हत्तीला लहानपणापासून दोर बांधून ठेवला होता, तो लहापणी तो दोर तोडायचा खूप प्रयत्न करत होता पण यशस्वी झाला नाही, त्याचा विश्वास बसला की ती दोरी तो तोडू शकत नाही, त्याने प्रयत्न करणे सोडून दिले. वय वाढले ताकदही वाढली, मोठं मोठे वजन उचलू शकतो, भिंत पाडू शकतो इतकी प्रचंड ताकद आली पण जेव्हा त्या अवाढव्य प्राण्याला ला लहान दोरीने बांधून ठेवतात तेव्हा तो ती तोडायचा प्रयत्न करत नाही, कारण लहानपनापासून कृत्रिम रित्या रुजवलेल्या विश्वास. हा तोच विश्वास आहे जो तुम्हाला तुमच्या बालपणात मिळतो, ह्याचे अनुभव घ्यायचे झाल्यास फक्त जवळच्या लोकांना म्हणा की मला 200 करोड प्रॉपर्टी चा मालक व्हायचे आहे, पहिले टोमणे भेटतील की तू टाटा, बिर्ला की अंबानी आहेस? तेच शेअर बाझार मध्ये पैसे गुंतवू शकतात, तेच 2 तास काम करून महिन्याभराच्या कमावू शकतात, तेच मोठं मोठे उद्योग करू शकतात, तेच भारतातील सगळ्यात श्रीमंत लोक बनू शकतात (इकडे ते तू शब्द नाही वापरणार तर आपण हा शब्द वापरणार), आपण नाही. मग तुम्ही न आवडणारे दुसऱ्यांच्या हाताखाली 8 ते 16 तास सतत काम करणार, तुम्ही क्षमता असून सुद्धा ती दाबून ठेवणार, 200 काय 500 करोड ची संधी जरी आली तरी ती तुम्ही सोडून द्याल नाहीतर टाटा, बिर्ला, अंबानी किंवा रहेजा असे आडनाव असणाऱ्या लोकांना द्याल. कारण तीच विश्वासाची दोरी जी तुमच्या मनात लहापनापासून रुजवली गेली आहे जी तुमची क्षमता वाढली असून सुद्धा तुम्हाला बांधून ठेवते.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार