कसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्टवेअर कोडर बनायचा प्रवास


ही कहाणी आहे आकाश ची, ज्याने शाळा सोडली आणि १३ वर्षांचा असताना संधीच्या शोधात तो मनपूर ह्या उत्तराखंड मधल्या छोट्याश्या खेडेगावातून २००९ साली मुंबईला आला होता.
इतर खेडेगावातील लहान मुलांसारखा मुंबई सारख्या गर्दीच्या, गजबजलेल्या शहरात नवीन, अशा परीस्थित त्याला रुळायला वेळ लागला. जगण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी तो भेटेल ते काम करू लागला. सिगरेट कंपनीची मार्केटिंग पासून ते पब मध्ये गिटार वाजवणे ते कॉल सेंटर मध्ये काम करेपर्यंत अशी भेटेल ती काम करत गेला, शेवटी त्याला भाग्याने बोलावले आणि तो IITB कोडर्स साठी त्यांच्यात घरात जेवण बनवायचे काम भेटले.
काही वर्ष गेल्यांनंतर, जेवण करत असताना त्याने बक्सी (हाउसिंग को फाउंडर) ला विचारले कि तू हे काय करत आहेस.
त्याने उत्तर दिले कि "तू जे हे फेसबुक, व्हाट्स एप वापरतो आहे ना तशीच कोडिंग वेबसाईट आणि एप वर होते. काम्पुटर ला शिकवावे लागते. आम्ही हे काम करतो."
आश्चर्याने तो लहान मुलगा बोलतो कि "अरे वा! मला पण हे करायचे आहे."
आणि अश्याप्रकारे महिन्यांचा दीर्घ कालावधीचा दिवस आणि रात्र सॉफ्टवेअर लिहायचे शिकायचा प्रवास चालू झाला. आकाशच्या आयुष्याचे सकाळी जेवण बनवणे, घर साफ करणे आणि दिवस 6 तास झोपून घेणे असे चक्र चालू झाले. एकदा का आम्ही कामावरून घरी आलो कि ज्या पण कम्प्युटर वर कोणी काम करत नसेल त्यावर तो शिकायला सुरुवात करतो. शिकायची सुरवात हि कोरसेरा हि कोडिंग शिकवणारी वेबसाईट ह्यावरील फ्रंट - एन्ड लेक्चर्सने होते, तो लवकर शिकत गेला. वर्षामध्येच एकाग्रतेने शिकल्यामुळे तो फ्रंट-एन्ड, बॅक-एन्ड डाटाबेस हाताळायला शिकला.
अगदी बेसिक पासून ते अल्गोरिदम स्पेसिफिक ते आता मशीन लर्निंग आणि NLP त्याचे कुतूहल वाढत गेले.
आम्ही तिघे मिळून लवकरच त्याला मॅकबुक एअर घेऊन देणार आहोत. आत तो आमचा मधील एक तज्ज्ञ आहे. शाळा अर्धवट सोडल्यापासून ते स्वयंपाकी ते सॉफ्टवेअर डेव्हलोपर असा आकाश चा प्रवास आमच्यासारख्या ध्येय आणि लक्ष्य असलेल्या लोकांना खूप प्रोत्साहन देणारा आहे.
जेव्हा मी हा लेख लिहीत होतो तेव्हा आकाश हा iOS चे कोडिंग करत होता. त्याचा आम्हा सगळ्यांना एकच सल्ला आहे "एका वेळेस एकच काम हातात घ्या आणि घुसून जा त्याच्यात." (Pick something you like. And commit yourself to it.)
आयुष्य म्हणजे अनुभवांचा संच आहे, जिथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळते, नव नवीन संधी उपलब्ध होतात. आपले आयुष्य घडवण्यासाठी त्यामधील फक्त काही संधी आपल्याला पकडायच्या आहेत, एका वेळेस एकच निवडा.

ईशान नाडकर्णी

अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार