संधी आणि त्यासोबत आलेले भाग्य हे सर्वांच्या आयुष्यात अनेक वेळेस येवून गेले आहे


हा लेख लिहायचे कारण असे आहे कि जी लोक आता नकारात्मक आयुष्य किंवा परिस्थिती जगत आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या संधीचे उपयोग न करून घेतल्यामुळे जगत आहेत. तुमच्या आयुष्यात श्रीमंत, समृद्ध बनायच्या संधी ह्या येवून गेल्याच आहेत, त्यासोबत खाजगी आयुष्यामधीलहि अनेक संध्या येवून गेल्या आहेत जसे कि मनासारखा जोडीदार, आरोग्य, सकारात्मक प्रगतीशील मित्र ह्या.
जो ह्या संधीचा फायदा उचलायचे शिकतो त्याच्यासाठी भाग्य काम करायला लागते आणि लोभ ते टिकवून ठेवते, कुठल्याही भावनेचा अतिरेक हा घातच आहे. हे तुम्हाला जो पर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत समजणार नाही. ती मानसिक स्थिती जगावी लागते, आणि आता एमआरआय, इईजी आणि इसीजी ज्या सहाय्याने सिध्द हि करू शकतो.
संधी कुणाच्या आयुष्यात येते? जी लोक मानसिक दृष्ट्या शांत, स्थिर, स्तब्ध, तथस्थ आणि एकाग्र असतात त्यांच्या आयुष्यात येत असते. बाहेरून बघितल्यावर असे वाटते कि त्यांनी ती संधी निर्माण केली आणि शोधून काढली पण प्रत्यक्षात तसे नसते, त्यांच्या मानसिक स्थिती मुळे जी कृती व्हायची, त्यामुळे ते प्रत्येक वेळेस योग्य ठिकाणीच असायचे.
तुम्ही आस्तिक असो किंवा नास्तिक ह्याच्याशी काहीही घेणे देणे नाही आहे, ह्यापैकी ज्यांचा विश्वास मजबूत तो जिंकतो. म्हणून सगळेच आस्तिक आणि सगळेच नास्तिक हे प्रगती करत नाही किंवा त्यांच्या खाजगी आयुष्यातही अनेक समस्या असतात.
जे आई वडील आपल्या मुलांकडे ह्या गोष्टी अनुवंशिकतेनुसार देतात ते तर अगदी लहान पनासूनच संधिसाधू आणि भाग्यशाली आयुष्य जगायला लागतात. ह्याची उदाहरणे देखील तुमच्या डोळ्यासमोरच आहे. शेकडो आणि हजारो वर्षे पाठी जायची गरज नाही आहे. तुम्ही आणि तुमच्या पाठी काही वर्षे अगोदर जन्माला आलेल्या लोकांचा अभ्यास केला तर ते तुम्हाला जाणवेल.
ह्यासाठी एक नैसर्गिक नियम आहे जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात वापरावाच लागेल जो मानसिकतेसंदर्भात आहे आणि तो म्हणजे मानसिक दृष्ट्या शांत, स्थिर, स्तब्ध, तथस्थ आणि एकाग्र असने. आणि ह्याच मानसिकतेतून चमत्कार घडतात मनुष्यांच्या आयुष्यामध्ये.
ह्यासाठी मनापासून आवड लागते. तो कधीच कठोर परिश्रम आणि जबरदस्तीने मन एकाग्र करत नाही. हि कृती त्याच्याकडून आपोआप होतच असते. म्हणेज विचार ह्या पातळीच्या हि पलीकडे ते आयुष्य जगत असतात.
जर तुम्ही तर्क आणि विचारांच्या पातळीवर आयुष्य जगत असाल तर तुम्हाला मला जे सांगायचे आहे ते समजून येणार नाही, पण तुम्ही त्यापलीकडे आयुष्य जगत असाल तर मी सांगितलेली किंवा आयुष्य जे तुम्हाला संधीच्या रुपात सांगायचा प्रयत्न करत आहे ते त्या क्षणीच समजून येईल.
गुरु कुठच्या मनुष्य प्राण्याला करण्यापेक्षा आयुष्याला करा, अनुभवांना करा तेव्हा तुम्ही प्रत्येक संधीचा फायदा उचलत जाल आणि भाग्यशाली आयुष्य जगायला लागल. म्हणून मी कधीच विचारत नाही कि तुम्ही यशस्वी का झालात आणि अयशस्वी का झालात, जो तो त्याच्या प्रयत्नाने झाला, त्याचा आदर केलाच पाहिजे.
माझे फक्त एकच म्हणणे आहे कि काहीही झाले तरी तुम्ही आलेल्या संधी ह्या सोडू नका, कधी कधी संधी सोडतो कारण आपण ज्यांच्यासोबत राहत असतो ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत नाही, ह्यासाठी मी सांगत असतो कि नेहमीच तज्ञांचे मार्गदर्शन घेत जा.
प्रत्येकाचे यशाचे मार्ग वेगवेगळे आहेत. अगदी विरुद्ध हि आहेत. पण ते सगळेच यशस्वी आहेत. आणि निसर्ग हा भेदभाव करत नाही तसेच यश हे भेटायचे झाल्यास अब्जोपतिला हि तसेच भेटते जसे गरीबाला भेटते. इथेही भेदभाव केला जात नाही.
विचार करा. समजून घ्या. इथे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपल्या आयुष्याच्या रथाची दोरी हि आपल्याच हातात असू द्या. वेळेपेक्षा जास्त किंमत हि कशालाच नाही आहे. सरासरी ८० वर्षाचे आयुष्य पकडू आपण त्यानुसार तुमचा आजचा क्षण हा अनमोल आहे.
एकदा का तुम्ही दुर्भाग्याचा आराखडा मोडून भाग्यामध्ये पाउल ठेवले कि परत तुम्ही तुमच्या मागच्या दुर्भाग्याच्या आयुष्यात परत जात नाही. जर विश्वास नसेल बसत तर फोर्ब्स मेगझीन मधील लोकांचे आजचे आयुष्य आणि एक एक वर्ष पाठी जात त्यांचा भूतकाळ बघा, तुम्हाला उत्तर भेटेल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार