भांडवलशाही - इथे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासून ते ते वयोवृद्ध मनुष्यापर्यंत सर्वकाही विकले जाते





हा फोटो काय दर्शवते? एक लहान मुलगी हातात कैची घेवून आपले पोट कापायला का निघाली? उत्तर तर तुमच्या समोरच आहे, फक्त दृष्टीकोन पाहिजे.
आजच्या युगात किंवा मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये सर्वकाही विकले जाते. मनुष्याच्या भावना सुद्धा. म्हणून एका हेल्थ ड्रिंक च्या जाहिरातीमध्ये आई आपल्या मुलाला प्रोस्ताहन देताना दिसते. त्यागोदर काय मुल यशस्वी होत नव्हती काय?
घर असतानाही एक दुचाकी किंवा चार चाकी गाडी घेताना संपूर्ण परिवार त्यामध्ये दाखवला जातो, ह्याचे कारण काय? लहान मुलांना काय समजते गाड्यांबद्दल?
टीव्ही वर सतत रंग रूपाने सुंदर मुली स्त्रिया आणि देखणे तरून किंवा पुरुष हे दाखवले जातात. हेच लहान मुल बघत असतात आणि त्याच वयात ते स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करायला लागतात.
मानसशास्त्राचा सोपा नियम आहे जर तरून मोठ्यांना गुलाम बनवायचे असेल तर त्यांना लहान पणापासून तेच संस्कार द्यावे लागतील. ठराविक धर्माचे संस्कार दिले तर मोठ्या पण तो स्वतहून ते प्रश्न विचारता अनुकरण करत जाईल. हेच राजकारण ह्याबाबतीतहि होते.
जर लहान पणापासून जाहिराती नाही दाखवल्यात, किंवा जाहिरातींमध्ये लहान मुलांचा वापर नाही केला तर भविष्यात उद्योग, व्यवसाय वाढणार कसा?
जर तुम्ही एका ब्रांड चे टूथ पेस्ट वापरत असतील आणि तीच सवय जर तुमच्या मुलांना लागेल, मधला तरून वयाचा थोडाफार काल सोडला तर परत ते तुमच्याच पेस्ट चे ब्रांड वापरायच्या मागे लागतील.
असेच इतर दररोजच्या वापरायच्या वस्तूंबरोबर होत असते. तुम्ही स्वतः थोडा तुमच्या आयुष्याचा अभ्यास केला तर समजेल.
एक जिंवत निरोगी मनुष्य हा आजच्या भांडवलशाहीच्या काळात निरुपयोगी आहे, पण एक नकारात्मक, रोगी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हा नफ्याचे साधन आहे. मग ते नुकतेच जन्मलेले बाळ असू देत किंवा मरणाला टेकलेला मनुष्य.
ह्याचे परिणाम हे खूपच भयंकर आणि दूरगामी आहे. अनु बॉम्ब च्या दुष्परिणामा पासून काही पिढ्यांमध्ये मुक्तता होऊ शकते पण हि जी मानसिकता भरवली आजत आहे त्यासाठी हजारो पिढ्यांचे बलिदान द्यावे लागेल.
लहान मुलांचे नाचायचे कार्यक्रम टीव्ही वर बघण्यापेक्षा आपल्या जवळपास कोणी लहान मुल असतील त्यांना मजा करताना, नाचताना आणि एक्टिंग करताना प्रत्यक्ष बघा, कारण हे वय त्यांचे परत येणारे नाही आहे आणि नाही जो व्हिडीओ बघून ती मजा तुम्हाला परत येणार आहे.
सासू-सून, सासरा-जावई हे जे मेकअप करून दाखवतात ते काही सत्य नाही आहे. वास्तवात दिसायला ते सामान्यच आहे, पण मेकअप इतका करतात कि जसे बुटांना पोलिश करून चमकवत आहोत आपण.
जे हिरो हिरोईन, मॉडेल ह्यांचे तुम्ही फोटो बघतात ते फोटोशॉप केलेले आहेत, वास्तव मध्ये त्यांचे शरीर हे स्थूल असते आणि अनेकदा हे वयोवृद्ध होवून सुद्धा ह्यांना तरून दाखवले जाते.
एकदा का तुमचे नाव झाले तर तुम्ही कितीही म्हातारे असू द्यात, लोकांना तुमचा तोच तरुणपनाचा चेहरा पाहिजे असतो. आणि हीच भांडवलशाही त्याचा पुरेपूर वापर करून तुम्हाला भ्रमात ठेवून स्वतःचा उद्योग व्यवसाय हा वाढवून घेते.
खेळ, सिनेमा व इतर मनोरंजक साधने हि फक्त मानसिक गुलामांना (सामान्य नागरिक किंवा मनुष्य) ह्यांना त्यांच्या समोर असलेल्या अडचणी विसरण्यासाठी वापरली जातात, जेणेकरून त्यांनी स्वतःबद्दल विचार नाही करावा आणि आपल्या मधील भावनिक उद्रेक हा सरकार, बडे उद्योजक आणि गुन्हेगार ह्यांच्या विरुध्द न होता तो त्यापुरताच झाला पाहिजे आणि तिथेच शमला पाहिजे.
आणि असे होतेही, लोक खेळातील हार जीत आणि सिनेमामधील हीरोचे जिंकणे बघून आपल्या भावना ह्या मुक्त करून टाकतो आणि परत आपल्या गुलामगिरीच्या आयुष्यात परत जातो.
अश्या अनेक घटना आहे तकी ज्या तुम्हाला सांगितल्या तर तुमचा ह्या माणुसकीवरचा विश्वास पूर्ण उडून जाईल. अश्या घटना ह्या तुमच्या ५० किंवा १०० किलोमीटर परिसरातही घडल्या असतील पण त्या सर्व दाबून टाकल्या जातात.
तो विषय इथे महत्वाचा नाही. मी काही सर्वांनाच जागृत करू शकत नाही आणि सामान्य मानसिकतेच्या लोकांना तर बिलकुलच नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याला मानसिक गुलामीतून मुक्त व्हायचे आहे तो होईल नाहीतर नाही.
हे आजचे वास्तव आहे, मी तो जितके सार्वजनिक ठिकाणी बोलू शकतो त्यानुसार मांडले आहे. मी इथे भांडवलशाहीला विरोध करत नाही आहे, मला माहित आहे तलावात रहायचे असेल तर मगरीसोबत वैर करू शकत नाही आणि हा परिस्थितीनुसार स्वतः मध्ये बदल घडवत जगण्याचा आणि जिवंत राहण्याचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार