INTERIOR CAFÉ NIGHT by Adhiraj Bose



(INTERIOR CAFÉ NIGHT by Adhiraj Bose) इंटेरियर केफे नाईट ही अधिराज बोस ह्या युवकाची आहे. ह्यामध्ये नासिरुद्दीन शाह ह्या जगप्रसिद्ध भारतीय कलाकाराने काम केले आहे. अतिशय सुंदर प्रेमावर आधारित शॉर्ट फिल्म आहे. ती दिनांक 18 जुलै ला YouTube वर प्रदर्शित केली गेली. मी बघितली 19 जुलै ला तेव्हा फक्त 14,000 लोकांनी बघितले होते. आणि आता पर्यंत 658,178 लोकांनी बघितले.
तुम्हाला सिनेमाचं काढायचा आहे तर त्या साठी थिएटर हाच एक महागडा पर्याय नाही आहे. कमी गुंतवणुकीमध्येही तुम्ही शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंट्री, लॉंग फिल्म काढू शकता. तुमची कल्पना, कथा, एडिटिंग, डायरेक्टिंग, ऍक्टिंग आणि इतर विविध कौशल्याला तुम्ही लोकांपर्यंत पोहचवू शकता. इंटरनेट हे असे प्रभावी माध्यम आहे की ते सामान्यांना, कलाकारांना, छोट्या गुंतवणूकदारांना, उद्योग, व्यावसायिकांना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते.
YouTube त्या फिल्म वर जाहिराती देते, आणि त्या जाहिरातींचे विविध प्रकार आहे त्यानुसार त्या व्हिडीओची, व्यक्तीची किंवा त्याच्या कंपनीची कमाई होते. आणि हो मोठं मोठे कलाकारही YouTube वरील व्हिडीओ बघत असतात. इंटरनेट सामान्य लोकांसाठी एक कमी खर्चिक व्यासपीठ आहे, आता त्याचा कसा वापर करायचा हे तुम्ही ठरवायचे.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार