अजूनपर्यंत काळा किंवा सफेद पैसा कमावणारा मूर्ख मनुष्य मला भेटला नाही. ते हुशारच असतात. पैसा त्यांच्याचकडे जातो जो त्याची कदर करतो. काळा पैसा सफेद करण्याचे अनेक मार्ग असतात, ते मार्ग ज्यांनी ज्यांनी वापरले असतील ते आता आरामत आहेत, पण जे गर्विष्ठ असतात त्यांचा पैसा हा एकतर कचऱ्यात किंवा जाळण्यात जातो.
असेच सफेद पैश्यांचेदेखील आहे. जो योग्य रित्या हाताळतो त्याच्याच हातात पैसा वाढत जातो, बकिंच्याचा पैसा वाळूसारखा हातातून निसटून जातो.
पैश्याला माहित नाही कि तो कुणाकडे जातो ते, जो मनापासून कुठलाही मार्ग वापरून किंवा ज्यावर त्याचा विश्वास आहे असा मार्ग वापरून कमावण्याचा प्रयत्न करेन त्याच्याकडे पैसा जाणारच.
असेच निसर्गाचे देखील आहे, गुरुत्वकर्षनाच नियम सगळ्यांनाच सारखा आहे. तो हे नाही बघत कि हा सज्जन मनुष्य आहे किंवा वाईट आहे, तो दोघांनाही एकसमान रित्याच खालीच खेचणार.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार