९ वर्षांचा लहान मुलगा व्यावसायिक हॅकर , CEO, मोठं मोठ्या कंपन्या त्याच्याकडून मदत मागतातज्या वयात लहान मुलं ही आपल्या स्वप्नांच्या आयुष्यात रमलेले असतात त्या वयात ह्या मुलाने तंत्रज्ञानाच्या जगतात खूप मोठे यश संपादून करून नाव कमावले आहे. 9 वर्षांचा हा मुलगा एक व्यावसायिक हॅकर, मोबाईल सॉफ्टवेअर ऍप डेव्हलपर, सायबर सिक्योरिटी तज्ज्ञ आणि ह्याही पुढे एका गेम डेव्हलपर कंपनी 'प्रुडेन्ट गेम्स' चा मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O) आहे.
भारतीय मूळ चा हा मुलगा अमेरिकेत राहतो आणि सायबर गुन्हेगारांपासून लोकांना वाचवत असतो. ह्या मुलाचे नाव आहे रुबेन पौल. हा जेव्हा बोलतो तेव्हा मोठं मोठी तज्ज्ञ मंडळी व्हायचे बोलणे लक्ष्य देऊन ऐकत असते. ह्या चमत्कारिक मुलाचे कौशल्य बघून सायबर जग पण आश्चर्यचकित आहे.
हा 9 वर्षांचा मुलगा इतका मोठा कारभार कसा सांभाळतो, ह्या विषयी विचारल्यावर त्याचे वडील मनो पौल सांगायला लागले की हा सर्व करणे हे त्याची आवड आहे जी खूप लहान वयातच सुरू झाली होती आणि आता तर त्याच्या आवडीला प्रगती करण्यापासून रोखू नाही शकत.
त्याचे वडील पुढे बोलले की मला अजून तो दिवस आठवत आहे, जेव्हा तो 5 वर्षांचा होता त्यावेळेस त्याने फायरवॉल हा शब्द बोलला होता. त्याच्या तोंडातून हा शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झालो होतो की कसा काय इतका लहान मुलगा ह्या शब्दाला कसा ओळखतो? तेव्हा मला त्याच्या आवडीबद्दल कळाले. मनो स्वतः ह्या क्षेत्रात काम करत आहेत, ते सेक्युरिटी सोल्युशन नावाच्या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O) आहेत.
जेव्हा रुबेन दुसरी इयत्तेत होता तेव्हा त्याच्या एका शिक्षकाने वर्गाला एक शैक्षणिक गेम बनवायचा प्रोजेक्ट दिला होता. सर्व मुलांनी हातांनी बनवलेले बोर्ड आणि कार्ड गेम बनवून आणले होते, तिकडे रुबेन ने एक शैक्षणिक अप्लिकेशनच बनवून टाकले होते. तो इतर वर्गातील मुलांना गणित शिकायला मदत करायचा म्हणून त्याचे नाव त्यांनी शुरिकेन गणित ठेवले होते.
संपूर्ण शाळेने त्याचे कौतुक केले आणि त्यांनी तो गेम एप्पल स्टोर वर पब्लिश करायला प्रोत्साहित केले. त्यानंतर त्याने आपल्या आई वडिलांकन्या मदतीने प्रुडेन्ट गेम नावाच्या कंपनीची स्थापना करायचा निर्णय घेतला. ही कंपनी शैक्षणिक गेम्स आणि एप्स बनवते. ह्यामुळे मुलं खेळता खेळता खूप काही शिकून जातात.
रुबेन सांगतो की चांगल्या हैकिंग कौशल्यामुळे तुम्हाला शक्ती मिळते, आणि जर तुमच्याकडे ती शक्ती आली तर तुम्हाला त्या साठी जबाबदारी पण उचलावी लागेल. तो पुढे म्हणत होता की तंत्रज्ञानाच्या ह्या युगात जिथे सायबर बुलिंग आणि डाटा चोरी हे सामान्य आहे, महत्वाचे हे आहे की लहान मुलांना ह्याबद्दल जागृत केले जावे जेणेकरून ते स्वतः ह्याचा शिकार होण्यापासून वाचवू शकतील.
रुबेन चे हे कौशल्य जेव्हा (ISC)2 चे कार्यकारी संचालक (executive director) हॉर्ड टिप्ट्न ला जेव्हा समजले तेव्हा त्यांनी ह्या मुलाच्या कौशल्याला सायबर सिक्युरिटी एप बनवण्यासाठी वापर करा असा सल्ला दिला. रुबेन ने आपला पहिला सायबर सीक्युरिटी एप बनवून पण टाकला ज्याचे नाव आहे क्रेकर प्रूफ, हा एप लहान मुलांना मनोरंजक आणि शैक्षणिक पद्धतीने स्ट्रॉंग पासवर्ड बनवायला शिकवतो. क्रेकर प्रूफ एप्पल स्टोर वर उपलब्ध आहे आणि रुबेन ने ह्या सारखे असे अनेक सेक्युरिटी एप्स बनवायच्या मार्गावर आहे.
रुबेन जगभरातील सिक्युरिटी कॉन्फरन्स मध्ये भाग पण घेत असतो. जेव्हा तो बोलतो तेव्हा त्या क्षेत्रातील दिग्गज लक्ष्य देऊन ऐकत असतात. ज्या वयातील मुलांना सिक्युरिटी सोबतच्या शब्दांचे अर्थ नाही समजत, त्यामध्ये हा मुलगा त्यावरती मोठं मोठे व्यख्यान देतो. रुबेन चे स्वप्न एक यशस्वी सायबर जासूस बनायचे आहे. त्याची इच्छा ही जगाला सायबर अपराधांपासून मुक्त करायची आहे.
नैसर्गिक रित्या प्रत्येकामध्ये असीम क्षमता असते. तुमच्या माझ्यामध्येही आहे. आपली क्षमता ओळखा, तिला जागृत करा.

धन्यवाद
अश्विनीकुमार फुलझेले
8080218797
Previous
Next Post »
0 आपले विचार