“चितळे व इतर उद्योजक व्यवसायिक हे गुगल येण्याच्या अगोदरपासून प्रसिद्ध होते व भले ते ऑनलाईन रजिस्टर जरी नसले तरी ग्राहकांना काही फरक पडत नाही कारण त्यांची जाहिरात हि प्रवासी लोक म्हणजे ग्राहकांपासून होते, आपल्याकडे येते ते पण पूर्ण अनुभव घेवून अनेकदा तेथून विकत घेवून घरी नेले जाते, नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांना दिले जाते, इथे कुठेही फुकट वितरण केले नाही तरीही जाहिरात उत्पादनासह झाली. हा नियम फक्त मोठ्या उद्योजक व्यवसायिकांना नाही तर लहान उद्योग व्यवसायिकांना देखील लागू होतो. प्रवासी ग्राहक त्यांची सुद्धा जाहिरात करत असतात. ऑनलाईन ला इतके महत्व देवू नका आणि उद्योग व्यवसाय सुरु करा, प्रचंड यशस्वी व्हाल.”


अश्विनीकुमार