1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण देऊन त्यांचा निकृष्ट माल अधिक किमतीने भारतीय ग्राहकांच्या माथी मारला गेला. अनेक वर्ष हा उद्योग चालू होता. असं एक कंपनीला जेव्हा तुम्ही कृत्रिम संरक्षण देता तेव्हा त्या कंपनीचा विकास होऊनच शकत नाही. आपल्याला असं म्हणायचं आहे का की ते संरक्षण आजही आपण देत राहायचं. का कंपन्यांना ज्याला इंग्रजीमध्ये थ्रो इन द डीप एंड म्हणतात, मुलाला पोहायला शिकवायचं म्हंटल तर त्याला खोल पाण्यात ढकलायला लागत, कायम एक सांगड बांधून त्याला सोडता येत नाही. इतक्या वर्षानुवर्षे आपण समाजवादाचा एक मृगजळ बघत त्याची सांगड घालून कंपन्यांना ढकललं आणि त्या कंपन्या पोहत राहिल्या ह्याच्या मुळे खरं म्हणजे आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे.
भारतीय कंपन्या सक्षम नाही आहे ह्याच मुळ कारण हे आहे की त्या टॉनिक वर वाढवल्या गेल्या, त्यांना व्यायाम करायला संधीच दिली नाही. आपण इतके ओरडतोय की भारतीय कंपन्यांची परिस्थिती वाईट आहे. आज आपल्या समोर पतंजली फार्मासिटिकल च उदाहरण आहे त्यांनी हिंदुस्तान लिव्हार सारख्या परकीय कंपन्यांना घाम आणलेला आहे. तेव्हा असं काही नसत की भारतीय कंपन्या ह्या कमजोरच होणार आहे.
उत्कृष्ट मार्केटिंग, उत्कृष्ट प्रॉडक्ट, उत्कृष्ट प्लेसमेंट हे जर केलं तर परकीय कंपन्यांना सहजपणे नमवता येते. कॅपिटल इज नॉट ए ओन्ली थिंग. दुसरी महत्वाची गोष्ट आता आपल्याला लक्ष्यात येत नाही आहे कि आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडन्ट आहे त्याच्या मध्ये वयाचा भाग जर सोडला तर स्किल किंवा कौशल्य हे फार कमी आहे. मॅनुफॅचुरींग युनिट मध्ये आता जी गुंतवणूक येत नाही त्याचे मुख्य कारण कुशल कामगार ह्या देशात नाही आहे. कारण टेकनॉलॉजिची वाढच झाली नाही. कालची टेकनॉलॉजि वापरून आजच्या लोकांना प्रॉडक्ट देण्याचा कार्यक्रम वर्षानुवर्षे चालला त्याला जर खंड पाडला नाही तर आपण कायम अशी बांडगुळ पोसत राहू आणि ती बांडगुळ पोसत राहिलो तर हे काही चालायचे नाही फार दिवस.
त्यामुळे आपल्या कंपन्यांना स्पर्धेमध्ये उतरावेच लागेल, स्पर्धेमध्ये उतरल्यानंतरच आपल्या कंपन्या सक्षम दिसतील आणि त्यातले काही सक्षम असतील ते तरतील, जे नसतील ते बुडतील, स्पर्धेचा हा नियमच आहे. आपण कायम बुडणाऱ्या लोकांना वाचवण्याचा ठेका घेतला आहे का?
चंद्रशेखर नेने
अर्थतज्ज्ञ
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार