अपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि यशामध्ये सोबत येणाऱ्यांना कधीच जवळ करू नका

खेळ असो किंवा उद्योग, व्यवसाय जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तो पर्यंत तुम्हाला कोणीही विचारत नाही, त्याअगोदर कराव्या लागणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा सामना हा तुम्हालाच कराव लागतो. तुम्ही संपूर्ण पणे क्रिकेट च्या झोकात हरवून जातात. आणि जेव्हा यशस्वी होतात तेव्हा समाज, सरकार व इतर गुंतवणूकदार जागे होतात व तुम्हाला मदत करायला लागतात. तुमच्या यशावर स्वतःची पोळी भाजून घेतात, देशभक्ती जागी होते. नैराश्य आणि आत्महत्या करण्याचे मुख्य कारण हेच आहे, खेळाडू ह्यांचे आयुष्य काय चार वर्षानंतर येणाऱ्या फक्त 17 दिवसांच्या ऑलम्पिक पुरते नाही आहे, त्यांनाही दररोज जगावे लागते, ती देखील माणसेच आहे. त्यानंतर ती जिवंत आहेत कि मेली आहेत हे कोणीच विचार करत बसणार नाही. असाच प्रकार यशस्वी झालेल्या उद्योजकांसोबतही होतो, जेव्हा यशस्वी होतात तेव्हा त्यांना महत्व दिले जाते, बाकी खेळाडू आणि उद्योजक ह्यांच्या अपयशाच्या कठीण, बिकट परिस्थितीत अक्षरक्ष वाळीत टाकले जाते. घरचे पाठ फिरवतात तर समाजाचे बोलून काय फायदा. अपवाद आहेत आणि तेही फक्त आपवादच आहेत, उन्नीस बीस असले असते तर चालले असते पण फरक इतका आहे कि 0.00१ अशी त्यांची संख्या आहे. आत्मकेंद्रित व्हा, आत्मविकासात मग्न रहा, जे फक्त ह्या ऑलम्पिक च्या दिवसात प्रोत्साहन देतात त्यांच्या पासून चार हात लांब रहा आणि जे 4 वर्षे सतत तुम्हाला प्रोत्साहन देतात अश्यांना जवळ करा, उद्योजकांना सुद्धा हेच आवाहन आहे, अपयशात साथ देणाऱ्यांना कधीच सोडू नका.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार