"वजनदार" सर्वांनी आवर्जून बघावा असा मराठी सिनेमा


"वजनदार" सर्वांनी आवर्जून बघावा असा मराठी सिनेमा. आशय हा फार छान आहे.
तुमच्या शरीरयष्टीचा समोरच्या माणसावर नकारात्मक प्रभाव पडत नाही जो पर्यंत तुम्ही तुमच्याच शरीरयष्टी बद्दल नकारत्मक विचार करत नाहीत. माणसाचा आत्मविश्वास हा डोळ्यांमध्ये, शरीरावरच्या त्वचेमध्ये चकाकी च्या स्वरुपात दिसून येतो. ह्यानंतर त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात दिसून येतो. मग तुम्ही जाडे असू द्यात किंवा बारीक, उंच असू द्यात किंवा ठेंगणे, काळे असू द्यात किंवा गोरे ह्याच्याशी कुणालाच काहीही फरक नको पडायला.
तुम्हाला वाटते तर बारीक व्हायचा प्रयत्न करा पण कोणी दुसरा बोलत आहे किंवा आपला जोडीदारच बोलत आहे त्यासाठी प्रयत्न नका करू. तुमच्या सुख दुखांच्या भावनांना फक्त तुम्ही जबाबदार आहात बाकी दुसरे नाही.
माझ्या समुपदेशनादरम्यान आढळून आले कि स्त्री आणि पुरुष हे दोन्ही शारीरिक दृष्ट्या केलेली टीका टिपण्णी हि मनावर घेतात. पण जेव्हा प्रशिक्षण सुरु होत तेव्हा त्यांना समजून येते कि बारीक किंवा जाडे होणे महत्वाचे नसून तो प्रवास आणि आपल्या आयुष्याचा प्रवास हा ध्येय प्राप्त करण्यापेक्षा महत्वाचा आहे.
जितके तुमच्या शरीराचे वजन नसते त्यापेक्षा जास्त वजन तुम्ही तुमच्या मन आणि मेंदू मध्ये घेवून फिरत असतात. आणि तुमचे विचारणे पण अश्या लोकांना असते कि ते अजून तुमचा आत्मविश्वास कमी करतात व घाबरवून सोडतात.
ते मार्गही नको ते सुवतात. जे तुम्ही नकारात्मक भावनेने करत जातात व तुम्हाला पाहिजे तसा निकाल न भेटता अजून खचत जातात.
कधीही योग्य समुपदेशन आणि प्रशिक्षण घेतले कि आपण नकारात्मक विचारांचे वजन आणि शरीराचे वजन आरामात कमी करू शकतो.
निर्णय तुमचा आयुष्य तुमचे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार