जेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्ये उतरतो, फाईव्ह स्टार हॉटेल सारखे हॉस्पिटल बांधतो तेव्हा समजून जावे कि तिथे जाणारा आजारी मनुष्य हा रुग्ण नसून एक ग्राहक आहे, त्याच्याकडील जास्तीत जास्त पैसे कसे काढता येईल ह्याकडे लक्ष्य असते. रुग्ण बरे होण्यापेक्षा, त्यांच्या आरोग्यापेक्षा त्यांच्याकडून नफा किती झाला ह्याकडे लक्ष्य असते. गरीब लोकांनी तिथे न बघितलेलेच बरे आणि मध्यम वर्गीयांनी तिथे गरीब किंवा कर्जबाजारी होण्यासाठी जावे. उद्योग जगतात सगळे ध्यान नफ्यावर केंद्रिंत असते डॉक्टर इंजिनिअर कामावर ठेवताना, मुलाखत घेताना ते तपासून घेतात कि खरंच हा आपल्याला नफा कमावून देणार आहे कि नाही. आणि कितीही काही झाले तरी मुख्य सूत्रधार हा जर मोठा उद्योजक किंवा सत्ताधारी असेल तर त्यावर कोणीच कारवाई करू शकत नाही. सरकारी रुग्णालय ह्या साठी उत्तम दर्जाचे करत नाही कारण खाजगी रुग्णालय चालले पाहिजे. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ह्याची सेवा निकृष्ट दर्जाचे करून रिलायंस ला फायदा करून दिला. असे उदाहरण अनेक आहेत, जो स्वतःच्या मेंदूने विचार करतो त्याला कोणीच मूर्ख बनवू शकत नाही. पुढच्या वेळेस खाजगी रुग्णालयात सांभाळून जाल, कदाचित तुमचे अवयव गायब होऊ शकतात. पोलीस आणि न्यायालय ह्यांचा अनुभव एकदा घेतला कि पुरेसा, दोन्हीही पिच्छा नाही सोडत, जर तुमच्या विरुद्धचे जर आर्थिक दृष्ट्या मजबूत असतील तर प्रत्येक क्षणी तुम्हाला झुंज द्यावी लागेल, त्यावेळेस तुम्हाला जाणवेल कि खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत कि नाही, आणि झालेले आर्थिक आणि मानसिक नुकसान हे कोणीच भरून देणार नाही. हुशार बना.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार