भारतीय आणि अनिवासी भारतीय ह्यामध्ये जमीन आसमानच फरक आहे.
शुद्ध भारतीय उद्योजक आणि अनिवासी भारतीय उद्योजक ह्यामध्येही जमीन आसमानच फरक आहे.
जेवढे शास्त्रज्ञ जगप्रसिद्ध मोठं मोठ्या विद्यापीठातून निघत नाहीत त्यापेक्षा जास्त शास्त्रज्ञ भारतातील गावा गावातून निघालेले आहेत.
जेवढा अनिवासी भारतीय, परदेशी उद्योजक परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरतो तिथे भारतीय उद्योजक यशस्वी ठरतो.
आमच्या मध्ये आत्मविश्वास आहे, धाडस आहे, आत्मसम्मान आहे आणि महत्वाचे म्हणजे ज्ञान आणि कौश्यल्य ठासून भरलेले आहे.
आणि हे सगळे आम्ही ह्या भारतात राहून मिळवलेले आहे, त्यासाठी कुठे भारताबाहेर जाण्याची गरज पडली नाही.
थोडक्यात सांगायचे झाल्यास आमच्यामध्ये लीडरशिप क्षमता आहे, विनाकारण आमच्या डोक्यावर अनिवासी भारतीय आणि परदेशी
नागरिक आमच्यापेक्षा कुशल म्हणून मारू नका. कारण जेवढा तो कमावत नसेल त्यापेक्षा कीतितरी पटीने जास्त नफा कमावणारे
मराठी उद्योजक हे माझ्या संपर्कात आहे, जे फक्त इथल्या उपलब्धतेचा वापर करून श्रीमंत झाले आहेत ह्यामध्ये ज्ञान ही आले आहे.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार