जग शिक्षित, श्रीमंत किंवा ताकदवर लोकांपेक्षा समजूतदार लोकांच्या पाठी जाते.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

कचरा वाहून नेणाऱ्या गाडीचा सिद्धांत
उत्तम संदेश, जेव्हा तुम्ही एकांतात असाल तेव्हा ह्या सिद्धांताचा विचार कराल. हे सत्य आहे.

आम्हाला विमानतळावर जायचे होते यासाठी आम्ही टेक्सी केली व विमानतळाच्या दिशेने निघालो. आम्ही बरोबर उजव्या बाजूने चाललो होतो, जशी पार्किंग जवळ येताच एक काळ्या रंगाची गाडी आली आणि जिथे आम्ही पार्क करणार होतो तिथे आमच्या समोर पार्क झाली.
आमच्या चालकाने जोरात ब्रेक दाबला, इंचांनी आमची गाडी त्या काळ्या गाडीपासून वाचवत पुढे गेली.
त्या काळ्या गाडीचा चालक आमच्या कडे बघत ओरडायला सुरवात केली. आमचा चालक हा चांगला होता, तो हसला आणि मान हलवली.
मी आमच्या चालकाला विचारले "तू असे का केलेस? त्याने जवळपास आपल्याला ठोकलेच असते आणि हॉस्पिटल ला पाठवले असते."
आमचा चालक स्पष्टीकरण देत म्हणाला खूप लोक हि कचऱ्याच्या गाडीसारखी असतात, त्यांच्या मध्ये कचरा भरून वाहत असतो, वैतागाने भरलेला कचरा, रागाने भरलेला कचरा आणि निराशेने भरलेला कचरा. जेव्हा ती कचऱ्याची गाडी पूर्णपणे भरून गेलेली असते तेव्हा त्यांना तो कचरा खाली करायचा असतो आणि कधी कधी ते तुमच्यावर तो कचरा खाली करतात.
हे कधीच मनावर घ्यायचे नाही. फक्त हसायचे, चांगल्या भावना त्यांना पोहचवायच्या आणि पुढे जायचे. त्यांनी आपल्यावर फेकलेला कचरा आपण घेवून पुढे कामावरच्या लोकांवर, घरी किंवा इतर रस्त्यावरील लोकांवर फेकत नाही जायचे. म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे कि यशस्वी लोक कधीच कचऱ्याच्या गाडीमुळे आपला दिवस खराब जावू देत नाही.
सकाळी निराशेने उठण्यासाठी आयुष्य खूप छोटे आहे, म्हणून जे तुमच्याशी चांगले वागतात त्यांच्यावर प्रेम करा. जे तुमच्याशी नीट नाही वागत त्यांच्या साठी प्रार्थना करा.
आयुष्य म्हणजे १० % तुम्हाला काय मिळत आहे.

आणि

९० % म्हजे तुम्ही त्यातून काय घेत आहात हे आहे.

कचरामुक्त आयुष्य जागा.

चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७ह्या जगात वाघ. सिंह, अस्वल, कोल्हा, साप आणि इतर अनेक, विविध विचारसरणीची लोक आहेत त्यामध्ये प्रत्येक वेळीस शेळी बनून का जगायचे?
- अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
तुम्ही कितीही शिका, पण जो ह्या क्षणात आलेली संधी, समस्या, बदल समजून घेतो तोच आयुष्यात पुढे जातो, बाकी जगण्यासाठी धडपड करत असतात किंवा संपून जातात.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
करोडो लोकांची पसंदी देखील कमी पडतील, जो पर्यंत तुम्ही स्वतःला आवडणार नाही.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७विचार करणे हे कठीण आहे,
त्या मुळे सामान्य मानसिकतेची लोक हि तुलना करत बसता.
कार्ल जंग

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना खुले पत्र
मी परीक्षेत काही विषयांत नापास झालो होतो, पण माझा मित्र सगळ्या विषयात उत्तम गुणांनी पास झाला होता. आज तो मायक्रो सोफ्ट मध्ये इंजिनिअर आहे आणि मी मायक्रो सोफ्ट चा मालक आहे.
बिल गेट्स
बारावीच्या परीक्षेमध्ये काहीही निकला लागो, जगावर सर्व क्षेत्रात यशस्वी होणाऱ्यांमध्ये शाळा सोडलेले किंवा नापास झालेलेच आहे. एकच आयुष्य भेटले आहे, तुम्हाला जे आवडते तेच करा, जग नुसते नाव ठेवायला आहे, त्याला तुम्ही असाल काय आणि नसाल काय ह्याने काहीच फरक पडत नाही. डॉक्टर, इंजीनिअर, सरकारी, खाजगी नोकरी ह्या पलीकडे खूप मोठे जग आहे ज्यांना तुमची नितांत गरज आहे.
तुमची आत्महत्या हि आता असलेल्या समाजाला दिलेली एक प्रकारची शिवी आहे, विद्यार्थी हा काही मंगळावरून नाही आलेला, तो ह्याच समाजातून बनलेला आहे, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हि समाजातील असलेल्या मानसिकतेची घाण दाखवत असते. जिथे समजूतदार पण संपतो तिथे कायदा आणि आत्महत्या ह्यांचे राज्य सुरु होते.
कोणीही तुमच्या पाठीशी असो व नसो मी एकटा तुमच्या पाठीशी आहे, वेळ प्रसंगी कोणीच कामी येत नाही, सुशिक्षित तर बिलकुल नाही, ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही एकटे आहात, माझ्यासारखी अनेक मित्र मैत्रिणी आहेत जे तुमच्या बाजूने आहे, असे अनेक पालक आहेत जे आपल्या मुलांना मुक्त पने जगू देतात व असे अनेक विद्यार्थी आहेत जे नापास होवूनही गुगल, मायक्रो सोफ्ट, एपल साठी काम करत आहेत व विदेशात गेले आहेत.
शैक्षणिक परीक्षेत नापास झाले तर चालेल, आयुष्याच्या परीक्षेत कधीच नापास होऊ नका.
संपूर्ण जग तुमच्यासाठीच आहे, कल्पनेचे, कौष्यल्याचे पंख लावा आणि घ्या भरारी.

नकारात्मक विचार आले कि लगेच फोन कराल.

अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७

कसा लागला वडापाव चा शोधआपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी 'वडापाव' खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ? 

वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहे.. 1965-70 चा तो काळ होता, कमलाबाई मुंबईतील दादर येथे राहत होत्या,उन्हाळ्याचे दिवस होते, पाव्हणे घरी आले म्हणून त्यांनी स्वयंपाक केला होता. बटाट्याची सुकी भाजी, भजे,पुरणपोळी वगैरे.. स्वयंपाक करताना त्यांनी बटाट्याची सुकी भाजी भज्याच्या पिठात टाकून तेलात सोडली, तर एक वेगळाच पदार्थ तयार झाला. त्यांनी तो पदार्थ खाऊन बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला 'वडा' हे नाव दिले. 

नविन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला, जेव्हा लोक येऊन खाऊ लागले तर लोकांनाही खुप आवडला, पुढे पुढे मारवाडी हाॅटेलवाल्यांनी त्यांची ही कल्पना चोरली आणी त्यांच्या नावाने मुंबईत वडे विकू लागले. त्या सोबत सुरवातीला चपाती देत असत, धावपळीच्या मुंबई मधे चपाती सोबत कशी न्यावी म्हणून चहासोबतच्या पावासोबत वडा विकला जाऊ लागला. 

त्यांची कलाकृती चोरली हे पाहील्यानंतर त्यांनी 'रूचिरा' हा पाककृतीचा छोटेखानी पुस्तीका लिहली, आजही पाककृती मधे 'कमलाबाई ओगले' यांच्या 'रूचिरा' चा विक्रम कोणी मोडू शकले नाही. अशा या आज्जीचा  वयाच्या 86 व्या वर्षी 1999 साली पुण्यात निधन झाले.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७तुम्ही ९० % किंवा ६० % काढले असतील ह्याने कुणाला काहीच फरक पडत नाही, कुठेतरी शाळा सोडलेल्याने आधीच उद्योग सुरु केला असेल जिथे तुम्हाला पुढील ५ वर्षांनंतर तुमचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला असेल.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
घरातील मुलाला किंवा मुलीला जर उद्योजक किंवा उद्योजिका बनवायचे असेल तर लहान पणापासूनच त्याच्यावर किंवा तिच्यावर उद्योजकीय संस्कार करायला पाहिजे. यासाठी मुलांच्या बरोबरीने उद्योजकीय शिबिरे, चर्चासत्रे, परीक्षा, उद्योगांना द्यावयाच्या भेटी, उद्योजकीय प्रशिक्षणाचे छोटे अभ्यासक्रम इ गोष्टी मुलां व मुलींना उपलब्ध करून द्यावयाच लागतील. मोठ्या उद्योगपतींच्या मुलां मुलींना त्यांच्या बाबा - काका - मामाच्या उद्योगातून आपसूक धडे मिळत असतात.
डॉ. गिरीश प. जाखोटिया
पुस्तक : चला बदल घडवूया

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

मानसिक गुलामाचे आयुष्य
सोमवार : सकाळी लवकर उठणे, कामावर जाने (जायची वेळ फिक्स आहे), तेच एकसारखे काम करणे, त्याच नकारात्मक लोकांमध्ये राहणे, त्याच सामान्य गोष्टी करणे, जगावर चर्चा करणे, निघण्याच्या वेळेवर अजून काम येणे, रात्री उशिरा घरी जायला निघणे, ट्रेन मध्ये गर्दी असणे, सामान्य मानसिकतेची लोक, सामान्य चर्चा, जाती धर्माच्या, तेढ निर्माण करणाऱ्या, कट्टर वादाच्या गोष्टी करत बसने, स्त्रियांबद्दल खालच्या दर्ज्याच्या गोष्टी करणे, दुसऱ्या समाजातील किं जातीतील असेल अजून खाली जावून चर्चा करणे, बसण्याच्या जागेवरून भांडण, घरी पोहचणे, IPL क्रिकेट मध्ये जे खेळाडून गुंतवणूकदार करोडो कमवत आहेत तो सामना केबल भाडे भरून आपण बघणे, ते जिंकल्यावर असे वाटते कि आपण जिंकलो आणि आपल्या आयुष्यत सपशेल पराभूत असतो, ते करोडो घेवून घरी जातात, आपण शून्य पण आत्मविकासासाठी असलेले वेळ नको त्या गोष्टीला देवून परत झोपून जातो.
सारांश : मानसिक गुलाम आपली सर्व इच्छाशक्ती मानसिक गुलाम बनून राहण्यातच घालवतो.

मंगळवार : सोमवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

बुधवार : मंगळवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

गुरुवार : बुधवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

शुक्रवार : गुरुवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

शनीवार : शुक्रवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

रविवार : अगदी कोणी मेलाच तर बाहेर जाने, जवळपास पैसे बघून फिरायला जाने, फिरण्यापेक्षा खर्चावर लक्ष्य, मुलांना ओरडणे, प्रत्येक गोष्टीला नाही बोलणे व मुर्खांसारखे कारणे देणे जे फक्त तुमच्या घरचीच मंडळी ऐकू शकतात, थोडे जास्त पैसे खर्च करून गेलात तर जास्तीत जास्त आठवड्याभराच्या गुलामीच्या आयुष्याला विसरायचा प्रयत्न करण्यात उर्जा घालवणे, कधीतरी केलेल्या पिकनिक चे विषय काही वर्ष काढणे, भूतकाळ सतत उकरत राहणे, स्वतःचे शहाणपण सांगत राहणे, चांगले, सकारात्मक किंवा प्रगतीशील सल्ले, चर्चा नाकारणे, आत्मविकास आर्थिक विकास मोफत किंवा फी भरून असलेल्या प्रशिक्षणाला न जाने व नावे ठेवणे, नाहीतर शनीवारची पुनरावृत्ती. प्रगती शून्य.

जानेवारी : वरील सर्व आठवड्याची पुनरावृत्ती, महिना संपला.

फेब्रुवारी : जानेवारीची पुनरावृत्ती

मार्च : फेब्रुवारीची पुनरावृत्ती

एप्रिल : मार्चची पुनरावृत्ती

मे : एप्रिलची पुनरावृत्ती

जून : मेची पुनरावृत्ती

जुलै : जूनची पुनरावृत्ती

ऑगस्ट : जुलैची पुनरावृत्ती

सप्टेंबर : ऑगस्टची पुनरावृत्ती

ऑक्टोबर : सप्टेंबरची पुनरावृत्ती

नोव्हेंबर : ऑक्टोबरची पुनरावृत्ती

डिसेंबर : नोव्हेंबरची पुनरावृत्ती

२०१६ वर्ष : वरील पुनरावृत्तीत संपले

ते सरासरी वयोमर्यादा अंदाजे १०० पकडूया जर आता वय २० असेल तर

२०९६ : मरण्याच्या काही सेकंद अगोदर आठवणार कि आपण एक सारखेच आयुष्य का जगात होतो जेव्हा आपल्या मध्ये अपार क्षमता होती, फक्त ती व्यक्त करता नाही आली म्हणजे व्यक्त करण्यासाठी फक्त १० सेकंद हा कालावधी पुरेसा होता ज्यामुळे तुमचे तुमच्या पुढील पिढीचे संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होते, ते दुख कोणीच सहन करू शकणार नाही.

स्वर्ग पण इकडेच आहे आणि नर्क पण.
तुम्हाला कसे जगायचे आहे ते तुम्ही ठरवायचे आहे.

अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७संपूर्ण जगामध्ये कुठेही जा,
तुम्हाला मालक हा सर्वांगीण संपन्न समृद्ध आयुष्य जगताना दिसेल,
MD, CEO, आणि MANAGER हे श्रीमंती पण सोबत नोकराचे,
आणि त्याखालील लोक हे नोकराचे आयुष्य जगताना दिसतील.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७अश्या डोंगरावर नका चढू जिथे लोक तुम्हाला आरामात बघू शकतील,
अश्या पर्वतावर चढा जिथे तुम्ही जग बघू शकाल.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

UPSC , MPSC, IIT, IIM

UPSC , MPSC, IIT, IIM
जे UPSC , MPSC, IIT, IIM परीक्षेमध्ये पास झालेत पण प्रकाशझोतात नाही आले, जे नापास झालेत, ज्यांनी प्रयत्न केला पण काही
कारणास्तव परीक्षा नाही देवू शकले अश्या विद्यार्थ्यांच्या धाडसिपनाला,
दृढ इच्छाशक्तीला, प्रामाणिक पने केलेल्या प्रयत्नाला माझा सलाम.
संपूर्ण जगामध्ये जे पहिले आले आहेत, विजेते आहेत, उच्च पदावर आहेत,
श्रीमंत व शक्तिशाली आहेत, अशी लोक नगण्य प्रमाणात आहेत, ते ह्या
जगातून नाहीशे झाले तरी मनुष्य जात संपणार नाही. पण जर जे दुसऱ्या
क्रमांकापासून खाली येतात, जे पराभूत आहेत, जे सामान्य आहेत अशी लोक जर पृथ्वीतलावरून नाहीशे झाले तर संपूर्ण मानवजातच नष्ट होवून जाईल.
जाता जाता एकच मोलाचा सल्ला देवून जातो,
माणसाची इच्छाशक्ती हि प्रत्येकवेळेस यशस्वी ठरली आहे,
प्रचंड इच्छाशक्ती असलेले, ध्येयाने झपाटलेल्या स्त्री किंवा पुरुषाचा नाद करायचा नाही.
तुमच्या मनात कधीही नकारात्मक विचार आलेत कि लगेच फोन कराल.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

आईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथाआईन्स्टाइन : मी तुला एक प्रश्न विचारेल आणि तू मला एक प्रश्न विचारायचा. जर तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तर तू मला एक रुपया देणार. जर मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर नाही देवू शकलो तर मी तुला १००० रुपये देईल.
मिस्टर बिन : ठीक आहे.
आईन्स्टाइन : (मिस्टर बिनला कठीण प्रश्न विचारला)
मिस्टर बिन : (आईन्स्टाइनला रुपया दिला)
आईन्स्टाइन : ठीक आहे. आता तुझी पाळी.
मिस्टर बिन : असा कुठचा प्राणी आहे ज्याचे पाय आहे, जेव्हा तो रस्ता पार करताना पायांवर करतो, आणि जेव्हा तो परत जातो तेव्हा तेव्हा त्याचे पाय असत?
आईन्स्टाइन : (खूप विचार करतो) मी हरलो. मी उत्तर देवू शकत नाही. (आईन्स्टाइन मिस्टर बिनला १००० रुपये देतात)
आईन्स्टाइन : पण मिस्टर बिन असा कुठचा प्राणी आहे तो?
मिस्टर बिन : (आईन्स्टाइनला रुपया देतो).
जग अश्या लोकांनी भरले आहे, तर्कावर कल्पनेने, इच्छा शक्तीने प्रत्येक वेळेस मात केली आहे, धाडसी लोक कधीच आपल्या बरोबर किंवा आपल्या पेक्षा हुशार व्यक्तींशी स्पर्धा करताना घाबरत नाही, कारण त्यांना माहित असते कि अनुभव हा चार भिंतीमध्ये बसून भेटणार नाही.

अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७जो सेल्समन आहे तो उद्योजक आहे,
उत्तम सेल्समन उत्तम उद्योजक,
ह्याचा अर्थ हा नाही कि जर तुम्हाला
विक्रीकला येत नसेल तर तुम्ही
उद्योजक नाही बनू शकत म्हणून,
जर आपले डोक वापरा आणि
सेल्समनला कामावर ठेवून घ्या.
मुक्त मनाचा उद्योजकच जिथे तो कमी आहे
तिथे तो त्या विषयाच्या तज्ञाची नेमणूक करून
आपल्या डोक्यावरील ताण त्याच्या डोक्यावर देतो.
- अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७फक्त तणाव दूर केल्यास आपण आपला ५०% पेक्षा जास्त पैसा वाचवू शकतो आणि तो वाढवूही शकतो. सल्ला व प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
solution.nirvana@gmail.com
तुमचा प्रत्येक निर्णय व कृती हि तुम्हाला तुमच्या भाग्याजवळ नेत असते आणि तुमची मुल हे तुमच बघून शिकत असतात.

AMAZON १२००० करोड गुंतवणूक आणि तुम्ही
AMAZON ची सुरवात भारतामध्ये २०१३ मध्ये झाली.
सुरवातीला ते फक्त इलेक्ट्रॉनिक सामान विकत होते.
भारतामध्ये उद्योग वाढवायला त्यांनी १२,००० करोड गुंतवले.
जगातील कुठल्याही मोठ्या उद्योगामागे मागे हजारो छोटे उद्योग गुंतलेले असतात.

माझा प्रश्न सोपा आहे.
तुम्ही ह्या १२,००० करोड पैकी काही आपल्याला भेटावे ह्यासाठी काय केले?

१) कच्चा माल पक्का करून विकला?
२) स्वतःचे उत्पादन ऑनलाईन नेले?
३) असंघटीत उद्योग उत्पादनाला संघटीत करून ऑनलाईन बाजारात विकायला ठेवले?
४) गोडाऊन बांधून, विकत किंवा भाड्याने घेवून कंपनीला लावले?
५) ट्रक, टेम्पो किंवा इतर माल वाहतूक गाड्या घेवून ट्रानस्पोर्ट व्यवसायिक म्हणून स्वतः किंवा भाड्याने गाड्या लावल्या?
६) माल साठी लागणारे कव्हर व इतर वस्तू बनवून व्यवसायिकांना पुरवल्या?
७) इमेज एडिटिंग, डाटा एन्ट्री, अपलोडिंग, कंटेंट रायटिंग व इतर संगणकीय सर्विस पूरवल्यात?
८) उत्पादन डिलेव्हरी करणारी सर्विस पुरवलीत?
९) ह्याच वेबसाईट ची नक्कल करून आपली एक वेबसाईट सुरु करून ह्या वेबसाईट वरील उत्पादन तुमच्या वेबसाईट वर विकलेत का?
१०) त्यांना लागणार कामगार वर्ग पुरवण्याची सर्विस तुम्ही दिली का?

असे अनेक प्रश्न आहेत जे तुम्ही स्वतःला विचारायचे आहे.कृतीशील माणस कारणे नाही ऐकत, ते कृती करण्यात, पैसे कमावण्यात आणि घर सांभाळण्यात मग्न असतात. इंटरनेटचा हा नवीन व्यवसायिक ओळख होण्यासाठी, किंवा आपले उत्पादन, सेवा हि नेट द्वारे ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी करत असतात. थोडक्यात त्यांचा विकास चालू असतो, काम संपल्यावर ते त्यांच्या खाजगी आयुष्यात काय करतात ह्याच्याशी मला काही देणे घेणे नाही.

ह्या १२००० करोड मध्ये नाही बोलले तरी २००० ते ५००० सुषम, मध्यम आणि लघु उद्योग चालत असतील.

विचार करा आणि योग्य कमेंट्स द्या.

अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७तुम्ही फक्त
दररोज कामाला जायचे,
बिलं भरायची,
सरकारी कर भरायचे
आणि मरून जायचे यासाठी
जन्माला नाही आला आहात.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७तर्काने तुम्ही फक्त वैमानिक बनू शकता
ज्याचा पगार फक्त काही लाखांच्या घरात आहे.
कल्पनेने तुम्ही "कसा आकाशात झेप घेवू शकेन?"
ह्यावर संशोधन करून विमानाची निर्मिती करू शकता,
ज्याचा नफा व रॉयल्टी हजारो करोडोंच्या घरात आहे.
- अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७सकारात्मकता हा आयुष्य 
बघण्याचा उत्तम दृष्टीकोन आहे.
- अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७जर तुम्ही शिक्षणावरून माणसाची योग्यता ठरवत असाल इंजिनिअर झालेला ओसामा बिन लादेन हा योग्य कार्य करणारा होता आणि शाळा सोडलेला बिल गेट्स हा अयोग्य कार्य करतो असे म्हणावे लागेल.
- अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७गुलामाचे मन विचारते
हे कायदेशीर आहे का?
स्वतंत्र माणसाचे मन विचारते
हे योग्य आहे का?
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७जर तुम्ही अपार कष्ट आणि प्रामानिकताच संपत्ती मिळवून देऊ शकते या विचाराचे असाल तर तो विचार सोडून द्या. ते काही खर नाही आहे. ज्या वेळी संपत्ती अमाप रुपात येते तेव्हा ती अपार कष्ट करूनच येते अस नव्हे. संपत्ती, श्रीमंती, जर ती येतच असेल तर, ती ठाम मागणीनंतर, निश्चित तत्वांच्या आधारे येत असते, केवळ संधी वा नशिबाने नव्हे.
- अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
जेवढा वातानुकुलीत कार्यालयात बसून एक डॉक्टर, इंजिनिअर, व इतर पदवीधर नाही कमवत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दिवसाला रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणारे संध्याकाळी कमावून जातात. स्वच्छ कपड्यात गुलाम बनून जगण्यापेक्षा मेहनतीने मळलेल्या कपड्यात मालक बनून जगलेले कितीतरी पटीने बरे आहे.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
शांत मन चमत्कार घडवते.
- अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७अंडरवर्ल्ड मध्ये जी शब्दाला जागायची सवय असते ती सभ्य लोकांत नसते.
गुन्हेगारी जगतात जो प्रामाणिक पणा असतो तो सभ्य लोकांत नसतो.
भीष्मराज बाम

चला उद्योजक घडवूया 

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७तुमचे भविष्य हे तुम्हाला घाबरवत नाही आहे. जी तुम्ही भूतकाळाची पुनरावृत्ती करत आहात ती तुम्हाला तणावात टाकत आहे.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७आकर्षणाचा सिद्धांत
जसा तुमचा दृष्टीकोन असतो अगदी तसेच आयुष्य तुम्ही जगत असता किंवा तसाच अनुभव तुमच्या वाट्याला येत असतो. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार जर तुम्ही गरिबीच्या दृष्टीकोनातून जर श्रीमंती मागत असाल तर तुमच्या वाट्याला गरीबीच अनुभवायला येईल, आणि जर विरोध किंवा जबरदस्ती करायचा करायचा प्रयत्न केला तर गरिबीचा अनुभव सर्व मार्गांनी तुमच्या कडे खेचला जाईल.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७