कधी काळी इंटरनेट हा सामान्य लोकांचा आवाज होता ज्यावर गर्भ श्रीमंत, बेईमान आणि सत्ताधारी लोकांचा वावर नव्हता

कधी काळी इंटरनेट हा सामान्य लोकांचा आवाज होता ज्यावर गर्भ श्रीमंत, बेईमान आणि सत्ताधारी लोकांचा वावर नव्हता. आम्हाला त्यावेळेस २ मोठ्या सोशल नेटवर्किंग साईस्ट प्रमोट करायचे पैसे मिळायचे. एका जुन्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटची एकाधिकारशाही नव्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट ने मोडीस काढली. हे चालूच असते, कोणी येणार, कोणी जाणार.
भारतात सोशल नेटवर्क साईट ला जास्त मागणी ह्यासाठी आली की लोकांच्या भावना परंपरा, संस्कृती आणि जुने विचार ह्यामुळे ते साधे घरच्या जवळच्या लोकांसमोरही व्यक्त होऊ शकत नव्हते ते फेक अकाउंट बनवून आपले नाव लपवून व्यक्त होऊ लागले, आणि आता काळ बदलण्याने नाव आणि फोटोसकट व्यक्त होऊ लागलेत. सामान्य लोक इंटरनेट आणि सोशल नेटवर्क चा गर्भ श्रीमंत, सत्ताधारी आणि बेईमान लोकांविरुद्ध वापर करू लागली.
ह्याची चुणूक ह्या ताकदवर श्रीमंत लोकांना लागली, ज्याच्याकडे पैश्यासोबत सत्ता आहे तो काही मूर्ख नाही आहे. शालेय शिक्षणात जरी ते शून्य असतील किंवा पैसे देऊन पास झाले असतील तरी आयुष्याच्या शिक्षणात ते उच्च शिक्षित असतात. आणि ह्या सोशल नेटवर्क चे मालक पण फक्त पैसा कमावण्यासाठी बसले असतात. सत्ताधारी श्रीमंत पैसे देऊन आपला प्रचार, आपले खोटे कसे खरे आहे, सत्य पूर्णपणे दडपून टाकायचे आणि सत्य असलेच तरी फक्त मनोरंजन पोहचू द्यायचे लोकांपर्यंत.
जी कमजोर मानसिकतेची लोक असतात ज्यांना सामान्य, मध्यम वर्गीय (लाचार) समजूया ज्यांना प्रत्येक वेळेस मदतीची गरज असते ते एक विशिष्ट विचारसरणीकडे (धर्म, देश, प्रदेश, भाषा, राहणीमान व इतर) किंवा जे काही समूह बांधण्यासाठी गरजेचे असते (ह्याला शास्त्रीय म्हणजेच वैज्ञानिकांच्या भाषेत ब्रेनवॉश म्हणतो) अश्या परिस्थिती कडे आकर्षित होतात.
ते काही विचार न करता आंधळेपणाने नैतृत्व बोलेल ते करतात आणि त्यांच्या मुलांनी जर मर्यादा ओलांडायची बोलले तर त्यांनाच पाय त्यांच्या आई वडील, मित्र मंडळी यांच्याकडून जोरदार खेचले जातात म्हणून सगळ्या आत्मविकासाच्या पुस्तकात (गीता, कुराण, बायबल व इतर धर्मीय धार्मिक पुस्तके ही पण आत्मविकासाची पुस्तके आहे, फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे आणि काय घेतले पाहिजे काय सोडले पाहिजे हे समजायला हवे. मी "नास्तिक" आहे हे तुमच्या माहितीकरता इथे नमूद करतो).
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मानसिक दृष्ट्या सक्षम लोक आदरयुक्त असतात, पण त्यांचा गैरफायदा घेतला की ते पहिल्याच चुकीमध्ये शहाणे होतात किंवा समोरच्याला सोडत नाही कारण त्यांना माहीत असते की एकाने गैरफायदा घेतला आणि त्याला माफ केले तर बाकीचे पण गैरफायदा घेऊ शकतात, आणि समाजात तुमचा दरारा गेला की लोक तुम्हाला इज्जत देत नाही.
असो हा सामाजिक इतिहासाचा अभ्यास संशोधन, आत्मविकास आणि मानसशास्त्राचा भाग थोडा बाजूला ठेवूया आणि मूळ मुद्द्याकडे येउया. आता जेव्हा तुम्ही बघाल तर सामान्य लोकांचे हत्यार इंटरनेट आणि सोशल नेटवर्क हे आता संपूर्णपणे भांडवलशाही, सत्ताधारी लोकांच्या हातात गेले आहे. आता फक्त मनोरंजनासाठी ह्याचा उपयोग होत आहे. त्यांच्या प्रत्येक जाहिरातीला लाखोंच्या वर लाईक आहेत आणि हे लाईक पण काही वेळेतच भेटतात.
काळ कुठचाही असू द्यात, वर्चस्व फक्त आणि फक्त श्रीमंत आणि सत्ताधारी यांचेच राहिले आहे. जगामधील मीडिया आणि भारतामधील 70 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मीडिया ही एकाच्या मालकीची आहे. ह्याला बोलतात अप्रत्यक्ष हुकूमशाही. जगातील कुठल्याही देशामध्ये जा, तिथे सामान्य लोकांची संख्या ही लाखो आणि करोडोंमध्ये असते, तुम्ही पण इतक्या मोठ्या समूहाला ताब्यात ठेवू शकता कारण ह्या सामान्य लोकांच्या समूहाला नेहमीच एक नैतृत्व लागते आणि तुम्ही त्या नैतृत्वाला काबूत केले की आपोआपच हा संपूर्ण समूह तुमच्या ताब्यात येईल. समूहाचं नाही तर त्यांच्या सात पिढ्यासुद्धा, कारण त्यांनी त्यांच्या मुलांना लहानपणापासून तीच शिकवण दिलेली असते.
एक सामान्य उद्योजक, व्यवसायिक ह्याला त्याच्या पेज किंवा पोस्ट ला लाईक मिळवायला खूप मेहनत करावी लागते तेच श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांना अजिबात मेहनत करावी लागत नाही कारण त्यांचे भावनिक भक्त जे लाखोंच्या संख्येत असतात तेच त्यांचे पोस्ट पसरवतात आणि त्या पोस्ट आपोआप करोडो लोकांपर्यंत पोहचतात. म्हणजे एकाठिकाणी मोठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या जिथे सामान्यांना काही स्थान नाही आणि स्थान मिळवायचे असलेच तर तुमच्याकडे तितका पैसा पाहिजे किंवा तुमच्या कडून काहीतरी फायदा झाला पाहिजे भले मग तो फायदा तुमच्या मृत्यूपासून का होईना. आणि दुसरीकडे फक्त इंटरनेट कनेक्शन पाहिजे जे खूप स्वस्त असते आणि खूप कमी गुंतवणुकीमध्ये उत्तम मार्केटिंग आणि विक्री करता येते. ग्राहकांपर्यंत थेट संपर्क होतो. हे झाले फायदे.
समुद्रात पोहायचे म्हंटले की छोटे मासे पण येणार आणि शार्क मासे पण येणार पण आयुष्यामधील शार्क मासे हे देवमाशाच्या आकाराचे असतात त्यांना सोबत म्हणून पिरान्हा सारखे भक्त मासे सरंक्षणासाठी असतात. तुमचे एक उत्तम दर्जाचे उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे दुय्यम दर्जाचे उत्पादन जे टीव्ही, वृत्तपत्र, सार्वजनिक मोक्याच्या ठिकाणी लागलेले जाहिरातींचे फरक अधिक इंटरनेट द्वारे सरळ ग्राहकांसोबत संपर्क त्याच्यात भर म्हणून त्यांनी पैसे देऊन उभे केलेले भक्तगण अशी स्पर्धा असते. आता तुम्ही सांगा जिंकणार कोण?
ह्याला पर्याय आहे, जिथे एक प्रश्न तिथे हजार उत्तर, जिथे एक समस्या तिथे हजार समाधान. आपले प्रत्येक क्लिक, लाईक आणि शेअर हे सोशल नेटवर्किंग साईट वरून ट्रेक केले जाते. ती सगळी माहिती गोळा करून ठेवतात आणि आता ही ट्रेकिंग सिस्टिम इतकी पुढे गेली आहे की ती तुमच्या संपूर्ण ब्राऊजर वर नजर ठेवून असते. जे तुम्ही लाईक करता किंवा नुसते बघता तरी तेच उत्पादन दुसऱ्या वेब पेज वर दिसून येते. एक प्रकारे तुमच्यावर लक्ष्य ठेवून आहे, जासूसी चालू आहे, ही उद्योग जगतातील काळी बाजू, अश्या अनके रक्ताने माखलेल्या बाजू पण आहेत, जो हाडाचा उद्योजक आहे त्याला मी काय बोलत आहे हे समजले असेल.
ही ट्रेकिंग तुम्ही मोडू शकता, दिशाही बदलू शकता, जो हे करू शकतो तो इंटरनेट वर करोडो रुपये कमावून घेऊन जाऊ शकतो. तुमच्या लाईक, शेअर आणि क्लिक वर ताबा मिळवून, पण हा ताबा मिळवायचा कसा? कारण ते इतक्या सुंदर जाहिराती काढतात की काय बोलायचे, सामान्य मानसिकतेचा मनुष्य आरामात फसून जातो, आणि भावनिक मुद्दे असतील तर त्याच्या प्रत्येक लाईक्स, क्लिक, कंमेंट्स आणि शेअरिंग हे त्या व्यक्तीला किंवा त्याच्या विरोधातील व्यक्तीला प्रसिद्धी देत असतात.
हेच आपले लाईक्स, क्लिक्स, कमेंट्स आणि शेअरिंग जर आपण आपल्या उद्योजक, व्यावसायिकाला दिले तर तो आपल्या मधील एक आपला उद्योग, व्यवसाय वाढवू शकतो. हेच जर नाव उद्योजकांसाठी केले तर त्यांचा उद्योग लवकर भरभराटीला येऊ शकतो. आपल्याकडे असलेल्या कल्पना, सूचना किंवा सल्ला त्याला दिला तर त्याचा खूप फायदा होईल.
समाजसेवा फक्त पैसा आणि वेळ देऊन नाही करता येत आणि फक्त गरिबांना, पीडित, आजारी लोकांना मदत लागते हे मन मेंदूतून काढून टाका. तुम्ही कोणत्याही उच्च पदावर राहा ते ज्ञान सुद्धा तुम्ही दान करू शकता. ज्या परंपरागत समाजससेवेच्या मर्यादा चालत आल्या आहेत त्याच्या मर्यादा वाढवा. हे तुम्ही जगभरातील अविकसित देशांपर्यंत आपले कौशल्याचे दान पोहचवू शकता.
आपल्या मन मेंदूतील फिल्टर काढून हा लेख वाचाल. जर तुम्ही विशिष्ट फिल्टर लावून वाचत असाल तर तुम्हाला काहीच समजणार नाही आणि कदाचित तुम्ही नकारात्मक अर्थ घेवू शकता. मी एक मनुष्य प्राणी आहे आणि ज्या नैसर्गिक गरजा जगातील सर्व मनुष्य प्राण्याला लागू आहेत त्या मलाही लागू आहे. असा विचार जरी तुम्ही केला तरी ९९ टक्के तणावापासून तुम्ही मुक्त होऊ शकता ह्याची मी हमी देतो.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार