नुसते बी ने झाड नाही उगवत, त्यासाठी तुम्हाला ते पेरावे लागेल,
सुपीक जमीन, पाणी, उन आणि सूर्यप्रकाश ह्या नैसर्गिक मुफ्त
आणि वाढीसाठी गरजेच्या असलेल्या गोष्टी भेटल्या कि बी चे रोपटे,
रोपट्याचे झाड आणि झाडाचा वटवृक्ष होतो हे निसर्ग नियम अटळ आहे,
आणि जगाच्या पाठीवर सगळीकडे सारखे आहे.
तसेच उद्योग धंद्याचे आहे जर तुम्ही जर तुम्ही उद्योग धंद्याच्या वाढीसाठी
लागणाऱ्या पूरक गोष्टी पुरवत गेलात तर त्या उद्योग धंद्याचा वटवृक्ष व्हायला वेळ नाही लागणार.
उद्योगाचे बी म्हणजे तुमची कल्पना आणि वाढण्यासाठी गरजेच्या गोष्टी म्हणजे
इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, जबाबदारी, लीडरशिप क्षमता, प्रोस्ताहन परिवाराकडून,
नातेवाइकाकडून, मित्रमंडळीकडून व समाजाकडून ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते, खास
करून तुम्हाला घरच्यांकडून पूर्णपने समर्थन व प्रोस्थाहन भेटले पाहिजे. जर तुमचा परिवार
पूर्णपणे एक आहे, सगळे उदारमतवादी आहेत व प्रोस्ताहन देणारे आहेत तर तुम्ही आनंदी,
यशस्वी व समृद्ध जीवन जगू शकता. ह्यामध्ये काही अंतराळाचे विज्ञान नाही आहे. कोणीही समजू शकते.

- अश्विनीकुमार

निर्वाणा
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार