डीअर झिंदगी हा सिनेमा आवर्जून बघाल. ह्या सिनेमामध्ये माणसाच्या आयुष्यातले जवळपास सगळ्याच भागावर भाष्य केले आहे


डीअर झिंदगी हा सिनेमा आवर्जून बघाल. ह्या सिनेमामध्ये माणसाच्या आयुष्यातले जवळपास सगळ्याच भागावर भाष्य केले आहे. जितका समजून घ्यायचा प्रयत्न करता येईल तितका समजून घ्या.
आताच्या तणावाच्या काळात हा सिनेमा अनेकांना नवीन आशा देवून जावू शकतो. समुपदेशन हे कसे काम करते आणि आम्ही म्हणजे समुपदेशक कसे काम करतात अर्थात सिनेमा बोलले तर थोडा फिल्मी पना आला आहे ते वगळून तुम्हाला समजून येईल.
प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यात घरात समस्या असतात आणि समुपदेशक, प्रशिक्षक हे हि माणसेच असतात.
ह्यामध्ये थोडासा भाग हा मराठी मानसिकतेचा देखील आहे, कसे पैसे कमावण्यासाठी आपण जर आवडीचे किंवा छंदाला आपण व्यवसायीक स्वरूप दिले तर कसे घरच्यांपासून ते समाज हे वेगळ्या नजरेने बघते, कसे तुम्ही चांगली प्रगती करत असतानाही सल्ला दिला जातो काही चांगले काम कर म्हणून ह्यावरही उत्तम भाष्य केले आहे.
आई वडिलांसाठी खूप महत्वाचा संदेश देण्यात आला आहे, कृपया पालकांनी हा सिनेमा आवर्जून बघावा.
तरून तरुणींनी साठी नाते संबंध, प्रेम प्रकरण खाजगी आणि व्यावसायिक आयुष्य ह्यावर चांगला प्रकाश टाकला आहे.
समजून घ्याल आणि आयुष्याच्या समस्या ह्या समुपदेशकाच्या सहाय्याने सोडवायचा प्रयत्न कराल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार