच्या भागात सपशेल नापास झालेले असतील जसे कि नाते संबधात दरार, न बरे होणारे आजाराने ग्रस्त, विचित्र किंवा विकृत स्वभाव असे अनेक भाग जे फक्त त्यांच्या घरच्या किंवा जवळच्या लोकांनाच माहित असतात, त्यामुळे फक्त ते ज्या मध्ये यशस्वी आहेत तोच भाग मागा न कि त्यांच्या सारखे पूर्ण आयुष्य. अंतर्मनाच्या नियमानुसार तुमचा कुठचाही विचार खरा होऊ शकतो त्यामुळे जे मागला ते विचार करून मागा. आयुष्यामध्ये सिनेमासारखे तोच सीन पुन्हा पुन्हा करायची संधी नसते. विचार तुमचा, आयुष्य तुमचे, जबाबदार तुम्ही.
- अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

संधी आणि त्यासोबत आलेले भाग्य हे सर्वांच्या आयुष्यात अनेक वेळेस येवून गेले आहे


हा लेख लिहायचे कारण असे आहे कि जी लोक आता नकारात्मक आयुष्य किंवा परिस्थिती जगत आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या संधीचे उपयोग न करून घेतल्यामुळे जगत आहेत. तुमच्या आयुष्यात श्रीमंत, समृद्ध बनायच्या संधी ह्या येवून गेल्याच आहेत, त्यासोबत खाजगी आयुष्यामधीलहि अनेक संध्या येवून गेल्या आहेत जसे कि मनासारखा जोडीदार, आरोग्य, सकारात्मक प्रगतीशील मित्र ह्या.
जो ह्या संधीचा फायदा उचलायचे शिकतो त्याच्यासाठी भाग्य काम करायला लागते आणि लोभ ते टिकवून ठेवते, कुठल्याही भावनेचा अतिरेक हा घातच आहे. हे तुम्हाला जो पर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत समजणार नाही. ती मानसिक स्थिती जगावी लागते, आणि आता एमआरआय, इईजी आणि इसीजी ज्या सहाय्याने सिध्द हि करू शकतो.
संधी कुणाच्या आयुष्यात येते? जी लोक मानसिक दृष्ट्या शांत, स्थिर, स्तब्ध, तथस्थ आणि एकाग्र असतात त्यांच्या आयुष्यात येत असते. बाहेरून बघितल्यावर असे वाटते कि त्यांनी ती संधी निर्माण केली आणि शोधून काढली पण प्रत्यक्षात तसे नसते, त्यांच्या मानसिक स्थिती मुळे जी कृती व्हायची, त्यामुळे ते प्रत्येक वेळेस योग्य ठिकाणीच असायचे.
तुम्ही आस्तिक असो किंवा नास्तिक ह्याच्याशी काहीही घेणे देणे नाही आहे, ह्यापैकी ज्यांचा विश्वास मजबूत तो जिंकतो. म्हणून सगळेच आस्तिक आणि सगळेच नास्तिक हे प्रगती करत नाही किंवा त्यांच्या खाजगी आयुष्यातही अनेक समस्या असतात.
जे आई वडील आपल्या मुलांकडे ह्या गोष्टी अनुवंशिकतेनुसार देतात ते तर अगदी लहान पनासूनच संधिसाधू आणि भाग्यशाली आयुष्य जगायला लागतात. ह्याची उदाहरणे देखील तुमच्या डोळ्यासमोरच आहे. शेकडो आणि हजारो वर्षे पाठी जायची गरज नाही आहे. तुम्ही आणि तुमच्या पाठी काही वर्षे अगोदर जन्माला आलेल्या लोकांचा अभ्यास केला तर ते तुम्हाला जाणवेल.
ह्यासाठी एक नैसर्गिक नियम आहे जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात वापरावाच लागेल जो मानसिकतेसंदर्भात आहे आणि तो म्हणजे मानसिक दृष्ट्या शांत, स्थिर, स्तब्ध, तथस्थ आणि एकाग्र असने. आणि ह्याच मानसिकतेतून चमत्कार घडतात मनुष्यांच्या आयुष्यामध्ये.
ह्यासाठी मनापासून आवड लागते. तो कधीच कठोर परिश्रम आणि जबरदस्तीने मन एकाग्र करत नाही. हि कृती त्याच्याकडून आपोआप होतच असते. म्हणेज विचार ह्या पातळीच्या हि पलीकडे ते आयुष्य जगत असतात.
जर तुम्ही तर्क आणि विचारांच्या पातळीवर आयुष्य जगत असाल तर तुम्हाला मला जे सांगायचे आहे ते समजून येणार नाही, पण तुम्ही त्यापलीकडे आयुष्य जगत असाल तर मी सांगितलेली किंवा आयुष्य जे तुम्हाला संधीच्या रुपात सांगायचा प्रयत्न करत आहे ते त्या क्षणीच समजून येईल.
गुरु कुठच्या मनुष्य प्राण्याला करण्यापेक्षा आयुष्याला करा, अनुभवांना करा तेव्हा तुम्ही प्रत्येक संधीचा फायदा उचलत जाल आणि भाग्यशाली आयुष्य जगायला लागल. म्हणून मी कधीच विचारत नाही कि तुम्ही यशस्वी का झालात आणि अयशस्वी का झालात, जो तो त्याच्या प्रयत्नाने झाला, त्याचा आदर केलाच पाहिजे.
माझे फक्त एकच म्हणणे आहे कि काहीही झाले तरी तुम्ही आलेल्या संधी ह्या सोडू नका, कधी कधी संधी सोडतो कारण आपण ज्यांच्यासोबत राहत असतो ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत नाही, ह्यासाठी मी सांगत असतो कि नेहमीच तज्ञांचे मार्गदर्शन घेत जा.
प्रत्येकाचे यशाचे मार्ग वेगवेगळे आहेत. अगदी विरुद्ध हि आहेत. पण ते सगळेच यशस्वी आहेत. आणि निसर्ग हा भेदभाव करत नाही तसेच यश हे भेटायचे झाल्यास अब्जोपतिला हि तसेच भेटते जसे गरीबाला भेटते. इथेही भेदभाव केला जात नाही.
विचार करा. समजून घ्या. इथे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपल्या आयुष्याच्या रथाची दोरी हि आपल्याच हातात असू द्या. वेळेपेक्षा जास्त किंमत हि कशालाच नाही आहे. सरासरी ८० वर्षाचे आयुष्य पकडू आपण त्यानुसार तुमचा आजचा क्षण हा अनमोल आहे.
एकदा का तुम्ही दुर्भाग्याचा आराखडा मोडून भाग्यामध्ये पाउल ठेवले कि परत तुम्ही तुमच्या मागच्या दुर्भाग्याच्या आयुष्यात परत जात नाही. जर विश्वास नसेल बसत तर फोर्ब्स मेगझीन मधील लोकांचे आजचे आयुष्य आणि एक एक वर्ष पाठी जात त्यांचा भूतकाळ बघा, तुम्हाला उत्तर भेटेल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


२००९ साली फेसबुक ने व्हाट्सएप चा सह संस्थापक ब्रायन एकटन चा नोकरीचा अर्ज धुडकावून लावला होता. ५ वर्षांनंतर फेसबुक ने व्हाट्सएप ₹ १,१४,००० करोड रुपये ला विकत घेतले.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

प्रतिकूल परिस्थितीवर मात

प्रतिकूल परिस्थितीवर मात

स्वकष्टाने परकर शिवून दारोदारी जाऊन विकण्याचा वरकरणी क्षुल्लक वाटणारा व्यवसाय सुरू केला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अक्षरश: रस्त्यावर राहायला लागलेल्या माधुरी यांनी स्वकष्टाने परकर शिवून दारोदारी जाऊन विकण्याचा वरकरणी क्षुल्लक वाटणारा व्यवसाय सुरू केला.. प्रचंड कष्ट केले आणि आज त्यांच्याकडे दीडशे स्त्रिया कामाला असण्याइतपत तो वाढवला. शून्यातून व्यवसाय उभा करणाऱ्या माधुरींचा हा प्रवास.
माधुरी खांडवे,
गायत्री परकर, गोंधळेनगर, हडपसर
८४२१०५०१८९
swapnalim@gmail.com
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



चला उद्योजक घडवूया ह्याचा मुख्य उद्देश हा आर्थिक विकास आणि आणि आत्मविकास ह्यामध्ये सर्वांगीण विकास ज्यामध्ये मानसीक आणि शारीरिक आरोग्यही येते हे आहे.
ज्या वेळेस हा पेज सुरु केला त्या वेळेस एक गैर समज होता कि मराठी उद्योजक आणि व्यवसायिक खूपच कमी आहे तो दुसऱ्याच महिन्यापासून सुरु झालेल्या फोन कॉल पासून तो विश्वास, गैरसमज मोडला गेला.
१ वर्ष जुना उद्योजक, व्यवसायिक आणि १५, २०, ३० वर्ष जुने उद्योजक, व्यवसायिक ते ज्यांना वारसा हक्काने उद्योग, व्यवसाय भेटला आहे आणि काहींचा पिढ्यांचा व्यवसाय आहे अश्यांचे फोन यायला सुरवात झाली.
तेच पुढे समुपदेशन, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी यायला लागले. ९० टक्क्याहून जास्त हे करोडोंचे उलाढाल करणारे आहेत. त्यामुळे अजून एक गैर समज दूर झाला कि मराठी मनुष्य हा उंच उडी घ्यायला घाबरतो म्हणून.
करोडोंची उलाढाल करणारे जवळ सर्वच आपले, आरोग्य, घर आणि कर्ज सांभाळून इतकी मोठी जबाबदारी आरामत पार पाडत आहेत. मुंबई मधला मराठी जेवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ फिरवून मुंबई बाहेर पळून गेला त्याउलट जास्त प्रमाणात मुंबई शहराबाहेरील मराठी हा ताठ मानेने तिथल्या उच्चभ्रु वस्तीत राहत आहे.
सिनेमा मध्ये जी मराठी लोकांची नोकर म्हणून ओळख दाखवायचे ती शहरात कदाचित असेल पण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर असे दृश्य नव्हते.
धाडस प्रचंड,सकारात्मक दृष्टीकोन प्रचंड, चिकाटी प्रचंड आणि गरुडझेप घेतलेला असे वर्णन मी करू शकतो.
ह्यापलीकडे परिस्थिती अशी झाली आहे कि आता विदेशातून मागणी यायला लागली आहे. ह्यावरून तुम्हाला अंदाज येईल कि मराठी झेंडा हा कधीच विदेशात गाडला गेला आहे.
ह्यामध्ये मुली आणि स्त्रियाही पाठी नाही आहे. त्याही सरकारी, खाजगी कंपन्यांमध्ये उच्च पदाचा अनुभव घेतलेल्या आणि स्वतःचे उद्योग व्यवसाय असलेल्या आहेत. वरील करोडोंच्या उलाढाली त्याही करणाऱ्या आहेत.
जे स्थिर मानसिकतेचे असतात, त्यांचे ध्येय आणि उदिष्ट हे निश्चित असते आणि त्यांना माहित असते कि आपल्याला सध्या कसली गरज आहे ते, त्यांच्या विचार आणि कृतीत खूप कमी अंतर असते, त्यांना जे पाहिजे ते त्यासंदर्भात त्यांना चांगलेच माहित असते ते त्यासंदर्भात बोलतात, त्यांना जे पाहिजे ते मिळते आणि ते पुढील वाटचालीच्या दिशेने जातात.
उद्योजक, व्यवसायिक हे कामापुरते किंवा मार्केटिंग पुरते फेसबुक आणि व्हास्टएप वर असतात त्यानंतर ते परत आपल्या उद्योग, व्यवसायिक विश्वात रममाण होतात.
जसे तुमचे अंतर्मन असते तशी परिस्थिती आणि लोक तुमच्या आयुष्यात येत असतात किंवा तसे अनुभव येत असतात. जर तुम्ही वरील परिस्थितीत नाही आहात तर तुम्हाला आत्मविकासाची सक्त गरज आहे. ज्यामध्ये पहिले तुमचा दृष्टीकोन बदलला जातो आणि त्यानंतर तुमची परिस्थिती आपोआप बदलली जाते.
तुम्हाला जर बाळकडू मिळाले असेल किंवा तुमची जडण घडण आर्थिक साक्षरतेपासून झाली असेल ते गोष्ट निराळी आहे. झाड वाढायला जसे पोषक वातावरण लागते तसेच उद्योजक आणि व्यवसायिक घडायलाही पोषक वातावरण लागते.
जर झाड निट वाढत नसेल तर वातावरण बदलायची गरज आहे नाही कि झाडावर उपचार करायची, तसेच मुल, उद्योजक आणि व्यवसायिक घडायलाहि वातावरण बदलायची गरज आहे ना कि उद्योग व्यवसाय तपासण्याची.
समविचारी लोकांसोबत राहा, जिथे नैसर्गिक वाढ भेटेल तिथे तग धरून राहा आणि जर वातावरण नसेल तर ते बदला, जे उद्योजक आणि व्यवसायिक आहेत त्यांच्यासोबत राहा, त्यांना उद्योग व्यवसायात मदत करा निस्वार्थीपणे, मग हळू हळू तुम्ही बदलत जाल.
व्हास्टएप, फेसबुक वर भेटणे आणि प्रत्यक्षात भेटणे ह्यामध्ये जमीन आसमान चा फरक आहे. इंटरनेट हे आभासी जग आहे, जो त्यावर विश्वास ठेवतो तो मूर्ख असतो, आणि जो प्रत्यक्षात ५००० ऑनलाईन मित्रांपेक्षा ५ सकारात्मक ऑफलाईन मित्रांसोबत राहत असतो तो प्रगती करून जातो आणि त्याची मानसिक स्थिती हि चांगली असते. तो स्वप्नात नाही तर वास्तवात आयुष्य जगत असतो.
जगामध्ये आणि भारतामध्येही जे तटस्थ आहेत त्यांनी जग घडवले आहे, बाकी परिस्थितीनुसार ते आणि त्यांचे कुटुंब संपून गेले आहे. नेहमी तटस्थ व्यक्तींबरोबर राहा. अश्यांकडे सकारात्मकता, संपत्ती आणि समृद्धी आकर्षित होत असते. आणि हे पिढ्यान पिढ्या समृध्द आयुष्य जगत असतात.
काही नियम हे मी तयार करू शकत नाही आणि न ते तुम्हाला लागू करू शकत, जे तुमच्या समजण्यावर आणि आकलनशक्तीवर अवलंबून असते. हे पेज लाईक करण्यापूर्वी आणि ग्रुप जॉईन करण्यापूर्वी लक्ष्यात ठेवा.
हा पेज सुरु झाल्यापसून अनेकांनी लेख आणि जेही माझे विचार मांडतो त्यावरून त्यांचे स्वतःचे नवीन उद्योग, व्यवसाय सुरु केला आहे आणि काहींनी तर अगदी थोड्या कालावधीमध्ये दुसरा उद्योग, आणि व्यवसायही सुरु करून टाकला आहे.
अनेकांचे आजारी पडलेले उद्योग व्यवसाय हे पुन्हा भरारी घेवून उभे राहिले आहे. अनेकांनी परत जोशाने, धोके पत्करत घाट्यात चाललेल्या उद्योग, व्यवसायाला परत नफ्यामध्ये आणून सोडले आहे.
आणि बाकी प्रत्यक्षात लाभ घेवून जात आहेत. ह्या सर्वांमध्ये साम्य एकच कि त्यांच्या ध्येयाशी, उद्योग, व्यवसायाशी एकनिष्ठ आहे. मी जितके माझ्या कडे असेलेल तुटपुंजे ज्ञान त्यांना द्यायचे प्रयत्न करतो त्यापेक्षा जास्त ज्ञान आणि अनुभव मला त्यांच्याकडून मिळते.
विरोधाभास तर कधीच जाणवला नाही. इतकाच चांगला अनुभव हा मला नोकर पेश वर्गांकडूनहि आला. कोणीही तुम्हाला इथे कमेंट करताना, चर्चा करताना दिसणार नाही.
चला उद्योजक घडवूया च्या प्रवासात तुम्ही कुठे आहात? पेज लाईक केल्यापासून ३ महिन्याचा कालावधी ठरवा, त्यामध्ये आर्थिक विकासावर भर द्या, जे लेख आणि विचार नाही समजले तर आत्मविकासापासून सुरवात करा, कारण माझे लेख आणि विचार ,माझ्या सांगण्यापेक्षा तुम्हाला समजणे खूप महत्वाचे आहे.
जर तुम्ही आर्थिक विकासासाठी पूर्ण तन, मन, धन लावून देतात तेव्हा तुमचा कमीत कमी ३ महिन्यात विकास व्हायला सुरवात होतेच. एकदा का तुम्ही जुना आराखडा म्हणजे गरिबी, मध्यमवर्ग, आर्थिक समस्या आणि मर्यादा हा मोडला कि परत तुम्ही जुन्या मर्यादित आयुष्यात परत जात नाही.
उद्योग, व्यवसाय, आर्थिक विकास आणि आत्मविकास ह्याच्या प्रवाहामध्ये रहा, जर तुम्ही किनाऱ्यावर असाल तर अनेक जन कधीच तुम्ही जिथे बसला आहात त्याच्या पुढे गेलेले आहेत. ह्या प्रवाहात राहणारच जरी थांबला तरी हा सकारात्मक प्रवाह त्याला वाहून नेत जातो, पण जर अपयशाने खचून हार मानून प्रवाहाबाहेर किनाऱ्यावर थांबला कि तो कायमचाच थांबला.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

गरूडभरारी म्हणजे नक्की काय ?


प्रोस्ताहन देणारा आणि ज्वलंत इच्छा शक्ती जागृत करणारा लेख
गरूड पक्ष्याबद्दल अभिमान होताच: पण त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले ते परवाची त्याच्याबद्दलची गोष्ट ऐकल्यावर.
गरूडाचं दु:ख समजलं. मी आणि माझ्यासारखे अनेक आज त्या दु:खातून जातो आहोत. तो आमच्यातील एक वाटला.
गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.
ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माझ्यात आणि माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. वास्तविक नखांचं उचकटणं नव्हे तर वाईट आचार विचारांच्या नखांचं उचकटणं , पंखांचं फाडणं नव्हे तर गर्विष्ठ मनोवृत्तीचा बीमोड करणं हे तप माणसाला करावं लागेल.
नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरमीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे. गरूडाला बोलता येत नाही तर त्यानं सांगितलं असतं त्याचं दु:ख आपणाला; परंतु शूर माणसाचं वैशिष्ट्य असतं , की तो दु:ख बायकीपणानं सांगत नाही. तो हसतमुखानं भोगतो ते. शौर्य आणि तितिक्षा दोन्ही दृष्टीनं गरूड माझा गुरू झाला. दुर्गम भागामध्ये शिक्षणाची सोय नसताना मैलो अन् मैल पायपीट करणा-या एखाद्या गरीब मुलाच्या जीवनात एका पायरीवर गरूड भिनावा आणि त्यानं भरारी मारावी , अनंत कष्ट सोसून त्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये नावं करावं . नव्या तरूण पिढीला दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करावं ही एका रानपाखरानं घेतलेली गरूडभरारीच नव्हे काय?
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .
मग यमसुध्दा तुला पाहिल्यावर लटालटा कापायला लागेल !!!
ह्याच मानसिक स्थितीमुळे लोक मरणातून परत येताना बघितली आहेत...
ह्याच मानसिक स्थितीमुळे गरिबांना श्रीमंत होताना बघितले आहे....
ह्याच मानसिक स्थितीमुळे अशक्य ला शक्य होताना बघितले आहे...
ह्याच मानसिक स्थितीमुळे लोकांच्या आयुष्यातील संकटांचे पर्वत हलताना बघितले आहे....
ह्याच मानसिक स्थितीमुळे दुर्भाग्य हे जवळ येता येता स्वतःचे भाग्यात रुपांतर करताना बघितले आहे....
जी लोक एका क्षणात बदलतात त्यामागे त्यांचा अब्जो क्षणांचा संघर्ष असतो. आहात तुम्ही भरारी घ्यायला तयार?
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


ताजमहल चा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा शहाजहानचे नाव घेतले जाते ना कि ताजमहल बनवणाऱ्या मजदुर आणि कारागिरांचे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



एका शाळकरी मुलाला शाळेतील बाईनी एक चिट्ठी दिली आणि सांगितलं हि चिट्ठी तुझ्या आई ला दे.मुलगा धावत धावत घरी आला आणि ती चिट्ठीआई जवळ दिली.आई ने ती चिट्ठी पहिली मात्र आणि त्या मुलासमोर ती वाचून दाखवली. त्यातील मजकूर असा होता
"प्रिय पालक आपला मुलगा खूपच हुशार व बुद्धिमान आहे, त्याची आकलनशक्ती अमाप आहे, परंतु आमच्या शाळेत त्याला शिकवतील असे शिक्षक नाहीत, त्यामुळे या पुढे तुम्ही आपल्या मुलाला शाळेत पाठउ नका, त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या. "
कालांतराने आई वारली. मुलगा देखील आता मोठा झाला होता, आता सार जग त्याला ओळखत होत.एके दिवशी असाच जुने पेपर्स चाळत असताना त्याला ती चिट्ठी सापडली .तीच जी त्याच्या आईने लहानपणी वाचून दाखवली होती.ती पाहताच तो ढसा ढसा रडायला लागला.
त्यातील मजकूर असा होता " प्रिय पालक आपला मुलगा मतीमंद आहे. त्याची आकलनशक्ती फारच कमी आहे, अश्या मुलाला आमची शाळा शिकवू शकत नाही, त्यामुळे त्याला शाळेत पाठू नये. त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्यावा"त्याला कळून चुकल त्याच्या आई ने ते पत्र खोट वाचून दाखवील होत.
हा मुलगा म्हणजेच थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन. ज्याने विजेचा शोध लावून अख्ख जग प्रकाशमय करून टाकल.काय म्हणाव अश्या मातेला जीने एका मतीमंद मुलातून एक शास्त्रज्ञ घडविला. ही किमया फक्त सुजान पालकच करू शकतात.
जो पर्यंत तुमचा विश्वास अटळ असतो तो पर्यंत तुम्ही पाहिजे ते करू शकता. विश्वास मोडण्याची पहिली सुरवात हि घरापासून होते आणि बाहेरच्यापेक्षा घरच्यांनी मोडलेला विश्वास हा संपूर्ण आयुष्य उध्वस्त करून टाकतो.
कुठलाही मुलगा हा जन्मजात ज्ञान घेवून येत नाही. तो पहिले आई वडिलांचे बघून शिकतो. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक, मित्र मंडळी, परिस्थिती आणि समाज ह्याप्सून शिकतो. ह्यानंतरच शाळा, शब्द वाचून शिकवून तो घडत जातो.
तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबतच रहा, उठणे बसने करा, जर नसतील तर एकटेही रहा पण मध्ये मध्ये पैसे खर्च करून तज्ञांची मदत घेत जा, ह्यामुळे तुम्ही सतत सकारात्मक रहाल आणि आपल्या स्वप्नांचे आयुष्य जगण्याच्या दिशेने प्रवास कराल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
बालक, पालक आणि कुटुंब
८०८०२१८७९७


चला उद्योजक घडवूया
आयुष्याचा महत्वाचा भाग आर्थिक विकासासाठी
उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक
प्रथम समुपदेशन आणि मार्गदर्शन आणि गरज भासल्यास प्रशिक्षण
प्रशिक्षण : मन, मेंदू, विचार, भावना, हृद्य आणि पेशी च्या स्तरापर्यंत
पुस्तकी स्तरावरील ज्ञान हे तुम्हाला श्रीमंत आणि समृद्ध बनायचे आहे हे फक्त सांगते पण पेशी स्तरावरील रुजलेले ज्ञान हे तुम्हाला ते आयुष्य जगवते.
समुपदेशनाद्वारे नक्की समस्या कुठे आहे हे समजून घेण्यात येईल व फक्त त्यावरच समाधान देण्यात येईल.
एकदा का तुम्हाला उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीची भाषा समजायला लागली कि तुम्ही अमर्याद आर्थिक स्वातंत्र्याचे आयुष्य जगायला लागता.
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
कधी कधी आपण वैचारिक आणि भावनिक दृष्ट्या कुठल्याही कारणास्तवर ग्रासून जाती ज्याचा परिणाम आपल्या उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक आणि खाजगी आयुष्यावर होतो हि मानसिक समस्या असल्यामुळे हिचा आघात हा अनेक वर्षांसाठी होतो ह्यावर विज्ञान आणि अध्यात्माद्वारे ह्यावर आरामात मात करू शकतो. स्वयं प्रोस्ताहित कसे व्हायचे हेही शिकवले जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातून अनेकांनी लाभ घेतला आहे व आज ते स्वतः आणि त्यांचे कुटुंब हे उत्तम रित्या आयुष्य जगत आहेत.
एकदा का मनुष्याने जुनी मर्यादित चौकट मोडली कि परत तो अमर्याद स्वतंत्रतेकडून परत मर्यादित चौकटीच्या आयुष्यात परत जात नाही.
आजच संपर्क करा.
ऑनलाईन आणि ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण, आपल्या सोयीनुसार उपलब्ध.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

भांडवलशाही - इथे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासून ते ते वयोवृद्ध मनुष्यापर्यंत सर्वकाही विकले जाते





हा फोटो काय दर्शवते? एक लहान मुलगी हातात कैची घेवून आपले पोट कापायला का निघाली? उत्तर तर तुमच्या समोरच आहे, फक्त दृष्टीकोन पाहिजे.
आजच्या युगात किंवा मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये सर्वकाही विकले जाते. मनुष्याच्या भावना सुद्धा. म्हणून एका हेल्थ ड्रिंक च्या जाहिरातीमध्ये आई आपल्या मुलाला प्रोस्ताहन देताना दिसते. त्यागोदर काय मुल यशस्वी होत नव्हती काय?
घर असतानाही एक दुचाकी किंवा चार चाकी गाडी घेताना संपूर्ण परिवार त्यामध्ये दाखवला जातो, ह्याचे कारण काय? लहान मुलांना काय समजते गाड्यांबद्दल?
टीव्ही वर सतत रंग रूपाने सुंदर मुली स्त्रिया आणि देखणे तरून किंवा पुरुष हे दाखवले जातात. हेच लहान मुल बघत असतात आणि त्याच वयात ते स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करायला लागतात.
मानसशास्त्राचा सोपा नियम आहे जर तरून मोठ्यांना गुलाम बनवायचे असेल तर त्यांना लहान पणापासून तेच संस्कार द्यावे लागतील. ठराविक धर्माचे संस्कार दिले तर मोठ्या पण तो स्वतहून ते प्रश्न विचारता अनुकरण करत जाईल. हेच राजकारण ह्याबाबतीतहि होते.
जर लहान पणापासून जाहिराती नाही दाखवल्यात, किंवा जाहिरातींमध्ये लहान मुलांचा वापर नाही केला तर भविष्यात उद्योग, व्यवसाय वाढणार कसा?
जर तुम्ही एका ब्रांड चे टूथ पेस्ट वापरत असतील आणि तीच सवय जर तुमच्या मुलांना लागेल, मधला तरून वयाचा थोडाफार काल सोडला तर परत ते तुमच्याच पेस्ट चे ब्रांड वापरायच्या मागे लागतील.
असेच इतर दररोजच्या वापरायच्या वस्तूंबरोबर होत असते. तुम्ही स्वतः थोडा तुमच्या आयुष्याचा अभ्यास केला तर समजेल.
एक जिंवत निरोगी मनुष्य हा आजच्या भांडवलशाहीच्या काळात निरुपयोगी आहे, पण एक नकारात्मक, रोगी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हा नफ्याचे साधन आहे. मग ते नुकतेच जन्मलेले बाळ असू देत किंवा मरणाला टेकलेला मनुष्य.
ह्याचे परिणाम हे खूपच भयंकर आणि दूरगामी आहे. अनु बॉम्ब च्या दुष्परिणामा पासून काही पिढ्यांमध्ये मुक्तता होऊ शकते पण हि जी मानसिकता भरवली आजत आहे त्यासाठी हजारो पिढ्यांचे बलिदान द्यावे लागेल.
लहान मुलांचे नाचायचे कार्यक्रम टीव्ही वर बघण्यापेक्षा आपल्या जवळपास कोणी लहान मुल असतील त्यांना मजा करताना, नाचताना आणि एक्टिंग करताना प्रत्यक्ष बघा, कारण हे वय त्यांचे परत येणारे नाही आहे आणि नाही जो व्हिडीओ बघून ती मजा तुम्हाला परत येणार आहे.
सासू-सून, सासरा-जावई हे जे मेकअप करून दाखवतात ते काही सत्य नाही आहे. वास्तवात दिसायला ते सामान्यच आहे, पण मेकअप इतका करतात कि जसे बुटांना पोलिश करून चमकवत आहोत आपण.
जे हिरो हिरोईन, मॉडेल ह्यांचे तुम्ही फोटो बघतात ते फोटोशॉप केलेले आहेत, वास्तव मध्ये त्यांचे शरीर हे स्थूल असते आणि अनेकदा हे वयोवृद्ध होवून सुद्धा ह्यांना तरून दाखवले जाते.
एकदा का तुमचे नाव झाले तर तुम्ही कितीही म्हातारे असू द्यात, लोकांना तुमचा तोच तरुणपनाचा चेहरा पाहिजे असतो. आणि हीच भांडवलशाही त्याचा पुरेपूर वापर करून तुम्हाला भ्रमात ठेवून स्वतःचा उद्योग व्यवसाय हा वाढवून घेते.
खेळ, सिनेमा व इतर मनोरंजक साधने हि फक्त मानसिक गुलामांना (सामान्य नागरिक किंवा मनुष्य) ह्यांना त्यांच्या समोर असलेल्या अडचणी विसरण्यासाठी वापरली जातात, जेणेकरून त्यांनी स्वतःबद्दल विचार नाही करावा आणि आपल्या मधील भावनिक उद्रेक हा सरकार, बडे उद्योजक आणि गुन्हेगार ह्यांच्या विरुध्द न होता तो त्यापुरताच झाला पाहिजे आणि तिथेच शमला पाहिजे.
आणि असे होतेही, लोक खेळातील हार जीत आणि सिनेमामधील हीरोचे जिंकणे बघून आपल्या भावना ह्या मुक्त करून टाकतो आणि परत आपल्या गुलामगिरीच्या आयुष्यात परत जातो.
अश्या अनेक घटना आहे तकी ज्या तुम्हाला सांगितल्या तर तुमचा ह्या माणुसकीवरचा विश्वास पूर्ण उडून जाईल. अश्या घटना ह्या तुमच्या ५० किंवा १०० किलोमीटर परिसरातही घडल्या असतील पण त्या सर्व दाबून टाकल्या जातात.
तो विषय इथे महत्वाचा नाही. मी काही सर्वांनाच जागृत करू शकत नाही आणि सामान्य मानसिकतेच्या लोकांना तर बिलकुलच नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याला मानसिक गुलामीतून मुक्त व्हायचे आहे तो होईल नाहीतर नाही.
हे आजचे वास्तव आहे, मी तो जितके सार्वजनिक ठिकाणी बोलू शकतो त्यानुसार मांडले आहे. मी इथे भांडवलशाहीला विरोध करत नाही आहे, मला माहित आहे तलावात रहायचे असेल तर मगरीसोबत वैर करू शकत नाही आणि हा परिस्थितीनुसार स्वतः मध्ये बदल घडवत जगण्याचा आणि जिवंत राहण्याचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



इतर लोक तुम्हाला कसे पाहात आहे हे महत्वाचे नसून तुम्ही स्वतःला कसे पाहत आहात हे महत्वाचे आहे.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



आयुष्यात तर्क चालत नाही, चालतात ते निसर्ग नियम जे करोडो वर्षांपासून सर्व जीवांसाठी सारखे आहे.
एक सज्जन माणूस ज्याच्या आयुष्यात सगळेकाही आलबेल असू शकते आणि एक दुर्जन माणूस ज्याचे आयुष्य सुखकर असू शकते. हा सगळा अंतरमनाचा खेळ आहे. जे आत आहे तेच बाहेर आहे. तुम्ही तुमच्या स्वभावानुसारच आयुष्य जगणार, त्यानुसार आपल्या आतील जे जन्मजात गुण आहेत त्यांना खतपाणी घाला, बाकी जे तुमच्यासाठी नकारात्मक गुण आहेत ते आपोआप कमी होत जातील व तुम्ही आकर्षणाचे आयुष्य जगायला लागल.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



तुमच्या विचारांपेक्षा तुमची कृती
तुमचे आयुष्य घडवत असते,
जर आयुष्यात बदल घडवायचा असेल
तर तुम्हाला तुमची कृती बदलावी लागेल.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक





वय वर्ष १३ कारकीर्द ला सुरवात "जयललिता" "अम्मा"
वय वर्ष १६ कारकीर्द ला सुरवात "सचिन तेंडूलकर"
वय वर्ष ११ कारकीर्द ला सुरवात "वारेन बफेट"
तुम्ही जो पर्यंत शाळेच्या आणि घराच्या चार भिंतीच्या जगात कैद असाल तर खऱ्या किंवा वास्तव आयुष्याशी आपला सामना झाला नसेल. जीवनाच्या भाषेत तुम्ही बालिश आहात असे समजू मग भले तुम्ही पुस्तकी ज्ञानात, घरात आणि शाळेत कितीही हुशार असो, त्याचा काहीही फायदा नाही.
आयुष्य जगायला उशिरा सुरवात करणे हे निसर्ग नियमाविरुद्ध आहे. निसर्गाने निर्माण केलेले सर्व प्राणीमात्र हे आप आपल्या मुलांच्या हात पायात आणि पंखात बळ आले कि ते त्यांना आपले पोट भरायला आणि रक्षण करायला शिकवतात, पण मनुष्य प्राणी हा अनेक वर्षे फक्त आणि फक्त चार भिंतीमधील फक्त बौद्धिक शिक्षणावर जोर देतो ज्यामुळे जी नैसर्गिक उर्जा असते नव नवीन शिकण्याची ती चार भिंतीमध्ये मरून जाते.
आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांची अवस्था अशी असते कि वाघाला आयुष्यभर पिंजर्यात ठेवले, शिकार न शिकवता खाऊ पिऊ घातले आणि मोठे झाल्यावर अचानक जंगलात सोडून दिले. मग दुसर्या दिवशी त्या वाघाची कोळे आणि कुत्र्यांनी शिकार केली.
ह्याला अपवाद अनेक आहेत. ते तुमच्या नजरेआड असतात किंवा तुम्हीच दुर्लक्ष केलेले असते. मी शाळेत असताना माझा मित्र एका कंपनीमध्ये सेल्समन चे काम करत होता, त्यावेळेसच त्याच्याकडे गाडी, मोबाईल बँक अकाऊंट हे सर्व होते. शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच तो पुर्ण पणे घर वगैरे घेवून सेटल झाला होता.
जसे बाहेरच्या जगात पाउल ठेवले तसेच अनेक उदाहरणे प्रत्यक्षात भेटू लागली जी शाळेपासून पैसे कमावण्यासाठी धडपड करत होती. काहींचे पारंपारिक किंवा वडिलोपार्जित व्यवसाय होते तर काहींनी स्वतः उद्योग व्यवसाय हा उभा केला होता. काही चांगल्या मार्गाने पैसे कमवत होते तर काही वाम मार्गाने. पण ह्या सगळ्यांमध्ये एक स्वभाव समान दिसला कि कितीही पैसे असले तरी त्यांचे पाय हे जमिनीवर होते. माणुसकीची जान होती. मदतीला तयार असत. हेच गुण खूप कमी प्रमाणात किंवा अतिशय नगण्य शिक्षित आणि उच्च शिक्षित लोकांमध्ये आढळले.
वारेन बफेट ने गुंतवणुकीसाठी वयाच्या ११ वय वर्षांपासून सुरवात केली तर जय ललिता ने वयाच्या १३ वर्षांपासून. आज हे दोघेही प्रसिद्धीच्या झोतात असल्यामुळे लोकांपर्यंत माहिती पोहचली, पण असे अनेक जगभरातून लहान मुल मुली आहेत कि ज्यांनी लाखो आणि करोडोमध्ये पैसे कमवायला सुरवात केली होती, करत आहेत आणि राहणारच.
सचिन तेंडूलकर ह्याचेही उदाहरण तुम्ही घेवू शकता. हि माणसे तुम्हाला फक्त नैसर्गिक दृष्टीकोन असेल तरच दिसतील किंवा तुमच्या आयुष्यात असतील, नाहीतर तार्किक दृष्टीकोन हा तुम्हाला जे पाहिजे तेच दाखवत राहील, भले हि लोक तुम्हाला भेटून गेली किंवा तुमच्या आयुष्यात आली तुम्हाला त्यांच्या क्षमतेबद्दल समजणार नाही.
जे वयस्करांना जमत नाही त्याही पेक्षा जास्त चांगले नातेसंबंध हि लोक सांभाळत असतात. त्यांचा दृष्टीकोन उद्दात्त झालेला असतो. मोडेलिंग क्षेत्रात अनेक मुली ज्या १२ वर्षे वयापासून स्पर्धेला उतरलेल्या असतात आणि ह्यांची स्पर्धा अनेक वेळेस हि वयस्कर मोडेल्स सोबत असते, असेच मुलांचे देखील आहे.
इथे मुलगा मुलगी हा भेद नाही चालत, परिस्थिती आणि गरज आणि ह्यांना असलेला प्रत्यक्ष अनुभव जो जगप्रसिद्ध बिझनेस मेनेजमेंट च्या विद्यापीठातहि नाही भेटत तो ह्यांच्याकडे असतो. मी स्वतः अश्या मुल आणि मुलींसोबत काम केले आहे जे माझ्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राशी निगडीत होते.
जीवनाच्या शाळेत तुमची पदवी तपासली आजत नाही, तिथे लागते कौशल्य, धाडस आणि वर्तमान काळात निर्णय घेण्याची क्षमता जी फक्त अनुभवानेच येते. आयुष्याच्या शाळेत कोणीही लहान मोठे नसते तर सर्वांना एकच अट लागते ती जिवंत राहण्याची.
कमी वयात आयुष्य सुरु केलेल्या लहान मुला मुलींनी जगाची, समाजाची काळी बाजू बघितली असते त्यामुळे तर चांगलेच तयार झालेले असतात. त्यांना खरे आयुष्य काय आहे ते माहित असते. त्यांना माहित आहे कि आपण अपयशी आहोत तर कोणीच विचारणार नाही आणि यशस्वी झालो जर जग डोक्यावर घेईल.
कमी वयात आयुष्य जगायला सुरवात केलेल्या मुला मुलींना जग कधीच गुलाम बनू शकत नाही. त्यांनी काळानुसार बदलायचा गुणधर्म हा स्वीकारलेला असतो. ह्यांची लग्नेही लवकर होतात आणि ते लग्नाच्या खूप आधीच सेटल झालेले असतात.
जय ललिता ची सुरवात हि कुठून झाली आणि ती कुठच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहचली. तिने राज्यावर राज्य केले नाही तर तिथल्या जनतेच्या हृदयावर राज्य केले. इतके तर सख्या आई वडिलांना पण जमत नाही मुलांच्या हृदयावर राज्य करणे.
पावसाळी ढग काही सूर्याला झाकू शकत नाही. तसेच तुमचा मर्यादित दृष्टीकोन हा मनुष्याला प्रगतीपासून रोखू शकत नाही. आपला दृष्टीकोन वाढवा. घराबाहेरही जग आहे जे तुमची वाट बघत आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
बालक, पालक, संगोपन आणि कुटुंब
८०८०२१८७९७

डीअर झिंदगी हा सिनेमा आवर्जून बघाल. ह्या सिनेमामध्ये माणसाच्या आयुष्यातले जवळपास सगळ्याच भागावर भाष्य केले आहे


डीअर झिंदगी हा सिनेमा आवर्जून बघाल. ह्या सिनेमामध्ये माणसाच्या आयुष्यातले जवळपास सगळ्याच भागावर भाष्य केले आहे. जितका समजून घ्यायचा प्रयत्न करता येईल तितका समजून घ्या.
आताच्या तणावाच्या काळात हा सिनेमा अनेकांना नवीन आशा देवून जावू शकतो. समुपदेशन हे कसे काम करते आणि आम्ही म्हणजे समुपदेशक कसे काम करतात अर्थात सिनेमा बोलले तर थोडा फिल्मी पना आला आहे ते वगळून तुम्हाला समजून येईल.
प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यात घरात समस्या असतात आणि समुपदेशक, प्रशिक्षक हे हि माणसेच असतात.
ह्यामध्ये थोडासा भाग हा मराठी मानसिकतेचा देखील आहे, कसे पैसे कमावण्यासाठी आपण जर आवडीचे किंवा छंदाला आपण व्यवसायीक स्वरूप दिले तर कसे घरच्यांपासून ते समाज हे वेगळ्या नजरेने बघते, कसे तुम्ही चांगली प्रगती करत असतानाही सल्ला दिला जातो काही चांगले काम कर म्हणून ह्यावरही उत्तम भाष्य केले आहे.
आई वडिलांसाठी खूप महत्वाचा संदेश देण्यात आला आहे, कृपया पालकांनी हा सिनेमा आवर्जून बघावा.
तरून तरुणींनी साठी नाते संबंध, प्रेम प्रकरण खाजगी आणि व्यावसायिक आयुष्य ह्यावर चांगला प्रकाश टाकला आहे.
समजून घ्याल आणि आयुष्याच्या समस्या ह्या समुपदेशकाच्या सहाय्याने सोडवायचा प्रयत्न कराल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


संस्कार आणि शिक्षण ह्यामधील फरक, समज आणि गैरसमज
संस्कार : आईच्या गर्भापासून सुरु होते.
शिक्षण : ५ वर्षांनंतर आणि आता २ वर्षांनंतर सुरु होते.
संस्कार : नवजात शिशु आई वडील आणि परिवारातील इतर सदस्यांकडून बघत ऐकत किंवा ते शिकवतील तसे शिकत जातो.
शिक्षण : शाळा, शिक्षक आणि सोबतचे विद्यार्थी शिकवतात.
संस्कार : शरीरातील पेशींपर्यंत खोलवर रुजतात.
शिक्षण : मेंदूमध्ये थोडेफार प्रमाणात रुजते.
संस्कार : आई, वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य जबाबदर असतात.
शिक्षण : शाळा जबाबदार असते.
संस्कार : आत्मविश्वास निर्माण करतो.
शिक्षण : विश्वासाचे भ्रम निर्माण करते.
संस्कार : सज्जन दुर्जन मनुष्य घडवते. जबाबदारी घर परिवाराची.
शिक्षण : सज्जन दुर्जन दोघांना घडवते. जबाबदारी त्या व्यक्तीचीच किंवा त्याच्या घर परिवाराची.
संस्कार : सर्वांचा आदर, सन्मान करायला शिकवते.
शिक्षण : पदवी, पद आणि वयानुसार आदर करायला शिकवते.
संस्कार : मुलांना जे आवडते ते करायला पूर्ण संधी दिली जाते किंवा करून घेतले जाते.
शिक्षण : विषय समजो वा न समजो, आवडो वा न आवडो, जबरदस्ती ने वेळ प्रसंगी मारून शिकवले जाते.
संस्कार : स्वभाव घडवते.
शिक्षण : समाज, सरकार ला जसा पाहिजे तसा व्यक्ती घडवला जातो, उद्योग व्यवसायांसाठी नोकरदार निर्माण केले जातात.
संस्कार : नैसर्गिक असतो
शिक्षण : अनैसर्गिक असते.
संस्कार : मुक्त जगायला शिकवते
शिक्षण : दुसर्यांचे गुलाम बनायला शिकवते
धन्यवाद
अश्विनीकुमार
बालक, पालक आणि कुटुंब
८०८०२१८७९७

हा लेख लिहिण्याचा उद्देश हा तुमचा हेअर स्टाइल आणि टेटू आर्ट हे व्यवसाय आणि त्याच्याशी निगडीत उद्योगाकडे आहे



Style Inc. with Aalim Hakim

टीएलसी टीव्ही चॅनेल वर एक कार्यक्रम लागतो, नाव आहे स्टाइल आयएनसी. ज्यामध्ये प्रसिद्ध हेअर स्टाइलिस्ट आणि टेटू आर्टिस्ट आलीम हकीम आहे. आलीम हकीम चे ग्राहक हे प्रसिध्द सिने कलाकार संजय दत्त, अंशुमन खुराना, टायगर श्रॉफ, वरून धवन आणि इतर प्रसिद्ध सिने कलाकार आहेत.
हा लेख लिहिण्याचा उद्देश हा तुमचा हेअर स्टाइल आणि टेटू आर्ट हे व्यवसाय आणि त्याच्याशी निगडीत उद्योगाकडे आहे. मोठी शहर आणि लहान शहरांमध्ये हा व्यवसाय आणि त्याच्याशी निगडीत उद्योग हे वाढत आहेत.
दुसरा उद्देश हा त्यांचे वागणे बोलणे, देहबोली, आत्मविश्वास आणि आरोग्य हा आहे. इतक्या दबावाखालीही त्यांना स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट ठेवावे लागते.
जेव्हा तुम्ही शांत मन असलेली, ध्येयाशी एकरूप असलेली, श्रीमंत, समृध्द आणि परदेशी नागरिक हि लोक प्रत्येक तासाला, मिनिटाला, सेकंदाला आणि क्षणाला कसे राहतात हे समजून येईल. ज्याने अनुभव घेतला आहे त्याला जस्त स्पष्ट करायची गरज नाही आणि जर तुम्ही अनुभव नसेल घेतला तर एकदा घ्या नाहीतर त्याशिवाय हा लेख समजणार नाही. अनुभवला पर्याय नाही.
हि लोक मानसिक दृष्ट्या इतकी सक्षम असतात कि प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत नाही. भले वृत्तपत्र आणि वाहिन्या त्यांच्या खाजगी गोष्टी ह्या सार्वजनिक केल्या तरी किंवा त्यांच्या चाहनार्यांनी, न चाहनार्यांनी काहीही कमेंट दिल्या तरी ते शांत बसतात.
जेव्हा कुणाकडे पैसा आणि प्रसिद्धी येते तेव्हा प्रचंड मानसिक तणावही येतो. जर तुम्ही गरीब किंवा मध्यमवर्ग ह्या वातावरणात राहत असाल तर तुम्हाला ह्याची प्रचीती नाही येणार. हा वर्ग जास्तीत जास्त दुसर्यांच्या आयुष्यात डोकावत असतो. अपवादही आहेत. जे पुढे प्रगती करतात किंवा त्यांची मुल मुली करतात.
नुसता पैसा किंवा प्रसिद्ध असून मनुष्य तसा होत नाही. त्याचे वागणे बोलणे त्यानुसार बदलले तरच तो ते आयुष्य मरेपर्यंत जगू शकतो नाहीतर परत तो जुन्या आयुष्यात परत जातो.
टीएलसी टीव्ही चॅनेल आणि कार्यक्रम ह्यासाठी खालील लिंकवर क्लिक कराल
http://www.tlcindia.co.in/style-inc-with-aalim-hakim/
आलीम हकीम ह्यांची वेबसाईट आणि चार्जेस ह्यासाठी खालील लिंक वर कीलक कराल
https://www.purplle.com/…/hakim-alim-hair-academy-bandra-we…
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७