आता जे ध्येय गाठले गेले आहे ह्याचा अर्थ असा नाही होत कि ते काल विचार केला आणि आज ध्येय गाठले. ह्यासाठी अनेक महिन्यांची, वर्षांची खडतर तपश्चर्या लागते.
४० वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध हावर्ड युनिवर्सिटी ने १९५३ साली आकडे काढायला सुरवात केली कि पदवीच्या शेवटच्या वर्षातील किती विद्यार्थ्यांनी आपले ध्येय स्पष्ट पणे लिहून ठेवले होते आणि ते ते साध्य करण्यासाठी योजनाही आखून ठेवली होती ह्यावर संशोधन करायचे ठरवले आणि माहिती गोळा करायला सुरवात केली. हे विद्यार्थी एका जगप्रसिद्ध युनिवर्सिटी मधले विश्वातील अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते, ह्यामुळे तुम्हाला वाटत असेल कि ह्यामधील सर्वच किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे उत्तर हे सकारात्मक असेल, बरोबर?
तुमचे उत्तर साफ चुकीचे आहे. वास्तवमध्ये संपूर्ण वर्गामधून फक्त ३ टक्के विद्यार्थ्यांनीच आपले ध्येय, स्वप्न लिहून ठेवले होते. आता ह्या संशोधनाचा महत्वाचा भाग सुरु होणार आहे. २० वर्षांच्या कालावधीनंतर संशोधकांनी परत ह्या विद्यार्थ्यांचे आकडे गोळा करायला सुरवात केली. ह्या मध्ये असे आढळून आले कि ज्या ३ टक्के विद्यार्थ्यांनी आपले ध्येय आणि स्वप्न लिहून ठेवली होती त्यांनी ९७ टक्के विद्यार्थ्यांनि कमावलेल्या एकूण संपत्ती पेक्षा जास्त संपत्ती कमावली होती. संशोधकांनी अजून एक नमूद केली होती कि हे ३ टक्के विद्यार्थी उरलेल्या ९७ टक्के विद्यार्थ्यांपैकी जास्त निरोगी आणि आनंदी होते.
मी जेव्हा तणावात गेल्यावर आयुष्यात सर्वांगीण अपयशी झाल्यावर जेव्हा आत्मविकासात गुंग झालो होतो तेव्हा हे संशोधन माझ्या नजरेस आले होते आणि त्यावेळेस मला समजले होते कि आपले ध्येय आणि स्वप्न पूर्ण करणे हे इतके सोपे होते.
मग मीही माझे ध्येय आणि स्वप्ने लिहून ठेवायला सुरवात केली. इतरांपेक्षा मला जास्त वेळ लागला पण ती ध्येय आणि स्वप्ने माझी पूर्ण झाली. तेव्हा मला जाणवले कि आपली ध्येय आणि स्वप्ने हि दररोज न चुकता लिहून ठेवणे हे काही महिन्यांनी किंवा वर्षांनी फळ देतेच.
जरुरी नाही कि तुम्ही माझ्यासारखीच ध्येय आणि स्वप्ने हि लिहून ठेवली पाहिजेत. प्रत्येक मनुष्य हा ह्या जगामध्ये विशेष असतो, त्याची ध्येय आणि स्वप्ने हि वेगवेगळी असतात, त्याच्या मानसिक आणि शारीरिक गरजाही ह्या वेगवेगळ्या असतात, आणि खाजगी आयुष्यातील ध्येय आणि स्वप्ने हि तज्ञ व्यक्तींशिवाय कधीच दुसऱ्या व्यक्तींना सांगायची नाही.
ह्या दररोजच्या छोट्याश्या कृतीद्वारे तुम्ही पाहिजे ते मिळवू शकता. आपली अनेक ध्येय आणि स्वप्ने हि पूर्ण करू शकता.
धन्यवाद
अश्विनीकुमार
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार