'मारवाडी नजरेतून' महाराष्ट्रीयन उद्योजकाचे सडेतोड विश्लेषण करताना लेखक डॉ. गिरीश जखोटियाने म्हटले आहे की, एका विशिष्ट आकारास पोहचल्यानंतर मराठी उद्योगपती बावचळतो, अडखळतो, गोंधळतो वा घाबरतो...' असं का होते या मागील त्यांनी पाच कारणे दिली आहेत. लेखक म्हटले आहे की, 'राजा शिवाजी नि माधवराव पेशवे होऊन गेल्यावर 'राज हम करेंगे' अशी तडफ, इच्छा, ईर्ष्या सामान्य मराठी माणसाकडे मी पाहिलेली नाही, हेच वैशिष्ट्य मराठी उद्योजकाचे! गुजरातचा अंबानी, राजस्थानचा बिर्ला, कर्नाटकचा मल्ल्या, सिंधकडचा छाब्रिया नि हरियाणाचा जिंदाल म्हणूनच मुंबईवर राज्य करू शकतात आणि सारे काही मराठी माणूस निरिच्छपणे पाहत असतो... स्वत:मध्ये बदल करून आपणही शेवटची स्पर्धा जिंकू शकतो, ही जिद्द मराठी माणसात खूप कमी आढळली...' ही फार मोठी त्रुटी दाखवून लेखक डॉ. गिरीश जखोटियाने मराठी माणसापुढे एक प्रकारचे आव्हान ठेवले आहे.
डॉ. गिरीश जखोटिया
पुस्तक - चला, बदल घडवूया!
अश्विनीकुमार फुलझेले
 चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार