दहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी

आज दही हंडी, गोपाळकाला उस्तव आहे. ह्यामध्ये किती उद्योग व्यवसाय आणि आपल्या कंपनी, सेवेची जाहिरात करण्याच्या संधी दडलेल्या आहेत?
ह्याचा कोणी विचार केला का?
ज्यांचे उद्योग किंवा व्यवसाय आहेत ते आपल्या कंपनीचे टी शर्ट बनवून देवू शकतात. कृपया कपड्याचा आणि प्रिंट चा दर्जा चांगला ठेवा जेणेकरून तरून मुल ती जास्त काळ वापरू शकतील, आणि आपल्या मित्रांना तशीच टी शर्ट घेण्याचा किंवा वापरण्याचा सल्ला देतील. ह्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या उत्पादनाचे किंवा सेवेचे नाव लोकांपर्यंत पोहचत असते.
बस, ट्रक व इतर लहान मोठी वाहने भाड्याने घेतली जातात.
त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली जाते इथे केटरिंग सेवा पुरवनार्यांचा, महिला बचत गटांचा व्यवसाय ह्यांची गरज लागते.
लहान मोठे खाद्यपदार्थ जागेनुसार जसे वडापाव, भजीपाव, समोसापाव, चायनीज भेळ, मंचुरियन, पोहे, शिरा, उपमा आणि वाईन शॉप जवळ नॉन वेज खाद्य पदार्थ ह्यांचा व्यवसाय चालतो.
ताक,लिंबू शरबत किंवा इतर शरबत ह्यांचाही व्यवसाय उत्तम होतो.
ह्या संधीचे २ फायदे आहेत
१) कायमस्वरूपी धंदा करणार्यांचे उत्पन्न वाढते
२) ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे किंवा छंदाचे व्यवसायात रुपांतर करायचे आहेत ते सुरवात करू शकतात, ह्या मध्ये त्यांना त्यांच्या क्षमता, उणीवा ह्याबद्दल समजते, आणि हा १ दिवसाचा अनुभव आयुष्य बदलून टाकतो. सकारात्मक व्यक्ती चुकांपासून शिकून शहाणी होते आणि नकारात्मक व्यक्ती चुकांना घाबरून कायमचे सोडून देते.
अजून काही नवीन कल्पना, उद्योग, व्यवसाय असेल तर कृपया खाली कमेंट मध्ये पोस्ट कराल.
धन्यवाद,
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार