मानसिक प्रवाह व माणसाचे खाजगी, व्यावसायिक जीवन




आपल्या मनात अनेकदा असा प्रश्न पडत असेल कि "अरे हि विचारांची शृंखला कुठून चालू झाली?" "का नकारात्मक विचारांना मी माहित असून सुद्धा उर्जा देत आहे?" "मी दररोज एकसारखे आयुच्य का जगत आहेत?" "का खूप कमी लोक हि नव नवीन अनुभव घेत प्रगतीशील आयुष्य जगत आहेत?" "का त्यांच्या आयुष्यात सर्व काही छान चालू आहे?" "ज्यांची लायकी नाही का ते सर्वांगीण सुखी आयुष्य जगत आहेत?" "मी चांगले वाईट, सुख दुख ह्या विचार चक्रात अडकलो आहे का?" "मला जे विचार नाही करायचे आहेत त्यांना मी भावनांची उर्जा देत का सतत करत असतो?" "मला माहित आहे कि नकारात्मक विचार केल्याबरोबर मला काही शारीरिक आजार होतात तरी पण मी तेच विचार का करत असतो?"

               जर आपल्याला असे प्रश्न सतत पडत असतील आणि जर तुम्ही त्याच्यावर समाधान शोधायचा नाही  प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यात सतत प्रश्नच उभे राहत जात असतील, आणि तुम्ही नाकारले तरी हेच वास्तव आहे. हे असे का घडते? ह्याचे उत्तम विश्लेषण डेनियल गोलमन ह्या जग प्रसिद्ध मानस शास्त्रज्ञाने त्याच्या इमोशनल इंटेलीजंन्स ह्या पुस्तकात त्यांचे अनेक वर्षांचे प्रयोग व त्यातून निघालेले निष्कर्ष अतिशय उत्तम प्रकार मांडले आहे. माझा वाचन हा छंद असल्यामुळे मी सांगतो कि हे पुस्तक खूप किचकट व शास्त्रीय भाषेने भरलेले आहे, त्या मुळे सामान्य वाचकांना ते आवडण्याची सुतराम शक्यता नाही.

               इमोशनल इंटेलीजंन्स म्हणजे काय? तर आपल्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करा, आपण याला भावनिक प्रगल्भता, साक्षरता, सक्षमता असे म्हणू. जगामध्ये कुठेही जा तिथे माणसाच्या नैसर्गिक, शारीरिक आणि भावनिक गरजा एकसारख्या असतात, पाश्चात्य लोक हे मुक्त मनाने आपले म्हणणे मांडत असतात जेणे करून शास्त्रज्ञांना समस्येचे समाधान भेटणे सोपे जाते, त्यांचे मानसिक समाधान झाल्यामुळे त्यांना त्यांच्या परिवार, समाज, राज्य आणि देश ह्यांच्या प्रगतीसाठी मानसिक आणि शारीरिक वेळ देत येतो, यामुळे तिथे सतत नवीन संशोधन हि होत असते.

               भारतामध्ये मानसिकतेने आपण एकाच वेळी १६०० काळातही असतो १९०० काळातही असतो आणि नवीन उपकरणांनी, कपड्यांच्या फॅशननि आपण २०१६ च्या काळात असतो. मला एकच समजत नाही कि २०० वर्ष जुने जेवण मी खाऊ शकत नाही, जे सडून कुजून माती झालेले असेल मग तीच लोक इतके  जुने विचार आता पर्यंत कसे काय घेवून जगत असतात?

               मनुष्य प्राणी हा हुशार आहे, जिथे जगण्याचे असते तिथे त्याला ताजे जेवण लागते, कारण त्याला माहित असते कि आपण जर ताजे जेवण नाही खाल्ले तर आजारी पडून मरून जावू, पण विचारांचे असे नसते, ते विचार त्या पिढीला आणि त्याच्या पुढील पिढीला अनुवांशिक आजार व नकारात्मक मानसिकता देवून जातात.

               हा तयार केलेला एक विचारांचा प्रवाह आहे, जो पिढ्यानपिढ्या न विचार करता ९० % लोक पुढच्या पिढीला देत जातात. हा प्रवाह गर्भ संस्काराने (आताच्या वैज्ञानिक पद्धतीने), कुटुंब संस्काराने, समाजातील संस्काराने आपण मोडू शकतो. आपली प्रवाहाला एक सामाजिक विचारांचा उतार भेटतो ज्यामुळे आपला प्रवाह अजून वेगाने वाहत जायला लागतो व त्या बरोबर आपली कृतीही होत जाते.

               विचारांच्या प्रवाहांचे दोन भाग करा, एक सकारात्मक उर्जा देणारा आणि दुसरा नकारात्मक उर्जा देणारा. जेव्हा तुम्हाला उस्ताह वाटत असेल, तेव्हा तुमची सकारात्मक उर्जा काम करते असे समजा, आणि जेव्हा नैराश्य वाटत असेल तेव्हा नकारात्मक उर्जा काम करते असे समजा. सकारात्मक विचारांची एक साखळी असते तशीच नकारात्मक विचारांची देखील असते, एक सुरु झाला कि त्या पाठोपाठ त्याला पूरक विचारांची शृंखलाच चालू होवून जाते.

              सकारात्मक आणि नकारात्मक ह्याचे विश्लेषण तुम्ही तुमच्या पद्धतीने कराल कारण माणसाच्या नैसर्गिक गरजा जरी एक सारख्या असल्या तरी त्यांचे प्रमाण प्रत्येक माणसांनुसार कमी जास्त असते. जास्त मेहनत करणाऱ्या माणसाला मी गाढव नाही बोलू शकत आणि कमी मेहनत करणाऱ्या माणसाला मी हुशार नाही बोलू शकत. प्रत्येक मनुष्य हा त्याच्या स्वभावानुसार जगत असतो. विजेचा वापर करून तुम्ही घर पण प्रकाशाने उजाळु शकता आणि त्याच विजेच्या झटक्याने कुणाचा जीवही घेऊ शकता.

               एक असतो नैसर्गिक मानसिक प्रवाह आणि दुसरा असतो कृत्रिम मानसिक प्रवाह. नैसर्गिक प्रवाह हा मुळातच श्रीमंत आणि समृद्ध असतो आणि कृत्रिम प्रवाह जो जो संस्कारांच्या रूपाने आपल्या आई वडील, कुटुंब, समाज आणि परिस्थितीतून येतो. नैसर्गिक प्रवाह हा आपल्याला चमत्कारी रित्या समृद्ध आणि श्रीमंत बनवतो आणि कृत्रिम प्रवाह हा आपल्याला खडतर मेहनत करायला लावतो.

               जे आई वडील त्यांच्या मुलांचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवता ते लवकर आयुष्यात जम बसवतात. त्यांचे सर्वांगीण आयुष्य जसे उद्योग, व्यवसाय, नोकरी, बढती, प्रेम संबंध, वैवाहिक आयुष्य उत्तम जगत असतात. ह्या सर्वांची सुरवात तुम्ही जेव्हा आईच्या गर्भात असता तेव्हा झालेली असते ते तुम्ही ५ ते ७ वर्षांचे होईपर्यंत तुमची विचारसरणी, स्वभाव, अंतर्मन किंवा विचारांचा प्रवाह विकसित झालेला असतो जो नंतर बदलत नाही, फक्त त्याला ताब्यात ठेवू शकतो.

               जो आपल्या भावनांशी किंवा शारीरिक गरजांशी निष्ठावंत असतो त्याच्यामधील भावनिक अडथळा दूर होऊन त्याचे आयुष्य बदलू लागते कधी कधी चमत्कारासारखे बदलून जाते. त्यासाठी विचार आणि भावना यामधील फरक ओळखायला हवा कारण आपण मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हजारो वर्ष मागे आहोत, आपण फक्त तंत्रज्ञानाने ह्या काळात आहोत पण विचारांच्या बाबतीत मागासलेले आहोत.

               ह्या विषयाचे अनेक पण श्रीमंत ते गरीब किंवा जगभरातील लोकांच्या स्वभावानुसार अनेक पण समान पैलू आहेत ते जसे तुमचे प्रतिसाद येतील त्यानुसार मी उलगडत जाणार.

काही शंका असल्यास संपर्क करा. खाजगी असतील त्या फक्त आणि फक्त इमेल, व्हास्टऐप किंवा फोन कराल.
सल्ला व प्रशिक्षण साठी आजच संपर्क करा.

धन्यवाद,

अश्विनीकुमार फुलझेले

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार