श्रीमंतांच्या सवयी आणि गरिबांच्या सवयी ह्यामधील फरक
5 वर्षांच्या 223 श्रीमंत आणि 128 गरीब अश्या 2 गटांच्या रोजच्या सवयीनवर अभ्यास केल्यावर ह्या दोघांमधील मोठे फरक आणि एक लक्षणीय समानता निष्पन्न आढळून आली.
श्रीमंत आणि गरीब हे दोन गट काही चांगल्या आणि काही हानिकारक अश्या 200 दैनंदिन कृती करताना आढळून आले, त्यामधील काही त्यांच्या सवयी होत्या.
तुमचे श्रीमंत, गरीब किंवा मध्यमवर्गीय राहण्याचे कारण ह्या श्रीमंत सवयी किंवा गरीब सवयी आहेत हे मी ह्या संशोधनातून शिकलो. तुमच्या जीवनाचा आराखडा आणि तुमच्या मुलांचे आयुष्य हे रोजच्या सवयी निर्धारित करतात.
तुमच्या रोजच्या सवयी अजाणतेपणाने तुमचे वागणे, विचार करणे, विश्वास आणि तुम्ही तुमची निवड ताब्यात ठेवतात. तुम्ही ज्या प्रकारच्या घरात राहत आहात, कुठच्या प्रकारचे शिक्षण तुमच्या मुलांना भेटत आहे, तुमच्या स्वातंत्र्याची मर्यादा, तुमची जीवनशैली, वापरणाऱ्या वस्तू आणि आयुष्यामधील सुख आणि समाधान तुमच्या सवयी निर्धारित करतात. म्हणून तुमच्या सवयी ह्या खूप महत्वाच्या आहेत.
सवयीचा हेतू असतो. मेंदूच्या मध्यभागेमध्ये असलेल्या अतिसुष्म भाग ज्याला बेसल गांगलीया म्हणतात त्यामधील ठराविक पुनरावृत्ती करण्याचे कार्य वगळले तर आपला मेंदू हा उच्च स्तरीय कार्य करायला मुक्त होऊन जातो. ड्यूक युनिव्हर्सिटीने 2006 साली केलेल्या अभ्यासात असे आढळून आले कि 40 टक्के (किंवा त्यापेक्षा जास्त) सगळ्या दररोजच्या क्रिया ह्या सवयी असतात.
शरीर क्रिया विज्ञानानुसार सवयी म्हणजे बेसल गांगलीया मधील परस्परांशी जुळलेले न्यूरल पाथवे मध्यभागी असलेले निओ कॉर्टेक्सचे न्यूरल प्रथिन यांचे केंद्र. ज्या क्षणी न्यूरल पाथवे हे बेसल गांगलीया शी जोडले जाते तेव्हा आपला मेंदू चमत्कारिक रित्या एक कायमस्वरूपी सवय बनवून टाकतो.
प्रत्येक श्रीमंत सवय जी तुम्ही लावून घेता ती तुमचे संपूर्ण जीवनमान बदलून टाकते. श्रीमंत सवयी ह्या यशासाठी केलेली गुंतवणुकीसारख्या आहे. कालांतराने ह्या श्रीमंत सवयी तुम्हाला तुमचे यश,स्वप्न साध्य करण्याच्या जवळ घेऊन जात असतात. कालांतराने जेवढ्या श्रीमंत सवयी लावून घ्याल तेवढ्या जवळ तुम्हाला यश जाणवत जाईल.
सल्ला व प्रशिक्षण साठी आजच संपर्क कराल.
धन्यवाद.

अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार