चेकमेट कंपनीवरील दरोडा आणि विजय माल्ल्याचा दरोडा आणि शेतकरी आत्महत्या

तुम्ही नुकतीच एक बातमी ऐकली असेल "चेकमेट कंपनीवर दरोडा, चोरट्यांनी काही करोड लुटले". आता मी आपण आपले आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन कसा हे विस्ताराने सांगेन. अगोदर असे चोरी दरोडे घालायचे प्रकार चालायचे पण आता काळ बदलला, आताच दरोडा म्हणजे तुमच्या समोर निर्लज्ज पणे घालतात आणि तुम्ही काहीच करू शकत नाही.
उदाहरणार्थ, मोबाईल नेटवर्क पुरवणारी कंपनी जिचे ग्राहक कमी पकडूया उदाहरणादाखल 3 करोड जी ग्राहकांना न सांगता 2 रुपये किमतीची रिंगटोन ऍक्टिव्ह करते म्हणजे 3,00,00,000 x 2 = 6,00,00,000 सहा कोटी, म्हणजे काही न करता 6 कोटी मिळवले. जे तक्रार करतात तेवढे ग्राहक कमी करूया 1,50,00,000 म्हणजे पुढच्या महिन्याला 3,00,00,000 कमावून जातात, हे चक्र असेच चालू राहते आणि ह्यामध्ये पोलीस तक्रार पण नाही करता येत. ती गोष्ट वेगळी आहे की पोलीस पण ह्याचे शिकार झालेले आहेत.
ह्याला बोलतात खाजगी पण कायदेशीर दरोडा. सरकारी दरोडा काय असतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि आपल्याच परिसरातील नगरसेवक, आमदार आणि खासदार अचानक 1 रूम किचन मधून करोडपती कसे होतात हे मला अजून समजले नाही आणि त्यांच्या भोवती लोकांची इतकी गर्दी का असते हे पण कोडेच आहे. सरकारी अधिकाऱ्यांची कशी बार मध्ये मिटिंग होत असते हे तर ज्याचे त्या कार्यालयाशी संबंध सतत येत असतो किंवा काम करत असतो त्याला चांगलेच माहीत असेल. तेव्हा आयकर विभाग, पोलीस आर्थिक गुन्हे विभाग कुठे असते ते माहीत नाही.
सगळ्यात जास्त दरोडा पडतो तो भावनिक दरोडा, एकदा एक प्रसिद्ध संत म्हणू की बाबा तो आमच्या परिसरात येणार होता त्या साठी लोकांनी प्रचंड मोठी रांग लावली होती, उच्च शिक्षित पासून अडाणी लोकांपर्यंत सगळे त्या रांगेत होते. माझी एक्स पण त्या रांगेत होती, मग तर चिडवणे आलेच कारण मी नास्तिक आहे ते तिला चांगलेच माहीत होते.
जेव्हा त्या प्रसिद्ध संत बाबांच्या गाडीचा ताफा आला तेव्हा मी बघतच बसलो. नक्की तो संत आहे की कोणी बडा उद्योगपती? शेवटी नोकरी करून पैसाच कमवायचा आहे ना? मग आमचे आई वडील शाळेत पाठवण्याच्या जागी जंगलात कुणा बाबाकडे का नाही पाठवले? आम्ही पण अश्या गड्याचा ताफा घेऊन फिरलो असतो. मग असे वाटायचे की आपल्या आई वडिलांना आपल्या मुलांची मर्यादेपर्यंतची प्रगती मान्य आहे त्यापुढे अमर्याद प्रगती ह्या संत बाबांसारखी मान्य नाही.
आता परत विषयाकडे येतो. चेकमेट कंपनीची सेवा पुरवायची कल्पना मला चांगलीच आवडली, अश्या अनेक सेवांची गरज सरकारी व खाजगी कंपन्यांना लागत असते. उद्योग, व्यवसाय खूप आहेत फक्त बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे आणि जो प्रयत्न करत असतो त्यालाच भेटते.
ज्यांनी दरोडा टाकला त्यांच्यात हिम्मत आणि धोका पत्करायचा गुण तर आहेच ह्याबद्दल काही शंका नाही, जर इतकाच धोका पत्करायचा असेल मग कुठचा छोटा उद्योग किंवा व्यवसाय का नाही करायला घेतला? उद्या कदाचित तो उद्योग किंवा व्यवसाय इतका मोठा झाला असता की ज्या कंपनीवर दरोडा टाकला आहे त्याच कंपनीला विकत घेतले असते त्यांनी.
दुसरा पर्याय त्याच कंपनीत काम करून सगळी कामे शिकून, इतरांच्या पेक्षा जास्त काम करून, अष्टपैलू कामगिरी करून बढती घेत उच्च पदावर पोहचला असता, भागीदार झाला असता किंवा आपली स्वतःची नवीन कंपनी चालू केली असती.
आता विजय माल्ल्या बद्दल, तो सतत दरोडा टाकत होता, त्याला कोणीही पकडले नाही, का नाही पकडले? जितक्या तत्परतेने ह्या दरोडेखोरांवर कारवाई केली तितक्याच तत्परतेने का नाही केली? बर ते जाऊ द्या, विजय माल्ल्या किंवा त्या इतर कंपन्यांनी दरोडा कसा टाकला? कंपनीच्या नावर लोन काढले आणि कंपनी तोट्यात दाखवली पण त्याच्या जीवनशैलीमध्ये काहीच फरक पडला नाही.
इकडे शेतकरी लोन काढतो त्याच्या पाठी ससेमिरा लावला जातो, त्याच्या जीवनशैलीत फरक पडतो, गरीब होतो, त्याच्या मुलांचे शिक्षण, लग्न होत नाही, मग हा समाज त्याला आत्महत्येकडे ढकलून देतो. राजकारणी समाजातूनच निर्माण झाले आहेत, सरकारी उच्च पदाधिकारीसुद्धा म्हणजे आपण अप्रत्यक्ष रित्या जबाबदार आहोत. खाजगी बडे उद्योजक लोन बुडवून श्रीमंत आणि गरीब शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय अजून गरीब आणि गुन्हेगार. पोलीस क्षणात तुमच्या दारात हजर आणि विजय मल्ल्या सर्वात जास्त सुरक्षित असलेल्या विमानतळावरु परदेशाला रवाना.
(हा परिच्छेद गाळण्यात आला आहे.)
ज्ञान कसे वापरायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नाहीतर कोर्टात करोडो केसेस पेंडिंग नसत्या राहिल्या, ना इतके भ्रष्टाचार झाले असते, ना न्याय व्यवस्थेची गरज भासली असती. वर्तमान काळात जे चालले आहे त्यावर लक्ष्य ठेवत जा, जर कोणी तुम्हाला भूतकाळाच्या इतिहासात रममाण करत असेल त्यापासून कोसो दूर राहा.
अर्थकारणाशी संबंधित प्रत्येक घटना समजून घेत जा. चांगलं किंवा वाईट हा विचार करत बसू नका, जगामध्ये हे चालूच राहणार आहे. फक्त ह्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर नकारात्मक नको व्हायला. उद्या काही घटना घडलीच तर तुम्ही त्याचा उत्तम रित्या सामना करू शकता. आयुष्याच्या रस्त्यावर वळण घ्यावेच लागते.
मला तुम्हाला तुमच्या मधले जन्मजात असलेले गुण, तुमचा दृष्टिकोन आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा घेतल्यामुळे झालेला दुष्परिणाम, अति घाई जी आजकाल सगळीकडे दिसून येते आणि ह्यामुळे होणारे आयुष्यातील शारीरिक, भावनिक अपघात हे सगळे ह्या घडलेल्या घटनेमधून सांगायचे आहे.

धन्यवाद

अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार