एका जंगलात एक बाळंतीन हरीणी बाळाला जन्मं देणार असते...
तिला बाळाला जन्म देण्यासाठी जागा भेटते. एक नदी वाहती नदी असते आणि तिच्या विरुद्ध बाजूला उंच वाढलेले सुकलेले गवत असते.
हरिणीच्या प्रसूती कळा सुरु होतात तेवढ्यात तिचे लक्ष्य हे समोरुण दबक्या पावलाने येणाऱ्या सिंहाकडे जाते....
पाठी फिरण्यासाठी जेव्हा मान फिरवते तेव्हा एक शिकारी तिच्यावर बाणाचा नेम धरून उभा असतो......
ती उंच वाढलेल्या सुकलेल्या गवताकडे बघतच तिथे वीज पडून आग लागते....
सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते...
तेवढ्यात सिंह झेप घेतो..... दुसरीकडे वीज हि शिकार्याच्या अंगावर पडते आणि त्याचा नेम चुकून सिंहाला लागतो.... आणि दोघेही मरतात.....तेवढ्यात जोरदार पाउस सुरु होतो आणि वणवा विझून जातो....
तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो...आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...
आणि या सगळ्या घटना घडत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या गोंडस हरणाला जन्मं देते...
बोध :
शिकारी, सिंह, हरीण आणि तिच्या पोटातील बाळ ह्यापैकी ज्यांची त्या परिस्थितीवर ताबा मिळवायची किंवा जगण्याची इच्छा जास्त त्याच्याच बाजूने परिस्थिती फिरते.
शिकारीला शिकार पाहिजे होती आणि सिंहालाहि भक्ष्य पाहिजे होते पण ते दोघेही आपल्या इच्छे सोबत एकरूप होऊ शकले नाहीत, पण ह्याउलट हरिणी ची इच्छा हि गोंडस बाळाला जन्म द्यायची होती आणि ती ह्या इच्छेसोबत एकरूप होती आणि बाळ हे नैसर्गिक रित्या जन्माला येण्याच्या इच्छे मध्ये होते त्यामुळे संपूर्ण परिस्थिती हि त्यांच्या बाजूने फिरली गेली.
आकर्षणाचा सिद्धांत हा निसर्ग नियमानुसारच काम करतो, तो निसर्ग ज्या मध्ये ब्रम्हांडाचे घटक आहेत तेच आपल्यामध्येही आहेत म्हणजे आपण निसर्ग आणि ब्रम्हांडाशी जुळलेलो आहोत. जो निसर्ग आणि ब्रम्हांडाशी एकरूप असतो तो असे चमत्कारिक आयुष्य जगत असतो.
निसर्ग आणि ब्रम्हांड कधीच भेदभाव करत नाही. त्याच्यासाठी सगळेच समान आहेत. आणि आत्मविकास आपल्याला परत ह्याच्याशी एकरूप करून देतो.
जर तुम्ही अश्या समस्यांनी ग्रस्त असाल तर तुम्हाला तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आत्मविकासाची गरज आहे.
आपन जर अश्या परिस्थितीतून गेला असाल तर nirvana.self.development@gmail.com इमेल वर नक्की शेअर कराल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार